विवाह संस्था ( Marriage Institute ) विवाह संस्थेचा अर्थ : ०१ )गिलीन ( Gillin) " प्रजोत्पादक कुटुंब निर्माण करण्यासाठी स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा समाजसंमत मार्ग म्हणजे विवाह होय." (२) डॉ. मदन आणि डॉ. मुजुमदार "कायदा व धार्मिक विधी यांद्वारे भिन्न लिंगी व्यक्तींनी शारीरिक व त्या अनुषंगिक , आर्थिक व सामाजिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे विवाह होय." ( ३ ) मॅलिनॉव्हस्की : "विवाह हा शारीरिक उपभोगाचा परवाना नसून मातृत्व-पितृत्व प्राप्त करून घेण्याचा परवाना आहे. " (४) रॉबर्ट लोवी :-विवाह म्हणजे सुस्पष्ट सामाजिक मान्यता असलेले स्त्री-पुरुषातील असे संबंध की , जे केवळ कामपुर्तीशीच मर्यादित न राहता कौटुंबिक जीवनाचे आधार बनतात , " ( ५) हॉबेल :- विवाहित स्त्री-पुरुषांचे परस्परांशी त्यांच्या रक्तसंबंधाविषयी , मुलांशी व समाजाशी असणारे संबंध नियंत्रित व परिभाषित करणारा समुच्चय म्हणजे विवाह संस्था होय." ( ६) वेस्टर्न मार्क: " एक किंवा अनेक पुरुषांच्या , एक किंवा अनेक स्त्रियांबरोबरच्या रूढी व कायदा यांनी म...
The blog explore social facts in India and educational material for Sociology.