घटक क्रमांक तीन
भारतातील पारंपारिक सामाजिक
चळवळी
Ø अ)ब्राह्मो समाज:
Ø राजा राममोहन राय यांनी ब्राम्हो
समाजाची स्थापना बंगाल येथे इ.स. १८२८ मध्ये केली.
Ø राजा राम मोहन राय यांना राजा ही पदवी
ब्रिटिशांकडून बहाल करण्यात आली.
Ø राजा राम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर
देवेंद्रनाथ टागोर व केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाजाचे नेतृत्व केले. देवेंद्रनाथ
टागोर यांनी १८३८ रोजी ब्राम्हो समाज मध्ये प्रवेश केला.
Ø राजा राममोहन रॉय यांनी हिंदू धर्माचा
अभ्यास करण्यासाठी १८२६ मध्ये वेदांचा अभ्यास करणारे ‘वेदांत महाविद्यालय’ स्थापन केले.
Ø हिंदू समाजाला इंग्रजी शिक्षण
देण्यासाठी १८१७ साली ‘हिंदू कॉलेज’ ची
स्थापना केली.
Ø ब्राह्मो समाज द्वारे स्त्री
शिक्षणासाठी आग्रही होता म्हणून त्यांनी नॉर्मल स्कूल व विक्टोरिया इन्स्टिट्यूटची
स्थापना केली.
Ø ब्राम्हो समाजाच्या प्रयत्नाने लॉर्ड
बेटिंग यांच्या सहकार्याने १८२९ साली सती
प्रथा विरोधी कायदा आला.
Ø ब्राम्हो समाजाचे तत्वज्ञान :
Ø परमेश्वर एकच असून तो निर्गुण आणि
निराकार सर्वव्यापी आहे.
Ø मूर्तिपूजा कर्मकांड अनेक ईश्वरवाद
अमान्य आहे .
Ø ब्राह्मण समाजाने मानवतावादाचा
पुरस्कार करून चारित्र्य नैतिकता सद्गुण यावर विशेष भर दिला.
Ø ब्राह्मो समाजाचे सभासदत्व स्त्रियांना
सुद्धा भेटले पाहिजे.
Ø ब्राह्मो समाज ब्राह्मो समाज
बहुपत्नीत्व सतीची चाल बालविवाह इत्यादी स्त्रियांविषयी च्या अनिष्ट प्रतीच्या
विरोधी होता.
Ø ब्राम्हो समाजात सर्व जाती धर्माच्या
व्यक्तीला प्रवेश असे.
o ब्राम्हो समाजाचे कार्ये :-
Ø १)ब्राह्मो समाज द्वारे प्रत्येक
शनिवारी सायंकाळी समाजातील लोकांना एकत्र करून उपनिषदाच्या बंगाली भाषेतील
प्रवचनांचे वाचन केले जाईल.
Ø २)ब्राह्मो समाजाच्या प्रचारासाठी तर ‘तत्वबोधिनी’
पत्रिका प्रकाशित करण्यात आली. या
पत्रिकेचे काम केशवचंद्र सेन यांनी चालवले.
Ø ३)जातीभेद निर्मूलनाचे कार्य करणे .
Ø ब)प्रार्थना समाज :
Ø केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजमधून बाहेर पडल्यानंतर डॉ. आत्माराम तर्खडकर यांच्या
प्रेरणेने १८६७ मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली.
Ø प्रार्थना समाजा मध्ये न्यायमूर्ती
चंदावरकर, न्यायमूर्ती रानडे रा गो भांडारकर दादोबा तरखडकर इत्यादींचे महत्त्वाचे
योगदान होते.
Ø महिलांच्या हिताला अनुसरून ‘आर्य महिला
समाज’ ही सामाजिक संस्था प्रार्थना समाज याद्वारे स्थापन करण्यात आली यामध्ये
पंडिता रमाबाई यांचे योगदान महत्त्वाचे होते
Ø प्रार्थना समाजाच्या कार्याला विठ्ठल
रामजी शिंदे, नामदार गोखले न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई, नाम जोशी, गोपाळ
कृष्ण गोखले, भांडारकर, चंदावरकर, इत्यादींनी विशेष योगदान दिले.
Ø आर्य समाजाच्या द्वारे विधवाविवाह
संघाची स्थापना करण्यात आली.
Ø धार्मिक मतभेदाच्या ऐवजी सामाजिक चळवळ
निर्माण करणे व अनिष्ट प्रथांचे निर्मूलन करणे हे महत्त्वाचे कार्य हाती घेण्यात
आले होते.
Ø प्रार्थना समाजाची वैशिष्ट्ये:
Ø जातीभेद नष्ट करणे
Ø स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणे.
Ø विधवा पुनर्विवाहाला प्राधान्य देणे.
Ø स्त्री-पुरुष विवाहाचे वय वाढविणे.
Ø प्रार्थना समाजाचे तत्वज्ञान:
Ø परमेश्वर हा एकच असून तो विश्व
निर्माता आहे.
Ø मानवाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे.
Ø ३)परमेश्वराला आपलेसे करण्यासाठी
उपासना भक्ती सदाचार आणि सत्व या तत्त्वांचा अंगीकार केला पाहिजे.
Ø प्रार्थना करण्याचे करण्याने
अध्यात्मिक प्रगती होते.
Ø परमेश्वराला मुर्तीपुजा मान्य नाही पण
आपण सर्व इशारा ईश्वराची लेकरे आहोत.
Ø अपंग व अनाथ मुलांच्या सेवेसाठी
पंढरपूर येथे आश्रम उभा केला.
Ø ७)विधवा विवाह स्त्री शिक्षण बालविवाह
पडदा पद्धती आंतरजातीय विवाह इत्यादीं ना प्रोत्साहन दिले पाहिजे
Ø प्रार्थना समाजाची शिकवण:
Ø एकेश्वरवाद
Ø मूर्तिपूजा अवतार कल्पना अमान्य
Ø भक्ती भावपूर्वक प्रार्थनेचे महत्त्व
Ø आदर्श मूल्यांचे पालन
Ø अन्यायी अनिष्ट दृष्ट प्रथांचा निषेध
Ø प्रार्थना समाजाची साप्ताहिक उपासना:
Ø उद्बोधन
Ø स्तवन
Ø कृतज्ञता
Ø दर्शन
Ø प्रार्थना
Ø निरूपण
Ø प्रार्थना व आरती
Ø ०४ मे१८७३ रोजी ‘सुबोध पत्रिका’ नावाचे
प्रार्थना समाजाचे मुखपत्र सुरू झाले. त्याचे ब्रीदवाक्य ‘सत्यमेव जयते’ हे होते.
सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी अनाथ स्त्रिया व मुले यांच्या संदर्भात समाजाने
विशेष काम केले.
Ø १८७२ मध्ये त्यासाठी बॉम्बे थीईस्टीक असोसिएशनची स्थापना केली.
Ø १८७६ ला भि ल चव्हाण यांनी मुंबई रात्र
शाळा सुरू केली.
Ø विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड
क्लासेस मिशनची स्थापना केली.
Ø ना म जोशी यांनी सोशल सर्विस लीग ही
कामगारांसाठी ची संस्था सुरू केली तर राजकीय कार्यासाठी भारत सेवक समाज हा राजकीय
पक्ष सुरू करण्यात आला.
Ø क)आर्य समाज:-
Ø स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या
ठिकाणी १८७५ साली आर्य समाजाची स्थापना केली.
Ø स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव
मूळशंकर हे होते.
Ø स्वामी दयानंद सरस्वती यांनी मथुरा
येथे वेदांचा अभ्यास केला.
Ø आर्य समाजाने शैक्षणिक क्षेत्रात व
धार्मिक क्षेत्रात शुद्धीकरण चळवळ चालवली.
Ø शैक्षणिक क्षेत्रामध्ये ‘गुरुकुल’
योजना, वेदांचा प्रचार करण्यासाठी ‘दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची’ स्थापना केली.
महाराष्ट्रातील मुंबई कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी शैक्षणिक संस्था सुरू केल्या.
Ø स्वामी दयानंद सरस्वती यांच्या
व्याख्यानाचे सारस स्वरूप ज्या ग्रंथांमध्ये प्रकाशित झाले त्याचे नाव “सत्यार्थप्रकाश”
असे आहे.
Ø ब्रिटिश काळात आर्य समाजाचे मुख्य
केंद्र हे मुंबई नंतर लाहोर होते.
Ø आर्य समाजाने हिंदू धर्मातून इतर
धर्मात प्रवेशित केलेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांच्या
शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली.
Ø आर्य समाजाची तत्त्वे:
Ø परमेश्वर हा निर्गुण, निराकार, दयाळू, अनंत,
सर्वस्पर्शी, शक्तिमान आहे.
Ø दोन प्रत्येकाने स्वतःच्या उन्नती पेक्षा
सर्वांच्या उन्नतीसाठी झटले पाहिजे.
Ø अविद्या मुळे सर्वनाश होतो त्यामुळे शिक्षण
घेतले पाहिजे.
Ø मनुष्याने सत्याचा विचार करून वर्तन करावे.
Ø प्रत्येकाने सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करावा.
Ø वेदांचा अभ्यास करून इतरांनाही शिकविणे व
वेदांकडे चला असा संदेश दिला पाहिजे. प्रत्येकाने इतरांसोबत प्रेमपूर्वक व
धर्मानुसार वर्तन करावे.
Ø आर्य समाजाची शिकवण:
Ø ०१)ईश्वर हा एकच आहे.
Ø ०२)तो विश्वाचा निर्माता आहे.
Ø ०३) मूर्तिपूजा अमान्य आहे.
Ø ०४) समाजात कोणतेही भेदभाव कर्मकांड
पुरोहितशाही नसेल पाहिजे.
Ø ०५) हिंदू धर्माचे खरे तत्त्वज्ञान आहे
मानवतावादी तत्वज्ञान आहे.
Ø ०६) वेदांचे अध्ययन केल्याने ते
आपल्याला प्राप्त करता येईल.
Ø ०७) समाज सुधारणा विषयक कार्य.
Ø ०८) आर्य समाजाने वेदांचा अभ्यास
करण्यासाठी गुरुकुल, संस्कृत शाळा सुरू केल्या.
Ø ०९) याशिवाय पाश्चात्य पद्धतीच्या
शिक्षणासाठी इंग्रजी महाविद्यालय देखील सुरू केले.
Ø १०)स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार
घेतला.
Ø ११)विधवा विवाहाचा पुरस्कार केला.
Ø १२) स्त्रियांच्या वेद अभ्यासा साठी आग्रह धरला
Ø १३)जातिभेद निर्मूलन, शुद्धीकरणाची
चळवळ, कल्याणकारी जनसेवा, इत्यादी कार्य त्यांनी केले.
Ø ड) सत्यशोधक समाज:
Ø महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24
सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
Ø सत्यशोधक समाजाच्या स्थापना आणि
प्रचारामध्ये कृष्णराव भालेराव भालेकर डॉ. विश्राम घुले मारुतराव नरवळे, डॉ.
संतूजी लाड, नारायण लोखंडे इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे.
Ø सत्यशोधक धर्म हा ब्राह्मणेत्तर धर्म
म्हणूनही ओळखला जातो.
Ø ब्राह्मणांच्या शिवाय कोणताही विधी
म्हणजेच धार्मिक विधी पार पाडणे यास सत्यशोधक समाजामध्ये महत्त्वाचे स्थान होते.
Ø १८९० मध्ये महात्मा फुले यांचा मृत्यू
झाल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी ही चळवळ पुढे नेली. १८९० नंतर छत्रपती शाहू
महाराजांचे सत्यशोधक समाज वाढ आणि विकास यामध्ये मोठे बळ मिळाले.
Ø कोल्हापुरातील सत्यशोधक चळवळ स्थापन
करण्यात व तिचा व तिची वाढ करण्यात भाऊराव जाधव, गणपत कदम, हरिभाऊ चव्हाण, लठ्ठे
इत्यादींचे योगदान आहे.
Ø सत्यशोधक चळवळ ही ग्रामीण
भागांमध्ये सत्यशोधकी जलशा, तमाशा, लावणी इत्यादी मनोरंजनच्या द्वारे प्राचारीत झाली.
Ø सत्यशोधक समाजाची तत्त्वे:
Ø १)सत्यशोधक समाज हा निर्मिक संकल्पना मानतो.
Ø २) सत्यशोधक समाज ईश्वर आणि समाज यांच्या मधल्या
मध्यस्थांना नाकारतो; म्हणजेच तो पुरोहित शाळेच्या विरोधी भूमिका घेतो.
Ø ३) सत्यशोधक समाज सत्य विचार आणि वर्तनावर
विश्वास ठेवतो.
Ø ४) व्यक्तीच्या जन्मा पेक्षा त्याचे कर्तृत्व
महत्त्वाचे मानतो.
Ø ०५) शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार यास सत्यशोधक
समाज प्राधान्य देतो. विशेषतः विशेषतः बहुजन, स्त्रि, शूद्रातिशूद्र इत्यादींच्या
शिक्षणाला सत्यशोधक समाज महत्व देतो.
Ø जातिभेद लिंगभेद आणि धर्म भेद सत्यशोधक
समाजाला मान्य नाहीत.
Ø ०७)सत्यशोधक समाज जाती वर्णन व
लिंगाधारित विषमतेला निर्मूलनाचे तत्वज्ञान मानतो.
Ø सत्यशोधक समाजाचे कार्य:
Ø ०१)सत्यशोधक समाजाने शिक्षणाच्या
प्रचारामध्ये विशेषतः स्त्री शूद्र अतिशूद्र म्हणजेच अस्पृश्यांसाठी च्या
शिक्षणाच्या प्रचारात आपले विशेष योगदान दिले.
Ø ०२) ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई
फुले यांनी १८४८ पासूनच शिक्षणाची चळवळ
सुरू केली होती.
Ø ०३) स्त्री शिक्षणाचा साठी मुलींची
पहिली शाळा त्यांनी सुरू केली.
Ø ०४) विधवांच्या विवाहाचा आणि त्यांच्या
शोषण मुक्तीचा प्रश्न सत्यशोधक समाजाने हाती घेतला होता ज्योतिबा फुले यांनी १८६३ ला बाल हत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.
Ø ०५) जाती निर्मूलन आणि अस्पृश्यता
निर्मूलन हा सत्यशोधक समाजाच्या कार्याच्या केंद्रबिंदू होता.
Ø ०६) शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या
अत्याचाराच्या विरोधामध्ये विशेषतः ब्राह्मणशाही कडून आणि ब्रिटीश शाळेकडून या
दोन्ही अत्याचाराच्या विरोधामध्ये सत्यशोधक समाजाने कार्य केले.
Ø ०७) सत्यशोधक समाजाच्या प्रचारामध्ये “दीनबंधु”
या वृत्तपत्राचे विशेष योगदान आहे.
Ø ०८) ब्राह्मणेतर चळवळीतील दिनकरराव
जवळकर, भास्कर जाधव, शंकर मोरे, केशवराव जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादींनी
सत्यशोधकी विचारांचा पुढे प्रचार केला.
Comments
Post a Comment