घटक क्रमांक दोन नेतृत्व , सामाजिक चळवळ व सामाजिक परिवर्तन Ø किंबाल यंग च्या मते, समाजातील लोकांच्या मनोवृत्ती प्रभावित करण्याचे काम करण्यास नेतृत्व असे म्हणतात. पिटर ड्रकर च्या मते, “नेतृत्व म्हणजे व्यक्तीने आपला दृष्टिकोन उच्च स्तराला पोचविणे व आपले व्यक्तिमत्त्व सर्वसाधारण मर्यादेपलीकडे नेणे होय.” Ø लीपईयर व फ्रान्सवरच्या मते, “नेतृत्व म्हणजे स्वतःच्या वर्तनाने इतरांवर प्रभाव टाकने पण स्वतः इतरांच्या वर्तनाने प्रभावित न होणे होय”. Ø मॅकआयव्ह्रर व पेज, “नेतृत्व म्हणजे कोणत्याही अधिकारा शिवाय केवळ स्व गुणाच्या बळावर इतरांना निर्देश करण्याची किंवा मन वळविण्याची क्षमता होय.” Ø नेतृत्व केवळ निष्क्रिय व्यवस्था नसून अनेक गुणांचा समुच्चय असतो. Ø औपचारिक नेतृत्व हे खरे नेतृत्व नसते किंवा ते नेतृत्व होऊ शकत नाही Ø हायथ्रोन ( 1956 )च्या मतानुसार , नेत्यांचे वागणे कार्यशैली इत्यादी बाबी या समूहातील सर्व सदस्यांच्या समूह मनाच्या कल ठरवीत असतात. Ø समाजाच्या पेचप्रसंगातून ...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.