विवाह संस्था (Marriage
Institute)
विवाह संस्थेचा अर्थ :
०१)गिलीन (Gillin) "प्रजोत्पादक कुटुंब निर्माण करण्यासाठी स्त्री-पुरुषांमध्ये
शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा समाजसंमत मार्ग म्हणजे विवाह होय."
(२) डॉ. मदन आणि डॉ. मुजुमदार "कायदा व धार्मिक विधी
यांद्वारे भिन्न लिंगी व्यक्तींनी शारीरिक व त्या अनुषंगिक, आर्थिक व सामाजिक संबंध प्रस्थापित
करणे म्हणजे विवाह होय."
(३) मॅलिनॉव्हस्की: "विवाह हा
शारीरिक उपभोगाचा परवाना नसून मातृत्व-पितृत्व प्राप्त करून घेण्याचा परवाना आहे.
"
(४) रॉबर्ट लोवी :-विवाह म्हणजे सुस्पष्ट सामाजिक मान्यता
असलेले स्त्री-पुरुषातील असे संबंध की, जे केवळ कामपुर्तीशीच मर्यादित न राहता
कौटुंबिक जीवनाचे आधार बनतात, "
(५) हॉबेल:- विवाहित स्त्री-पुरुषांचे
परस्परांशी त्यांच्या रक्तसंबंधाविषयी, मुलांशी व समाजाशी असणारे संबंध नियंत्रित व
परिभाषित करणारा समुच्चय म्हणजे विवाह संस्था होय."
(६) वेस्टर्न मार्क: " एक किंवा
अनेक पुरुषांच्या, एक किंवा अनेक स्त्रियांबरोबरच्या रूढी व कायदा यांनी मान्य केलेल्या
संबंधाना 'विवाह' असे म्हणतात. तसेच त्यात विवाह करणाऱ्या
स्त्री-पुरुषांना परस्परांच्या बाबतीत व त्यांना होणाऱ्या संततीच्या बाबतीत
असलेल्या हक्कांचा व पार पाडावयाच्या कर्तव्यांचा समावेश होतो.
विवाहाचे विविध दृष्टिकोन (Various
Aspects of Marriage )
विवाह ही संस्था जरी प्रत्येक समाजात
अस्तित्वात असली तरी प्रत्येक धर्माचा विवाहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा
आहे त्यांचा आपण येथे थोडक्यात विचार करू.
(१) हिंदूधर्म (Hindu Religion) हिंदू धर्मीय व्यक्तीच्या
दृष्टिकोनानुसार विवाह हा एक पवित्र धार्मिक संस्कार आहे असे मानले जाते. तसेच
वैवाहिक जीवन जगणे हा धार्मिक कार्याचाच एक भाग मानला जातो. त्यामुळे
पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध पवित्र व संस्कारात्मक असे मानले जातात पती-पत्नीच्या
शारीरिक संबंधाना, प्रजोत्पादनाचे एक साधन एवढेच महत्त्व दिले गेले आहे. पती-पत्नीमधील
हे संबंध दोघांनी जपले पाहिजेत असे बंधन त्यांच्यावर असते.
(२)
मुस्लिम धर्म (Muslim Religion) : मुस्लिम धर्मात विवाह हा
स्त्री-पुरुषांमधील करार आहे असे मानतात. वैवाहिक संबंध पवित्र आहेत असा त्याचा
दृष्टिकोन नसतो, त्यामुळे
इतर करारात्मक संबंध ज्या सहजतेने मोडले जातात तेवढ्याच सहजतेने वैवाहिक संबंध
तोडण्याची तरतूद त्या समाजात आहे. त्यामुळे मुसलमान पती पत्नीला अगदी सहजरित्या
घटस्फोट घेता येतो.
विवाहाची वैशिष्ट्ये (Characteristics
of Marriage) :
(१) शारीरिक गरजांची पूर्तता व्यक्तीच्या
भौतिक, शारीरिक
व मानसिक गरजा असतात. शारीरिक गरजांपैकी 'कामवासना' ही एक स्त्री-पुरुषाची महत्त्वाची गरज आहे.
व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे संघटन टिकविण्यासाठी व्यक्तीच्या शारीरिक गरजांची
समाधानकारकपणे पूर्तता होणे जरूरीचे असते. म्हणूनच स्त्री-पुरुषांत समाजमान्य
शारीरिक संबंध निर्माण होतात. ते केवळ विवाहामुळेच तसेच सामान्यतः पती-पत्नी योग्य
मार्गाने शारीरिक गरजांची पूर्तता करतात. इतर कोणत्याही अन्य मार्गाने या गरजेची
पूर्तता करण्यास समाज मान्यता देत नाही. व्यक्तीच्या केवळ शारीरिक गरजांची पूर्तता
होत नसून जीवन जगण्यास आवश्यक असलेल्या प्रेम, सहकार्य व परस्पर त्याग इत्यादी गोष्टींची
देखील प्राप्ती होत असते.
(२) नियंत्रित शारीरिक संबंध विवाह
संस्थेचा अभ्यास करताना एक बाब अत्यंत महत्त्वाची समजली जाते, ती म्हणजे पती-पत्नीतील शारीरिक संबंध
समाजमान्य असतात आणि ते संबंध अत्यंत महत्त्वाचे समजले जातात. स्त्री-पुरुषातील
शारीरिक संबंध हे नियंत्रित स्वरूपाचे असतात. पती-पत्नी ह्यांनी फक्त परस्परांशीच
शारीरिक संबंध ठेवावयाचे असतात. बहुतेक सर्व समाजात विवाहबाह्य शारीरिक संबंध
निषिद्ध व कनिष्ठ दर्जाचे समजले जातात.
(३) औरसत्वाचे तत्त्व विवाहाच्या
वैशिष्ट्यांचा विचार करताना औरसत्वाचे तत्त्व प्रमुख असे मानले जाते. वैवाहिक
संबंधातून जन्मास आलेली संतती ही औरस संतती म्हणून मानली जाते. और सलामत सामाजिक, नैतिक, धार्मिक व कायदेशीर मान्यता प्राप्त होते.
अनौरस संततीस कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. "समाजमान्य मार्गाने शारीरिक
गरजेची पूर्तता करण्याचा व औरस संततीला जन्म देण्याचा विवाह हाच एकमेव मार्ग
आहे." औरस व अनौरस संततीला अधिकार हक्क व सवलती देण्याबाबतचे नियम समाजात
असतात. अनौरस संततीला जन्म दिल्यामुळे संबंधित स्त्री-पुरुषांच्या प्रतिष्ठेला
बाधा येते. त्याचे चारित्र्य हीन दर्जाचे समजले जाते.
(४) अनौपचारिक संबंध वैवाहिक संबंध हे
अनौपचारिक असतात म्हणजेच आपोआप निर्माण झालेले असतात, तसेच हे संबंध अकृत्रिम, आत्मीयतेचे वैयक्तिक व कनिष्ट अशा
स्वरूपाचे असतात, म्हणूनच ते अधिक काळ टिकणारे असतात व त्यांना कायमचे स्थैर्य प्राप्त
होते. पती-पत्नी ह्या दोन व्यक्तीचा समूह हा प्राथमिक समूह असतो असे म्हटल्यास
चुकीचे होणार नाही.
(५) हक्क व कर्तव्याची जाणीव विवाहाच्या वैशिष्ट्यात हक्क व
कर्तव्याची जाणीव यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला आहे. विवाहामुळे
स्त्री पुरुषांना पती-पत्नी म्हणून काही हक्क व कर्तव्ये पार पाडावी लागतात. पती
पत्नी या दर्जाशी निगडित असलेली कर्तव्याविषयीची जाणीव व्यक्तीच्या मनात
सामाजीकरणाच्या मार्गाने सजविली जाते.
विवाहसंस्थेची उद्दिष्टे
(१) शारीरिक गरजांची पूर्तता प्रत्येक
मानवामध्ये कामवासना बसत असते व तिची पूर्तता होणे. आवश्यक असते. व्यक्तीच्या
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा निकटचा संबंध कामवासनेच्या पूर्ततशी आहे.
त्यामुळे व्यक्तीची कामवासना जर पूर्ण झाली नाही तर व्यक्तींच्या शरीरावर त्याचा
हानीकारक परिणाम होतो त्याचप्रमाणे त्यांच्यात काही मानसिक न्यूनगंड निर्माण होतो.
म्हणून स्त्री पुरुषाच्या कामवासना तृप्तीसाठी नियमित व्यवस्था म्हणून समाजात
विवाहाची निर्मिती झाली. कामवासनातृप्ती व प्रजोत्पादन हे विवाहाचे प्रमुख
उद्दिष्ट होय.
(२) मानसिक गरजांची पूर्तता व्यक्तीच्या शारीरिक गरजाप्रमाणे
व्यक्तीच्या काही मानसिक गरजापण असतात. उदाहरणार्थ, दुसऱ्याने प्रशंसा करणे, कौतुक करणे, सहानुभूती दाखविणे किंवा मिळविणे या
व्यक्तीच्या मानसिक गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते. आपल्या सुखात किंवा दुःखात
कोणीतरी वाटेकरी व्हावा, आपणास नेहमी कोणीतरी चांगले म्हणावे, असे व्यक्तीना सतत वाटत असते. विवाहामुळे
व्यक्तीला कायमचा असा जोडीदार मिळतो.
(३) शारीरिक संबंधावर नियंत्रण सर्वसाधारणपणे
पती-पत्नीच्या नात्याने परस्परांशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींनाच परस्परांशी संबंध
ठेवण्यास परवानगी दिली जाते. विवाहाद्वारा कोणी कोणाबरोबर शारीरिक संबंध
ठेवावयाचा हे निश्चित केले जाते. अशारीतीने व्यक्तीचे लैंगिक वर्तन व शारीरिक
संबंध यावर नियंत्रण ठेवले जाते. त्याचप्रमाणे विवाह हा जरी स्त्री-पुरुष यांच्यात
होत असला तरी कोणत्या स्त्रीने कोणत्या पुरुषाशी विवाह करावयाचा हे पण समाजाच्या
नियमानेच ठरते.
(४) कुटुंबाची निर्मिती विवाहातूनच कुटुंबाची
निर्मिती अथवा स्थापना होते. प्रथम स्त्री करतात, त्यांना मुले होतात, तेव्हा पती-पत्नी व त्यांची मुले यांचा
मिळून कुटुंब स्थापन होतो विवाहाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने समाजमान्य
कुटुंबाची निर्मिती होऊ शकत मानव जातीच्या स्थैर्याच्या दृष्टीनेही कुटुब निर्मिती
आवश्यक असते. अपत्य प्राप्तीशिवाय वैवाहिक जीवनाची खरी पूर्णत नाही समाज संमत
मार्गाने कुटुंब स्थापण्याचा विवाह हाच एकमेव मार्ग आहे.
(५) वंशसातत्य व संपत्तीचे हस्तांतरण
प्रत्येक आपल्या यशाचा अभिमान असतो. वंशाच्या सातत्यासाठी किंवा कुळाचे नाव
कायम टिकविण्यासाठी स्त्री-पुरुष विवाह करून प्रजोत्पादन करतात. त्याचप्रमाणे
व्यक्तीने जमा केलेली संपत्ती आपल्या मुलाबाळांस मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते.
विवाहामुळे आपल्या कुळाचे नाव पुढे चालविणे व संपत्तीचे हस्तांतरण करणे
विवाहामुळेच शक्य होते
विवाहाचे प्रकार (Types of
Marriage)
विवाह संस्थेच्या उद्दिष्टांना अनुसरून विवाहाचे प्रकार (Types of
Marriage )
०१)एकपती पत्नीविवाह
०२)बहुपती-पत्नीविवाह
(अ) एकपती पत्नी विवाह (Monogamy
). "एक
पुरुष आणि एक स्त्री ही उभयता परस्परांशी जेव्हा विवाहबद्ध होतात तेव्हा अशा
विवाहाला एक पती पत्नी विवाह असे म्हणतात. पेडींग्टनच्या मते " ज्या पद्धतीत
एका पुरुषाला एकावेळी केवळ एकाच स्त्रीबरोबर विवाह करता येतो, त्या पद्धतीस एक विवाह असे म्हणतात.
हॅरी जॉन्सनच्या मते : "ज्या विवाह प्रकारात एका पुरुषाला
एकावेळी एका स्त्रीशी विवाह करण्याची सामाजिक संमती असते, तो विवाह प्रकार म्हणजे एक विवाह होय.
"
एक विवाहाचे प्रकार
एक विवाहाचे तीन प्रकार पाडले जातात. (१) जोडी विवाह (Pair
Marriage) जोड़ी
विवाह या प्रकारात एक पुरुष एका स्त्रीशीच विवाह करतो परंतु एक विवाह पद्धतीत
स्त्रीला पती इतका दर्जा मिळत नाही, तसे या पद्धतीत नाही, या पद्धतीत पती व पत्नी यांना समान
दर्जा असतो तसेच या पद्धतीत एक पुरुष अनेक स्त्रियांशी व एक स्त्री अनेक पुरुषाशी
शारीरिक संबंध ठेवू शकत नाही. लहानसहान कारणावरून पती-पत्नी यांना वैवाहिक बंधन
तोडणे जोडी विवाहात शक्य नसते.
(२) मोनोजिनी विवाह (Monogyny)
मोनोजिनी हा एक विवाहाचा उपप्रकार आहे.
या प्रकारातही एक पुरुष एकाच स्त्रीशी विवाह करतो. परंतु त्यास विवाहाच्या
स्त्रीशिवाय इतर स्त्रियांशी केवळ शारीरिक संबंध ठेवण्यासाठी परवानगी दिली जाते.
ज्या स्त्रीशी पुरुषाचा विवाह झाला असेल तिला पत्नीचे सर्व कौटुंबिक अधिकार मानसन्मान
दिले जातात. कायद्याने तिचे सर्व अधिकार सुरक्षित ठेवले जातात त्याचप्रमाणे
कुटुंबाची धार्मिक कृत्ये करण्याचा अधिकार विवाहित स्त्रीलाच फक्त दिला जातो. हा
विवाहाचा प्रकार मध्ययुगीन सरंजामशाहीत अस्तित्वात होता. कारण त्यावेळी आर्थिक
सुबत्ता होती व अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणे हे श्रीमंतीचे व ऐश्वर्याचे लक्षण
मानले जात असे. तसेच या स्त्रियांना दासी किंवा रखेली असेही म्हटले जात असे.
(३) अस्थायी एकविवाह (Monoandry)
या विवाह प्रकारात सुद्धा पुरुषाला
एखाद्या स्त्रीशी विवाहाव्यतिरिक्त निश्चित कालावधीसाठी शारीरिक संबंध ठेवण्याची
परवानगी दिली जाते. परंतु हा कालावधी संपल्यानंतर ती स्त्री समुदायाच्या मालकीची
समजली जाते. कॅलिफोर्निया व ब्राझीलमधील काही आदिवासी समाजात ही प्रथा आढळते. तसेच
दक्षिण भारतातील 'कदार' अंदमान व लंकेतील 'वेद' आफ्रिकेतील 'बुशमन' इत्यादी जमातीतून हा विवाह प्रकार आढळतो..
(ब) बहु विवाह पद्धती (Polygamy)
या विवाह
पद्धतीत एक पुरुष, दोन किंवा अधिक स्त्रियांशी विवाह करतो किंवा एक स्त्री दोन किंवा
अधिक पुरुषांशी विवाह करते तेव्हा त्यास बहु विवाह असे म्हणतात. या पद्धतीचे दोन
प्रमुख उपप्रकार पडतात.
I)बहुपती विवाह पद्धती (Polandry): ज्यावेळेला एकाच स्त्रीचा अनेक
पुरुषांबरोबर विवाह झालेला असतो. तेव्हा त्या विवाहास बहुपती विवाह पद्धती असे
म्हणतात. विचारवंत राल्फ-डे- पोमराईच्या मते “जेथे निसर्ग कृतघ्न आहे, जीवन दुष्कर आहे, अन्नाचे दुर्भिक्ष्य आहे आणि परिणामतः
पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे, अशा प्रदेशात बहुपती विवाह आढळतो." या
बहुपती विवाहाचे दोन प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे.
(१) बांधविक बहुपती विवाह (Fraternal
Polyandry) या
विवाह पद्धतीत स्त्रीचे अनेक पती हे परस्परांचे सख्खे भाऊ असतात. सर्वसाधारपणपणे
वडीलभाऊ एखाद्या स्त्रीशी लग्न करतो व नंतर ती स्त्री धाकट्या भावांची आपोआपच
पत्नी बनते. पतीचा एखादा भाऊ लहान असेल किंवा वडीलभावाच्या लग्नानंतर त्याचा जन्म
झाला असेल तरीसुद्धा तो त्या स्त्रीचा पती होतो. अशा स्त्रीच्या मुलाबाळांना सर्व
भावांची समान अपत्ये म्हणून संबोधले जाते. 'लडाखी' जमातीत हा विवाहाचा प्रकार आढळतो.
विचारवंत पोमराइच्या मते" बहुतेक सर्व बहुपतीप्रथा प्रचलित असलेल्या
समुदायात स्त्रीचे पती हे परस्परांचे भाऊ रक्तसंबंधी असतात आणि धाकट्या भावाचे
शारीरिक जीवन हे वडीलभावाच्या सहानुभूती व औदार्यावर अवलंबून असते. त्यांना
स्त्री- दुर्भिक्षामुळे लादलेले ब्रह्मचर्य पाळावे लागते.
(२) अबांधविक विवाह
पद्धती (Non-Fraternal Polyandry) अबांधविक विवाह पद्धतीत स्त्रीला दोन किंवा अधिक पती असतात. परंतु हे
सर्व पती परस्परांचे सख्खे भाऊ नसतात. म्हणजेच हे पती वेगवेगळ्या कुटुंबातील
असतात. या विवाह प्रकारातील सामान्य पत्नी (Common Wife) विशिष्ट कालावधीसाठी आपल्या पतीबरोबर
राहते.एखाद्या विशिष्ट पतीबरोबर राहत असताना तिला जर गर्भधारणा झाली तर मूल
होईपर्यंत त्याच्या घरी राहते तो पती त्या मुलाचा पिता होतो.
बहुपती विवाहाची कारणे (Causes of
polyandrous Marriage) (
१) पुरुषांचे अधिक्य (Excess Proportion of Male) आपण पूर्वी पाहिलेच की. सर्वसाधारणपणे
सर्व समाजात स्त्री-पुरुषांची संख्या समान असते. परंतु काही कारणामुळे समाजातील
स्त्रियांची संख्या कमी होते.
(२) मूल्याची रूढी (Castomo
Bide Price) अनेक
आदिवा पत्नी पुरुषांना पैसे द्यावे लागत. काही वेळेला पत्नी यासाठी द्यावे लागणारे
मूल्य इतक्या मोठ्या प्रमाणात मागितले जाते की, कुटुंबातील एका तरुणाला किंवा प्रत्येक भाव
स्वतंत्रपणे देऊन स्वतंत्र पत्नी शक्य नसते. अशा वेळेला सर्व भाऊ एकत्र येऊन
चुकवितात व एकाच स्त्रीशी विवाहबद्ध होतात यातूनही काही समाजात ही विवाह पद्धती
अस्तित्वात आली असावी.
(३) संपत्तीचे विभाजन टाळण्यासाठी व आर्थिक
सहकार्यासाठी (Property division and to create economic co-operation) बहुपती विवाहाच्या मुळाशी संप टाळणे हा
एक हेतू असावा असे वाटते कुटुंबातील मालमत्तेचे विभाजन टाळण्यासाठी ही विवाह
पद्धती
(४) बहुपत्नी विवाह (Polygynous Marriage) अनेकदा बहुपती विवाह पद्धती रूढ
होण्यास बहुपत्नी विवाह
मार्शल जोन्सच्या मते "बहुपतीप्रथा ही एकूण परिस्थितीला दिलेला
प्रतिसाद आहे, ज्यात
दारिद्रय लोकसंख्येची विषमता ही प्रमुख
कारणे असून इतर सुप्त कारणेही असतात.
II)बहुपत्नी विवाह पद्धती (Polygynous Marriage) बहुविवाहाचा हा दुसरा प्रकार. बहुपत्नी
विवाह होय. जेव्हा एक पुरुष दोनपेक्षा अधिक खिवांशी विवाह करतो. तेव्हा त्या
विवाहाला बहुपत्नी विवाह पद्धती असे म्हणण्यात येते. हा विवाहाचा प्रकार जगातील
निरनिराळ्या देशात कमी अधिक प्रमाणात हमखास आढळून येतो. बहुपत्नी विवाह अस्तित्वात
असलेल्या समाजातील कुटुंबात स्त्रियांचे स्थान हे पुरुषापेक्षा गौण असते.
(१) द्विभार्या विवाह (Bigamy) या विवाह पद्धतीप्रमाणे एका पुरुषाला
फक्त दोन स्त्रियांशी विवाह करता येतो. या पद्धतीची विविध कारणे प्रतिपादन केली
जातात. पहिल्या पत्नीस मुलगा न झाल्यास किंवा ती सतत आजारी असल्यास किंवा
बाळंतपणासाठी काही काळ पतीपासून दूर राहत असल्यास पुरुष दुसरा विवाह करतो.
(२) असीमित बहुपत्नी विवाह (Un-restricted
Polygynous Marriage) या
पद्धतीत एका पुरुषास कितीपण स्त्रियांशी विवाह करता येतो. जास्त बायका करणे हे
श्रीमंतीचे ऐश्वर्याचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे प्राचीन समाजातील सुखवस्तु
कुटुंबात ही विवाह पद्धती आढळून येत होती.
(३) सशर्त बहुपत्नी विवाह (Conditional
Marriage) असीमित
बहुपत्नी विवाह पद्धतीचे लहान रूप म्हणजे सशर्त बहुपत्नी विवाह पद्धती होय. या
पद्धतीप्रमाणे समाजातील काही विशिष्ट व्यक्तींनाच अनेक वायका करण्याचा अधिकार
असतो. साधारणपणे राजे लोक, सरदार, सेनापती, नवाब इत्यादी व्यक्ती अनेकदा अनेक स्त्रियांशी विवाह करून जास्तीत
जास्त स्त्रियांना पदरी बाळगत असत.
(अ) संमतौदर्शक नियम (positive
norms): या
नियमानुसार विवाह जुळविताना आपल्या साथीदार म्हणून निवडावे लागते. या अंतरगट
विवाहाच्या नियमांचा समावेश होतो. त्यावर आपण चर्चा करू अंतरगट विवाहाचे नियम (Rules of
Endogamy) हा
नियम संमतीदर्शक नियमांतर्गत एक नियम होय. समाजात अनेक वंश, वर्ग, जाती, धर्म इत्यादींचा समावेश असतो. हे सर्व
समाजशास्त्रीय भाषेत सामाजिक गट या संज्ञेस पात्र ठरतात. या प्रकारचे नियम
सर्वसाधारणपणे समाजात आढळून येतात. निरनिराळ्या समाजांचा अभ्यास केल्यानंतर
उपप्रकार पडतात :-
(१) जाती अंतरगट विवाह (Caste
Endogamy) प्रत्येक
जात अंतरविबाह गट आहे. व्यक्तीला आपला विवाहाचा साथीदार आपल्या जातीतूनच निवडावा
लागतो. दुसऱ्या शब्दात हे एकच जातीचे
सभासद असणे जरूरी आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक जातीत अनेक उपजाती असून वधूवर एकाच
उपजातीचे पण पाहिजेत असाही नियम आहे. या नियमाला सामाजिकदृष्ट्या फार महत्त्व आहे.
प्रत्येक जात हा स्वतंत्र असा गट आहे. प्रत्येक जातीची संस्कृती ही थोड्याफार
प्रमाणात वेगळी असते. वधूवर एकाच जातीचे असल्यामुळे त्यांना परस्परांशी सहजरीत्या
जुळवून घेता येते.
(२) वर्ग अंतर्गट विवाह (Class Endogamy) आधुनिक काळात काही समाजाची विशेषत औद्योगिक
समाजाची रचना वर्ग व्यवस्थेवर आधारलेली असते. समाज हा उच्च वर्ग, मध्यम वर्ग व कनिष्ठ वर्ग अशा स्वरांत
विभागला गेला आहे. एका वर्गाची संस्कृती, जीवनपद्धती समान असते. तसेच एका वर्गातील
कुटुंबाचा दर्जापण समान असतो, त्यामुळे वधूवर एकाच वर्गातील असले तर ते एकमेकांशी चांगल्या प्रकारे
जुळवून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला वर्ग व्यवस्थेत फार
मोठे स्थान प्राप्त होते. जर आपण कनिष्ठ कुटुंबाशी वैवाहिक संबंध जोडले तर आपल्या
सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येईल ही भीती वर्गबाह्य विवाहास मनाई करते.
(३) धर्म अंतर्गट विवाह (Religious
Endogarny) व्यक्तीने
स्वधर्मीयांबरोबरच वैवाहिक संबंध जोडावेत असा या नियमांचा अर्थ आहे. हा नियम
अस्तित्वात येण्यास वरील कारणेच कारणीभूत आहेत. श्रद्धा व निष्ठा हा प्रत्येक
धर्माचा प्रमुख भाग आहे. निरनिराळ्या धर्मामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या श्रद्धा व
निष्ठा तसेच धार्मिक संस्कार वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्यात नेहमीच अंतर राहते
म्हणून असे विवाह यशस्वी होऊ शकत नाहीत.
(४) वंश अंतर्गट विवाह (Racial
Endogamy) जगामध्ये
शारीरिक गुणवैशिष्ट्यांवर आधारलेले अनेक गट आढळून येतात. उदा. निग्रोवंश, प्रत्येक व्यक्तीला आपल्या वंशातील
व्यक्तीबरोबरच विवाह करावा लागतो. काही वंश इतरांपेक्षा आपल्याला श्रेष्ठ समजतात व
त्यामुळे त्यांच्यात नेहमी दुरावा निर्माण होतो व कनिष्ठ वंशाबरोबर ते संबंध
ठेवण्याचे टाळतात.
(५) स्थान अंतर्गट विवाह (Local
Endogamy) काही
सामाजिक गट स्थानपरत्वे निर्माण झालेले असतात, त्यांना प्रादेशिक गट असे म्हणतात. समुदाय हा
असाच प्रादेशिक गट आहे. वैवाहिक संबंध जोडताना ते आपल्या प्रादेशिक गटातील
व्यक्तींबरोबरच जोडावयाचे असा प्रघात सर्वत्र आढळू येतो.
(ब) निषेधात्मक नियम (Negative
Norms) वधूवराची
निवड करताना समाज ज्याप्रमाणे काही संमतीदर्शक नियम आहेत. त्याप्रमाणे काही
निषेधात्मक नियमही आहेत.त्यात बरी शिथिलता आली असली तरी विवाह जुळविण्याचा अंतिम
अधिकार ज माता-पित्याचाच असतो.
विवाह विच्छेद किंवा घटस्फोट (Dissolution
of Wedlock of Divorce)
विवाह विच्छेद किंवा घटस्फोट याचा अर्थ
विवाहामुळे एकत्र आलेल्या स्त्री आणि पुरुषाशी त्यांचे परस्परांशी पटले नाही तर वैवाहिक
जीवनातून मुक्त होण्याची कायद्याने मान्य केलेली व्यवस्था होय. तसेच
कायदेशीररीत्या पती-पत्नीतील वैवाहिक संबंधाचे विच्छेदन म्हणजे घटस्फोट होय.
घटस्फोटासाठी अनेक कारणे असतात. तरी औद्योगीकरणाची तीव्र वाढ, स्त्रियांच्या सामाजिक दर्जात झालेली
वाढ इत्यादी गोष्टी घटस्फोटाला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत झाल्याचे आढळते. घटस्फोट
हे अमेरिकन समाजाचे प्रमुख अंग बनले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन घटस्फोटाचे
प्रमाण खूपच वाढले. विचारवंत किंग्जले डेव्हिस यांनी याबाबत केलेल्या अभ्यासावरून
त्यांना असे आढळून आले की, अमेरिकेतील प्रत्येक तीन विवाहांपैकी एका विवाहाची परिणिती घटस्फोटात
होते. अर्थात, घटस्फोटाचे
हे प्रमाण अमेरिकेतच सर्वाधिक आहे. असे नव्हे तर इजिप्समध्ये हे प्रमाण सर्वात
जास्त आहे. परंतु या संबंधीची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही.
हॅरी जॉन्सन यांनी केलेल्या अमेरिकेतील घटस्फोटाच्या अभ्यासावरून ते
असे प्रतिपादन करतात की, १८६७ ते १९४८ या काळात अमेरिकेची लोकसंख्या ३०० टक्क्यांनी वाढली.
विवाहाचे प्रमाण ४०० टक्के वाढले, तर घटस्फोटाचे प्रमाण ४००० टक्के वाढले. यावरून तिकडील घटस्फोटाच्या
भीषणतेची जाणीव होईल. घटस्फोटाचे प्रमाण एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढण्यात खालील
कारणे कारणीभूत आहेत.
कुटुंब संस्था (Family Institution)
कुटुंब हि संकल्पना Family शब्दाचे भाषांतर आहे ; हा शब्द Famalus या लैटीन
शब्दा पासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ समूह की ज्यात माता ,पिता
त्यांची मुले व त्यांचे नोकर, गुलाम यांचा
समावेश होतो.
मैक आयव्हरी आणि पेज यांच्या मते "प्रजोत्पादन व बालसंवर्धन करण्यासाठी पुरेसा लहान कायम स्वरूपाच्या लैंगिक संबंधावर
आधारलेला असा समूह म्हणजे कुटुंब होय.
डॉ. डी. एम. मुजुमदारानी एकाच घरात राहणार्या, एकमेकाशी रक्त
संबंधित असणार्या व स्थान, हित व परस्परांविषयीच्या कर्तव्याची जाणीव या
बद्दल जागरूक असणार्या व्यक्तीच्या समूहाला कुटुंब म्हणतात.
रॉबर्ट लुई: कुटुंब हा विवाहावर आधारलेला सामाजिक समूह आहे. या
समूहात माता-पिता आणि त्यांची मुले यांचा समावेश होतो.
किंबाल
यंग यांच्या मते, ज्या समूहात एक किला अधिक पुरुष आपल्या एक किंवा अधिक स्त्रिया व आपल्या
अगर दत्तक घेतलेल्या मुलांसहित मुझे लहान असेतोपर्यंत तरी एकाच घरी राहातात अशा
सामाजिक समूहाला कुटुंब म्हणतात.”
कुटुंबाची वैशिष्टये :
(१) विवाह
बंधन: स्त्रीपुरुषांच्या विवाहबंधनातूनच कुटुंबसंस्था उदयास येते. या विवाह बंधनाला
समाजमान्यता असते. हे विवाह बंधनाला दीर्घकाल टिकणारे, कायमचे अगर अल्पजीवीही असते.
(२) आप्तसंबंध :कुटुंबातील सर्व
व्यक्तीचे एकमेकांशी रक्तसंबंध स रक्ताचे संबंध कुटूबीयांच्या नात्यातील आधार
असतात. आईवडील यांच्यामध्ये जसे रक्ताचे संबंध असतात तसेच आईबापांची ज्या
व्यक्तीशी रक्ताची नाती असतात त्या लोकांशीसुद्धा अभावितपणे मुलांचेही रक्तसंबंध
प्रस्थापित रक्तगटातील असतात.
(३) द्विपक्षीय
स्वरूप :कुटुंबात माता-पिता या दोषांचा समावेश असतो. सातत्यही टिकून राहणार
नाही, इतकेच नव्हे तर कुटुंबातील प्रत्येक
व्यक्तीचे आई व वडील या दोहोंच्या आप्तसंबंधीयांशी नाते प्रस्थापित होते. म्हणूनच
कुटुंबाचे स्वरूप हे द्विपक्षीय असते.
(४) समान
निवासस्थान एकाच कुटुंबातील सर्व व्यक्ती एकाच घरात राहतात. माता-पिता व
त्यांची मुले एके ठिकाणीच राहत असल्याने समान निवासस्थान हे कुटुंबाचे वैशिष्ट्य
ठरते. पितस्थानीय कुटुंबात विवाहानंतर मुलगी आपल्या पतीच्या घरी जशी नांदावयास
जाते तसेच मातृस्थानीय कुटुंबात विवाहानंतर प्रौढ मुलगा आपल्या पत्नीच्या घरी
जातो. अशा कुटुंबातून सुद्धा माता-पिता व त्यांची मुले यांचे निवासस्थान एकच असते.
हिंदुसमाजातील यु कुटुंबपद्धतीत कुटुंबातील तीन पिढया एकत्रच राहत असतात.
(५) वंशपरंपरा
पद्धती: मुलाचा रक्तसंबंध हा जरी त्याच्या माता पित्याशी असला तरीसुद्धा
मुलाची वंशपरंपरा मातेमार्फत किंवा पित्यामार्फत ठरविली जाते. मातृवंशीय कुटुंबात
मुलाची वंशपरंपरा मातमार्फत निश्चित केली जाते. कुटुंबात मालमत्तेचा व पदाचा
अधिकार आईकडून मुलाकडे येतो तर पितृ वंशीय कुटुंबात हे अधिकार पित्याकडून मुलाकडे
आलेले असतात.
(६) आर्थिक
व्यवस्था: माता-पिता व त्यांची मुले हे सर्व एकत्रच राहत असतात. या सर्व
कुटुंबीयांच्या चरितार्थाचा व पालनपोषणाचा आर्थिक प्रश्न महत्त्वाचा असतो.
कुटुंबप्रमुखाला सर्व कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाची काळजी घ्यावी लागते.
कुटुंबप्रमुखाच्या या महत्त्वाच्या आर्थिक कार्यात प्रत्येक जण आपापल्या परीने
कुटुंबप्रमुखाला साहाय्य करीत असतो. त्यामुळेच मरडाँक यांनी कुटुंबातील आर्थिक
सहकार्याला महत्त्व दिले आहे..
(६) सर्वव्यापकता
:मानव विकासाच्या सर्व अवस्थांत कुटुंबसंस्थेचे अस्तित्व दिसून येते. किंबहुना
कुटुंबास समाजविकासाची प्रथम अवस्था मानतात. मानवविकासाची अशी कोणतीय अवस्था नाही
की ज्या अवस्थेत कुटुंबसंस्थेचे अस्तित्व नाही. इतकेच काय पण मानवेतर मानवी
विकासाच्या कोणत्या अवस्थेचा विचार कुटुंब संघटने शिवाय साकल्याने करता येणे शक्य
नाही.
(७ )
भावनिक संबंध: सर्व कुटुंबीयांच्यात भावबंध निकटचे असतात. हे भावनिक बंध
एका अर्थाने कुटुंबाला घरपण प्राप्त करून
देतात. पती- पत्नी , माता-पुत्र, बंधु-बहीण इत्यादी सर्व कुटुंबिय प्रेम, वात्सल्य, वंशाभिमान, श्रद्धा, सहानुभूती, त्याग या भावनांनी एकमेकांशी बंद झालेले असतात.
कुटुंबातील हा भावनिक उबदारपणाच कुटुंबाच्या सातत्याची ग्वाही देतो.
(८ )
मर्यादित आकार :कुटुंबातील सदस्यांची संख्या नैसर्गिकरीत्या सीमित झालेली
असते, जीवशास्त्रीय परिस्थितीची मर्यादाच या
कुटुंबाच्या आकारावरच पडते. कुटुंबाचे सदस्यत्व जन्मावर अगर विवाहाने ठरत असल्याने
ही मर्यादा स्पष्ट होते.
(९ )
रचनात्मक प्रभाव मानवी आयुष्याच्या प्रारंभी मानवाला सामाजिक पर्यावरण हे
कुटुंबामुळेच लाभत असते. मानवाच्या व्यक्तिमत्वाच्या योग्य वाढीला आवश्यक असणारे संस्कार कुटुंबच करीत
असते. त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाला आकार व घाट येत असतो. व्यक्तीच्या
समाजीकरणाची सुरवात कुटुंबात होत असते.
कुटुंबाच्या विलक्षण प्रभावानेच कुटुंबियांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण होत असते.
(५) कुटुंबियांची
जबाबदारी: कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जबाबदारीची पूर्ण जाणीव असते. प्रत्येक
व्यक्ती आपल्या कुटुंबाकरिता कोणताही
त्याग मोठा मानत नाही. कुटुंबियांच्यातील सहकार्य हा कुटुंबाचा स्थायिभाव असतो.
(६) सामाजिक
नियमन: कुटुंब समूहाचे समाजातील महत्व अनन्यसाधारण आहे. हे महत्व कुटुंबाच्या
या वैशिष्ट्याने जास्त स्पष्ट होते. व्यक्तीवर पूर्णतया नियंत्रण हे कुटुंबाचे
असते. कुटुंबाचे नियंत्रण झुगारणे व्यक्तीला इतके सोपे वाटत नाही. रुढी, परंपरा, लोकाचार
यांच्या द्वारा व्यक्तीच्या समाजवर्तनावर नियंत्रण प्रस्थापित केले जाते. साहजिकच
कुटुंबाचे व्यक्तीवरील नियंत्रण हे सर्वश्रेष्ठ मानले पाहिजे.
(७) समाजरचनेतील
मध्यवर्ती स्थान: समाजरचनेचा पाया कुटुंबच असतो. व्यक्तीचा जन्म कुटुंबातच होत
असल्याने कुटुंबप्रभावानेच व्यक्तीचे व्यक्ति मत्व घडत असते. व्यक्तीवरील
संस्कारांची सुरुवातच कुटुंबात होते. साहजिकच या समाजीकरणाच्या प्रक्रियेने कुटुंब
समाजाला योग्य व पोषक अशा व्यक्त घडवीत असते. त्यामुळेच समाजाला अनेक कुटुंबांचा
समुच्चय मानतात.
कुटुंब संस्थेचे महत्व :
कुटुंबसंस्थेचे समाजातील अनन्यसाधारण महत्त्व
हे कुटुंबसंस्थेच्या कार्यावरच ठरले गेले आहे. त्याशिवाय या संस्थेस समाजात एवढे
महत्त्व लाभले नसते. अर्था तच या कार्याच्या स्वरूपात कालमानाप्रमाणे बदल होत
चालला आहे हे सर प्राचीन कुटुंबाची कार्ये अर्वाचीन कालात इतर संस्थांच्याकडे
सोपवली आहेत. तरीसुद्धा कुटुंबाच्या मूलभूत स्वरूपाच्या कार्यात बदल झालेला दिसून
येत नाही.
(१) कुटुंबाची
जैविक कार्य मानवाची कामतृप्ती ही महत्वाची गरज आहे. ही कामतृप्ती
कुटुंबसंस्थेमार्फतच होत असते. कुटुंबसंस्थेच्या या प्रमुख उद्दिष्टे समाजमान्यता
लाभलेली असते. लैंगिक संबंधावर आधारित असलेल्या कुटुंबात प्रजोत्पादन होत असते.
समाजाचे अस्तित्व टिकविण्याच्या व समाजाच सातत्य टिकविण्याच्या दृष्टिकोणातून हे
कार्य अत्यंत जरुरीचे आहे
(२) मनोवैज्ञानिक
कार्ये : व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास सबै दृष्टोंनी व खऱ्या अर्थानि
होण्यासाठी कुटुंबाचे हे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कुटुंबातील प्रत्येक
व्यक्तीला मानसिक समाधान व सुरक्षिततेची भावना वाटली पाहिजे. बुटुंबातील प्रत्येक
व्यक्तीचे एकमेकांवर असणारे अकृत्रिम प्रेम, सहानुभूती, बादर यामुळे त्यांना फार मोठे मानसिक समाधान
मिळत असते. याच्यामुळेच जीवना तील व्यावहारिक कठोर समस्यांचा विसर पडून कुटुंबीय
जीवन व्यवस्थितपणे जगू शकतात.
(३) आर्थिक
कार्ये : कुटुंबाचे आर्थिक कार्य
तितकेच महत्त्वाचे आहे. प्राचीन काळापासून कुटुंबाचे हे आर्थिक कार्य अखंडितपणे
चालू आहे. औद्योगिक अयंतीपूर्वी तर कुटुंब हा एक आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण घटक
होता. आर्थिक उत्पादनापासून ते व्यावसायिक शिक्षणापर्यंतच्या सर्व क्रिया कुटुंबच
करीत आहे. द्वितीय श्रमविभाजन, संपत्तिविभाजन
इत्यादींची जबाबदारी कुटुंबच घेते.. आजसुद्धा आर्थिक कियांचे संपादन करणे
कुटुंबाला जरुरीचे आहे.
(४) सामाजिक
कार्ये : प्रत्येक कुटुंबाला समाजात एक निश्चित स्थान असते. त्याप्रमाणे
कुटुंबियांना समाजात स्थान किंवा दर्जा मिळत असतो. अजूनही काही समाजात कुटुंबाचा
परंपरागत व्यवसाय व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य त्यांना नसते. आधुनिक कालात
कुटुंबियांना हे स्वातंत्र्य जरी मिळत असले, तरीसुद्धा
व्यक्तींना मिळणारा दर्जा हा त्यांच्या कुटुंबाच्या कुटुंबियांना करावा लागतो.
कुटुंबाचे प्रकार :
कुटुंबातील सदस्यांच्या संख्येवरून दोन प्रकार
(१) केंद्र किवा प्राथमिक कुटुंब ( Nuclear or elementary family) (२) संयुक्त (Joint family) केंद्र अगर प्राथमिक कुटुंबात अस तात. अशा
प्रकारचे कुटुंब हे जवळ जवळ सर्व समाजात आढळून येते. हे सर्वात लहान स्वरूप होय. संयुक्त कुटुंबात तीन
पिढयांपर्यंतचे सदस्य एकत्र राहतात व आपली उपजीविका समान मालमत्तेवर करतात.
संयुक्त कुटुंबातील विवाहित मुळे स्वतंत्र विवाह न करता आपल्या पत्नीसह त्याच कुटुंबात राहतात.
(व)
कुटुंबाची औपचारिक सता, निवासस्थान या आधारावर कुटुंबाचे दोन
प्रकार पडतात.
(१) पित्र सत्ताक कुटुंब व (२) मातृसत्तात्मक कुटुंब.
(क)कुटुंबातील
पती पत्नी च्या विवाहाच्या स्वरूपावरून १) एक विवाही २) बहु विवाही असे दोन प्रकार
पडतात.
प्रा. रिव्हर्स यांनी चार
प्रकार सांगितले आहेत
(१ ) (Clan कुल २) मातृसत्ताक (Matrilocal famiiy) (३) पितृसत्ताक (Patrilocal family)
(४ )विभक्त (Individual family).
भारतीय संयुक्त
कुटुंबाची वैशिष्टे :
१) एकजिनसीपणा :
(२) शेती
या एकाच व्यवसायावर कुटुंबाची रचना: असे म्हणता येईल की " समान जमीन, समान पर, समान
आर्थिक कार्य समान आप्तसंबंध यामुळेच ग्रामीण कुटुंब आकारित होते. "
(३) ग्रामीण
कुटुंबात शिस्तीची व अवलंबनाची भावना तीव्र दिसून येते:
(४)
सर्व कुटुंबियांत कुटुंबाबद्दल अभिमान बसत असतो
जाती संस्था : Caste Institution :
जातीला इंग्लिशमध्ये Caste ' म्हणतात. Caste हा इंग्लिश शब्द Casta' या
शब्दातून उत्पन्न झाला. आहे. Casta या
पोर्तुगीज व्युत्पत्ती 'castas'
या लॅटिन शब्दातून झाली. Castas शब्द वंशाची शुद्धता असा आहे. Caste हा शब्द पोर्तुगीजांनी वंशशुद्धते १५६७ साली
गोवामंडळाच्या हुकुमनाम्यात प्रथम वापरला पण जाती शुद्धतेने निदर्शक नाही, हे मानवशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. जातीचा
समूहाचा कोणताच संबंध नाही,
हे मानवशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले
आहे. वांशिक समूहाचा कोणताच संबंध नाही हे जसे मानवशास्त्रज्ञांनी स त्याचप्रमाणे
जात व वर्ण यांतील भेदही स्पष्ट केला. जात व वर्ण शब्दांची नेहमीच गल्लत केली जाते.
म्हणूनच जातीची व्याख्या करण्यापूर्वी जा व वर्ण या दोहोंतील फरक ध्यानी घेतला
पाहिजे..
जातीची व्याख्या:
(१)
सर हर्बर्ट रिस्ले यांनी जातीची व्याख्या अशी केली आहे. " एकच सामान्य नाव
धारण केलेल्या, विवक्षित मानवी अगर देवी अशा काल्पनिक
मूळ पूर्वजापासून आपल्या संतान परंपरेला सुरुवात होते असे मानणाच्या पिढीजात
व्यवसाय करणाऱ्या व जे आपले मत व्यक्त करण्यास समर्थ आहेत अशा लोकां फडून तो एक
एकजिनसी समुदाय आहे अशी मान्यता पावलेल्या कुटुंबाचा समुच्चय म्हणजे जात होय.
"
(३)
डॉ. केतकर यांनी आपल्या History
of Caste in India या
ग्रंथात जातीची व्याख्या केली आहे. ते म्हणतात, या सामाजिक समूहाची दोन वैशिष्ट्ये आहेत. (१)
विशिष्ट जातीतील सभासदांच्या पोटी जन्मास आलेल्यांनाच त्या जातीचे सदस्यत्व
प्राप्त होते. अशा प्रकारे जन्मलेल्या सर्वांचा समावेश त्या जातीत केला जातो. (२)
आपल्या सदस्यांना आपल्या जातीबाहेरील व्यक्तीशी लग्न करण्यास कडक सामाजिकद्वारे
प्रतिबंध प्रा. हटन यांनी या व्याख्येवर आक्षेप घेताना या दोन्ही वैशिष्ट्यांचा
परा आहे.
(१)
पहिल्या वैशिष्टयाबद्दल ते म्हणतात की, द.
भारतात अशी उदाहरणे विपुल प्रमाणात आढळून येतात. त्यायोगे हे स्पष्ट होते की, एका जातीच्या लोकांना दुसऱ्या जातीत प्रवेश
दिला जातो. मलवारमधील अंबलवासी जात, ओरिसातील
शामोईपेशा व उस, करण यांनी परस्पर जातीत प्रवेश केला
आहे.
२) दुसन्या वैशिष्टपाबाबत प्रा. हटन म्हणतात की, बहिविवाहासंबंधी एवंडा कडक नियम नाही. पू.
बंगालमधील जातीची पोटजात कायस्थ व सुनरी या जातीशी रोटीबेटीचे व्यवहार करते.
(३) डॉ. केतकर यांच्या व्यक्तीच्या अंतर्भाव
आहे. पण व्यवसायनिवडीसंबंधीय पवित्र अपविधी उल्लेख नाही.
(३)
श्री. एन. के. दत्त यांनी The
origin and growth of efite in India' या ग्रंथात जातीची व्याख्या न करता जातीच्या क्षणांचे वर्ण आहे. ते
म्हणतात, " आपल्या जातीबाहेरील व्यक्तीकी
सदस्यांना वा ते येत नसे;
परजातीच्या व्यक्तीबरोबर
खाण्यापिण्याविषयीची विवाहा नसली तरी त्यासारखी बंधने होती. प्रत्येक जातीचे
व्यवसाय उरले असत जन्मावरूनच जात ठरविली जात असे. जातीमध्ये गतिणीबाब ब्राह्मणांचे
श्रेष्ठत्व हा या जातियंत्रणेचा महत्वाचा भाग होता.
जी एस घुर्ये यांनी Caste. Class and Occupation ' या ग्रंथात जातीची व्याख्या न करता जातीच्या
विचार केला आहे. जातीच्या व्याख्यांवरून जातीचे संपूर्ण चित्र होत नाही.
जातीची वैशिष्ट्ये
(१) समाजाची
विविध गटांमध्ये विभागणी (Segmental division of Society) : संपूर्ण समाजाची विभागणी विविध गटांमध्ये जातीच्या आधारावर दिसून
येते. प्रत्येक जातीचा गट सुसंघटित व स्वतंत्र असतो. प्रत्येक जातीची जीवनपद्धती
वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवन त्याच्या जातीने पूर्णतः नियंत्रित केलेले असते. ज्या जातीत व्यक्तीचा
जन्म झालेला जातीत त्याला आयुष्यभर राहावे लागते. याच जातीवरून त्या समाजात स्थान
व दर्जा मिळतो. इतकेच नव्हे तर परंपरागत जातीने घालून दिलेला व्यवसायच त्याला
करावा लागतो. आपली जात बदलण्याचे स्वातंत्र्य हे उसे व्यक्तीला नसे, तसेच व्यवसाय निवडीचेही स्वातंत्र्य त्याला
नव्हते. जातीचा पूर्ण प्रभाव व्यक्तीवर व समाजावर असे. या करिता जात पंचायती काम
करत ;या पंचायती व्यक्तीच्या खालील बाबीवर लक्ष केंद्रित करत असत.
(१)
परजातीच्या व्यक्तीबरोबर सहभोजन व सहपान करणे.
(२)
परजातीय स्त्रीशी संबंध ठेवणे.
(३)
विवाहित स्त्रीचा विनयभंग करणे.
(४)
विवाहवचनाचा भंग करणे.
(५)
वयात आलेल्या विवाहित मुलीला पतीच्या घरी पाठविण्यास नकार देणे.
(६)
पत्नीला सांभाळण्याचे नाकारणे.
(७)
कर्जफेड न करणे.
(८)
व्यवसायाच्या नियमांचे उल्लंघन करणे. करणे.
९) ब्राह्मणाचा अपमान
(१०)
गोवध करणे.
या कृत्यांचा गंभीरपणे विचार करून पंचायत संबंधित गुन्हेगाराला दड
करणे, जातिबाह्य करणे, देहदंडाचे शासन देणे, धर्मबाह्य ठरविणे इत्यादी गुन्ह्याच्या
गांभीर्याप्रमाणे शासन देत होती.
(२) जातीतील
उत्क्रम रचना ( Hierarchy
) जातिव्यवस्थेने
पूर्णतया प्रभारित झालेल्या समाजात स्तरीकरण हे जातीच्या आधारावर केले होते. ही
स्तररचना सुद्धा काटेकोर स्वरूपाची होती. एक जात दुसन्या जातीहून श्रेष्ठ आहे
मानून जातींची कमवार रचना केली जाई. सर्व जातीत ब्राह्मण ही श्रेष्ठ जात समजली
जाई. त्यामुळे या उत्कम रचनेतील सर्वश्रेष्ठ स्थान ब्राह्मणांनाच दिले गेले हो या
कनिष्ठ स्थान अस्पृश्यांचे होते.
०३)खाणेपिणे व सामाजिक व्यवहार या विषयी निर्बंध : रोटी बेटी
या विषयी अतिशय कडक निर्बंध होते. ब्राम्हण त्यांच्या पेक्षा कनिष्ट जातीच्या
हातचे अन्न ग्रहण करीत नसते. त्याच प्रमाणे इतर जातीही आपल्या पेक्षा कनिष्ट
जातीचे अन्न ग्रहण करीत नसत.
४)सामाजिक व धार्मिक अयोग्यता : वैदिक धर्मा नुसार काही
जातींना धर्म- पूजा-राहणीमान -खानपान इ,मध्ये विशेषाधिकार दिले आहेत तर काही काही
जातींना अयोग्य ठरविले आहे.जसे कि ब्राम्हण जातींना विशेष अधिकार दिले आहते तर
अस्पृश्य जातींना अयोग्य ठरविण्यात आले आहे.
५)व्यवसाईक निर्बंध : जाती आधारित व्यवसाय हे जातीचे प्रमुख
वैशिष्टे आहे. ब्राम्हण पूजा पाठ -क्षत्रिय -राज्यकारभार. वैश्य- व्यवसाय /शेती तर
शुद्र हे सर्वाची सेवा करतील अशी व्यवस्था होती . त्या -त्या वर्ण संबंधी जाती
असेच काम करत होते.
६) विवाह विषयक बंधने :जाती व्यवस्था हि आंतरविवाही संस्था
आहे तर कुल बाह्य विवाह हेही तिचे वैशिष्टे आहे. अनुलोम व प्रतिलोम विवाहा विषयी
सुद्धाबंधने अतिशय कडक आहेत.
बलुतेदारी -आलुतेदारी :
शेतीवर आधारलेला व्यवसाय बलुतेदार
गावातील इतर गरजा पूर्ण करणारा आलुतेदार
जातीवर आधारित व्यवसाय म्हणजे बलुतेदार
-आलुतेदार
वस्तू-सेवा विनिमयाची व्यवस्था
गरजे नुसार त्यांचा स्तर रचना आहे
सोनार-लोहार- सुतार इतरांना कमी लेखतात
Comments
Post a Comment