संख्यात्मक संशोधन अर्थ आणि वैशिष्टे
संख्यात्मक स्वरूपाच्या संशोधनात
संख्याशास्त्रीय आधार असल्यामुळे व्यक्तीनिष्ठतेचा दोष आढळून येत नाही. त्यामुळे
अशा स्वरूपाचे संशोधन उच्च प्रतीचे मानले जाते. पण संख्यात्मक संशोधनातून समाजातील
मानवी वर्तन, भावभावना यांचे अचूक आकलन होईल याची खात्री
देता येत नाही. त्यामुळे सामाजिक शास्त्रातील संशोधनात संख्यात्मक व गुणात्मक
संशोधनाचा समन्वय साधणे आवश्यक असते.
संख्यात्मक पद्धतीशास्त्र हे प्रत्यक्षवाद आणि
नव प्रत्यक्षवाद यावर आधारित आहे. शतकांपासून सामाजिक विज्ञानाच्या संशोधन
पद्धतीसाठी प्रमाणित कार्यप्रणाली त्याची संरचना, प्रक्रिया
आणि सैद्धांतिक पार्श्वभूमी आणि विकासासाठी तो आधार आहे. संख्यात्मक संशोधनाची
सैद्धांतिक तत्वे प्रमाणित आहेत. ती पुढीलप्रमाणे:
संख्यात्मक संशोधांच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे:
१) कोहन यांच्या मते, 'संख्यात्मक
संशोधन म्हणजे सामाजिक संशोधनात प्रायोगिक पद्धती व प्रायोगिक विधाने यांचा वापर
करणे होय'.
२) क्रिसवेल यांच्या मते, संख्यात्मक
संशोधन हा संशोधनाचा एक प्रकार असून यामध्ये घटनांच्या स्पष्टीकरणाद्वारे सांख्यिकीय
सामग्री संकलित करून त्याचे गणितीय पद्धतीच्या आधारे विश्लेषण केले जाते'.
३) "ज्या संशोधनामध्ये सांख्यिकीय तंत्राचा मोठ्याप्रमाणात वापर
केला जातो, विविध चलाचे मापन करीत असताना त्यांच्या
संख्यात्मक स्थितीचाच विचार केला जातो. तसेच संशोधनाच्या उद्दिष्टांचे व
परिकल्पनांच्या पडताळ्याचे निर्णयही संख्यात्मक माहितीच्या आधारे घेतले जातात, अशा संशोधनास संख्यात्मक संशोधन असे म्हणतात, "
४) ज्या संशोधनात निरीक्षण व मापन अत्यंत वस्तुनिष्ठपणे व काटेकोरपणे
केले जाते. तसेच हे संशोधन
तार्किक प्रत्यक्षवादाच्या गृहीतकांवर आधारित असते, त्यास संख्यात्मक संशोधन म्हणतात.
संख्यात्मक संशोधनाचे स्वरूप खालीलप्रमाणे :
१) चलांमधील परस्परसंबंध स्पष्ट करण्यासाठी किंवा नवप्रवाहांचे
संशोधन समस्येद्वारे वर्णन करण्यासाठी उपयुक्त असे हे संशोधन असते.
२) हेतू विधान, संशोधन प्रश्न व
परिकल्पना हे विशिष्ट, संक्षिप्त, मापनक्षम
आणि निरीक्षणक्षम असतात.
३) संशोधन साधनांच्या वापरातून व्यक्तींना विचारलेले प्रश्न व
त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद यामार्फत मोठ्या संख्येने सांख्यिकीय सामग्री जमा
केली जाते.
४) नवप्रवाहांचे विश्लेषण, गटांमधील
तुलना किंवा सांख्यिकीय विश्लेषणातून चलांमधील संबंध पाहणे
आणि अर्थनिर्वचन केलेल्या निष्कर्षाचे मुख्य भाकीत व भूतकाळातील
संशोधनाची तुलना करणे.
५) संशोधन अहवालाचे प्रमाणित, निश्चित
आराखड्यात लेखन करणे..
संख्यात्मक संशोधनाची वैशिष्ट्ये :
१) संख्यात्मक संशोधनात वास्तवता ही मूर्त वस्तुनिष्ठ आणि
व्यक्तिनिरपेक्ष मानली जाते.
२) संख्यात्मक संशोधनात संशोधक व संशोधन केली जाणारी वस्तू किंवा
परिस्थिती हे दोन्ही घटक परस्परांपासून मुक्त व स्वतंत्र असतात, हे घटक कोणत्याही प्रकारच्या आंतरक्रियांव्दारे
एकमेकांना प्रभावित करीत नाहीत.
३) संख्यात्मक संशोधनात निरीक्षण हे स्थल-काल निरपेक्ष असते असे
मानले जाते. एका ठिकाणी दिसून
येणारे निरीक्षण अन्य ठिकाणीही तसेच आढळून आल्यास सामान्य नियमांची
मांडणी केली जाते.
४) संख्यात्मक संशोधन हे विश्वात घडणाऱ्या प्रत्येक घटना किंवा कृतीच्या
मागे काहीतरी कारण असतेच
असे मानते.
५) संख्यात्मक संशोधन हे मुल्यमुक्त असते, संशोधकाच्या व्यक्तिगत मुल्यांचा परिणाम संशोधन
केल्या
जाणाऱ्या बाबींवर पडत नाही.
६) संख्यात्मक संशोधन सिध्दांतावर व निगमनात्मक अन्वेषणावर आधारित
असते.
७) संशोधकाची भूमिका तटस्थ स्वरूपाची असते.
८) माहिती विश्लेषणासाठी सांख्यिकीय तंत्राचा वापर केला जातो..
९) संख्यात्मक संशोधनाची वस्तुनिष्ठता, सामान्यीकरण
व पूर्वानुमान क्षमता ही वैशिष्ट्ये असतात,
१०) संख्यात्मक संशोधन हे व्यवस्थित, नियंत्रित
आणि अनुभवजन्य असते आणि त्याव्दारे नैसर्गिक घटनांमधील संभवनीय संबंधाच्या
गृहीतकृत्याचे टीकात्मक परीक्षण केले जाते.
१) नामांकन श्रेणी संख्या, चिन्ह
किंवा नावे यांचा उपयोग करून नामांकन श्रेणी तयार होते. या : प्रकारातील घटक
समानतेच्या संबंधांचा वापर करून एकत्र केलेले असतात. यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार
आणि भागाकार करता येत नाहीत. यामध्ये वापरलेली नावे, संख्या
यांची अदलाबदल केली, तरी आधार सामग्रीत कोणताही फरक पडत नाही.
२) क्रमांकन श्रेणी: या श्रेणीमध्ये गटातील घटक सारख्याच दर्जाचे
असले, तरी क्रमांक देताना त्यांच्यातील गुणवत्ता, क्षमता, संख्या, दर्जा, श्रेणी
इत्यादींमध्ये असलेल्या थोड्याफार फरकाचा विचार करूनच त्याचे क्रमांकन केले जाते.
म्हणजेच क्रमांकन करताना समानतेमधील असमानतेचा विशेषत्वाने विचार केला जातो.
म्हणून तिला नामांकन श्रेणीची पुढची पायरी असेही म्हणतात.
३) अंतर श्रेणी एखाद्या गटातील सर्व घटकांमधील परस्पर अंतराची
निश्चित कल्पना येत असेल,
तर त्या श्रेणीला अंतरश्रेणी असे
म्हणतात. या श्रेणीमध्ये क्रमांकन श्रेणीचेही गुणधर्म दिसून येतात. या श्रेणीमध्ये
लागोपाठ येणाऱ्या क्रमांकामधील अंतर निश्चित केलेले असते. या श्रेणीमध्ये गुणाकार, भागाकार करता येत नाही...
४) गुणोत्तर श्रेणी : या श्रेणीचा वास्तव प्रारंभ बिंदू शून्य असतो.
तिच्यामध्ये समानता व असमानता हे दोनही गुणधर्म असतात; परंतु त्यासोबतच दोन अंतरांमधील गुणोत्तरसुद्धा
या श्रेणीमध्ये असते. या श्रेणीपद्धतीने मिळणारी आधार सामग्रीही सर्वाधिक निर्दोष
व अचूक असते. या श्रेणीमध्ये अंतर श्रेणीची सर्व वैशिष्ट्ये असतात.
फायदे : संख्यात्मक संशोधनाचे फायदे खालीलप्रमाणे :
१) संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे मोठ्या जनसंख्येबाबतचे अंदाज मांडता
येतात.
२) व्यक्तींमध्ये असणारी अभिवृत्तीबाबतची व्यापकता संख्यात्मक
संशोधनाद्वारे दर्शविता येते.
३) संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे सांख्यिकीचे लघुरूप असणारे निष्कर्ष
मांडता येतात.
४) संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे विविध गटांमधील तुलना
संख्याशास्त्राने दाखविण्याची संधी उपलब्ध
होते.
५) संख्यात्मक संशोधन प्रक्रिया स्पष्ट व प्रमाणित असल्याने
सुस्पष्टता येते.
६) संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे घटना कृती व प्रवाह यांचे मापन स्तर
निश्चित करता येतात.
७) संख्यात्मक संशोधन पद्धतीमुळे किती आणि किती वेळा' या प्रश्नांची संख्यात्मक उत्तरे देता येतात...
उपयोग : संख्यात्मक संशोधनाचे उपयोग खालीलप्रमाणे
जेव्हा संशोधनातून संख्यात्मक उत्तरांची अपेक्षा असते, तेव्हा संख्यात्मक संशोधन प्रकारच्या संशोधनाचा
उपयोग होतो.
संख्येविषयक बदल अचूकतेने अभ्यासण्यासाठी संख्यात्मक संशोधनाचा उपयोग
होतो.
संख्यात्मक संशोधनाचा उपयोग मतांचे, अभिवृत्तीचे
आणि वर्तनाचे मापन करण्यासाठी होतो.
एखादी घटना संख्यात्मक स्वरूपात स्पष्ट करण्याकरिता संख्यात्मक
संशोधनाचा उपयोग होतो.
संख्यात्मक तथ्यांवर प्रक्रिया करण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी एस.
पी. एस. एस. हे सॉफ्टवेअर
वापरले जाते
संख्यात्मक संशोधनाचा उपयोग परिकल्पनांचे परिक्षण करण्यासाठी केला
जातो.
गुणात्मक संशोधन अर्थ आणि वैशिष्टे :
नैसर्गिक शास्त्रांमध्ये निरीक्षण व मापन
अत्यंत वस्तुनिष्ठ व काटेकोरपणे करावे लागते. बहुसंख्य संशोधन हे निर्जीव वस्तूंशी
संबंधित असल्यामुळे काटेकोर व अचूक मापन शक्य असते. हे संशोधन संख्यात्मक संशोधन
म्हणून ओळखले जाते. मात्र संख्यात्मक संशोधनामध्ये समाजातील मानवी वर्तन, भावभावना, संस्कृती
यांचे सुयोग्य वर्णन संख्यांव्दारे व्यक्त करणे अवघड असते. विसाव्या शतकाच्या
उत्तरार्धात व्यक्तींच्या समूहाचा सखोल अभ्यास करण्यासाठी, त्यांचे वर्णन व स्पष्टीकरण करण्यासाठी
गुणात्मक संशोधन केले जावे,
असा दृष्टीकोन उदयास आला.
गुणात्मक संशोधन हे अनुभव, कल्पना, भावना, मत, दृष्टीकोन
या संदर्भात व्यक्तीनिष्ठ माहितीवर आधारित असते. एखादी सामाजिक प्रक्रिया
निसर्गात:च कशी घडली याचे वर्णन गुणात्मक संशोधनात केले जाते. गुणात्मक संशोधनात
प्रायोगिक पद्धतीप्रमाणे परिस्थितीत कोणताही हस्तक्षेप नसतो किंवा चलांची हताळणी
केली जात नाही. कोणतीही सामाजिक प्रक्रिया नैसर्गिक किंवा वास्तव वातावरणात कशी
घडत आहे याचे निरीक्षण गुणात्मक संशोधनात केले जाते. यातील घटनांचे आकलन हे
समष्टिवादी दृष्टीकोनातून केले जाते. गुणात्मक संशोधनात घडणाऱ्या घटनांमध्ये
संशोधक कोणतीही ढवळाढवळ करीत नाही.
गुणात्मक संशोधनाच्या व्याख्या :
१)
मार्शल
आणि रोझमन यांच्या मते, अभ्यासासाठी निवडलेल्या परिसरातील दैनंदिन
जीवनाशी एकरूप होणे असे आवश्यक मानणारी, सहभागी
व्यक्तींच्या जीवनविषयक दृष्टिकोनाला महत्त्व देणारी आणि त्या दृष्टिकोनांचा शोध
घेणारी, शोधही संशोधन आणि सहभागी व्यक्ती यांच्यात
परस्पर परिणाम करणारी प्रक्रिया आहे असे मानणारी आणि प्राथमिक आधारसामग्री करिता
प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांच्या शाब्दिक निवेदनावर अवलंबून असणारी वर्णनात्मक
प्रक्रिया म्हणजे गुणात्मक संशोधन होय.
२)स्ट्राइस आणि कॉर्बिन यांच्या मते, कोणत्याही प्रकारची सांख्यिकी किंवा
परिणामदर्शक साधनांचा वापर न करता निष्कर्ष मांडलेले कोणत्याही प्रकारचे संशोधन
म्हणजे गुणात्मक संशोधन होय.
३) गुणात्मक संशोधन म्हणजे मानवी आंतरक्रियांच्या
गुंतागुंतीचे अधिक चांगले आकलन करून घेण्याची प्रक्रिया होय. सुव्यवस्थित साधनांनी
संशोधक या आंतरक्रियाबाबतची माहिती संकलित करतो. त्याच्या अर्था बाबत चिंतन-मनन
करून निष्कर्ष काढतो, त्याचे मूल्यांकन करतो व सरतेशेवटी त्या
आंतरक्रियांचा अन्वयार्थ प्रतिपादन करतो...
गुणात्मक संशोधनाची गृहितके :
मेरीयल ने गुणात्मक संशोधनाची पुढील गृहितके
सांगितली आहेत :
१) गुणात्मक संशोधन वर्णनात्मक असते. त्यात
संबंधित विषयाची भरपूर माहिती संकलित केलेली असते.
२) त्यामध्ये क्षेत्रकार्याचा समावेश असतो.
संशोधनाशी संबंधित किंवा विषयासंबंधी प्रत्यक्ष निरीक्षण, संवाद, भेटी, चर्चा यातून माहितीचे संकलन केले जाते..
(३) निष्पत्ती अथवा निर्मितीपेक्षा प्रक्रियेशी
अधिक संबंध असतो. काय घडले यापेक्षा कसे घडले याकडे अधिक लक्ष असते.
४) सविस्तर माहितीच्या आधारे अमूर्त संकल्पना, कल्पना, सिद्धांत, परिकल्पना यांची संशोधक उभारणी करीत असल्याने
ही पद्धत उद्गगामी आहे.
गुणात्मक संशोधनाच्या पद्धती व तंत्रे :
१) संस्कृती वर्णन यामध्ये स्वाभाविक स्थितीतून
दैनंदिन व्यवहाराचे निरीक्षण करून किंवा समूहात सहभागी होऊन सामाजिक गटाच्या
अस्तित्वाचा शोध घेतला जातो. तसेच मानवी वर्तन व सवयींचा अभ्यास केला जातो.
संस्कृती वर्णन या शब्दाचा शब्दश: अर्थ हा जीवन जगण्याच्या पद्धतीबाबत लिहिणे हा
आहे.. संस्कृती वर्णनाचा मुख्य विषय हा सांस्कृतिक मानवशास्त्राचा अभ्यास करणे हा
आहे. यामध्ये लोकांच्या जीवनातील भौतिक, सामाजिक, राजकीय, वैयक्तिक
व ऐतिहासिक अंगामधील परस्परसंबंधाचा अभ्यास केला जातो. संस्कृती वर्णन पद्धतीमध्ये
संस्कृतीचा समग्रवादी पद्धतीने सखोल अभ्यास केला जातो. यामध्ये समाजातील धर्म, कर्मकांड, मिथके, संस्कृती, भाषिक
व्यवहार, कौटुंबिक नातेसंबंध यांचा अभ्यास करण्यात येतो.
(२) पायाभूत सिद्धांत गुणात्मक संशोधनाचा
पायाभूत सिद्धांत स्ट्रॉस यांनी विकसित केला आहे. आगमन व निगमन या दोन्ही
विचारांच्या पद्धतीतून पायाभूत सिद्धांताची निर्मिती झाली आहे. याचा मुख्य उद्देश
संकल्पनात्मक विचारावर आधारित गृहीतकृत्यांची निर्मिती करणे हा आहे.
करण्यास व्यक्तीअभ्यास पद्धती असे म्हणतात.
व्यक्ती अभ्यासामध्ये व्यक्तींचा किंवा समूहाचा दीर्घकाळ प्रत्यक्ष सहभाग घेऊन
अभ्यास केला जातो.
४) आशय विश्लेषण: आशय विश्लेषणाचा सर्वप्रथम
वापर १९२६ मध्ये मेल्कोम विल्ली यांनी वृत्तपत्रांच्या आशय विश्लेषणातून केला.
यामध्ये वृत्तपत्रे, कादंबरी, भाषणे
अशा संप्रेषण माध्यमांचे विश्लेषण करून त्यातील मतितार्थ शोधला जातो. आशयाचे
वस्तुनिष्ठ क्रमबद्ध आणि परिणामात्मक वर्णन प्रस्तुत करणे हा आशय विश्लेषणाचा
मुख्य उद्देश आहे.
आशय विश्लेषणाची एकक पुढीलप्रमाणे:
आशय विश्लेषण तंत्राच्या साहाय्याने गुणात्मक
विषयाचे परिणामकारक अध्ययन करणे शक्य होते. यामध्ये माहितीची व्याख्या, सारणी, आलेख
इत्यादी माध्यमातून स्पष्टीकरण केले जाते. आशय विश्लेषण यामुळे व्यक्ती व समूहाचा
विचार आदर्श, मूल्य, मनोवृत्ती, भावना इत्यादींचा अभ्यास करता येतो.
५) सहभागी निरीक्षण : सहभागी निरीक्षण पद्धतीत
संशोधक समुहात अशा प्रकारे सहभागी होतो की, तो
समूह संशोधकाला त्यांच्यापेक्षा बाहेरचा समजत नाही. या गुणात्मक संशोधन पद्धतीचे
मूळ परंपरागत संस्कृती वर्णन संशोधनामध्ये आहे.
सहभागी निरीक्षण या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख
लिंडमन यांनी १९२४ मध्ये 'सोशल डिस्कवरी या पुस्तकात केला. सहभागी
निरीक्षण ही अधिक काळ चालणारी प्रक्रिया आहे. यात संशोधक समुदायाच्या सदस्यांबरोबर
घनिष्ठ संबंध प्रस्थापित करून आंतरक्रिया करतो.
सहभागी निरीक्षण या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख
लिंडमन यांनी १९२४ मध्ये 'सोशल डिस्कवरी' या
पुस्तकात केला. सहभागी निरीक्षण ही अधिक काळ चालणारी प्रक्रिया आहे. यात संशोधक
समुदायाच्या सदस्यांबरोबर घनिष्ठ संबंध प्रस्थापित करून आंतरक्रिया करतो.
ही पद्धत सामाजिक मानवशास्त्राच्या क्षेत्रीय
कार्यातून विकसित झाली आहे. मॅलिनॉस्की यांनी टॉम्बियन बेटावरील आदिवासी समुदायाचा
अभ्यास करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला.
या पद्धतीत संशोधक निरीक्षण करावयाच्या समूहाशी
एकरूप होऊन दैनंदिन सामाजिक घटनांचे आकलन करतो. यामध्ये संशोधक प्रत्यक्ष सहभागी
होऊन नैसर्गिक निरीक्षण, अनौपचारिक मुलाखत, सामूहिक चर्चा व व्यक्तिगत दस्तऐवजांचे
विश्लेषण इत्यादी साधनांचा वापर करतो.
गुणात्मक संशोधनाची वैशिष्ट्ये :
पॅटन यांनी गुणात्मक संशोधनाची पुढील
वैशिष्ट्ये सांगितली आहे
१)
गुणात्मक
स्वरूपाची माहिती यामधील माहिती संख्यात्मक स्वरूपात नसून ती वर्णनात्मक : असते.
माहितीही शब्दरूपात प्रासंगिक नोंदी, क्षेत्र
नोंदी, मुलाखतीतील अभिव्यक्ती इत्यादी गुणात्मक
स्वरूपात असते.
२) नैसर्गिक स्थितीत माहिती संकलन : गुणात्मक
संशोधनात व्यक्तींचा किंवा समूहाचा अभ्यास हा नैसर्गिक परिस्थितीतच केला जातो.
यामध्ये कोणतेही चल नियंत्रित केले जात नाही. व्यक्ती जशी बोलते, वागते याचे निरीक्षण करून अभ्यास केला जातो.
३) संशोधन आराखड्यातील लवचिकता : संख्यात्मक
संशोधनात संशोधन प्रक्रियेचे स्वरूप निश्चित असते, पण
गुणात्मक संशोधनात संशोधन प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत लवचिकता असते. यामध्ये
माहिती संकलन करताना आलेल्या प्रतिसादानुसार संशोधन साधने, माहितीचे स्रोत बदलू शकतात.
४) सहेतुक नमुना निवड गुणात्मक संशोधनात अशा
व्यक्ती व समूहाची निवड सहेतुकपणे केली जाते की, ज्यातून
अर्थपूर्ण व भरपूर माहिती मिळते.
५) निरिक्षण व सहभागीता गुणात्मक संशोधनात
संशोधक हा स्वतः व्यक्तींच्या सहवासात राहतो, त्यांचे
निरीक्षण करतो. त्यांच्याशी प्रश्न विचारून संवाद साधतो. तसेच संशोधक परिस्थितीशी
एकरूप होऊन संवेदनशीलतेने अनौपचारिक मुलाखतीतून मानवी वर्तन, स्वभाव व भावना समजून घेतो.
६) सर्वसमावेशकता : गुणात्मक संशोधनात निवडक
अशा चलांचा अभ्यास न करता एखाद्या व्यक्तीसमुहाबाबतच्या सर्व बाजूंनी अभ्यास केला
जातो.
७) सामाजिक संदर्भाचा अभ्यास गुणात्मक संशोधनात
फक्त व्यक्तीच्या वर्तणुकीवर लक्ष केंद्रित केले जात नाही. तर व्यक्ती विशिष्ट
प्रकारे का वागते, त्याचे सामाजिक, सांस्कृतिक
व तत्कालीन संदर्भ अभ्यासले जातात.
८) व्यक्तिनिष्ठता व वस्तुनिष्ठतेचा समन्वय
गुणात्मक संशोधनात संशोधक व्यक्तीसमुहाविषयीचे आकलन स्वत:च्या दृष्टिकोनातून करतो
पण त्याच बरोबर संशोधक व्यक्तीसमुहाविषयीची वस्तुस्थिती ही तथ्यांद्वारे मांडत
असतो.
९) उद्रगामी विचार पद्धतीचा अवलंब : गुणात्मक
संशोधनाचे कार्यक्षेत्र हे कृत्रिम नसून नैसर्गिक असते.. एकापाठोपाठ घडणाऱ्या
घटनांमधून उद्गामी पद्धतीने निष्कर्ष काढले जातात.
१०) खुलेपणा : गुणात्मक संशोधनात घटनेचे
सविस्तर वर्णन असते. हे संशोधन पूर्वनियोजनाच्या
प्रक्रियेने बंदिस्त नसते, तर येणाऱ्या विविध अनुभवानुसार त्यात खुलेपणा
असतो.
सामाजिक शास्त्र संशोधनात तत्वमीमांसा, ज्ञानमीमांसा, आणि
पद्धतीशास्त्र या तीन पूर्वमान्यतेवर संशोधन अध्ययनाची निवड अवलंबून असल्यामुळे
उपलब्ध दृष्टीकोनात विभिन्नता आढळते. समाजशास्त्रीय विचाराचा तत्त्वज्ञानात्मक
आधार आणि समाजशास्त्रातील संशोधन पद्धतीचा वापर आणि त्यातून सामाजिक व ऐतिहासिक
परीक्षण महत्वाचे आहे. गुणात्मक संशोधनामध्ये अनेक पद्धतीशास्त्रीय दृष्टीकोन
आहेत. त्यांचे प्रत्येकाचे सैद्धांतिक तत्वदेखील वेगळे आहे. उदा. घटनाशास्त्र, अर्थनिर्णयशास्त्र, सामाजिक आंतक्रियावाद इ. यामध्ये सामाजिक
वास्तवतेचे वर्णन उत्तरदात्यांच्या अनुभवावर आधारित असून सामाजिक संबंधाच्या
अन्वेषणाचा हा उद्देश संख्यात्मक असून त्यात तथ्य संकलनाच्या पद्धतींचा अवलंब केला
जातो.
गुणात्मक संशोधन
हे मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यासारख्या
सामाजिक विज्ञानांच्या शाखांवर आधारित आहे. म्हणून, गुणात्मक
संशोधन पद्धती उत्तरदात्यांच्या प्रतिसादांवर आधारित सखोल आणि पुढील चौकशी आणि
प्रश्न विचारण्याची परवानगी देतात, जिथे
मुलाखतकार संशोधक देखील त्यांची प्रेरणा आणि भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतात, तुमचे प्रेक्षक कसे निर्णय घेतात हे समजून घेणे
संशोधनात निष्कर्ष काढण्यात मदत करू शकते. गुणात्मक संशोधनाच्या पद्धतींमध्ये
निरीक्षण आणि मुलाखती, अनिर्बंध म्हणजेच मुक्त किंवा खुली सर्वेक्षणे, केंद्रित गट, दृश
किंवा दिसणारे आणि ग्रंथात्मक सामग्रीचे विश्लेषण आणि मौखिक इतिहासाचा समावेश आहे.
बारटन आणि पॉल
लाझारस्फेल्ड यांनी गुणात्मक संशोधना संदर्भात तीन बाबी नमूद केल्या आहेत. १)
गुणात्मक संशोधन हे अन्वेषणाला मदत करीत असून संशोधनाची उद्दिष्टे, निर्देशकांची निश्चिती आणि वर्गीकरण करते.
२) गुणात्मक संशोधन हे सामाजिक संबंधातील
निश्चित घटकांबाबत चल, तुलना, निष्कर्षामधील
संबंधाचा
शोध घेते.
३) गुणात्मक संशोधन हे एकात्मिक रचनेची
पूर्वमान्यता आणि गृहीतकृत्याला परीक्षणक्षम बनविते. गुणात्मक संशोधक हा सामाजिक
वास्तवता ही आंतरक्रियेच्या अन्वयार्थाद्वारे निर्माण होते यावर विश्वास ठेवतात.
संशोधन आंतरक्रिया आणि अन्वयार्थामार्फत वास्तवतेचा अनुभव घेतो.
गुणात्मक पद्धतीशास्त्रातील तत्त्वज्ञानात्मक
अर्थनिर्णयशास्त्राच्या संप्रदायांनी प्रत्यक्षवादाची चिकित्सा केली असून
तत्त्वज्ञानात्मक कार्याचे व्यवस्थितपणे स्पष्टीकरण केले आहे. त्यात
घटनाशास्त्राचे हसले, अल्फ्रेड गांना ग्राण होतो.
गुणात्मक पद्धतीशास्त्रातील तत्त्वज्ञानात्मक
अर्थनिर्णयशास्त्राच्या संप्रदायांनी प्रत्यक्षवादाची चिकित्सा केली असून
तत्त्वज्ञानात्मक कार्याचे व्यवस्थितपणे स्पष्टीकरण केले आहे. त्यात
घटनाशास्त्राचे हसले, अल्फ्रेड शूझ गॉफमन यांचा समावेश होतो.
त्यांच्या मते
१) सामाजिक संघटनेचे अस्तित्व बहिर्गत नाही तर
ते लोकांच्या मनामध्ये आणि त्यांच्या अन्वयार्थामध्ये
आहे.
२) वास्तवता ही वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ
आहे. सामाजिक क्रियेच्या अन्वयार्थातून वास्तवतेचे आकलन
होते.
३) सामाजिक वर्तनाचा अर्थ संख्यात्मक मापनातून
शोधता येत नाही तर संशोधक उत्तरदात्याच्या प्रतिक्रियांवर विश्वास ठेवतो व त्यातून
घटनेच्या अर्थातून निष्कर्ष शोधतो...
(४) अनेक कारणांसाठी गृहीतकृत्यांचा अवलंब करणे
हे प्रश्नार्थक आहे आणि त्या अनुषंगाने मर्यादित प्रश्न विचारून उत्तरदात्याकडून
कारणांचा शोध घेणे शक्य होत नाही..
गुणात्मक पद्धतीशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांची
ओळख खालील बाबीवरून करता येईल. यात मुख्य सैद्धांतिक आधार, मध्यवर्ती तत्वे व आधार यांचा समावेश होतो.
गुणात्मक पद्धतीशास्त्राचे सामान्य निकष:
१) सामाजिक विश्व नेहमीच मानव निर्मित आहे ही
अधिमान्यता आहे. परिणामी,
अन्वयार्थ विज्ञान हे उत्तरदात्यांचा
अनुभव आणि त्यांचा दृष्टीकोण जे वास्तवात आहेत, त्याला
प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. आंतर क्रियेतील वास्तवतेला प्राप्त करण्याचा
प्रयत्न केला जातो..
२) यात संख्येने कमीच असलेल्या उत्तरदात्यांचा
अभ्यास केला जातो.
३) यादृच्छिक नमुना तंत्राचा अवलंब केला जात
नाही.
४) विस्तृत व सविस्तर शाब्दिक तथ्य व पूर्ण
स्वरूपाची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला जातो.
यात संख्यात्मक विश्लेषण केले जात नाही.
५) संख्यात्मक मापन व चल याचा अवलंब केला जात
नाही,
६) यामध्ये पूर्वकल्पना व पूर्वरचना प्रतिकृती
किंवा आकृतीबंधाशिवाय वास्तवता आकलनाचा दृष्टिकोन
आहे.
७) एका स्थितीच्या समान दोन महत्त्वपूर्ण
तत्त्वांचा संशोधक जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा
उत्तरदात्यांना चल म्हणून मर्यादित केले जात नाही. कारण समग्राचा तो भाग नसतो. अशा
पद्धतीने मर्यादित केल्यामुळे मानवी वर्तनाच्या व्यक्तिनिष्ठ स्वरूपाचे अनुभव हे
संख्यात्मक माहितीच्या निष्कर्षामध्ये ते मर्यादित होतात.
८) वास्तवता ही बहिर्गत नसून ती आंतरिक मनामध्ये
असते.
९) कर्ता व इतर लोक स्वतःच घटनेला अर्थ देतात
आणि अर्थपूर्ण मानवी क्रिया करतात.
८) वास्तवता ही बहिर्गत नसून ती आंतरिक
मनामध्ये असते.
९) कर्ता व इतर लोक स्वतःच घटनेला अर्थ देतात
आणि अर्थपूर्ण मानवी क्रिया करतात.
(१०) दैनंदिन मानवी सामाजिक क्रियेचा अर्थ
प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो.
११) लोकांच्या आकलनाचा उद्देश हा घटनेचे मापन
करणे हा नाही.
१२) संशोधन कार्यप्रणालीमध्ये वर्णनात्मक
तथ्यनिर्मिती केली जाते. उत्तरदात्यांनी स्वतः दिलेला अर्थ व स्वत: घेतलेल्या
अनुभविक दृष्टिकोनावर भर दिला जातो.
१३) अन्वयार्थात्मक चौकशीला प्राधान्य
दिल्यामुळे आपोआपच नैतिक चौकशीला प्राधान्य मिळते.
अनेक संशोधकांमार्फत या दृष्टीकोनाची मुख्य
तत्वे विशद केली आहेत. त्यात विशेषतः सूक्ष्म समाजशास्त्रीय हीत समाविष्ट आहे. यात
सामाजिक संरचना ही प्रवाही म्हणजेच नेहमी परिवर्तनशील अशी मानली आहे आणि उच्च
स्वरूपातील व्यक्तिनिष्ठता आणि सापेक्षता येथे पहावयास मिळते. सामाजिक विश्वाचे
आंतरिक निर्धारक अनुभव आहेत आणि विविध पद्धतीशास्त्रीय सैद्धांतिक ही त्यामध्ये
घटक आहेत...
गुणात्मक पद्धतीशाखाचा सैद्धांतिक आधार :
गुणात्मक संशोधनातील विविधता ही केवळ त्याच्या
प्रकारातच नव्हे, तर ती सैद्धांतिक संदर्भचौकटीच्या संदर्भातही
असते. त्यावर आधारित निश्चीत संशोधन प्रक्रियेसाठी मार्गदर्शकाची तरतूद आहे.
गुणात्मक पद्धती हे अधिक विस्तृत प्रमाणात व सैद्धांतिक आधाराशी संबंधित आहे. ते
अधिक उच्च, बहुविध व विविधतापूर्ण आहे. जॅकोब यांच्यामते, गुणात्मक पद्धती शास्त्राची सहा
कार्यक्षेत्राची विचारक्षेत्रे आहेत. सामाजिक संशोधनात अधिक महत्त्वपूर्ण अशा काही
गुणात्मक कार्यक्षेत्राचा अवलंब केला जातो. त्यामध्ये घटनाशास्त्र, अर्थनिर्णय शास्त्र व प्रतिकात्मक आंतरक्रियावाद
यांचा समावेश केला जातो. गुणात्मक संशोधनाची सहा कार्यक्षेत्रे खालील प्रमाणे आहेत
:
१) मानवी परिस्थिती कार्यक्षेत्र- लोकांच्या
दैनंदिन जीवनातील वर्तनाचे आकृतिबंध याचा सखोल अभ्यास
केला जातो. त्यासाठी निरीक्षण तंत्राचा अवलंब
करणे.
२) परिस्थितीशास्त्रीय मानसशास्त्र
कार्यक्षेत्र लोक आणि त्यांच्या सामाजिक पर्यावरणातून त्यांच्या जीवनाच्या
मार्गाचे निश्चित स्वरूप शोधणे, त्यासाठी
मुख्यत्वे करून निरीक्षण तंत्राचा अवलंब केला जातो.
३) समग्र संस्कृतीवर्णन कार्यक्षेत्र
संस्कृतीचा मानवी जीवनावरील परिणाम अभ्यासणे सहभागी निरीक्षणाचा
अवलंब करणे.
४) बोधात्मक मानसशास्त्र कार्यक्षेत्र-
लोकांच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करणे, तसेच
बोधात्मक मानसशास्त्रामध्ये भाषेच्या आकलनावर विशेष भर दिला जातो. भाषा ही विविध
गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रिया, बोधकार्य व
मानवी मनाचे आकलन समजून घेण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. यासाठी मुलाखत
तंत्राचा वापर केला जातो.
सामाजिक संशोधनात अधिक महत्त्वपूर्ण अशा काही
गुणात्मक कार्यक्षेत्राचा अवलंब केला जातो. त्यामध्ये घटनाशास्त्र, अर्थनिर्णय शास्त्र व प्रतिकात्मक
आंतरक्रियावाद यांचा समावेश केला जातो. गुणात्मक संशोधनाची सहा कार्यक्षेत्रे
खालील प्रमाणे आहेत :
१) मानवी परिस्थिती कार्यक्षेत्र- लोकांच्या
दैनंदिन जीवनातील वर्तनाचे आकृतिबंध याचा सखोल अभ्यास
केला जातो. त्यासाठी निरीक्षण तंत्राचा अवलंब
करणे.
२) परिस्थितीशास्त्रीय मानसशास्त्र
कार्यक्षेत्र लोक आणि त्यांच्या सामाजिक पर्यावरणातून त्यांच्या जीवनाच्या
मार्गाचे निश्चित स्वरूप शोधणे, त्यासाठी
मुख्यत्वे करून निरीक्षण तंत्राचा अवलंब केला जातो.
३) समग्र संस्कृतीवर्णन कार्यक्षेत्र
संस्कृतीचा मानवी जीवनावरील परिणाम अभ्यासणे सहभागी निरीक्षणाचा अवलंब करणे.
४) बोधात्मक मानसशास्त्र कार्यक्षेत्र-
लोकांच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करणे, तसेच
बोधात्मक मानसशास्त्रामध्ये भाषेच्या आकलनावर विशेष भर दिला जातो. भाषा ही विविध
गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रिया, बोधकार्य व
मानवी मनाचे आकलन समजून घेण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. यासाठी मुलाखत
तंत्राचा वापर केला जातो.
५) संस्कृतीवर्णन व संप्रेषण कार्यक्षेत्र -
भाषिक आणि शाब्दिक वगैर-शाब्दिक प्रक्रियेशी हे संबंधित आहे.
६) प्रतिकात्मक आंतरक्रियावादी कार्यक्षेत्र
प्रतिकात्मक आंतरक्रियाबादा नुसार समाज गतिशील आहे, समाजाची
निर्मिती, सामजिक क्रिया आणि भूमिका बदलती राहते.
त्यामुळे समाजाचे अध्ययन करण्यासाठी हा दृष्टीकोन उपयोगी ठरतो.
Comments
Post a Comment