Skip to main content

Posts

Showing posts with the label Mixed Research: Meaning and Characteristics

Mixed Research[मिश्र संशोधन]

  मिश्र संशोधन : अर्थ आणि वैशिष्टे   I. प्रस्तावना - सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये गुणात्मक व संख्यात्मक संशोधनपद्धतीनंतर अलीकडच्या काळात मिश्र संशोधन पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात  केला जात आहे.ही पद्धत जरी नवी असली तरी ती संशोधनाच्या क्षेत्रात हळूवारपणे मोठ्या प्रमाणात स्वीकारली  जात आहे. की या मिश्र संशोधन पद्धतीला समिश्र (Composite), संकरित (Hybrid) संशोधन पद्धती अशा नावांनी  सुद्धा ओळखले जाते .एकाच अभ्यासामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक (परिमाणात्मक) संशोधन पद्धतीचे  एकत्रीकरण करून जी तिसरी संशोधन पद्धती अस्तित्वात  येते ती म्हणजे मिश्र संशोधन पद्धती होय. हि संशोधन पद्धत गुणात्मक व संख्यात्मक संशोधनपद्धतीच्या  दोन्ही दृष्टिकोनांच्यामध्ये असलेल्या उपयुक्त  वैशिष्ट्यांच्या सामर्थ्याचा आधार  घेऊन संशोधन समस्येची अधिक व्यापक  स्वरुपात अभ्यास केला जातो की जे  प्रत्येक स्वंतत्र अशा संशोधन (गुणात्मक व संख्यात्मक) पद्धतीमध्ये जे करता येत नाही ते या मिश्र संशोधन पद्धती मध्ये केले जाते. II. अर्थ- मिश्र संशोधन पद्धत आपणास ...