संशोधन आराखडा ( Research Design) प्रस्तावना: सामाजिक शास्त्रात संशोधन करण्याच्या प्रक्रियेत आराखड्या शिवाय वस्तुनिष्टता बाळगणे शक्य नाही. सामजिक संशोधन करतांना नमुना कोणता असेल ? तथ्य कोणती असतील आणि संकलनाची पद्धत काय असेल ? इत्यादी बाबतचे निर्णय संशोधन करण्यापूर्वीच संशोधन आराखड्यात निश्चित केले जातात. संशोधन करतांना कोणत्या समस्या येतील त्याचे निराकरण कसे करायचे याचा विचार संशोधनात केला जातो. संशोधन आराखड्याची उपयुक्तता स्पष्ट करताना आल्फ्रेड यांनी म्हटले की , " संशोधनाच्या संशोधनाची निर्मिती प्रस्तावित अध्ययनाच्या उपयुक्ततेस स्पष्ट करते. आणि पद्धती संबंधी प्रमुख समस्यांच्या निराकरणासाठी सहाय्यता पोहचविली जाते. संशोधन आराखड्याचा अर्थ: (Meaning and Definitions of Research Design) ( १) सेल्टिज , जोड़ा , डॉइश व कूक: “ संशोधनाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निष्कर्षाची संबंद्धता आणि संशोधन कार्यातील मित्त्ववेयता यांची सांगड घालता देण्याच्या दृष्टीने तथ्याचे संकलन आणि विश्लेषण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटीची नियोजित व्यवस्था ...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.