संख्यात्मक संशोधन अर्थ आणि वैशिष्टे संख्यात्मक स्वरूपाच्या संशोधनात संख्याशास्त्रीय आधार असल्यामुळे व्यक्तीनिष्ठतेचा दोष आढळून येत नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचे संशोधन उच्च प्रतीचे मानले जाते. पण संख्यात्मक संशोधनातून समाजातील मानवी वर्तन , भावभावना यांचे अचूक आकलन होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सामाजिक शास्त्रातील संशोधनात संख्यात्मक व गुणात्मक संशोधनाचा समन्वय साधणे आवश्यक असते. संख्यात्मक पद्धतीशास्त्र हे प्रत्यक्षवाद आणि नव प्रत्यक्षवाद यावर आधारित आहे. शतकांपासून सामाजिक विज्ञानाच्या संशोधन पद्धतीसाठी प्रमाणित कार्यप्रणाली त्याची संरचना , प्रक्रिया आणि सैद्धांतिक पार्श्वभूमी आणि विकासासाठी तो आधार आहे. संख्यात्मक संशोधनाची सैद्धांतिक तत्वे प्रमाणित आहेत. ती पुढीलप्रमाणे: संख्यात्मक संशोधांच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे: १) कोहन यांच्या मते , ' संख्यात्मक संशोधन म्हणजे सामाजिक संशोधनात प्रायोगिक पद्धती व प्रायोगिक विधाने यांचा वापर करणे होय '. २) क्रिसवेल यांच्या मते , संख्यात्मक संशोधन हा संशोधनाचा एक प्रकार असून यामध्ये घटनांच्या स्पष्टीकरणाद्वारे सा...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.