Skip to main content

नेतृत्व, सामाजिक चळवळ व सामाजिक परिवर्तन(घटक क्रमांक दोन)

 *     घटक क्रमांक दोन

*   नेतृत्व, सामाजिक चळवळ व सामाजिक परिवर्तन

Ø  किंबाल यंग च्या मते, समाजातील लोकांच्या मनोवृत्ती प्रभावित करण्याचे काम करण्यास नेतृत्व असे म्हणतात. पिटर ड्रकर च्या मते, “नेतृत्व म्हणजे व्यक्तीने आपला दृष्टिकोन उच्च स्तराला पोचविणे व आपले व्यक्तिमत्त्व सर्वसाधारण मर्यादेपलीकडे नेणे होय.”

Ø  लीपईयर व फ्रान्सवरच्या मते,  “नेतृत्व म्हणजे स्वतःच्या वर्तनाने इतरांवर प्रभाव टाकने पण स्वतः इतरांच्या वर्तनाने प्रभावित न होणे होय”.

Ø  मॅकआयव्ह्रर  व पेज,  “नेतृत्व म्हणजे कोणत्याही अधिकारा शिवाय केवळ स्व गुणाच्या बळावर इतरांना निर्देश करण्याची किंवा मन वळविण्याची क्षमता होय.”

Ø  नेतृत्व केवळ निष्क्रिय व्यवस्था नसून अनेक गुणांचा समुच्चय असतो.

Ø  औपचारिक नेतृत्व हे खरे नेतृत्व नसते किंवा ते नेतृत्व होऊ शकत नाही

Ø  हायथ्रोन (1956 )च्या मतानुसार , नेत्यांचे वागणे कार्यशैली इत्यादी बाबी या समूहातील सर्व सदस्यांच्या समूह मनाच्या कल ठरवीत असतात.

Ø  समाजाच्या पेचप्रसंगातून नेतृत्व निर्माण होते विविध परिस्थितीनुसार नेतृत्वामध्ये ही बदल होतो

Ø  दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडचे नेतृत्व चर्चिलने केले तर युद्ध संपल्यानंतर ऑटलीला  यांनी नेतृत्व केले.

Ø  कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजाची अधिमान्यता हा नेतृत्वाचा आधार असतो लोकांचा विश्वास असेपर्यंत नेतृत्व कायम राहते.

Ø  राजकीय व्यवस्थेतील सामाजिक संबंधावर आधारित हुकुमशाही नेतृत्व व लोकशाही नेतृत्व असे दोन नेतृत्वाचे प्रकार मांडता येतात.

Ø  हुकुमशाही नेतृत्व लोकशाही नेतृत्व अपेक्षा अनियंत्रित सत्ता प्राप्त करून कार्य करत असते तो एकटाच सर्व समूहाची धोरणे ठरवीत असते अशा प्रकारचे नेतृत्व एकाच समूहाचे  नियोजन करीत असतो हुकूमशाही वृत्ती चे नेतृत्व विभाजित समूह संरचनेला चालना देते

Ø  लोकशाही नेतृत्व आहे संघटनेतील सदस्यांना कामकाजात  नेतृत्व जबाबदाऱ्यांची विभागणी करून सर्व सदस्यांना समान संधी देते. संघटनेतील सदस्यांच्या आंतरक्रिया व सामाजिक संबंध वाढविण्याच्या साठी प्रोत्साहन दिले जाते.

Ø  मॅक्स वेबर यांनी नेतृत्वाचे तीन आदर्श प्रकार सांगितलेले आहेत हे प्रकार चळवळीची रचना आंदोलन आणि चळवळीचे उद्दिष्ट काय आहेत यावर अवलंबून आहेत १)परंपरागत नेतृत्व हे नेतृत्व पारंपारिक धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे मानले जाते उदाहरणार्थ विविध धर्माचे धर्मगुरु

Ø  २)वैधानिक नेतृत्व हे औपचारिक स्वरूपाचे कायदा आणि विविध संस्थेची मान्यता असलेली ने असलेले नेतृत्व आहे अनिष्ट परंपरा या विरोधामध्ये म्हणजेच सामाजिक सुधारणाचे काम करण्याचे पाठबळ या नेतृत्वाच्या पाठीमागे असते.

Ø  ३)करिष्माई नेतृत्व हे नेतृत्व समूह व दिव्य वलय असणारे मानले जाते आश्चर्यकारकरीत्या ते समाज व संघटनेचे प्रभावित करते

Ø  याशिवाय १)आदर्शवादी नेतृत्व २)प्रशासकीय नेतृत्व ३)प्रतिकात्मक नेतृत्व ३)निष्क्रिय नेतृत्व आणि ४)श्रेणी श्रेष्ठ नेतृत्व इत्यादी नेतृत्वाचे प्रकार मानता येतील.

Ø  हुकुमशाही नेतृत्व



 लोकशाही नेतृत्व






 

Ø  ब्राऊन च्या मते नेतृत्व हे ज्या घटकाचे किंवा चळवळीचे नेतृत्व आहे त्या समूहाचे सदस्य म्हणजेच घटक भाग असले पाहिजे.

Ø  लायनबर्जर सारख्या विचारवंत च्या मता नुसार, नेतृत्व हे फक्त समाजाचे घटक भाग असून चालत नाही तर त्याने विशिष्ट पद्धतीचे मुल्ये आणि प्रमाणके जपली पाहिजेत.

 

Ø  नेतृत्व समूहाची मुल्ये स्वीकारतो म्हणून महत्त्वाचा असतो असे नव्हे तर तो समूहाचा सर्वोत्तम व्यक्ती असला पाहिजे, तो समाजाचा एक आदर्श नमुना असला पाहिजे, प्रभावी नियंत्रण आणि समूहाच्या अडचणी सोडवण्याचा तज्ञ असला पाहिजे.

Ø  नेतृत्व हे अंतर दृष्टी असणारे असले पाहिजे.

Ø  राजकीय पक्ष किंवा संघटना ची संरचना ही स्वतंत्र असते त्यामुळे त्या पक्षाचे किंवा संघटनेचे नेतृत्व ही विशिष्ट असते बहुतांश आणि ते हितसंबंधांवर आधारलेली असते.

Ø  समाजाला नेतृत्व हे नेहमी आकर्षित करत असते 1971 ला इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाव’ चा नारा देऊन भारतीय समाजाला आकृष्ट केले होते.

Ø  नेडल यांनी नेतृत्वाबद्दल खालील विधाने केली आहेत:

Ø  सामाजिक प्रतिष्ठेच्या आधारावर श्रेष्ठ जन जनतेकडून सहजपणे लोकांचा पाठिंबा मिळवतात लोक त्यांच्या आज्ञांचे पालन करतात.

Ø  विशेष तज्ञ म्हणजे वैज्ञानिक संशोधक कायदेतज्ञ डॉक्टर इंजिनियर त्यांना समाजातील लोकांवर नेहमीच विश्वास दर्शवितात.

Ø  ३)ज्या व्यक्तीमध्ये प्रमाणिकपणे सचोटी लोकाभिमुखता असते त्याला नेतृत्वाची संधी मिळते लोक त्यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवतात.

Ø  मॅक्स वेबर यांनी निश्चित नेतृत्व व सत्ता यांच्यात भेद गेला आहे.

Ø  १९०५  ला लोर्ड कर्जन या अधिकाऱ्याने बंगालची फाळणी केल्यामुळे ब्रिटिशां विरोधात आपला लढा तीव्र झाला या काळात बाळ गंगाधर टिळक यांच्या नेतृत्वाखाली स्वदेशीची चळवळ सुरू झाली.

Ø  १९२० ला  महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसा आणि असहकाराची चळवळ सुरू झाली.

Ø  1948 ते 1951 या कालखंडात भारत सरकारने कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली होती.

Ø  पश्चिम बंगाल मधील दार्जीलिंग जिल्ह्यातील सिलिगुडी तालुक्यात नक्षलवादी या संथाळ आदिवासी यांच्या गावात शेतकऱ्यांनी जमीन धारा विरुद्ध 1967 सालच्या मे महिन्यात उठाव केला आणि त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या हा नक्षलवादी चळवळीचा उगम होता.

Ø  १९७८ ला  पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शरद जोशी यांनी शेतकरी संघटना स्थापन केली.

Ø  गाय रोचर यांच्या मते समाजातील स्वीकृत मूल्यांच्या संबंधित समाजाच्या हितसंबंधांची काहीतरी मागणी सदस्यांची असते या मागणीला समाजातून पाठिंबा मिळत असतो. समाजाला याद्वारे अपेक्षित परिवर्तन अपेक्षित असते.

Ø  लेविस किलीयण याच्यामध्ये सामाजिक चळवळीत व्यक्तीला अशी एक प्रबळ भावना असते की त्यांच्यामुळे सामूहिक कृती द्वारा समाजात व्यापक स्वरूपाचे परिवर्तन घडावे अशी अपेक्षा असते.

Ø  अलायन टरेन च्या मते ,सामाजिक परिवर्तन सामाजिक चळवळी द्वारे  कसे घडवून आणले जाते? त्याची तत्वे पुढीलप्रमाणे:

Ø  क्र,१) चळवळ विशिष्ट लोकांच्या हितसंबंधाचे प्रतिनिधित्व करते.

Ø  सामाजिक चळवळ लोक गट किंवा व्यवस्था यांच्या विरोधात असते.

Ø  सामाजिक चळवळीच्या द्वारे परिवर्तन घडवून आणले जाते.

Ø  अलायन टरेन .यांनी आधुनिक समाजात चळवळी सामूहिक कृती मधून  निर्माण होतात. याविषयीची पुढील भूमिका मांडली आहे.

Ø  ०१) सामाजिक चळवळ ही समाजव्यवस्था आणि व्यक्ती यांच्या मधील दुवा म्हणून कार्य करीत असते कोणत्याही एका व्यक्तीला परिवर्तन अशक्य असते म्हणूनच विशिष्ट मूल्यावर विश्वास असणारे लोक एकत्र येऊन सामूहिक कृती करतात.

Ø  ०२) सामाजिक चळवळी या समाजात कोणत्या समस्या किंवा अडथळे आहेत याचीच जाणीव करून देतात व लोकमत तयार करतात.

Ø  ०३) लोक जमा सामूहिक कृतीसाठी तयार होतात किंवा प्रवृत्त होतात तेव्हा प्रस्थापित वर्गावर दबाव निर्माण होतो प्रस्थापित वर्ग बळाचा वापर करून विरोध करण्याचा प्रयत्न करतो परंतु सामाजिक चळवळ या विरोधाला न जुमानता सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकत असते.

Ø  जेम्स बी मेकी यांनी सामाजिक चळवळी पुढील तीन प्रकारे परिवर्तन घडवून आणतात असे सांगितले आहे:

Ø  ०१)संपूर्ण परिवर्तन ०२)अंशतः परिवर्तन आणि ०३)अत्यल्प परिवर्तन

Ø  ऑकबर्न यांनी संस्कृती संबंधी सांस्कृतिक मागासलेपणाचा सिद्धांत मांडलेला आहे.

Ø  कोणतीही चळवळ सुरू असताना पुढील प्रक्रिया घडते असे लेविस  कीलियन यांचे मत आहे.

Ø  क्र.०१) नेतृत्वात परस्पर प्रक्रिया करते.

Ø  ०२) नेतृत्व अनुयायी यांच्यामध्ये अंतर क्रिया घडते.

Ø  ०३)अनुयायी व विरोधक यांच्यात अंतर क्रिया घडते.

Ø  ०४)अनुयायांच्या प्रक्रिया करतात व त्यांच्यातील अंतर क्रियांमुळे सामाजिक चळवळ- क्रांतीचे स्वरूप बदलते.

Ø  एम  एस ए राव यांनी सुधारणावादी व क्रांतिकारक चळवळ असे चळवळीचे दोन प्रकार सांगितले आहेत.

Ø  समाजात असंतोष किंवा आंतरिक तनाव निर्माण झाल्यानंतर चळवळ निर्माण होते.

Ø  चळवळीद्वारे संभाव्य परिवर्तन शक्य असते त्यामुळे नवीन सामाजिक संबंध प्रमाणाचे मूल्य मान्यता इत्यादी प्रस्थापित होतात. 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...