मिश्र संशोधन: अर्थ आणि वैशिष्टे
I.प्रस्तावना -
सामाजिक
संशोधन पद्धतीमध्ये गुणात्मक व संख्यात्मक संशोधनपद्धतीनंतर अलीकडच्या काळात मिश्र संशोधन पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.ही पद्धत जरी नवी असली तरी ती
संशोधनाच्या क्षेत्रात हळूवारपणे मोठ्या प्रमाणात स्वीकारली जात आहे. की या मिश्र संशोधन पद्धतीला समिश्र(Composite),संकरित (Hybrid) संशोधन पद्धती अशा नावांनी सुद्धा ओळखले जाते.एकाच
अभ्यासामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक (परिमाणात्मक)
संशोधन पद्धतीचे एकत्रीकरण करून जी तिसरी
संशोधन पद्धती अस्तित्वात येते ती म्हणजे
मिश्र संशोधन पद्धती होय. हि संशोधन पद्धत गुणात्मक व संख्यात्मक
संशोधनपद्धतीच्या दोन्ही दृष्टिकोनांच्यामध्ये
असलेल्या उपयुक्त वैशिष्ट्यांच्या सामर्थ्याचा
आधार घेऊन संशोधन समस्येची अधिक व्यापक स्वरुपात अभ्यास केला जातो की जे प्रत्येक स्वंतत्र अशा संशोधन (गुणात्मक व
संख्यात्मक) पद्धतीमध्ये जे करता येत नाही ते या मिश्र
संशोधन पद्धती मध्ये केले जाते.
II.अर्थ-
मिश्र
संशोधन पद्धत आपणास पद्धतशीरपणाने समजावून घ्यावयाची असेल तर सर्वप्रथमता आपणास
काही अभ्यासकानी केलेल्या व्याख्यांच्यावर
चर्चा करावी लागेल.
A) मिश्र संशोधन पद्धतीची व्याख्या -
i. जॉन डब्ल्यू. क्रेसवेल (John W. Creswell):
"मिश्र
संशोधन पद्धत ही एक प्रक्रिया आहे जिथे संशोधक गुणात्मक व सांख्यिक पद्धतींचे एकत्रितपणे
उपयोग करून एका विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दोन्ही पद्धतींच्या तत्त्वांचा
वापर करतो."
ii. डॉनाल्ड टेडली (Donald Teddlie) आणि अबसॉलन ताशखोरी
(Abbas Tashakkori):
"मिश्र संशोधन पद्धत ही गुणात्मक व सांख्यिक
पद्धतींचेतीं चेएकत्रित वापर करून डेटाचे संकलन व विश्लेषण करण्याची पद्धत आहे,
ज्यामुळे संशोधनातील अधिक विश्वासार्ह निष्कर्ष प्राप्त होतात."
iii. बर्गमन (Bergman):
"मिश्र
संशोधन पद्धत म्हणजे एक संशोधन दृष्टिकोन आहे, जिथे गुणात्मक
आणि सांख्यिक पद्धतींचा तीं वापर एकत्रित केला जातो जेणेकरून संशोधनाच्या समस्येचे
समग्र उत्तर मिळू शकते."
iv.ऍलन ब्रायम (Alan Bryman):
"मिश्र संशोधन पद्धती
ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात गुणात्मक व सांख्यिक डेटा संकलनाच्या विविध
तंत्रांचा एकत्रितपणे वापर करून संशोधन समस्येचे विश्लेषण केले जाते."
वरील
सर्व व्याख्यांचा विचार केला असता आपणास मिश्र संशोधन
पद्धतीची पुढील बाबी मुख्यता दिसून येतात त्या अशा:
B) मिश्र संशोधन पद्धतीच्या
महत्वाच्या बाबी -
i.मिश्र संशोधन पद्धत ही तत्वज्ञानात्म्क दृष्टिकोनातून टीकात्मक/विवेचनात्मक/
चिकित्सात्मक सैद्धांतिक दृष्टिकोन स्वीकारल्याचे
दिसून येते.
ii.उद्दिष्टांशी निगडित असलेल्या प्रश्नांची
उत्तरे तो गुणात्मक व सांख्यिकी पद्धतीचा एकत्रित
वापर करून शोधून काढतो.
iii.मिश्र संशोधन पद्धतीत तथ्य संकलन हे गुणात्मक व सांख्यिकी पद्धतीच्या
विविध साधनांचा आणि तंत्राचा योग्य वापर करून एकत्रीकरणातून केले जाते.
iv.गुणात्मक व सांख्यिक तंत्रांचा एकत्रित वापर करून
संशोधन समग्र समस्येचे विश्लेषण करणारी पद्धत म्हणजे मिश्र संशोधन पद्धत.
III. मिश्र संशोधन पद्धतीची वैशिष्टे -
मिश्र संशोधन पद्धती आपणास
व्यवस्थितरित्या समजावून घ्यावयाची असेल तर आपणास वरील सर्व केलेल्या चर्चांच्या
आधारे खालील वैशिष्टे समजून घेणे आवश्यक
आहे.
i. समस्यांचा
सर्वांगीण आढावा (A
comprehensive overview of the issues):
मिश्र
संशोधन पद्धतीत स्वतः संशोधक अभ्यासाचा आढावा घेण्यासाठी ज्या समूहाचा अभ्यास करावयाचा आहे त्या समूहामध्ये प्रत्यक्षात सहभागी
होऊन अभ्यास समूहाचे सर्व बाबींचे योग्य आकलन करून गुणात्मक आणि संख्यात्मक
पद्धतीने अभ्यास करण्याची रणनीती ठरवली जाते. साहजिकच, यामुळे या अभ्यासात संशोधक अभ्यास समूहाचा एक प्रकारे सदस्यच बनतो असे म्हंटल्यास काही चुकीचे ठरणार नाही
त्यामुळे साहजिकच समस्यांचा सर्वांगीण आढावा मिश्र संशोधन पद्धतीमध्ये घेतला जातो.
ii. टिकात्मक/विवेचनात्मक/ चिकित्सात्मक सैद्धांतिक प्रारूप /प्रतिमान (Critical Theory Paradigm):
मिश्र
संशोधन पद्धती ही मुख्यतः संशोधनाच्या तत्त्वज्ञानात्मक प्रतिमान या दृष्टिकोनातून
विचार करावयास गेल्यास टिकात्मक /विवेचनात्मक/
चिकित्सात्मक सैद्धांतिक प्रतिमानमध्ये येते.सदर प्रतिमान प्रत्यक्षवादी प्रतिमान आणि निर्वचनात्मक
प्रतिमान या दोहोंच्या मिश्रणातूनच विकसित
झालेले त्यामुळे मिश्र संशोधन पद्धतीचा तत्वज्ञानात्मक प्रतिमान हा टीकात्मक/विवेचनात्मक/ चिकित्सात्मक सैद्धांतिक दृष्टिकोन हा आहे; यामध्ये
मुख्यतः मार्क्सवाद, स्त्रीवाद ,शोषित अंकितजन यासारख्या सिद्धांतिक
दृष्टिकोनांचा दृष्टिकोणाचा यात समावेश होतो.
iii. परस्परपूरकता:
मिश्र
संशोधन पद्धतीची रचना ही गुणात्मक आणि संख्यात्मक परिमाणात्मक या दोन्ही पद्धतील अभ्यासाशी निगडीत असणारया
चांगल्या बाबींचे एकत्रीकरण एक मजबूत असा
परिपूर्ण अभ्यास केला जातो, ज्यामुळे एकमेकाच्या पद्धतीतील कमकुवतपणा दुसऱ्याच्या सामर्थ्याने
भरून काढता येतो त्यामुळे गुणात्मक आणि संख्यात्मक परिमाणात्मक पद्धतीमधील परस्परपूरकतेमधुनच मिश्र संशोधन पद्धत तयार होते.
iv. लवचिकता (Flexibility):
या संशोधन पद्धतीमध्ये लवचिकतेचे तत्व दिसून
येते; संशोधक गुणात्मक, संख्यात्मक या दोन्ही पद्धतींचा गरजेनुसार वापर करीत असतो त्यामुळे अभ्यासाची
स्थळ, काल, परिस्थिती या सर्वांचा परिणाम या संशोधन पद्धतीवर होत असतो त्यामुळे सापेक्षतेच्या नियमाला अनुसरून लवचिक
पद्धतीने या ठिकाणी अभ्यास केला जातो
v. गुणात्मक आणि संख्यात्मक
(परिमाणात्मक) पद्धतीचे एकत्रीकरण
(Integration of
Qualitative and Numerical (Quantitative) Methodology):
मिश्र संशोधन पद्धतीमध्ये
सामाजिक संशोधनात सामान्यत: वापरल्या जाणारया संशोधन पद्धती आहेत; यामध्ये विशेषत: सर्वेक्षण,प्रयोगात्मक, व्यष्टी
अध्ययन, क्षेत्र कार्यपद्धती, लोकांन्वय पद्धत,प्रघटनात्म्क पद्धत या सारख्या संशोधन पद्धतींचे समस्येच्या
अनुषंगाने योग्य समन्वय साधून परिणामकारक हेतू साध्य होण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक (परिमाणात्मक)
पद्धतीचे एकत्रीकरण मिश्र संशोधन पद्धतीत केले जाते.
vi. गुणात्मक आणि संख्यात्मक (परिमाणात्मक) तथ्यांचे एकत्रीकरण (Integration of Qualitative and Numerical
(Quantitative) facts/Data):
मिश्र संशोधन पद्धतींमध्ये मुख्यतः
सहभागी निरीक्षण ,असहाभागी निरीक्षण बंदिस्त
व खुली प्रश्नावली,मुलाखत ,अनुसूची
, औपचारिक ,अनौपचारिक चर्चाद्वारे
मिळवलेली गुणात्मक तथ्ये आणि
संख्यात्मक (परिमाणात्मक) तथ्ये एकत्रित करून मिश्र संशोधन पद्धत अभ्यासाची
परिणामकारक व्यापकता वाढवते .
vii. सखोल विश्लेषण (In-depth Analysis):
दोन्ही
पद्धतीचा अवलंब केल्याने तथ्य संकलन हे वेगवेगळ्या तंत्राद्वारे घेतले जाते
त्यामुळे विश्लेषण करणे हे सोपे जाते अर्थातच यामुळे सखोलून विश्लेषण क्षमता धारण करण्याचे
कार्य या संशोधन पद्धती द्वारे होते
viii. अचूक आणि विश्वासार्ह निष्कर्ष/ परिणाम (Accurate and Reliable
Conclusion/ Results):
या संशोधन पद्धतीत गुणात्मक संख्यात्मक तसेच
वेगवेगळ्या संशोधन पद्धती आणि विविध तंत्राद्वारे संकलन केल्या गेल्याने एक
प्रकारे परिपूर्ण अशी माहिती अभ्यासाची मिळते त्यामुळे साहजिकच योग्य विश्लेषण
होते होतो निष्कर्ष हे अचूक, विश्वसनीय स्वरूपाची बनते.
ix. इतर वैशिष्टे (Other
Characteristics/ Features):
मिश्र
संशोधन पद्धतीचे इतर काही अभ्यासाच्या दृष्टीकोनातून कोल्वर विचार केला असता आणखी
काही वैशिष्टे सामोये येतात त्यांचाही या ठिकाणी उहापोह करणे आवश्यक आहे;
a-जटिल अभ्यास
आरखडा (Complex Study Plan/ Design)
मिश्र पद्धतीत गुणात्मक आणि संख्यात्मक तथ्ये कसे एकत्र करायचे हे एक मोठे आव्हानात्मक मुद्दा आहे;याच्या
अनुषंगाने योग्य व काळजीपूर्वक नियोजन
आवश्यक आहे कि याच्या परिणामातून या
संशोधन पद्धतीचा एक जटिल अभ्यास आरखडा(Design) होऊ शकतो. संशोधकाने
या सर्व बाबीवर एकत्रीत तपशीलवार लक्ष देणे आवश्यक आहे.
b- व्यापक दृष्टिकोन (Comprehensive Approach):
मिश्र
संशोधनात गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन पध्दतील विविध घटकांचे एकत्रीकरणातून एक
व्यापक स्वरुपात नवा दृष्टिकोन तयार
होतो.अलिकडच्या काळात कामगार- भांडवलदार,वंचित समुदाय,सिमातंक समूह,लिंग भेदभाव
,जातीय-धार्मिक भेदभाव या सारक्या विविध समस्यांचे संशोधन मिश्र संशोधनातून मोठ्या
प्रमाणात होत आहे अर्थातच यामुळे मार्क्सवादी आंबेडकरवादी,स्त्रीवादी इ. विविध सैद्धांतिक
दृष्टीकोनांची उपयुक्तता या संशोधन पद्धतीतून समजून घेणे शक्य होत आहे.
IV.तथ्य मिश्रण /संकरण
मिश्र
संशोधन पद्धतीमध्ये म्हणजे हाती घेतलेली संशोधनाची समस्या अधिक व्यापक स्वरुपात समजण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक/मात्रात्मक
तथ्यांचे एकत्रीकरण किंवा एकत्रीकरण करण्याची जी प्रक्रियाआहे तिला तथ्य मिश्रण म्हणतात. ही एकत्रीकरणाची
प्रक्रिया संशोधनाच्या विविध आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर (तथ्य संकलन, विश्लेषण) विविध मार्गाने केले
जाते ते असे;
मिश्र
संशोधनात तथ्य मिश्रण /संकरण करण्याचे विविध आराखडे/
मार्ग (Various Designs/path of mixing the data in mixed research):
i. अनुक्रमिक मिश्रित मार्ग (Sequential Mixed Path):
एका
पद्धतीतील माहिती दुसऱ्या पद्धतीला माहिती
देउन समस्यांचा अभ्यास मिश्रित पद्धतीने करतेवेळी आपणास यामध्ये खालील दोन उपप्रकारावर चर्चा करावी लागेल.
a) स्पष्टीकरणात्मक अनुक्रमिक मार्ग (Sequential Explanatory path):
प्रथम
संख्यात्मक माहिती(तथ्ये) संकलित करून
ती विश्लेषित केली जातात , त्यानंतर
गुणात्मक माहिती(तथ्ये) संकलित केली जातात जेणेकरून
यामुळे संख्यात्मक निष्कर्षांचे
स्पष्टीकरण दिले जाऊ शकते.
उदा:
संख्यात्मक पद्धतीचा वापर
करून एका सर्वेक्षणात असे दिसून येते की 80% विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापेक्षा
पारंपारिक शिक्षणाला प्राधान्य देतात.गुणात्मक पद्धतीचा वापर करून पारंपारिक
शिक्षणाची (उदा. लवचिकता, सुविधा) पसंतीची कारणे समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतले
जातात.संख्यात्मक पद्धत कल दर्शवतात, तर गुणात्मक पद्धत तो कल
का अस्तित्वात आहे हे स्पष्ट करतो.
b) अन्वेषणात्मक अनुक्रमिक मार्ग
(Sequential
Exploratory Path):
एखाद्या घटने (समस्या)चा अभ्यास करण्यासाठी प्रथम गुणात्मक माहिती(तथ्ये) संकलित
केली जातात,त्यानंतर प्रारंभिक निष्कर्षांची चाचणी घेण्यासाठी किंवा सामान्यीकरण
करण्यासाठी संख्यात्मक माहिती(तथ्ये) संकलित
केली जाते.
उदा.
नवीन शिकवण्याच्या पद्धतीच्या अंमलबजावणीतील आव्हाने हि संशोधनातील समस्या समजून घेण्यासाठी गुणात्मक पद्धतीचा
अवलंब करून शिक्षकांची मुलाखत घेऊन
त्यांचे विचार, कल समजून घेतले जाते
यामध्ये प्रशिक्षण, संसाधनांचा अभाव या बाबी मुख्यत: समोर येतात आणि या आधारावरच संख्यात्मक
पद्धतीने सर्वेक्षणात किती शिक्षकांना प्रशिक्षण किंवा
संसाधनांचा अभाव यासारख्या विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो याचे
मूल्यांकन केले जाते.गुणात्मक तथ्यांद्वारे समस्यांची मुख्य कारणे ,विषय कोणते आहेत! या बाबी ओळखता येतात आणि संख्यात्मक तथ्यांद्वारे त्या समस्यांच्या मुख्य कारणांचे,विषयांचे
सामान्यीकरण करण्यायोग्य त्याचे मोजमाप
केले जाते.
ii. समवर्ती मिश्रित मार्ग (Concurrent
Mixed Path):
गुणात्मक
आणि संख्यात्मक
माहिती(तथ्ये) एकाच वेळी संकलित करून ती स्वतंत्रपणे विश्लेषित केले जातात
आणि नंतर संख्यात्मक माहिती(तथ्ये) मध्ये गुणात्मक अंतर्दृष्टीसह तुलना करून निष्कर्ष
मांडता येतात.
उदा:
वर्गात
विद्यार्थ्यांचा सहभाग,अध्ययन पद्धतीवर
समाधान या समस्यावर संख्यात्मक
पद्धतीच्या आधाराने एक सर्वेक्षण केले
जाते बरोबर त्याचवेळी यातील विद्यार्थ्याबरोबर गट चर्चा,मुलाखतद्वारे अध्ययन
पद्धतीच्या कोणत्या पैलू ,पद्धती समाधानतेवर प्रभावी ठरतात या बाबी स्पष्ट करून
घेतल्या जातात. संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती विश्लेशीत करून दोन्ही माहितींची
तुलना करून वर्गात विद्यार्थ्यांचा सहभाग,अध्ययन पद्धतीवर
कसे व कोणते प्रभाव पडतात याची सखोल माहिती, अंतर्दृष्टी
प्राप्त होते.
iii.अंतर्भूतीत मिश्रित मार्ग Embedded Mixed Path:
संख्यात्मक
प्रकारची माहिती (तथ्य) मध्ये काही गुणात्मक माहिती (तथ्य)
समाविष्ट केली जाते जेणेकरून समस्यांची सखोल अंतर्दृष्टी प्राप्त करून घेता येते.
उदा.
विद्यार्थ्यांचे परीक्षेतील कामगिरी या विषयावर अभ्यास करताना सर्वप्रथमता विद्यार्थ्यांची
परीक्षेतील कामगिरी या संदर्भात संख्यात्मक पद्धतीद्वारे सांख्यिकी माहिती प्राप्त
करून घेणे त्यानंतर त्यांच्या कामगिरीचे यशाचे अनुभव खुल्या प्रश्नाद्वारे समजून
घेतले जाते.यात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे
विश्लेषण करताना विद्यार्थ्यांचे अनुभव, प्रतिसाद कसे आहेत या बाबी स्पष्ट
होतात.थोडक्यात यामध्ये संख्यात्मक माहितीबरोबर गुणात्मक भावभावानाचे अंतरंग यातील फरक व साम्य या बाबी यातून सष्ट होतात.
थोडक्यात,आपणास
वरील सर्व घटकावर चर्चा केली असता निश्चितच मिश्र संशोधन पद्धत नेमकी काय आहे! ती
कशी उपयुक्त आहे! त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी करायची! या विविध बाबींचे
आपणास योग्य आकलन होऊ शकते.
Comments
Post a Comment