भारतातील आदिवासी समाज आदिवासी ' हा शब्द भारतीय संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर आदिवासी समाज हा आधुनिक जगापासून काहीसा अलिप्त , स्वतःची स्वतंत्र संस्कृती आणि सामाजिक संरचना जपणारा गट मानला जातो. आदिवासी: समाजशास्त्रीय अर्थ समाजशास्त्रानुसार , ' आदिवासी ' म्हणजे असा मानवी समूह जो एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहतो , ज्यांची स्वतःची एक स्वतंत्र बोलीभाषा आहे आणि ज्यांची सामाजिक , राजकीय व आर्थिक व्यवस्था आधुनिक समाजापेक्षा वेगळी आहे. समाजशास्त्रीय भाषेत त्यांना अनेकदा ' जमात ' ( Tribe ) असेही संबोधले जाते. ' आदिवासी ' या शब्दाचा शब्दशः अर्थ ' मूळ रहिवासी ' (Original Inhabitants ) असा होतो. प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या वेगवेगळ्या विद्वानांनी आदिवासी किंवा ' जमात ' या संकल्पनेची व्याख्या आपल्या अभ्यासानुसार केली आहे: डॉ. डी. एन. मजुमदार :- " आदिवासी जमात म्हणजे असा कुटुंब समूह की ज्यांचे एक सामान्य नाव असते , जे एका निश्चित प्रदेशात राहतात , ज्यांची भाषा एक असते आणि लग्नाविषयी किंवा व्यवसायाव...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.