संशोधन आराखडा ( Research Design)
प्रस्तावना:
सामाजिक
शास्त्रात संशोधन करण्याच्या प्रक्रियेत आराखड्या शिवाय वस्तुनिष्टता बाळगणे शक्य
नाही. सामजिक संशोधन करतांना नमुना कोणता असेल? तथ्य कोणती असतील आणि संकलनाची पद्धत काय असेल? इत्यादी बाबतचे
निर्णय संशोधन करण्यापूर्वीच संशोधन आराखड्यात निश्चित केले जातात. संशोधन करतांना
कोणत्या समस्या येतील त्याचे निराकरण कसे करायचे याचा विचार संशोधनात केला जातो.
संशोधन आराखड्याची उपयुक्तता स्पष्ट करताना आल्फ्रेड यांनी म्हटले की, "संशोधनाच्या संशोधनाची निर्मिती प्रस्तावित अध्ययनाच्या उपयुक्ततेस
स्पष्ट करते. आणि पद्धती संबंधी प्रमुख समस्यांच्या निराकरणासाठी सहाय्यता
पोहचविली जाते.
संशोधन आराखड्याचा अर्थ:
(Meaning
and Definitions of Research Design)
(१) सेल्टिज, जोड़ा, डॉइश व कूक: “संशोधनाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी निष्कर्षाची संबंद्धता आणि
संशोधन कार्यातील मित्त्ववेयता यांची सांगड घालता देण्याच्या दृष्टीने तथ्याचे
संकलन आणि विश्लेषण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटीची नियोजित व्यवस्था म्हणजेच
संशोधन आराखडा होय.”
(२) ऐकॉफ: "निर्णय क्रियान्वित करण्याची स्थिती येण्यापूर्वीच निर्णय निर्धारित
करण्याच्या प्रक्रियेला आराखडा असे म्हणतात”.
(३) एफ.
एन. करलिंगर: "संशोधन आराखडा, संशोधनाची एक योजना, संरचना आणि एक रणनिती आहे. ज्याद्वारे संशोधन प्रश्नाची उत्तरे
प्राप्त केली जातात आणि भिन्नत्व प्रसरणावर (Variance)
नियंत्रण ठेवले जाते.
संशोधन आराखड्याची स्वरूप (Nature of Research Design)
१)
संशोधन आराखड्याचा संबंध सामाजिक संशोधनाची आहे: संशोधन विषयाचे स्वरूप, व्यक्तीं समूह, उप-समूह, समाज किंवा
त्याचे मिश्रीत समूह, घटनांची संख्या एक, काही निवडक घटना
किंवा अनेक निवडल्या गेलेल्या घटना, सामाजिक-भौतिक वातावरण कोणत्याही एका काळातील
एकाच समाजाशी संबंधित गोष्टी, किंवा अनेक समाजातील अनेक गोष्टी, इ. सर्व बाबी संबधित सामाजिक संशोधन करण्यासाठी संशोधन आराखडा गरजेचा आहे.
२) संशोधनाची एक निश्चित दिशा करतो: संशोधन
आराखडा हा संशोधनांचा एक प्रकारचा मार्गदर्शक आहे. अध्ययनाचे स्वरूप (Nature of Study): संशोधनाचा प्रकार आणि स्वरूप स्पष्ट निर्धारित करून त्याची नोंद केली
जाते. संशोधन व्यक्तिगत, तुलनात्मक, प्रयोगात्मक, विश्लेषणात्मक, अन्वेषणात्मक
किंवा संयुक्त प्रकारचे देखील असू शकते.
३) सामाजिक घटनांच्या जटिल स्वरूपाला सोप्या
रूपात प्रस्तुत करणे: संशोधन आराखडा
हा समस्याचे स्वरूप व परिस्थिती काय होती? आतापर्यंत समस्याचे कुणी कुणी अध्ययन केले त्यांच्या
अध्ययनातून कोणते निष्कर्ष निघाले. त्यामध्ये कोणत्या त्रुटी राहिल्यात आता त्या
कोणत्या प्रकारे दूर करणे शक्य आहे. या सर्व गोष्टीचा उल्लेख संशोधन आराखड्यात
केला जातो.
४) संशोधनाची रूपरेषा: संशोधन आराखडा
संशोधनाची अशी रूपरेषा आहे की, जिची रचना संशोधन कार्य सुरू करण्यापूर्वीच केली जाते. संशोधन
आराखड्यतील अंतर्भूत घटक किंवा आराखडा करण्यासाठी आवश्यक घटक संशोधन आराखडा म्हणजे
संपूर्ण संशोधनाची एक रुपरेषा असते.
५) नियंत्रित प्रक्रिया: संशोधन आराखडा
संशोधन प्रक्रियेच्या दरम्यान येणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो आणि संशोधन कार्यास सुलभ बनवितो. संशोधक योग्य
संसोधन पद्धती व पूर्वग्रह यांना दूर ठेऊन परस्थिती आणि संशोधन प्रक्रियेवर
नियंत्रण ठेवतो.
६) वेळ श्रम आणि पैसा यांची बचत: संशोधन
आराखडा केवळ मानवी श्रमच कमी करीत नाही तर वेळ आणि पैसा देखील कमी करतो. सर्वेक्षण
काळ, वेळ आणि पैसा सर्वेक्षणाला किती वेळ लागेल, हे ठरविले जाते.
तसेच एकूणच संशोधनासाठी किती वेळ आणि पैसा लागेल. या गोष्टीबाबत निर्णय घेऊन
त्याची नोंद संशोधन आराखड्यात केली जाते
७) संशोधन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर
करणे: संशोधन प्रक्रिया हि अतिशय दीर्घ आणि गुंतागुतीची प्रक्रिया असल्याने
त्या मध्ये अनेक अडचणी येतात. या अडचणी संशोधक आणि संशोधन या दोन्ही पातळीवरच्या
असतात. संशोधनाच्या दरम्यान येणाऱ्या अडचणींना कमी करण्यामध्ये संशोधन आराखडा संशोधनकर्त्याला
मदत करतो.
८) संशोधनाच्या उद्देशाची पूर्तता:
कोणतेही संशोधन जर आपले उद्देश पूर्ण करत नसेल तर ते शास्त्रीय निष्कर्षा पर्यंत
पोहचू शकत नाहीत. मात्र संशोधनाच्या अधिकाधिक उद्देशाची प्राप्त करण्यास संशोधन
आराखडा मदत करतो
९) गृहितकृत्याच्या स्वरूप: सामाजिक संशोधनाची समस्या आणि गृहितकृत्याच्या
स्वरूपाच्या आधारावर केली जाते. या नुसार त्याचे वेवेगवेगळे प्रकार हि पडतात.
१०) योग्य निर्णय घेण्याबाबत मदत करतो: संशोधन आराखडा समस्येचे निर्धारण करण्यापासून तर
संशोधन अहवालाच्या शेवटच्या पायरीपर्यंतच्या विषयाबाबत सर्व पर्यायाच्या संबंधात
व्यवस्थित रूपात योग्य निर्णय घेण्याबाबत मदत करतो.
संशोधन प्रक्रियेच्या दरम्यान आवश्यकतेनुसार
संशोधन आराखडा हा संशोधित केला जात असल्यामुळे आराखडा व त्यामधील संकल्पना स्पष्ट, सुनिश्चित आणि अनुभवप्रमान्य
असतात; त्यामुळे संशोधन हे व्यवस्थित होते. संशोधक पूर्वग्रह आणि अनिश्चितता
यापासून दूर राहून योग्य प्रकारे संशोधन करता यावे म्हणून संशोधन आराखडा आवश्यक
असतो.
अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा
(Explorative or Formulative Research Design)
“जेव्हा एखाद्या संशोधन कार्याचा उद्देश कोणत्याही सामाजिक घटनेमध्ये
अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे हा असतो, तेव्हा अशा संशोधनासाठी तयार केल्या
जाणाऱ्या 'आराखड्याला अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक आराखडा असे म्हणतात.” या संशोधन आराखडाद्वारे अज्ञात तथ्यांचा शोध घेतला जातो. काही अंन्वेषणात्मक अध्ययनाचा
उद्देश गृहितकृत्ये विकसित करणे आणि संशोधन समस्येच्या निर्मितीमध्ये लहान
संशोधनावर भर देणे हा देखील आहे. अंन्वेषणात्मक संशोधन आराखडा हा घटनेचे स्वरूप आणि प्रक्रियांच्या वास्तविकतेचा
शोध घेतो. ज्या क्षेत्रात संशोधन कार्याद्वारा मिळविलेले ज्ञान मर्यादित आहे.
अशा सामाजिक शास्त्रातील कोणत्याही गृहितकृत्याची निर्मिती ही अन्वेषणात्मक
अध्ययनाच्या आधारावर केली जाते. सेल्टिज, जोडा आणि इतरांनी लिहिले की, "अधिक
निश्चित अशा संशोधनाच्या हेतूने संबंधित गृहितकृत्याच्या निर्मितीमध्ये सहाय्यक
ठरतील अशा अनुभवांना प्राप्त करण्यासाठी अन्वेषणात्मक संशोधन आवश्यक आहे."
अन्वेषणात्मक
संशोधन पद्धतीचे आपल्या दैनंदिन जीवनातील उदाहरण देता येईल डॉक्टरकडे रोगी
गेल्यानंतर तो रोग्याचे म्हणणे ऐकतो. रोग्याची विविध साधनाद्वारे तपासणी करतो
पूर्वीचे वैद्यकीय रिपोर्ट देखील बघतो. या सर्व आधारावरून डॉक्टर रोग्याला काय
झाले असावे? याचा विचार करून एक विशिष्ट रोग झाला असे तो गृहीत धरतो. म्हणजेच
डॉक्टर रोग एक गृहितकृत्य मांडतो आणि
त्यानुसार रोग्यास औषध देतो समजा ते लागू
पडले तर डॉक्टरचे गृहितकृत्य किंवा निदान खरे ठरले असे तो मानतो. परंतु औषध लागू
पडले नाही आणि आजार वाढला असेल तर पूर्वीचे निदान चूक ठरले, असे मानून
रोगाबद्दल वेगळे निदान करतो. डॉक्टरची ही जी भूमिका आहे तीच भूमिका संशोधनकर्त्यांची अन्वेषणात्मक संशोधनात
असते.
अन्वेषणात्मक अध्ययनात
विषयाचा परिचय करून घेणे, संशोधन समस्यांची तिची
संभाव्य उत्तरे वा संभाव्य गृहितकृत्ये कोणती असणार? हे ठरविण्याचे कार्य संशोधकास
करावे लागते. त्याकरिता विशिष्ट व्यक्तीला वेग-वेगळे प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे, निरनिराळी
तंत्रसाधने वापरणे त्या विषयाबाबतचे अहवाल बघणे, इत्यादी कार्य संशोधकास करावे लागतात, या सर्व
प्रयत्नानंतर समस्याचे निर्धारण किंवा पर्यायी स्वरूपाची गृहितकृत्याची माडणी केली
जाते अन्वेषणात्मक अध्ययन हे संशोधनाच्या अखंड प्रक्रियेचे सुरुवातीचे अध्ययन
कार्य होय, अन्वेषणात्मक संशोधनाद्वारे संशोधन समस्येचा शोध घेतला जातो. तसेच
त्या अनुषंगाने गृहितकृत्याची मांडणी केली जाते.
अन्वेषणात्मक अध्ययनासाठी आवश्यक बाबी
सेल्टिज, जोडा आणि
इतरांनी (Selltiz, Jahoda, and Others) यांनी अन्वेषणात्मक अध्ययनासाठी आवश्यक ते ज्ञान उपलब्ध व्हावे
म्हणून माहिती संकलित करणाऱ्या पुढील तीन गोष्टीचे विवेचन केले आहे.
१)साहित्य सर्वेक्षण (Survey of Literature) कोणत्याही संशोधन विषयाच्या अनुषंगाने
बरीच माहिती पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके, आणि संशोधन पत्रिकामधून प्राप्त होते. साहित्याचे अभ्यासाकरिता संदर्भग्रंथसूची
सारांश आणि अनुक्रमणिका इत्यादी गोष्टी उपलब्ध असतात, अलिकडे
ग्रंथालयात 'कम्प्यूटर' चा उपयोगामुळे संबंधित लेख अनुक्रमणिका खूपच सोपी झाले आहे. 'इंटरनेट (Internet) मुळे तर जगातील महत्त्वाची
पुस्तके संशोधनपत्रिका इ. सर्वेक्षण करणे फारच सुलभ झाले आहे. अन्वेषणात्मक संशोधन
आराखडयात सर्वप्रथम संबंधित विषयावरील साहित्याचे अध्ययन व सर्वेक्षण करणे आवश्यक
आहे.
२)अनुभव सर्वेक्षण (Experience Survey) : समाज हाच समाजशास्त्राची प्रयोगशाळा
आहे. म्हणून कोणत्याही विषयासंबंधीची माहिती पाहिजे असल्यास त्या विषयामध्ये तज्ञ
असलेल्या सर्व संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून त्याच्याकडून माहिती गोळा करावी अशा
अनेक अनुभवी व्यक्ती असतात की, ज्याच्याकडे त्या विषया संबंधित भरपूर ज्ञान असते. परंतु ते आपले
ज्ञान लिखित स्वरुपात लोकांसमोर मांडू शकत नाही. अशा अनुभवसंपन्न व्यक्तीचे
व्यावहारिक ज्ञान आपल्याकरिता मार्गदर्शकाचे कार्य करू शकते. या व्यक्ती कोण असू
शकतात याचा आढावा पुढील प्रमाणे:
(i) नवीन व्यक्ती
(ii)
एका सांस्कृतिक समूहातून दुसर्या सांस्कृतिक समूहामध्ये
जात असलेली आणि दोन्ही समूहाशी आपला संपर्क टिकवून ठेवणारी सीमांत व्यक्ती (Marginal Man)
(iii)
अशी व्यक्ती जी विकासाच्या एका स्थितीतून दुसर्या
स्थितीकडे संक्रमणाच्या काळात आहे.
(iv)
विचलनात्मक व्यक्ती एकाकी व्यक्ती आणि
समस्याग्रस्त व्यक्ती किंवा विशुद्ध, आदर्श व्यक्ती
(vi)
अत्याधिक समस्याच्या स्थितीत आढळणारी व्यक्ती
(vii) सामाजिक
संरचनेच्या अंतर्गत विविध परिस्थितीचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती
(viii) संशोधन करणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवाचे पुनरावलोकन आणि त्याच्या खाजगी
प्रक्रियांची परीक्षा
३)अंतर्दृष्टीस प्रेरणा देणाऱ्या घटनांचे
विश्लेषण:
अन्वेषणात्मक
संशोधन आराखड्यासाठी परिणामकारक असलेली ही तिसरी पद्धती आहे. संशोधन विषयाशी
संबंधित असे अनेक विषय असतात की त्याचा प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष हा त्या विषयाशी असतो. अशा विषयाच्या
अध्ययनातून संशोधनकर्त्याची दृष्टी विकसित होते. अध्ययन विषयाच्या संबंधात
व्यावहारिक अंतर्दृष्टीचा विकास होऊ शकतो. अशा प्रकारच्या अंतर्दृष्टीद्वारे
गृहितकृत्याच्या निर्मितीमध्ये आणि वास्तविक संशोधन कार्यामध्ये मदत प्राप्त होते.
सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राईड यांना मानसिक रुग्णाच्या अध्ययनावरूनच अंतर्दृष्टी प्राप्त झाली
होती. त्या अंतर्दृष्टीमुळे त्याना अनेक सैद्धांतिक कल्पना सुचल्या होत्या.
अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याचे मुख्य कार्य
किंवा उद्देश, महत्व:
अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याचे पुढील मुख्य
सात कार्य किंवा उद्देश आहेत.
(१) पूर्वानिधारित गृहितकृत्याचे तात्कालिक परिस्थितीच्या संदर्भात
परीक्षण करणे.
(२)
विविध संशोधन पद्धतीच्या उपयोगाच्या शक्यताचं स्पष्टीकरण करणे.
(3) सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या समस्यांकडे
संशोधनकर्त्यांचे लक्ष आकर्षित करणे.
(४)
व्यापक संशोधन कार्य करता यावे या दृष्टीने अपरिचित क्षेत्रात गृहितकृत्याचा आधार
प्राप्त करून देणे.
(५) संशोधन कार्यास विश्वसनीय दृष्टिकोनातून सुरुवात करता यावी म्हणून
सहाय्य करणे.
(६) विज्ञानाच्या सीमाचा विस्तार करून त्याचे क्षेत्र विकसित करणे.
(७)
अधिक महत्त्वपूर्ण विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी संशोधनकर्त्यास प्रेरीत करणे.
वर्णनात्मक संशोधन आराखडा (Descriptive Research Design)
एखाद्या व्यक्ती, समूह, समाज, पटना किंवा
कोणत्याही विषय वा समस्यांच्या वास्तविक तथ्यांचे वैशिष्ट्यांचे वर्णनात्मक विवेचन
प्रस्तुत करणे हा वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. याकरिता विषयाच्या संबंधात यथार्थ आणि संपूर्ण माहिती प्राप्त होणे
आवश्यक आहे; कारण त्याशिवाय अध्ययन विषय किंवा समस्यांच्या संदर्भात आपण कोणतेही
वर्णनात्मक विवेचन केल्यास असे विवेचन वैज्ञानिक राहणार नाही.
वैज्ञानिक
विवेचनाचा आधार वास्तविक आणि विश्वसनीय तथ्ये हा आहे;
म्हणून जर आपणास कोणत्याही समुदायाच्या संरचना, शिक्षण, स्तर, वय-समूह, संस्था इ.
वर्णनात्मक विवेचन प्रस्तुत करायचे असेल तर त्याकरिता या विषयाशी संबंधित वास्तविक
तथ्यांना वैज्ञानिक तंत्र पद्धतीद्वारा एकत्रित करणे आवश्यक आहे; अशा प्रकारे
वैज्ञानिक पद्धतीने संकलित केलेल्या तथ्यांच्या आधारे वर्णनात्मक विश्लेषण म्हणजे
वर्णनात्मक संशोधन आराखडा होय.
वर्णनात्मक
संशोधन आराखड्यात तथ्य संकलनासाठी वैज्ञानिक तंत्राचा उपयोग करून वस्तुनिष्ठ तथ्ये
संकलित केली जातात. वर्णनात्मक संशोधन आराखड्यात मुलाखत, प्रश्नावली, निरीक्षण, सामुदायिक
रेकॉर्ड इ. तथ्य संकलनाच्या तंत्राचा समावेश केला जातो.
वर्णनात्मक संशोधन आराखड्याच्या आवश्यक गोष्टी:
वर्णनात्मक
संशोधन आराखडा संशोधनाच्या दृष्टीने अधिक उपयुक्त होण्यासाठी संशोधनकर्त्याने
खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
(१) अध्ययन विषयाची विचारपूर्वक निवड:
संशोधन कर्त्याने अतिशय विचारपूर्वक आणि सावधगिरी बाळगूनच अध्ययन विषयाची निवड
केली पाहिजे. ज्या विषयाच्या संबंधात आवश्यक आणि योग्य अशी तथ्ये प्राप्त होऊ शकेल
असाच विषय संशोधन कर्त्याने निवडला पाहिजे.
(२) तथ्य
संकलनाच्या योग्य तंत्राची निवड: कोणत्याही संशोधन कार्यात संबंधित विषयाबाबतची
तथ्ये संकलित केली जातात. ही तथ्ये संकलित करण्यासाठी प्रश्नावली, मुलाखत, निरीक्षण
इत्यादी तंत्राचा उपयोग केला जातो. तथ्य संकलनासाठी कोणत्या तंत्राची निवड केली
पाहिजे याकडे संशोधन कर्त्याने विशेष लक्ष दिले पाहिजे. संशोधनाचे अचूक निष्कर्ष काढण्याकरिता तथ्ये हि वस्तुनिष्ठ आणि यथार्थ असणे आवश्यक आहे.
(३) वस्तुनिष्ठता
बाळगणे: निर्दोष वर्णनात्मक संशोधन आराखडा तयारकरण्यासाठी संशोधन
विषयासंबंधीची संशोधन कर्त्याची दृष्टी ही वस्तुनिष्ठ असली पाहिजे. पूर्वग्रह, गैरसमज, पक्षपात इ.
गोष्टींचा परिणाम वर्णनात्मक विवेचनावर होण्याची शक्यता असते. म्हणून संशोधक
जागरूक राहून पूर्वग्रह, गैरसमज इ. गोष्टी पासून अलिप्त रहावे. वर्णनात्मक
आराखडा तयार करीत असताना संशोधन कर्त्याने तटस्थ राहून वस्तुनिष्ठ पद्धतीने
प्रत्येक गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे.
(४) संतुलित
दृष्टिकोन: विशिष्ट व आकर्षक तथ्याच्या संबंधात संशोधन कर्त्याने
संतुलित दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता असते.
वर्णनात्मक विवेचन अधिक चांगले करण्याच्या इच्छेने संशोधन कर्त्याने आकर्षक आणि
विशिष्ट वयाकडे आपले अधिक केंद्रित करण्याची शक्यता असते. त्यामुळे अश्या विशिष्ट
गोष्टीकडे आकर्षित होणे ही गोष्ट वैज्ञानिक प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. संशोधन
कर्त्याने संतुलित दृष्टिकोन कायम ठेवून अध्ययन संबंधितांकडे दिले पाहिजे.
५) प्रमाणितता/ मित्तवेयता: शोधकार्य
अविस्तृत असते. म्हणून संशोधन कर्त्याने आपले अध्ययन मर्यादित ठेवावे. विषयासंबंधी
गोष्टी आवश्यक आहेत. त्याच गोष्टींना अध्ययनात घ्याव्यात. अध्ययनाशी संबंधित
नसलेल्या अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजेत.
अन्यथा तथ्यांचे विश्लेषण आणि वर्णन अमर्यादित होऊन अनावश्यक गोष्टीवर अधिकचा श्रम, वेळ आणि पैसा
खर्च होऊ शकतो.
वर्णनात्मक संशोधन आराखड्याच्या पायऱ्या
(Steps
of Descriptive Research Design)
(१) संशोधन
अध्ययनाचे उद्देश निश्चित करणे:
संशोधन अध्यनयाच्या उद्दिष्टांचे निरुपण करणे
ही वर्णनात्मक संशोधन आराखड्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे अनावश्यक आणि असंबद्ध तथ्यांचे संकलन
केले जात नाही तसेच, वेळ, श्रम, आणि पैसा याची बचत देखील होते.
(२) तथ्य
संकलनाच्या तंत्राची निवड: संशोधन अध्ययनाची उद्दिष्टे स्पष्ट केल्यानंतर तथ्य
संकलनाच्या तंत्राची निवड केली जाते. तथ्य संकलनाच्या तंत्राची निवड योग्य
पद्धतीने केली नाही; तर संशोधन विषया संबंधित तथ्ये योग्य प्रमाणात संकलित केले
जाईलच याची खात्री नसते. कारण अध्ययन विषयाच्या अनुषंगाने उपयुक्त अशा तथ्य संकलन
तंत्राची निवड केलेली नसते.
(३) नमुन्याची
निवड: वर्णनात्मक
संशोधन आराखडा ही तिसरी पायरी आहे. या पायरीमध्ये नमुन्याची निवड केली जाते.
अध्ययन विषयाच्या प्रत्येक एककाचे अध्ययन करणे गरजेचे असते. संपूर्ण अध्ययन
समग्राचे अध्ययन न करता त्या समग्रातील काही निवडक एककाचे अध्ययन केले जाते. निवडक
एकक नमुना निवड पद्धतीद्वारे निवडले जाते.
४)तथ्य संकलन आणि तपासणी: नमुन्याची निवड
केल्यानंतर तथ्य संकलन करणे आवश्यक आहे.
त्याच बरोबर योग्य तपासणीदेखील केली जाते. त्यामुळे इमानदारी आणि परिश्रमावरच
यथार्थ आणि शुद्ध अशी माहिती (तथ्ये एकत्रित केल्या जाऊ शकते; म्हणून तथ्यांचे संकलन
करीत असताना तथ्य संकलन कर्त्यांवर सतत नियंत्रण ठेवले पाहिजे.
(५) परिणामाचे
विश्लेषण: अध्ययन विषयाच्या संबंधात तथ्यांचे संकलन केल्यानंतर त्या तथ्याचे
साम्य आणि भिन्नता या आधारावर विविध प्रवर्गा मध्ये वर्गीकरण केले जाते.
वर्गीकरणानंतर सारणीकरण आणि सांख्यिकीय विश्लेषण केले जाते.
(६) अहवाल
सादर करणे: वर्णनात्मक
संशोधन आराखड्याची ही शेवटची पायरी आहे. या पायरीमध्ये संशोधन विषयाच्या संबंधात
तथ्याचे विश्लेषण आणि निष्कर्ष प्रस्तुत केले जातात. अहवाल सादर करताना भाषेची
विशेष काळजी घेतली जाते. अलंकारिक भाषेचा उपयोग करू नये अन्यथा अध्ययनात
अतिरंजितपणा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तथ्यांचा वेगवेगळे लोक
वेगवेगळा अर्थ लावण्याची शक्यता असते म्हणून अहवालाची भाषा सोपी व साळ हवी.
वर्णनात्मक
दृष्टिकोनाचे महत्त्व:
१)चलाचा परिणाम वेगळा करण्यासाठी: परायत चला वरील एक किंवा दोन चलाचा परिणाम वेगळा करायचा असतो.
प्रयोगशाळेत नियंत्रित परिस्थितीत अशा प्रकारचा परिणाम वेगळा करणे शक्य आहे. परंतु
सामाजिक घटकांना प्रयोगशाळेत आणून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही म्हणून
अशा परिस्थितीत वर्णनात्मक अध्ययनातून विभिन्न चलाचा परिणाम स्पष्ट केला जातो.
२)वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या अभ्यासा करिता: वेगवेगळे संशोधन आराखडे वापरले जातात. कारण संशोधनाच्या
उद्दिष्टानुसार संशोधन आराखड्याची निवड केली जाते. संशोधनाचा उद्देश वर्णन करणे हा
आहे अशा संशोधनासाठी वर्णनात्मक संशोधन आराखडा वापरला जातो.
३)समाज कल्याणाची धोरणे: कोणत्याही विकासाच्या योजना किंवा धोरणे राबविण्यासाठी लोकांच्या
समस्या, त्याची वैशिष्टये स्वरूप इत्यादी विषयीची माहिती आवश्यक असते कारण
लोकांची शासकीय धोरणाविषयीची कोणती मते आहेत. हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे.
४)व्यक्ती, लोकाची वैशिष्ट्ये व त्यांचा दृष्टिकोण: त्याची मते
इत्यादी गोष्टीची माहिती शासनाला असेल तर त्यानुसार धोरणाची योग्य प्रकारे अमलबजावणी
होऊन त्याचा लोकांना फायदा मिळेल. त्याकरिता वर्णनात्मक अध्ययनातूनच लोकांविषयी
माहिती प्राप्त होत असते; म्हणून विकासाच्या योजना व धोरणाची योग्य अंमलबजावणी
करण्याच्या दृष्टीने वर्णनात्मक अध्ययनाचे विशेष महत्त्व आहे.
प्रयोगात्मक किंवा परीक्षणात्मक संशोधन आराखडा:
भौतिकशास्त्रामध्ये
प्रयोगशाळेत प्रयोग करून संशोधन केले जाते. भौतिक शास्त्राप्रमाणेच समाजशास्त्रात
देखील संशोधन कार्यात निरीक्षण-परीक्षणाचा म्हणजेच प्रयोगाचा उपयोग करून अधिकाधिक
यथार्थता आणण्याचा प्रयत्न केला जातो. भौतिकशास्त्रात ज्याप्रमाणे काही निश्चित
नियंत्रित अवस्था निर्माण करून विषयाचे अध्ययन केले जाते; त्याच प्रकारे
समाजशास्त्रात सुद्धा अध्ययन केला जाते. अशा नियंत्रित स्थितीत निरीक्षण
परीक्षणाद्वारा केल्या जाणाऱ्या सामाजिक घटनाच्या पद्धतशीर अभ्यासाला प्रयोगात्मक
किंवा परीक्षणात्मक संशोधन म्हणतात.
स्टुअर्ट चैंपिन
यांनी लिहिले की, "समाजशास्त्रीय संशोधनात प्रयोगात्मक आराखड्याची संकल्पना ही
नियंत्रणाच्या अवस्था अंतर्गत निरीक्षणाद्वारा मानवीय संबंधाच्या व्यवस्थित
अध्ययनाकडे संकेत करते.”
विज्ञान किंवा
शास्त्रामध्ये प्रयोग केले जातात. प्रयोग (Experiment)
या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना शास्त्रज्ञ
म्हणतात की, "नियंत्रित अवस्थेत केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय."
प्रयोगात्मक पद्धतीत संशोधन कर्त्याला
नियंत्रित स्थिती किंवा अवस्था निर्माण करून आपल्या गृहितकृत्याची यथार्थता तपासून
बघावी लागते. नियंत्रित अवस्था याचा अर्थ हा आहे की, जोपर्यंत प्रयोग सुरू आहे. तोपर्यंत
त्या स्थितीत कोणत्याही बदल होऊ न देणे तोच परिस्थिती कायम ठेवून प्रयोग करणे.
प्रयोगात्मक
संशोधन आराखड्याच्या आवश्यक बाबी :
१)प्रायोगिक संशोधन आराखड्यात प्रयोगात्मक आणि नियंत्रित अशा दोन गटाची
निवड केली जाते;हे गट समान असतात. याचाच अर्थ या दोन्ही गटाची वैशिष्टये
ही सारखी असतात. भौतिकशास्त्रात समान गुणधर्म अर्थात वैशिष्टये असणाऱ्या वस्तू
किंवा पदार्थांची निवड करणे शक्य असते. परंतु दोन समान मानवी गट निवडणे अतिशय कठीण
गोष्ट आहे; म्हणूनच विशेष काळजीपूर्वक दोन गटाची निवड करणे आवश्यक आहे.
२)परायत्त चलाचे मापन करण्याच्या वेळेचे
पूर्वनिर्धारण प्रयोगात्मक संशोधनात प्रयोगात्मक गटास चलाची मात्रा दिली जाते;
लक्षणांबाबत ही मात्रा दिली जाते त्याला परायत चल (Dependent Variable) असे म्हणतात.
अशी मात्रा देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर परायत चलाचे मापन केले जाते. परायत्त
चलाचे मापन केव्हा करावे याची निश्चित नोंद करणे आवश्यक असते. प्रयोगापूर्वी आणि
प्रयोगानंतर असे दोन वेळा किंवा फक्त प्रयोगानंतरच परायत चलाचे मापन करायचे, यासंबंधीचे
निर्धारण पूर्वीच केले पाहिजे.
३)प्रयोगात्मक पद्धतीत प्रायोगिक गटास
विशिष्ट काळापर्यंत स्वायत्त चलाची मात्रा दिली जाते. विशिष्ट कालावधीसाठी असा
प्रयोग केला जातो. त्यानंतर त्या प्रयोगावरून निष्कर्ष काढण्यात येतात.
(४) अनियंत्रित घटक प्रयोगात्मक पद्धतीत
नियंत्रित अवस्थेत निरीक्षण केले जाते.म्हणून या पद्धतीत प्रयोगात्मक पद्धती असे
म्हणतात. या पद्धतीत सर्व घटकांवर संशोधनकर्त्यांचे नियंत्रण असते. सामाजिक
शास्त्रात प्रयोगात्मक पद्धतीचा उपयोग करताना काही घटकांवर नियंत्रण ठेवणे संशोधन कर्त्याला
शक्य नसते म्हणून ज्या घटकांवर नियंत्रण ठेवणे संशोधनकर्त्याला शक्य नसते, अशा
घटकांना 'अनियंत्रित घटक' असे म्हणतात.
प्रयोगात्मक पद्धतीचे प्रकार (Types of Experimental Methods)
प्रयोगात्मक पद्धतीचे पुढील तीन प्रमुख प्रकार
आहेत.
१)प्रयोगोत्तर किंवा मात्रोत्तर पद्धती (After only Experiment)
या पद्धतीमध्ये समान वैशिष्टये आणि स्वरूप
असलेल्या दोन गटाची निवड केली जाते. या दोन गटा पैकी एक गट नियंत्रित ठेवले जाते.
म्हणून त्या गटास हा दुसरा प्रयोगात्मक असतो. प्रयोगात्मक गटावर प्रयोग केला जातो.
जो नियंत्रित समूहा मध्ये कोणत्याही
प्रकारचे परिवर्तन केले जात नाही. या नंतर प्रयोगात्मक गटात मात्र कोणत्या एका कारकाद्वारे
परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे प्रयोगात्मक गटात परिवर्तन
पडून येते. प्रयोगात्मक गटाच्या तुलनेत नियंत्रित गट हा स्थिर असतो. या गटात
कोणतेच परिवर्तन होत नाही प्रयोगात्मक गटातील परिवर्तन हे त्या विशिष्ट कारक किंवा
घटकामुळे पडून आले असे मानले जाते. म्हणजेच ते कारक वा पटक परिवर्तनाचे कारण होय.
२) पूर्वोत्तर किंवा पूर्वपश्चात पद्धती (Before or After Experiment):
या पद्धतीत फक्त
एकच गट निवडून त्याचे प्रयोगपूर्व आणि प्रयोगानंतर मापन केले जाते. या
प्रयोगामध्ये प्रयोगात्मक गटास स्वायत्त चलाची मात्रा देण्यापूर्वी प्रयोगात्मक व
नियंत्रित गृहीत परिणामाच्या संदर्भात मापन केले जाते त्यानंतर प्रयोगपूर्व आणि
प्रयोगोत्तर स्थितीत घडून आलेल्या स्थित्यंतराचे निरीक्षण आणि मापन केले जाते. हा
फरक म्हणजेच परिवर्तित परिस्थितीचा किंवा कारकाचा परिणाम होय असे मानले जाते.
पूर्वोत्तर किंवा पूर्वपश्चात मापन प्रयोगाचे चार उपप्रकार आहेत.
१)
एका गटाचे पूर्वोत्तर किंवा पूर्वपश्चात पद्धती
(Before After Experiment with one Single
Group)
२)एका नियंत्रित गटासह पूर्वोत्तर किंवा
पूर्वपश्चात पद्धती
(Before
After Experiment with One Control Group)
३)
दोन नियंत्रित गटासह पूर्वोत्तर किंवा
पूर्वपश्चात पद्धती
(Before
After Experinement with Two Control Groups)
४)तीन नियंत्रित गटासह पूर्वोत्तर किंवा
पूर्वपश्चात पद्धती
(Before After Experiment Three Control Groups)
३) परिणामोत्तर
कारणमीमांसा (Export Facto Experiment)
ही पद्धत
स्टुअर्ट चौपिन यांनी
विकसित केली. काही विशिष्ट घटना घडून गेलेल्या
असतात, त्या किंवा तशा घटनांची पुनरावृती करणे शक्य नसते. समाज किंवा
समूहावर कोणता परिणाम झाला याचे अध्ययन आपणास परिणायोत्तर कारणमीमांसा
पद्धतीद्वारा करता येते. या पद्धतीत संशोधन कर्ता दोन गटांची निवड करतो. पैकी एकामध्ये
घटना घडून गेलेली असते, तर दुसऱ्या गटात ती घटना घटलेली नसते. या दोन्ही गटाचे
अध्ययन करून पहिल्या गटात जो काही परिणाम आढळून येतो. तो परिणाम त्या गटात घडून आलेल्या विवक्षित घटनेमुळे झाला, असे मानले जाते.
परिणामोत्तर -कारण मीमांसा पद्धतीचे फायदे-तोटे:
फायदे/गुण : अ)अनेक सामाजिक घटना या घडून गेलेल्या असतात त्या घटनांची
पुनरावृत्ती होत नाही. म्हणून अशा घटनांच्या परिणामाच्या अध्ययनासाठी ही पद्धत
विशेष उपयुक्त आहे.
ब)वर्तमानकाळातील लोकसंख्येची पूर्वीच्या
काळातील लोकसंख्येशी तुलना करून सरासरी, मृत्युदर, जन्मदर इ. अध्ययन करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे.
क)काही सामाजिक अनुभवाची पुनरावृत्ती करणे शक्य
असले, तरी या साठी फार मोठा कालावधी लागतो इतका मोठा कालावधी म्हणून
परिणामोत्तर संशोधन सोयीचे आहे.
ड)परिणामोत्तर कारण मीमांसा पद्धतीच्या
अध्ययनात प्रयोगोत्तर किंवा पूर्वोत्तर प्रयोग पद्धतीप्रमाणे ही पद्धत जवळपास
सारखी आहे..
दोष/ मर्यादा : १)या पद्धतीत दोन गट निवडायचे असतात. त्यापैकी एका गटात घटना घडून
गेलेली असते; आणि दुसऱ्या गटात घटना घडलेली नसते. अशा दोन गटाची निवड करणे अतिशय
कठीण असते.
वर्णनात्मक, अन्वेषणात्मक आणि प्रयोगात्मक संशोधन
आराखड्यातील फरक
१)वर्णनात्मक संशोधन आराखड्यात गृहितकृत्य, तथ्य संकलन
पद्धती आणि विश्लेषण हे अन्वेषनात्मक संशोधन आराखड्यापेक्षा अधिक संरचित(नियोजित) असते.
२)वर्णनात्मक संशोधन आराखड्याची सुरुवात
गृहितकृत्या पासून होते, तर अन्वेषनात्मक संशोधन आराखड्यात अध्ययनाच्या शेवटी
गृहितकृत्य मांडले जाते.
३)अन्वेषणात्मक अध्ययनापेक्षा वर्णनात्मक
अध्ययनात गृहितकृत्य हे अधिक विशिष्ट(More
Specific) असते.
४) अन्वेषणात्मक संशोधनातून गृहितकृत्य मांडले
जाते. तर वर्णनात्मक संशोधनात गृहितकृत्याचे परीक्षण केले जाते.
५) प्रयोगात्मक आराखडा हा इतर आराखड्याच्या
तुलनेत अधिक तांत्रिक असतो.
Comments
Post a Comment