Indian Rural Community Module-02 भारतीय ग्रामीण समुदाय ग्रामीण समुदायाचा अर्थ : १) त्रि.ना. अत्रे (गावगाडा ):-“खेडणे म्हणजे जमीन कसणे, खेडूत म्हणजे जमीन कसणारा खेडूताची जी वस्ती खेडे म्हणजे गावडे होय.ज्या भरण्याची वस्ती शेतकर्याची असते.” २) पुराण ग्रंथ : “जिच्या सभोवती किर्दसार -वहतीला योग्य जमीन आहे व जिच्या भोवती मात्तबर शेतकरी व पुष्कळसे मजूर आहेत,अश्या वस्तीला गाव म्हणतात.” ३) राधाकमल मुखर्जी :”खेडे म्हणजे असा मानवी समूह कि, ज्याच्या ठिकाणी सापेक्ष अशी सांस्कृतिक व सामाजिक साम्ये आढळतात, ज्यांचे स्वरूप अनौपचारिक व प्राथमिक समूहा सारखे असते. तेथे लोकसंख्येची घनता कमी असून शेती हा प्रमुख व्यवसाय असतो.” ४) हेरॉल्ड पिक :- “ ग्रामीण समुदायात अश्या परस्परसंबंधीत किंवा असबंधित व्यक्तीच्या समुहाचा अंतर्भाव होतो, जो एका मोठ्या कुटुंबा पेक्षा मोठा आहे, त्या व्यक्तीची घरे अगदी जवळजवळ किवा अनियमित वसलेली आहेत. या समुदायाच्या कृषी योग्य जमिनीवर शेती केली जाते व सभोवतालच्या पडीक जमिनीवर गुरे चारली जातात. शेजारच्या सिमेपर्यंत पसरलेल्या कृषी योग्य व पडीक जमिनीवर त्या समुदायाच्...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.