Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

Disaster Management --Objectives (आपत्ती व्यवस्थापन )

STD Notes For BA-I Semester-II (Module-I ) अचानक येणारे संकट म्हणजे आपत्ती होय. आपत्ती ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित अश्या दोन प्रकारची असते. बदलत्या काळात काही आपत्ती या मिश्र स्वरूपाच्या आहेत. नैसर्गिक आपत्ती या निसर्गाचा अपरिहार्य भाग आहेत तर मानवनिर्मित आपत्ती मुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. व्यवस्थापन करतांना मानवनिर्मित आपत्ती टाळणे आणि नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान कमींत कमी करणे अपेक्षित असते. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसैर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती मुळे होणारे नुकसान कमीत कमी करण्या साठी केल्या जाणाऱ्या विविध स्तरातील उपाययोजना होत. आपत्ती चे तीन पातळीवर व्यवस्थापन करता येते. १) प्रतिबंधात्मक (आपत्ती येण्या पूर्वी ) २) उपचरात्मक (आपत्तीच्या दरम्यान ) ३)उपाययोजनात्मक (आपत्ती येऊन गेल्या नंतर ) जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लहरी" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे भूकवचाखा...