घटक क्रमांक तीन भारतातील पारंपारिक सामाजिक चळवळी Ø अ)ब्राह्मो समाज: Ø राजा राममोहन राय यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना बंगाल येथे इ.स. १८२८ मध्ये केली. Ø राजा राम मोहन राय यांना राजा ही पदवी ब्रिटिशांकडून बहाल करण्यात आली. Ø राजा राम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजाचे नेतृत्व केले. देवेंद्रनाथ टागोर यांनी १८३८ रोजी ब्राम्हो समाज मध्ये प्रवेश केला. Ø राजा राममोहन रॉय यांनी हिंदू धर्माचा अभ्यास करण्यासाठी १८२६ मध्ये वेदांचा अभ्यास करणारे ‘वेदांत महाविद्यालय’ स्थापन केले. Ø हिंदू समाजाला इंग्रजी शिक्षण देण्यासाठी १८१७ साली ‘हिंदू कॉलेज’ ची स्थापना केली. Ø ब्राह्मो समाज द्वारे स्त्री शिक्षणासाठी आग्रही होता म्हणून त्यांनी नॉर्मल स्कूल व विक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली. Ø ब्राम्हो समाजाच्या प्रयत्नाने लॉर्ड बेटिंग यांच्या सहकार्याने १८२९ साली सती प्रथा विरोधी कायदा आला. Ø ब्राम्हो समाजाचे तत्वज्ञान : Ø परमेश्वर एकच असून तो निर्गुण आणि निराकार सर्वव्यापी आहे. Ø मूर...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.