मुलाखत Interview मुलाखतीचा अर्थ ( Meaning of Interview) सेल्टिज , जहोडा , डवाइश आणि कूक यांनी Research Methods in Social Relation' या ग्रंथात पृष्ठ क्रमांक २३६ वर जी. डब्लू. ऑलपोर्ट ( G.W.Allport) यांचे एक विधान नमूद केले आहे. हे विधान मुलाखतीचे महत्त्व प्रतिपादन करणारे आहे. जी. डब्लूय ऑलपोर्टच्या मते , “ जर तुम्हाला लोकांच्या भावनाबद्दल अनुभवाबद्दल त्यांच्या स्मरणशक्तीबद्दल त्यांच्या संवेग आणि प्रेरणाबद्दल काही जाणून घ्यावयाची इच्छा असेल तर तुम्ही त्याबद्दल त्यांनाच का विचारीत नाही." ( If we want to know how people fell, what they experience and what they remember, what their emotions and motives and like, and the reasons for acting, as they do why do not ask them? G. W. Allport ) व्याख्या ( Definitions) (१) गुड आणि हॅट ( Good and Hatt) “ मुलाखात मूळ रूपात सामाजिक आंतरक्रियेची एक प्रक्रिया आहे. ' )( Interview is fundametally a process of Social Interaction - Goode and Hatt) (२) एम. एन. बसू ( M.N. Basu) " मुलाखतीची अशी व्याख्या करता येईल की , काही विषयावर ...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.