मुलाखत Interview
मुलाखतीचा अर्थ (Meaning of
Interview)
सेल्टिज, जहोडा, डवाइश आणि कूक यांनी Research Methods in Social Relation' या ग्रंथात पृष्ठ क्रमांक २३६ वर जी. डब्लू.
ऑलपोर्ट (G.W.Allport) यांचे एक विधान नमूद केले आहे. हे विधान
मुलाखतीचे महत्त्व प्रतिपादन करणारे आहे. जी. डब्लूय ऑलपोर्टच्या मते, “जर
तुम्हाला लोकांच्या भावनाबद्दल अनुभवाबद्दल त्यांच्या स्मरणशक्तीबद्दल त्यांच्या
संवेग आणि प्रेरणाबद्दल काही जाणून घ्यावयाची इच्छा असेल तर तुम्ही त्याबद्दल
त्यांनाच का विचारीत नाही." (If we
want to know how people fell, what they experience and what they remember, what
their emotions and motives and like, and the reasons for acting, as they do why
do not ask them? G. W. Allport )
व्याख्या (Definitions)
(१) गुड आणि हॅट (Good and
Hatt) “मुलाखात मूळ रूपात सामाजिक
आंतरक्रियेची एक प्रक्रिया आहे.')(Interview
is fundametally a process of Social Interaction - Goode andHatt)
(२) एम. एन. बसू (M.N. Basu)
"मुलाखतीची अशी व्याख्या करता येईल की, काही
विषयावर व्यक्तींची समोरा-समोर झालेली बैठक होय." ("An interview can be defined as a meeting of persons
face to face on some points" - M.N. Basu )
(३) पॉलिन व्ही यंग (Pauline
V. Young) “मुलाखतीला एक अशी क्रमबद्ध पद्धत मानता
येईल की, ज्याद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींच्या आंतरिक जीवनात कमी-जास्त
प्रमाणात काल्पनिक रूपात प्रवेश करतो आणि ज्यास तो मुलाखतकर्ता सामान्यतः
तुलनात्मक रूपात अपरिचित आहे." ("The interview may be regarded as a systematic method by which onc
person enters more or less, imaginatively into the inner life of another who is
generally a comparative stranger to him.- Pauline V.Young. )
(४) हँडर आणि लिंडमन (Hader
and Lindman) : "मुलाखतीत दोन
किया अधिक व्यक्तीमधील संवाद किवा मौखिक प्रतिसाद असतो."("Interview consists of dialogue or verbal responses
between two per sons or between several persons" - Hader and Lindman 5)
(५) एफ. एन. करलिंगर (F.N.
Kerlinger) “मुलाखत ही समोरा समोरील आंतर-व्यक्तिगत
भूमिकेची एक अशी परिस्थिती आहे की, ज्यामध्ये एक व्यक्ती मुलाखतदाता, ज्याची
मुलाखत घेतली जाते. त्या व्यक्तीकडून किंवा उत्तरदात्याकडून त्या प्रश्नाच्या
संदर्भात उत्तरे प्राप्त करतो की, जे संशोधन समस्येच्या उद्देशांची
पूर्ती करतात."("The interview is a face to face inter
personal role situation in which one persons, the interviewer asks a person
being interviewed, the respondent, the questions designed to obtain answers
pertinent to the purposes of the research problem-F.N.Kerlinger )
मुलाखत तंत्राची वैशिष्ट्ये (Characteristics of Interview Technique)
(१) दोन किंवा अधिक व्यक्ती (Twoor
More Person) मुलाखतीमध्ये दोन किंवा दोन पेक्षा
जास्त व्यक्तीचा जवळचा संबंध येऊन त्यांच्यात
(२) समोरा-समोरचा संबंध (Face to Face Relations) मुलाखतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलाखतकार व मुलाखतदाता
यांचा प्रत्यक्ष समोरा-समोरचा संबंध प्रस्थापित होत असतो.
(३) विशिष्टय उद्देश (Specific
Object) : मुलाखतीचा एक विशिष्टय उद्देश असतो.
त्या उद्देशांच्या पूर्तीकरिता दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा प्रत्यक्ष
संबंध येतो.
(४) तथ्य संकलन (Data
Collection): मुलाखतीच्या माध्यमातून विशिष्ट विषयाच्या
संबंधात तथ्य संकलन केले जाते. सामाजिक संशोधनात सामाजिक अध्ययनाच्या दृष्टीने
प्राथमिक तथ्य संकलनाचा एक स्त्रोत म्हणून मुलाखत तंत्राचा उपयोग केला जातो.
(१) प्रत्यक्ष आणि समोरा समोरच्या संपर्कातून माहिती (Information
Through Direct and Face to Face Contract) :
(२) गृहितकृत्याचा प्रमुख स्त्रोत (Main Source of Hypothesis)
(३) निरीक्षणाची संधी (Opportunity
of Observation).
(४) व्यक्तिगत आणि गुणात्मक तथ्यांचे ज्ञान (Knowledge of Personal and Qualitative Data):
मुलाखतीचे
प्रकार Types of Interviews
(अ) उद्दिष्टानुसार वर्गीकरण (Classification According to Purpose)
(१)
निदानात्मक मुलाखत (Diagnostic
Interview) : जेव्हा समस्येचे निदान करणे आणि त्याची
कारणे जाणून घेणे हे संशोधनाचे मुख्य उद्दिष्ट असते. तेव्हा अशा संशोधनासाठी
घेतलेल्या मुलाखतीला निदानात्मक मुलाखत असे म्हणतात, विशिष्ट गंभीर सामाजिक समस्येच्या
किंवा घटनेच्या कारणांचा शोध घेणे हा या मुलाखतीचा उद्देश असतो.
(२) उपचारात्मक मुलाखत (Treatment
Interview) : सामाजिक समस्या सोडविण्यासाठी काही
उपायांचा शोध घेण्यासाठी ज्या मुलाखती घेतल्या जातात. त्या मुलाखतीस उपचारात्मक
मुलाखत असे म्हणतात. विविध सामाजिक समस्यांबाबत उपाययोजना सूचविण्याचा दृष्टीने
याच मुलाखती घेतल्या जाते.
(३) संशोधनात्मक मुलाखत (Research
Interview) : ज्यावेळी विविध सामाजिक विषय आणि घटनांच्या संबंधात कारणांचा शोध घेण्यासाठी ज्या
मुलाखती घेतल्या जातात. त्यांना संशोधनात्मक मुलाखत असे
म्हणतात. या मुलाखतीचा उद्देश केवळ संशोधनापुरता मर्यादित असतो.
(ब) औपचारिकतेनुसार वर्गीकरण (Classification According to Formality)
(१) औपचारिक मुलाखत (Formal Interview): या मुलाखतीमध्ये मुलाखत घेताना अनुसूचीचा उपयोग
करतात. मुलाखत घेण्यापूर्वी ही अनुसूची तयार केली जाते. या अनुसूचीनुसार प्रश्न
विचारले जातात. उत्तरदाता जे उत्तरे देईल. ते मुलाखतकार स्वतः लिहून घेतो.
मुलाखतकार इतर कोणते अनावश्यक प्रश्न विचारीत नाही. फक्त अनुसूचीमध्ये असलेले
प्रश्नच तो विचारीत असतो, अनुसूचीमुळे मुलाखतीचे स्वरूप निश्चित असते.
म्हणून या मुलाखतीला औपचारिक मुलाखत असे म्हणतात.
(२) अनौपचारिक मुलाखत (Informal Interview) या मुलाखतीला कोणत्याही विशेष अनुसूचीचा उपयोग
केल्या जात नाही. मुलाखतकर्ता मुलाखतदारास काही मुख्य प्रश्न किंवा कोणत्या
विषयाबाबत प्रश्न विचारतो आणि मुलाखतदाता आपल्या पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरे देतो. मुलाखतकर्ता या माहितीच्या आधारावर
निष्कर्ष काढतो. या प्रकारच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याच्या संदर्भात मुलाखतकर्त्यावर कोणतेही बंधन नसते.
(क) उत्तरदात्यांच्या संख्येनुसार वर्गीकरण
(Classification According to
Number of Informants)
(१) व्यक्तिगत मुलाखत (Personal
Intervicw) : ज्या मुलाखतीमध्ये एका वेळी एकाच
व्यक्तीची मुलाखत घेतली जाते. त्यास व्यक्तिगत मुलाखत असे म्हणतात. मुलाखतकर्ता हा
मुलाखतदात्याला प्रश्न विचारतो. आणि मुलाखतदाता त्या प्रश्नांची उत्तरे देत असतो.
(२) सामूहिक मुलाखत (Group Interview) व्यक्तिगत मुलाखतीत एका वेळी एकाच व्यक्तीची
मुलाखत घेतली जाते. परंतु सामूहिक मुलाखतीत एका वेळी अधिक व्यक्तीची मुलाखत
घेण्यात येते. मुलाखतकर्ता समूहातील प्रत्येक व्यक्तीला क्रमाक्रमाने प्रश्न
विचारतो. कधी तर एकच व्यक्ती उत्तरे देत असतो आणि बाकीचे लोक केवळ त्या उत्तरांचे
अनुमोदन करतात. या मुलाखतीकरिता स्थान किंवा जागा पूर्वोच निश्चिती केली जाते.
(ड) अध्ययन पद्धतीनुसार वर्गीकरण (Classification
According to Methodology)
(१) संरचित किंवा नियंत्रित मुलाखत (Structured
or Controlled Inter view) : या
मुलाखत पद्धतीमध्ये मुलाखतकर्ता मुलाखत अनुसूचीच्या सहाय्याने मुलाखत घेतो. मुलाखत
अनुसूची पूर्वीच तयार केलेली असते. या अनुसूचीनुसार प्रश्न विचारले जाते.
उत्तरदाता जे उत्तर देतो, त्याची नोंद मुलाखत अनूसूचीत करीत असतो. या
मुलाखती अनुसूची मधील प्रश्न विचारण्याचे बंधन मुलाखतदात्यावर असते. म्हणून या
संरचित मुलाखतीलाच नियंत्रित मुलाखत असे देखील म्हणतात. या पद्धतीत मुलाखत ही
प्रमाणीकृत होते. मुलाखतीपूर्वी त्या विषयाचे अध्ययन करावे लागते आणि त्या
अध्ययनाच्या आधारावर मुलाखत अनुसूची तयार केली जाते. अनुसूचीमधील प्रश्न हे मुक्त
किंवा बंद अशा दोन्ही प्रकारचे असतात. मुलाखत घेतांना अनुसूची मधील प्रश्नांमध्ये
कोणत्याही प्रकारचे परिवर्तन केले जात नाही. या प्रकारच्या मुलाखतीचे स्वरूप हे
व्यवस्थित क्रमबद्ध वस्तुनिष्ठ असते. यामध्ये सांख्यिकीय विश्लेषण करण्याची सोय
असते.
(२) असंरिचत किंवा अनियंत्रित मुलाखत (Unstrutured
and Uncon. trolled Interview) संरचित
मुलाखतपद्धतीच्या अगदी विरुद्ध असंरचित मुलाखत आहे. या मुलाखतीत अनुसूची नसते.
मुलाखतकर्ता उत्तरदात्यासमोर समस्येची मांडणी करतो. आणि त्यानंतर उत्तरदाता आपले
अनुभव व विचार व्यक्त करीत असतो. उत्तरदात्यांच्या उत्तरावर कोणत्याही प्रकारचे
नियंत्रण नसते. त्याचप्रमाणे मुलाखतदात्यावर सुद्धा नियंत्रण नसते. म्हणून या
मुलाखतीस अनियंत्रित मुलाखत असे म्हणतात.
(३) केंद्रित मुलाखत (Focussed Interview) केंद्रित मुलाखतीमध्ये मुलाखतकर्त्यांचे लक्ष
एका विशिष्ट मुद्यांवर केंद्रित झालेले असते. हा नियंत्रित मुलाखतीचाच एक प्रकार
आहे. ह्या मुलाखतीत मुलाखत घेणाऱ्याचे लक्ष उत्तरदात्याच्या एखाद्या अनुभवावर आणि
त्याच्या परिणामावर केंद्रित झालेले असते. अशाप्रकारच्या मुलाखतीचा उपयोग टेलिव्हिजन,
चित्रपट ह्यांच्या सामाजिक आणि मानसिक
परिणामाचे अध्ययन करण्यासाठी केला जातो. या मुलाखतीत मुलाखत गाईडचा उपयोग केला
जातो. तरी देखील ही मुलाखत प्रामुख्याने स्वतंत्रच असते. नवीन शोधाचा समाजावर
कोणता प्रभाव पडतो. याबाबत अध्ययन करण्यासाठी मुलाखत पद्धतीचा अवलंब केला जातो.
केंद्रित मुलाखतीचा सर्वप्रथम उपयोग डब्लू. एफ. आँगबर्न (W.F. Ogburn) यांनी
केला. त्यांनी रेडिओचा समाजावर कोणता प्रभाव पडतो याचे अध्ययन करण्यासाठी या मुलाखत
पद्धतीचा उपयोग केला होता. ऑगबर्न यानी रेडिओचे समाजावर जवळपास दिडशे प्रकारचे
परिणाम पडतात असे प्रतिपादन केले.
(इ) विषयसामुग्रीच्या आधारानुसार वर्गीकरण (Classification
According to Subject Matter)
(१)
गुणात्मक मुलाखत (Qualitative Interview) : या मुलाखतीमध्ये गुणात्मक स्वरुपाची माहिती संकलित केली जाते.
गुणात्मक माहिती संकलित करणे हा या मुलाखतीचा उद्देश असतो. समूहाच्या अध्ययनासाठी
आणि परिणामात्मक समस्यांच्या अध्ययनासाठी या मुलाखत पद्धतीचा उपयोग केला जातो.
व्यष्टी अध्ययन देखील या मुलाखत पद्धतीद्वारा केले जाते. यामध्ये उत्तर दात्याला
त्याच्या भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळा संबंधीचे प्रश्न विचारून गुणात्मक तथ्ये संकलित केली जातात. गुणात्मक मुलाखती
मध्ये अनुभवी आणि प्रशिक्षित मुलाखत कर्त्यांची आवश्यकता असते. तेव्हाच गुणात्मक तथ्ये संकलित करणे शक्य होते.
(२) परिमाणात्मक मुलाखत (Qunatitative
Interview) : जेव्हा मुलाखतकर्त्याला परिणामात्मक
तथ्ये संकलित करायची असतात. तेव्हा या मुलाखत पद्धतीचा उपयोग केला जातो. समूहाच्या
अध्ययनासाठी अशा प्रकारची मुलाखत घेतली जाते. जनगणना करताना परिणात्म मुलाखती
घेतल्या जातात.
(३) मिश्रित मुलाखत (Mixed Interview) : जेव्हा मुलाखतकर्त्याला गुणात्मक आणि
परिमाणात्मक अशा दोन्ही प्रकारची तथ्ये संकलित करायची असतात. तेव्हा मिश्रित
मुलाखतीचा उपयोग केला जातो. या मुलाखतीद्वारे गुणात्मक आणि परिमाणात्मक तथ्यांचे
संकलन केले जाते.
(फ) संपर्काच्या आधारानुसार वर्गीकरण (Classification
According to Contact)
(१) अल्पकालीन संपर्क मुलाखत (Short
Contact Interview ) : या मुलखतीचा
उपयोग आवश्यकता वाटल्यास विशिष्ट अध्यनासाठी केला जातो. ही मुलाखत नियमित आणि
नियंत्रित नसते. अन्वेषणात्मक अध्यनासाठी या मुलाखत पद्धतीचा उपयोग करण्यात येतो.
कधी कधी या प्रकारच्या मुलाखतीतून त्या अध्ययन विषयाच्या संबंधात महत्त्वपूर्ण
सांख्यिकीय माहिती प्राप्त होते. अशा प्रकारच्या मुलाखती रेल्वे स्टेशन, बस
स्टेशन, चित्रपटगृह, घरी इत्यादी ठिकाणी घेतल्या जातात. या मुलाखती
थोड्या वेळात घेतल्या जातात. अर्थात, मुलाखतकर्ता उत्तरदात्यांशी अगदी थोड्या
वेळाकरिता संपर्कात येतो. म्हणून या प्रकारच्या मुलाखतीला अल्पकालीन संपर्क मुलाखत
असे म्हणतात.
(२) दीर्घकालीन संपर्क मुलाखत (Long
Contact Interview ) : ज्या मुलाखती
दीर्घकाळ पर्यंत चालतात. म्हणजेच मुलाखतकर्ता उत्तरदात्याशी जास्त वेळपर्यंत
संपर्कात राहतो. म्हणून या मुलाखतीला दीर्घकालीन संपर्क मुलाखत असे म्हणतात. सखोल
आणि गंभीर स्वरूपाची माहिती मिळविण्याच्या उद्देशाने ही मुलाखत घेतली जाते.
त्यामुळे या मुलखतीत अधिक काळपर्यंत त्या समस्येच्या विविध पैलूंचे सूक्ष्म अध्ययन
केले जाते. या मुलाखती फार वेळपर्यंत चालतात. उत्तरदात्याला वारंवार भेटून मुलाखत
घेतली जाते. असंरचित किंवा अनिदर्शित मुलाखतीचा अंतर्भाव या मुलाखत पद्धतीमध्ये
होतो. कारण या मुलाखती दीर्घकाळ पर्यंत चालतात.
मुलाखत तंत्राचे गुण किंवा महत्त्व (Merits
and Importance of Interview Technique)
(१) सर्वप्रकारच्या माहितीचे संकलन (Collection of All Types of Informa tion): मुलाखत तंत्राचा प्रमुख गुण म्हणजे या
तंत्राद्वारे सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन करता येते. यामध्ये प्रत्यक्ष
संबंधित व्यक्तीशी भेटून माहितीचे संकलन करणे शक्य होते.
(२) भूतकालीन घटनांचे अध्ययन (Study of Past Phenomenon) : मुलाखत
तंत्राद्वारे भूतकालीन घटना आणि त्यांच्या परिणामाचे अध्ययन करणे शक्य होते. मानवी
जीवनात विविध प्रकारच्या घटना घडत असतात. या घटना भूतकाळात घडलेल्या असतात. काही
घटनांची पुनरावृत्ती होणे शक्य नसते. परंतु त्या घटनांचे मानवी किंवा सामाजिक
जीवनाच्या संबंधात अध्ययन करणे महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत मुलाखत तंत्राचा
उपयोग करून भूतकाळात घडलेल्या घटनाचे अध्ययन केले जाते.
(३) अमूर्त आणि अदृश्य घटनांचे अध्ययन (Study of Abstract and Non Visible Phenomenon) : निरीक्षण तंत्राद्वारे केवळ मूर्त आणि दृष्य
स्वरूपाच्या घटनांचेच अध्ययन केले जाते. परंतु मुलाखत तंत्राद्वारे अमूर्त आणि
अदृश्य घटनांचे अध्ययन करणे शक्य होते. व्यक्तिगत विचार, भावना, संवेग, मनोवृत्ती
अशा अनेक अमूर्त घटना आहेत की, ज्या मानवी क्रियांचे निर्धारण करतात. या अमूर्त घटनांचे अध्ययन निरीक्षण तंत्राद्वारे
करणे शक्य नसते कारण या घटना दृश्य स्वरूपात नसतात. या घटना अदृश्य असून देखील
केवळ व्यक्तिगत जीवनच नाही तर सामाजिक जीवन प्रभावित करतात. म्हणून अशाप्रकारच्या
अमूर्त आणि अदृश्य घटनांचे अध्ययन मुलाखत तंत्राद्वारे केले जाते.
(४) पर्याप्त मानसशास्त्रीय अध्ययन (Adequate Psychological Study) : व्यक्तीचे अनेक विचार आणि उद्देश असतात. व्यक्ती हा भावनाप्रधान
असतो. त्यामुळे या गोष्टींचे अध्ययन करणे कठीण असते. परंतु मुलाखत तंत्राद्वारे या
मानसिक गोष्टींचे मानसशास्त्रीय दृष्टीने अध्ययन करणे शक्य असते. मुलाखतीत
उत्तरदात्यांशी प्रत्यक्ष संबंध येतो. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेचे प्रत्यक्ष
अध्ययन शक्य होते. अनेक मानसशास्त्रीय प्रश्न विचारून उत्तरदात्यांच्या मनातील
गोष्टी काढून घेता येतात. म्हणून मुलाखत तंत्राद्वारे पर्याप्त प्रमाणात
मानसशास्त्रीय अध्ययन करणे शक्य होते.
(५) बहुपक्षीय आणि सखोल अध्ययन (Multi-Dimensional and Deep Study) : मुलाखत तंत्रामध्ये व्यक्तीच्या सर्वच
प्रकारच्या व्यवहार, सामजिक वातावरणाचा प्रभाव, विचार, भावना इत्यादीचे अध्ययन केले जाते.
त्याचप्रमाणे या गोष्टींचे अधिक सखोल अध्ययन करता येते. या पद्धतीत
मुलाखतकर्त्याला सखोल व सूक्ष्म अध्ययन करण्याची संधी असते. त्यामुळे मुलाखतकर्ता
आपल्या त्या संधीचा फायदा घेऊन अध्ययन विषयाच्या सर्व पैलूंचे सखोल अध्ययन करतो.
(६) पारस्पारिक प्रेरणात्मक अध्ययन (Inter
Stimulative Study) : मुलाखत घेताना
मुलाखतदाता किंवा उत्तरदाता आणि मुलाखतकर्ता यांच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण
होत असते. ते आपले विचार व्यक्त करतात. मुलाखतकर्ता उत्तरदात्याला उत्तरे
देण्यासाठी प्रेरीत करतो. तसेच आपल्या प्रभावी बोलण्याने त्याच्यामध्ये उत्साह
निर्माण करतो. केवळ उत्तरदाता प्रेरीत व उत्साहित होतो असे नाही तर उत्तरदात्यांच्या
विचारांमुळे मुलाखतकर्त्याला देखील प्रेरणा मिळतात. त्यामुळे मुलाखत ही अधिक
चांगली होते. दोघांच्या बोलण्यामधून अनेक नवीन पैलू लक्षात येतात.
(७) माहितीची सत्यता पडताळून बघण्याची शक्यता (Verification
of Infor mation Possible) : मुलाखत
तंत्राद्वारे मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून बघण्याची संधी असते. मुलाखतदाता
स्वतंत्रपणे आपले विचार व्यक्त करतो. त्याचे विचार हे सत्य आहे किंवा नाही हे
जाणून घेण्यासाठी मुलाखतकर्ता प्रतिप्रश्न विचारतो. त्यामुळे माहितीची सत्यता
पडताळून बघता येते. त्यामुळे मुलाखत तंत्राद्वारे संकलित केलेली माहिती ही अधिक
विश्वसनीय असते...
मुलाखत तंत्राचे दोष किंवा मर्यादा (Demerits
or Limitations of Interview Technique)
(१) विस्मरणाची शक्यता (Possibility
Of Forgetting) मुलाखत घेत असतांना सर्वच गोष्टीची
नोंद घेणे शक्य नसते. कारण त्यामुळे मुलाखत खंडीत होण्याची शक्यता असते. काही
गोष्टींची नोंद घेता येते त्यामुळे मुलाखतदाता ज्या महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या
सर्व त्याच्या लक्षात राहतीलच असे नाही. काही महत्वाच्या गोष्टींचे विस्मरण
होण्याची शक्यता असत म्हणून मुलाखत तंत्राचा हा एक फार मोठा दोष आहे.
(२) व्यक्तिगत पूर्वग्रह (Personal Bias) मुलाखत तंत्राचा
आणखी एक महत्वाचा दोष म्हणजे, यामध्ये व्यक्तिगत पूर्वग्रहाचा विशेष प्रभाव
असण्याची शक्यता असते. मुलाखतदाता जी काही माहिती देतो त्या माहितीवरच मुलाखतकर्त्याला
अवलंबून रहावे लागते. मुलाखतदात्याने दिलेल्या माहितीच्या आधारावरच निष्कर्ष काढले
जातात परंतु मुलाखतदात्याचा पूर्वग्रह असू शकतो. अनेकदा मुलाखतदाता आपल्या पूर्वग्रह दृष्टिकोनातून माहिती देत असतो.
त्यामुळे मुलाखतदात्याने दिलेली माहिती ही पक्षपातपूर्ण असू शकते. त्याचप्रमाणे
मुलाखतकर्ता हा पूर्वग्रहापासून अलिप्त असतो असे म्हणता येत नाही.
(३) मुलाखतदात्यावर अवलंबून असणे (To Depend on Informants) : मुलाखत तंत्राचा एक महत्वाचा दोष म्हणजे मुलाखतकर्ता हा पूर्णपणे
मुलाखतदात्यावर अवलंबून असतो. प्रथम मुलाखतदात्याला मुलाखत देण्यासाठी प्रवृत्त
करावे लागते. मुलाखतदाता मुलाखत देण्यासाठी तयार झाल्यानंतर तो स्वतंत्रपणे माहिती
देणे पसंत करतो. अशावेळी मुलाखतकर्त्याला आवश्यक असलेली माहिती मिळेलच असे नाही.
अनेकदा भावनात्मक प्रश्नाच्या संदर्भात माहिती देण्यास मुलाखतदाता तयार नसतो.
त्यामुळे मुलाखतकर्त्यासमोर समस्या निर्माण होते यावरून हे स्पष्ट होते की, मुलाखतकर्त्याला
मुलाखतदात्यावर अवलंबून रहावे लागते.
(४) न्यूनगंडाची भावना (Inferiority
Complex): मुलाखत घेणे ही साधी गोष्ट नाही.
मुलाखतीकरिता मुलाखतकर्ता अनेक व्यक्तीकडे जातो. समाजात वेगवेगळ्या स्वभावाची
माणसे असतात. मुलाखतकर्त्याला चांगल्या अनुभवापेक्षा अनेक वाईट अनुभव येतात. काही
मुलाखतदाते त्याचा अपमान करण्यास देखील मागे पुढे बघत नाही. त्यामुळे
मुलाखतकर्त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. मुलाखतकर्त्याच्या
न्यूनगंड भावनेचा प्रभाव मुलाखतीवर पडू शकतो. त्यामुळे मुलाखती मधील काही
महत्त्वपूर्ण तथ्यांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.
(५) प्रशिक्षित मुलाखतकर्त्याची आवश्यकता (Need for Trained Inter viewers) मुलाखत हे एक तंत्र आहे. कुणीही मुलाखत घेऊ शकत नाही. यशस्वी मुलाखत
घेण्यासाठी काही कौशल्याची आवश्यकता असते. जर मुलाखतकार्य हा प्रशिक्षित असेल
त्याला मुलाखत घेण्याचे कौशल्य अवगत असेल तर मुलाखतीतून अधिक महत्त्वपूर्ण
तथ्यांचे संकलन करता येते. परंतु जर मुलाखतकर्ता हा प्रशिक्षित नसेल, त्याच्या
जवळ बुद्धीचातुर्य व कौशल्याचा अभाव असेल तर मुलाखत तंत्राचा योग्य वापर करणे
अशक्य असते. अशावेळी मुलाखतीतून मिळालेली माहिती दोषपूर्ण असू शकते.
(६) अधिक वेळेची आवश्यकता (Need of More Time) : मुलाखतीकरिता
बराच वेळ लागतो. मुलाखतकर्ता प्रत्येक मुलाखतदात्याकडे जाऊन त्याची सविस्तर मुलाखत
घेत असतो. कधी कधी मुलाखतीची वेळ ठरवून देखील
मुलाखतदाता मुलाखत देण्यासाठी उपलब्ध नसतो. अशावेळी मुलाखतकर्त्याला वारंवार
मुलाखतदात्याकडे जावे लागते. काही मुलाखतदाते मुलाखत देताना इतर गोष्टी मध्ये बराच
वेळ घालवित असतात. त्यामुळे मुलाखत ही लांबली जाते. मुलाखत घेण्यासाठी
मुलाखतकर्याला बराच वेळ द्यावा लागतो.
(७) सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि भाषेची समस्या (Problems of Cultural Background and Language) मुलाखतकर्ता आणि मुलाखतदाते यांची सांस्कृतिक व
सामाजिक पार्श्वभूमी आणि भाषा सारखी असेलच असे नाही. इतकेच नव्हे तर सर्व
मुलाखतदाते हे एकाच सांस्कृतिक पार्श्वभूमोतून आलेले नसतात. त्यांची सांस्कृतिक व
सामाजिक पार्श्वभूमी आणि भाषा यामध्ये भिन्नता असते. सांस्कृतिक व सामाजिक तसेच
भाषेच्या भिन्नतेमुळे मुलाखत घेताना अनेक अडचणी निर्माण होतात.
(८) अशुद्ध अहवाल (Inaccurate
Report) : मुलाखती घेतल्यानंतर मुलाखतकर्ता अहवाल
तयार करतो. परंतु हा अहवाल तयार करताना मुलाखतकर्त्याचे विचार, भावना, इत्यादींचा
प्रभाव पडत असतो. त्यामुळे अहवाल तयार करताना पक्षपात होण्याची शक्यता अधिक असते.
प्रश्नावली - Questionnaire
प्रश्नावलीचा अर्थ व व्याख्या (Meaning
and Definition of Questionnaire)
(१) लुंडबर्ग (Lundberg): “मूलभूत
स्वरूपात प्रश्नावली ही प्रेरणांचा असा समूह आहे की जी शिक्षित लोकांपुढे या
प्रेरणाच्या अंतर्गत त्यांच्या मौखिक व्यवहारांचे निरीक्षण करण्यासाठी प्रस्तुत
केली जाते. "
("Fundamentally, the
Questionnaire is a set of stimuli to which literate people are exposed in order
to observe their verbal behaviour under these stimuli." - George Lundberg.
)
(२) गुड आणि हॅट (Good
and Hatt) : "सामान्य रूपात
प्रश्नावली म्हणजे प्रश्नाची उत्तरे प्राप्त करून घेण्याची पद्धती असून तिच्यात
प्रश्नपत्रिकेचा उपयोग केला जातो. आणि जी उत्तरदाता स्वतः भरतो. "("In general the word questionnaire refers to a device
for securing answer to questions by using a form
which the respondent fills in himself. - Good and Hatt)
(३) जोहॅन गॅल्ट्रंग (Johan
Galtung) : "लिखित चेतक (प्रश्न) व लिखित
प्रत्युत्तर म्हणजे प्रश्नावली होय." ("Questionnaire is written verbal stimulus and written verbal
response."- John Galtung)
(४)
बोगार्डस (Bogerdus) : "प्रश्नावली विविध व्यक्तींना उत्तर देण्याकरिता
तयार करण्यात आलेली एक तालिका होय."("A questionnaire is a list of questions to a number of
persons for them to answer" - Emory S Bogendus
(५) सिन पाओ यंग (Hsin Pao Yang) : "आपल्या साध्या रूपात प्रश्नावली हीप्रश्नांची एक अनुसूची आहे. जी
सूचीतील व्यक्तींना किंवा सर्वेक्षण नमुन्यामध्ये निवड झालेल्या व्यक्तींकडे
पोस्टाद्वारा पाठविली जाते."
("In its simplest form,
the questionnaire consits of a shedule of questions, sent by mail to persons on
a list or in a survey sample." - Hsin Pao Yang. )
(६) विल्सन गी (Wilson
Gce) : “विस्तृत क्षेत्रात मोठ्या संख्येने
पसरलेल्या किंवा एखाद्या निवडलेल्या लहान क्षेत्रात पसरलेल्या लोकांकडून मर्यादित
प्रमाणात तथ्ये संकलन करण्याची सुलभ पद्धती म्हणजे प्रश्नावली होय."
("It does constitute a
convenient method of obtaining a limited amount of information from a large
number of persons on from a small selected group which is videly
scattered"-
Wilson Gee)
प्रश्नावलीची वैशिष्ट्ये (Characteristics of Questionnaire)
(१) प्रश्नावलीमध्ये अध्ययन विषयाबाबतच्या प्रत्येक पैलूंविषयी अनेक
प्रश्न एका सूचीच्या रूपात असतात.
(२) प्रश्नावलीमध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरे उत्तरदाता स्वतः
भरतो.
(३) विस्तृत क्षेत्रात पसरलेल्या लोकांकडून माहिती संकलित करण्याची
एक अतिशय महत्वाची पद्धत आहे.
(४) प्रश्नावली हो पोस्टाद्वारा उत्तरदात्यांकडे पाठविली जाते.
(५) प्रश्नावलीमधील प्रश्नांची भाषा ही अतिशय स्पष्ट असते. उत्तरदाता
संशोधनकर्त्यांच्या मदतीशिवाय प्रश्नाची उत्तरे लिहितो.
(६) प्रश्नावलीद्वारे प्राप्त होणारी तथ्ये ही अधिक यथार्थ आणि
वस्तुनिष्ठ असतात. कारण उत्तरदाता प्रश्नाची उत्तरे लिहितो तेव्हा तेथे
संशोधनकर्ता नसतो. उत्तरदाता शांतपणे आपल्या मतानुसार प्रश्नाची उत्तरे लिहितो. त्याच्यावर कोणाचा दबाव
(७) गोपनीय आणि महत्वपूर्ण तथ्यांचे संकलन प्रश्नावलीद्वारे केले
जाते. कारण उत्तरे नसतो. लिहिताना
त्याच्यावर कुणाचा दबाव नसतो.
(८) प्रश्नावलीद्वारे एकाच वेळी सर्व उत्तरदात्यांकडून माहिती
प्राप्त केली जाते.
(९) प्रश्नावलीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीचा उपयोग फक्त सुशिक्षित
उत्तरदात्यापुरता मर्यादित असतो. अशिक्षित उत्तरदात्यांच्या संदर्भात
प्रश्नावलीद्वारे तथ्य संकलन करणे अशक्य असते.
(१०) प्रश्नावली पद्धतीद्वारे कमी वेळात आणि कमी पैशात जास्तीत जास्त
तथ्यांचे संकलन केले जाते.
प्रश्नावलीचे प्रकार ( Types of Questionnaire)
प्रश्नावलीची रचना, प्रश्नाचे स्वरूप आणि तथ्याचे स्वरूप या
आधारावर प्रश्नावलीचे विविध प्रकार पाडले जातात.
(अ) लुंडबर्ग (Lundberg) : यांनी प्रश्नावलीचे दोन प्रकार सांगितले आहेत.
(१) तथ्य संबंधित प्रश्नावली (Questionnaire
of Fact)
(२)
मते आणि मनोवृत्ती संबंधित प्रश्नावली (Questionnaire Attitude of
Opinion )
(ब) श्रीमती पॉलिन यंग (Smt.
Pauline Young)
(१) संरचित प्रश्नावली (Structured
Questionnaire)
(२)
असंरचित प्रश्नावली (Nonstructured
Questionnaire)
(क) प्रश्नाच्या स्वरूपाच्या आधारानुसार प्रश्नावलीचे प्रकार
(१) बंदिस्त प्रश्नावली (Closed
Questionnaire)
(२) मुक्त प्रश्नावली (Open
Questionaire)
(३) चित्रमय प्रश्नावली (Pictorial
Questionnaire)
(४) मिश्रित प्रश्नावली (Mixed
Questionnaire)
लुंडबर्ग आणि श्रीमती पॉलिन यंग यांनी प्रश्नावलीचे जे विविध प्रकार
सांगितले आहेत. तसेच प्रश्नांच्या स्वरूपाच्या आधारावरून प्रश्नावलीचे मुख्य
प्रकार सांगता येतील. प्रश्नावलीच्या मुख्य प्रकाराचे विवेचन पुढीलप्रमाणे.
प्रश्नावलीचे प्रकार (Types of Questionnaire)
(१) संरचित प्रश्नावली (Structured Questionnaire) संरचित प्रश्नावलीमधील
प्रश्नाची रचना ही संशोधन सुरू करण्यापूर्वीच केली जाते. नंतर मात्र त्यामध्ये
कोणतेच परिवर्तन केले जात नाही. श्रीमती पॉलिन यंग यांनी लिहले की, "संरचित
प्रश्नावली ही अशी आहे की, ज्यामधील प्रश्न निश्चित ठोस आणि पूर्वनिर्धारित
असतात. त्या प्रश्नांची रचना ही प्रश्नाची उत्तरे लिहिण्यापूर्वीच केली जाते. (Structured Questionnaire are those in which there
definite, concrete, and pre-ordained questions, that is, they are prepared in
advance and not constructed on the spot during the questioning period. ) अध्ययनाचा उद्देश सामाजिक किंवा आर्थिक
घटनांच्या संदर्भात माहिती संकलित करणे, मतांच्या संबंधात माहिती प्राप्त करणे, किया
कोणते प्रशासकीय धोरण किंवा परिवर्तनाच्या संबंधात अध्ययन करणे हा असू शकतो. या
विविध उद्देशाच्या प्राप्तीकरिता संरचित प्रश्नावलोचा उपयोग केला जातो. अध्ययनाचा
उद्देश कोणताही असो, विस्तृत क्षेत्रामधून पूर्वनिर्धारित योजनेनुसार माहिती संकलित
करण्यासाठी संरचित प्रश्नावली ही सर्वात चांगली असते. या प्रश्नावलीतील प्रश्न
पूर्वनिर्धारित असल्यामुळे ते क्रमबद्ध आणि निश्चित असतात. तसेच सर्व
उत्तरदात्याकरिता प्रश्न सारखे असतात. त्यामुळे या प्रश्नावलीद्वारे विश्वसनीय व
प्रमाणित तथ्ये प्राप्त करणे सुलभ होते. हा या प्रश्नावलीचा सर्वात महत्वाचा फायदा
होय.
(२) असंरचित प्रश्नावली (Non Structured Questionnaire) : असरचित प्रश्नावलीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांची रचना पूर्वी
केलेली नसते. याचाच अर्थ प्रश्न है पूर्वनिर्धारित नसतात. ज्या विषयाच्या संबंधात
उत्तरदात्याकडून माहिती संकलित करायची असते. त्या विषयाचा या प्रश्नावलीत केवळ उल्लेख
असतो. असरचित प्रश्नावलीचे स्वरूप मुलाखत मार्गदर्शिकेप्रमाणे असते. परंतु
प्रश्नावली पद्धतीत मुलाखत घेतली जात नाही. खरे तर असंरचित प्रश्नावलीस प्रश्नावली
म्हणणे योग्य नाही. तरी देखील समाजशास्त्राच्या सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती पॉलिन
यंग यांनी असंरचित प्रश्नावलीस प्रश्नावलीचा एक प्रकार मानला आहे.
(३) बंदिस्त प्रश्नावली (Closed Questionnaire) : बंदिस्त प्रश्नावलीमध्ये प्रत्येक प्रश्नाचे पर्यायी उत्तर दिलेले
असते. उत्तरदात्याला त्या प्रश्नाच्या पर्यायी उत्तरावर फक्त खूण करायची असते.
याचाच अर्थ या प्रश्नावलीत उत्तरदात्याला प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तरापैकी
योग्य उत्तर निवडून त्यावर खूण करायची असते. या प्रश्नावलीत उत्तरदात्यांना आपले
मत स्वतंत्रपणे नोंदविण्याची सोय नसते. त्याला फक्त प्रश्नावलीत नमूद केलेल्या
पूर्वनिर्धारित उत्तरांपैकी कोणत्या तरी एका उत्तराची आपल्या मतानुसार निवड करून
त्यावर खूण (v) करायचे असते. उत्तरदात्याला आपले विचार स्वतंत्रपणे मांडता येत नाही.
फक्त पर्यायी उत्तरांपैकी त्याला योग्य उत्तराची निवड करावी लागते. म्हणून या
प्रश्नावलीस बंदिस्त प्रश्नावली असे म्हणतात. बंदिस्त प्रश्नावलीचे स्वरूप
पुढीलप्रमाणे असते.
उदाहरण :- कौटुंबिक तणावाचा आपल्यावर कोणता प्रभाव पडतो (अ) घर सोडून
जाण्याची इच्छा. (ब) मानसिक ताण (क) आत्महत्या करण्याची इच्छा (ड) दारू पिण्याची
इच्छा
बंदिस्त प्रश्नावलीचा सर्वात महत्वाचा लाभ म्हणजे उत्तरदाता
प्रश्नावलीतील सर्व प्रश्नाची उत्तरे देतो. प्रश्नाची उत्तरे देण्यामध्ये त्याला
कंटाळा येत नाही. त्यामुळे प्रश्नावली भरणे त्याला सोपे वाटते. उत्तरदात्याला
प्रश्नाचा अर्थ त्वरित कळतो. या प्रश्नावली द्वारे प्राप्त झालेल्या माहितीचे
वर्गीकरण करणे सुलभ असते. बंदिस्त प्रश्नावलीच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे
सर्वच प्रकारच्या अध्ययनात या प्रश्नावलीचा उपयोग करणे शक्य नाही.
(४) मुक्त प्रश्नावली (Open
Quctionnaire) : मुक्त प्रश्नावलीमध्ये प्रश्नांची
पर्यायी उत्तरे दिलेली नसतात. फक्त प्रश्न विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नांसमोर
मोकळी जागा असते. त्या मोकळ्या जागेत उत्तरदाता आपल्या
इच्छेनुसार प्रश्नाची उत्तरे लिहितो. म्हणून या प्रश्नावलीस मुक्त प्रश्नावली असे
म्हणतात. आपले उत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य उत्तरदात्याला असते. त्यामुळे
उत्तरदाता निर्भिडपणे आपल्या उत्तरांची नोंद प्रश्नावलीमध्ये करू शकतो. मुक्त
प्रश्नावलीचे स्वरूप हे पुढीलप्रमाणे असते. उदा.(१) आपल्यामते, बालगुन्हेगारीचे
स्वरूप कसे आहे? (२) बालगुन्हेगारी निर्माण होण्याची कारणे कोणती ?
मुक्त प्रश्नावलीमध्ये उत्तरदात्यांना आपल्या वास्तविक भावनांची
अभिव्यक्ती करण्यास स्वातंत्र्य असते. गुणात्मक तथ्यांचे संकलन करण्याच्या
दृष्टीने ही प्रश्नावली विशेष उपयुक्त आहे. अन्वेषणात्मक संशोधनासाठी मुक्त
प्रश्नावलीचा उपयोग केला जातो.
(५) चित्रमय प्रश्नावली (Pictorial Questionnaire) : चित्रमय प्रश्नावलीमध्ये प्रश्नांची संभाव्य उत्तरे चित्रांद्वारा
दर्शविली जातात. प्रश्नाचे उत्तर ज्या चित्रांद्वारे स्पष्ट होत असते, अशा
चित्रावर उत्तरदाता खूण (v) करतो. चित्रे असल्यामुळे प्रश्नावली ही आकर्षक
वाटते. सतत व्यस्त असलेल्या व्यक्ती देखील चित्रांकडे आकर्षित होऊन उत्तरे देण्यास
प्रेरीत होतात. उत्तरदात्याला योग्य उत्तर वाटणाऱ्या चित्रांवर खूण करायची असते.
त्यामुळे त्याला आपल्या डोक्यास ताण देण्याची आवश्यकता नसते. या प्रश्नावलीचा
प्रमुख दोष म्हणजे या प्रश्नावलीचा आकार हा मोठा असतो. तसेच ही प्रश्नावली
छापण्याकरिता संशोधनकर्त्याला जास्त खर्च येतो.
(६) मिश्रित प्रश्नावली (Mixed Questionnaire) : मिश्रीत प्रश्नावलीमध्ये प्रश्नावलीच्या वेगवेगळ्या प्रकारांचा
समावेश केला जातो. साधारणतः बंद आणि मुक्त प्रश्न अशा दोन्ही प्रकारच्या
प्रश्नांचा अंतर्भाव मिश्रित प्रश्नावलीमध्ये असतो. या प्रश्नावलीस मिश्रित
प्रश्नावली असे म्हणतात. अलिकडे सामाजिक संशोधन आणि सामाजिक सर्वेक्षणात मिश्रित
प्रश्नावली चा उपयोग केला जातो.
प्रश्नावली तंत्राचे महत्व किंवा उपयोगिता
(Importance, Utility and
Merits of Questionnaire)
(१) विस्तृत क्षेत्राचे अध्ययन (Study
of Large Field) : प्रश्नावली
पद्धतीमुळे विस्तृत क्षेत्रात विखुरलेल्या लोकांकडून कमी वेळात महत्वपूर्ण तथ्याचे
संकलन केले जाते;परंतु प्रश्नावली पद्धतीद्वारे मात्र मोठ्या समूहाच्या लोकांकडून
माहिती मिळविणे अतिशय सोपे आहे.
(२) कमीत कमी खर्च (Minimum Expenses) प्रश्नावली पद्धतीचा एक महत्वाचा फायदा म्हणणे
या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे फारच कमी खर्च येतो. कारण या तंत्रामध्ये कोणत्याही
प्रकारच्या क्षेत्रीय कार्यकत्यांची आवश्यकता नसते. त्यामुळे त्यांच्यावरील
खर्चाची बचत होते.
(३) माहिती त्वरित प्राप्त होणे (Early
Reccipt to Information) : प्रश्नावलीद्वारे
कमीत कमी वेळात उपयुक्त तथ्यांचे संकलन करणे शक्य होते. प्रश्नावली सर्व
उत्तरदात्यांकडे एकाच वेळी पाठविली जाते आणि १० ते १५ दिवसात जवळपास सर्वच
उत्तरदात्यांकडून माहिती प्राप्त होते. प्रश्नावलीमध्ये उत्तरदाता संशोधन क्षेत्रात जात नाही.
उत्तरदात्यांकडे प्रश्नावली पोस्टाने पाठविली जाते आणि लगेच ते प्रश्नावली भरून
वापस पाठवितात. म्हणून प्रश्नावलीमध्ये माहिती त्वरित प्राप्त होते.
(४) पुन्हा पुन्हा माहिती प्राप्त करण्याची सोय (Easy
to Get Repetitive Information) : काही
संशोधन अशा प्रकारचे असते की, ज्यामध्ये उत्तरदात्यांकडून एका निश्चित
वेळेनंतर अनेकदा माहिती प्राप्त करणे आवश्यक असते. उदा. कौटुंबिक बजेट संबंधीची
माहिती.
(५) स्वतंत्र आणि प्रामाणिक माहिती (Free and Valid Information) : प्रश्नावलीमधील उत्तरे उत्तरदाता हा स्वतः आपल्या घरी किंवा
कार्यालयात लिहितो. त्यावेळी संशोधनकर्ता तेथे उपस्थित नसतो. अनेकदा
उत्तरदात्यांची संशोधनकर्त्याशी ओळख देखील नसते. स्वतंत्रपणे आपले विचार व्यक्त
करण्याची सोय प्रश्नावलीमध्ये असते. उत्तरदात्यावर कोणाचा दबाव येत नाही.
प्रश्नावली पोस्टाने घरी येत असल्यामुळे उत्तरदाता शांतपणे, विचारपूर्वक
प्रश्नावली भरतो. महत्वाची गोष्ट म्हणजे संशोधनकर्त्यांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा
त्यांच्या विचारांचा कोणताही प्रभाव उत्तरदात्यांवर पडत नसतो. म्हणून
प्रश्नावलीमधील माहिती स्वतंत्र आणि प्रामाणिक असते.
(६) सोयीची (Convenience)
: प्रश्नावली तंत्राच्या अंतर्गत माहिती
एकत्रित करणे अतिशय सुलभ आहे. कारण या पद्धतीत संशोधनकर्त्यास अधिक श्रम, पैसा
आणि वेळ खर्च करण्याची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे आपल्या सोयीनुसार, योग्य
वेळी प्रश्नांची उत्तरे लिहिण्याची सोय असते. म्हणून प्रश्नावली ही उत्तरदाता व
संशोधनकर्ता या दोघांच्याही दृष्टीने सोयीची आहे.
(७) स्वयं-प्रशासन (Self-Administered) : प्रश्नावली तंत्रामध्ये संशोधनकर्त्याला
संशोधनक्षेत्रात जाण्याची आवश्यकता नसते तथ्य संकलन करण्यासाठी विविध
कार्यकर्त्यांची आवश्यकता नसते. अध्ययन विषयासंबंधी प्रश्नावली तयार करून ती
उत्तरदात्याकडे पोस्टाने पाठविली जाते आणि उत्तरदाते प्रश्नावली भरून पोस्टाद्वारे
संशोधनकर्त्याकडे पाठवितात. अशाप्रकारे संशोधनकर्त्याला घरी किंवा आपल्या
कार्यालयात बसून तथ्यांचे संकलन करणे शक्य होते. अशाप्रकारे प्रश्नावली तंत्र हे
स्वयंप्रशासन असलेले एक तंत्र आहे.
प्रश्नावलीचे दोष किंवा मर्यादा (Demerits
or Limitations of Questionnaire)
प्रश्नावलीचे पुढील काही दोष आहेत.
(१) केवळ सुशिक्षित उत्तरदात्यांकरिता (Only For Literates Informant)प्रश्नावली तंत्राचा सर्वात मोठा दोष म्हणजे, अशिक्षित
उत्तरदात्यांकडून तथ्ये संकलित केले जाऊ शकत
नाही. फक्त सुशिक्षित उत्तरदात्याकरिता प्रश्नावली उपयुक्त आहेत. आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे
भारतातील बहुसंख्य अशिक्षित उत्तरदात्यांच्या संबंधात प्रश्नावलीचा उपयोग करणे शक्य नाही. फक्त मूठभर सुशिक्षित
लोकांकरिता प्रश्नावलीचा उपयोग केला जातो. म्हणून प्रश्नावली
तंत्राची ही एक फार मोठी मर्यादा आहे.
(२) अपूर्ण माहिती (Incomplete Information) : प्रश्नावलीत भरलेली माहिती हो अपूर्ण असण्याची
शक्यता असते. अनेक प्रश्न उत्तरदात्याला कळत नाही. जे प्रश्न कळले नाही. त्याबाबत
मार्गदर्शन करण्यासाठी संशोधनकर्ता तेथे नसतो. म्हणून उत्तरदाता त्या प्रश्नांची
उत्तरे लिहिण्याचे टाळतो. जे प्रश्न सोपी आहेत. त्याच प्रश्नांची उत्तरे लिहितो.
उत्तरदात्याला त्या संशोधन विषयांसंबंधी आपुलकी किंवा रूची असण्याचे कोणतेच कारण
नसते. म्हणून तो प्रश्नावलीतील उत्तरे काळजीपूर्वक लिहीलच याची शाश्वती नसते.
त्यामुळे प्रश्नावलीतील माहिती ही अपूर्ण आणि अस्पष्ट असते.
(३) प्रश्नावली भरून पाठविण्याची समस्या (Problem of Sending Question naire with Answers) : प्रश्नावली उत्तरदात्यांकडे पाठविल्यानंतर ते
त्वरित माहिती भरून परत पाठवतील, अशी आशा करणे व्यर्थ आहे. फारच कमी उत्तरदाते
हे प्रश्नावली भरून संशोधनकर्त्याकडे पाठवितात. परंतु बहुसंख्य उत्तरदाते मात्र
प्रश्नावली भरणे आणि तो संशोधनकर्त्यांकडे पाठविण्याच्या संदर्भात हलगर्जीपणा
करतात. त्यामुळे उत्तरदात्यांना प्रश्नावली पाठविण्याकरिता अनुगामी पत्र पाठवावे
लागते. अनुगामी पत्र पाठविल्यानंतर देखील उत्तरदाता प्रश्नावली पाठविलच असे नाही.
उत्तरदाते प्रश्नावली भरून पाठवित नाही. म्हणून प्रश्नावली तंत्रामध्ये प्रश्नावली
भरून पाठविण्याची समस्या निर्माण होते.
(४) भावनात्मक प्रेरणाचा अभाव (Lack
of Emotional Stimulation) : प्रश्नावली
तंत्रामध्ये संशोधनकर्याचा उत्तरदात्यांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. त्यामुळे
संशोधनकर्ता आपल्या व्यक्तिगत प्रभावाद्वारे उत्तरदात्यास वास्तविक माहिती
सांगण्यास भावनात्मक प्रेरणा देऊ शकत नाही. प्रश्नावली भरणे ही उत्तरदात्याकरिता
फक्त एक औपचारिकता राहते. उत्तरदात्यांना प्रश्नावली भरताना भावनात्मक प्रेरणा
मिळत नसल्यामुळे प्रश्नावलीतील उत्तरे योग्य प्रकारे भरण्याची शक्यता कमी असते.
(५) उत्तरे लिहिण्यास संशोधनकर्त्यांच्या
सहाय्यताचा अभाव (Lack of Assis tance of the Investigatigater in
Answering the Questions): acetata da प्रश्न
उत्तरदात्याला कळत नाही. अनेक प्रश्नांचा अर्थ उत्तरदात्यांच्या लक्षात येत नाही.
अशा परिस्थितीत उत्तरदाता आपल्या मतानुसार त्या प्रश्नाचा अर्थ लावून प्रश्नांची
उत्तरे लिहिण्याची शक्यता असते. अशावेळी उत्तरदात्याला त्या प्रश्नांचा योग्य अर्थ
समजावून सांगण्याची आवश्यकता असते. परंतु प्रश्नावली पद्धतीत संशोधनकार्याचा
उत्तरदात्याशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. उत्तरदात्याला संशोधनकर्त्यांच्या
सहाय्याशिवाय उत्तरे लिहावी लागतात. म्हणून प्रश्नावलीतील उत्तरे ही चुकीची अपूर्ण
असण्याची शक्यता अधिक असते.
(६) सखोल अध्ययन अशक्य (Deep
Study Impossiblc) प्रश्नावलीत एखाद्या
विषयाचे सखोल अध्ययन करणे शक्य नसते. फक्त त्या विषयासंबंधीची वरवरची माहिती
संकलित करणे शक्य होते. प्रश्नावलीतील उत्तरे भरण्यासाठी अर्धा किंवा एक तास
लागतो. इतक्या कमी वेळात सखोल माहिती गोळा करणे शक्य नसते. फक्त त्या संबंधी काही
सहाय्यक माहिती मिळते. उत्तरदात्यांचे विचार,
भावना, मनोवृत्ती जाणून घेता येत नाही. विशेष
महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नावली तंत्रामध्ये उत्तरदात्याच्या आंतरिक जीवनात
संशोधनकर्त्यात प्रवेश करता येत नाही. म्हणून प्रश्नावलीमध्ये संशोधन विषयाचे सखोल
अध्ययन करणे शक्य नाही.
(७) सार्वभौमिक प्रश्न अशक्य (Uniform Questiones Impossible) : अनुसूचीप्रमाणे
प्रश्नावलीत प्रामाणिक सार्वभौमिक प्रश्नांची निमिर्ती करणे शक्य नसते. जे प्रश्न
प्रत्येक प्रकारच्या समूह, सांस्कृतिक प्रातिमानात राहणारे लोक आणि सर्व
आर्थिक व सामाजिक स्तरातील लोकाकरिता उपयुक्त असतील अशा प्रश्नांचा प्रश्नावलीत
अभाव असतो. त्यामुळे वेगवेगळी सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समूहातील लोक आपआपल्या
दृष्टीने त्या प्रश्नांचा अर्थ लारतात म्हणून वस्तुनिष्ठ उत्तरे प्राप्त होत नाही.
(८) वाईट हस्ताक्षर (Bad Handwriting) : उत्तरदाता हा प्रश्नावलीतील उत्तरे स्वतः लिहीत
असतो. परंतु सर्वच उत्तरदात्यांचे हस्ताक्षर चांगले असेलच असे नाही.
उत्तरदात्यांनी घाईघाईने प्रश्नांची उत्तरे लिहिल्यामुळे ती चुकीची तर असतात. तसेच
हस्ताक्षर चांगले निघत नाही वाईट हस्ताक्षर असल्यामुळे संशोधनकर्त्याला असे
हस्ताक्षर वाचणे अवघड जाते. तसेच त्या उत्तरांचा अर्थ समजत नाही. काही उत्तरदाते
हे उत्तरे लिहिताना बरीच खोडातोड करतात. त्यामुळे देखील त्या उत्तरांचा अर्थ लावणे
एक समस्या बनते.
Comments
Post a Comment