Skip to main content

Social Movements in India (भारतातील सामाजिक चळवळी /आंदोलने)

 

 

Social Movements

सामाजिक चळवळ /आंदोलन

Movements या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर चळवळी/आंदोलन असा केला जातो

या अर्थाने, Social Movements चे मराठी भाषांतर हे सामाजिक चळवळी/सामाजिक आंदोलन असा केला जातो

1)राल्फ टर्नर आणि लेविस किलीयान : “एकत्रित राहणार्‍या आलेले अनेक लोक ज्या समूहाचे किंवा समाजाचे घटक भाग असतात त्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा परिवर्तनाला विरोध करण्यासाठी जेंव्हा काहीशा .सातत्याने कार्यरत असतात, त्यास सामाजिक चळवळ / आंदोलन असे म्हणता येईल.”

२)रुडाल्फ हेबर्ले: “एखाद्या समाजातील प्रस्थापित संबंधात रूपांतरपण घडवून आणण्यासाठी केलेला सामूहिक प्रयत्न म्हणजे  सामाजिक चळवळ / आंदोलन होय ”

३)हर्बर्ट बुल्मर : “सामाजिक जीवनाची नवी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी करण्यात येणारा सामूहिक प्रयत्न म्हणजे  सामाजिक चळवळ / आंदोलन होय .”

४)जॉन विल्सन:” सामाजिक व्यवस्थेत व्यापक प्रमाणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी किंवा घडवून येणार्‍या बदलांचा प्रतिकार करण्यासाठी जाणीव पूर्वक संघटीत रित्या, असंस्थिकृत साधनाचा किंवा मार्गाचा अवलंब करण्यात येणारा प्रयत्न म्हणजे म्हणजे  सामाजिक चळवळ / आंदोलन होय. “

५)ड्रेसलर  आणि विलीस : अनेक लोक हेतू पूर्वक आणि सामुहिक रित्या परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न म्हणजे  सामाजिक चळवळ / आंदोलन असे म्हणतात.”

६) हॉर्तन आणि हंट: “अश्या प्रकारचे सामुदाईक प्रयत्न कि ज्या मध्ये समाज किंवा त्या मधील सभासद त्यांच्या मध्ये परिवर्तन होण्यासाठी प्रेरणा दिली जाते किंवा प्रतिरोध केला जातो त्यास  सामाजिक चळवळ / आंदोलन असे म्हणतात”

सी.डब्लू.किंग:- “सामजिक चळवळी अशी प्रक्रिया आहे कि जिचा उद्देश,विचार, व्यवहार आणि सामाजिक संबधात परिवर्तन आणणे असते”

 

सामाजिक चळवळीचे वैशिष्टे:

       एकच (समान) उद्देश

       सामूहिक प्रयत्न

       विचार धारेची समानता

       विशिष्ट संरचना

       पूर्वीच्या व्यवस्थेतील बदला साठी आग्रह

       किंवा आहे ती व्यवस्था टिकविण्यासाठी

       औपचारिक किंवा अनौपचारिक स्वरूप

       धोरण आणि कृती कार्यक्रम

       नेतृत्वाचे- प्रचारक आणि अनुयायी व्दारे अनुकरण

       ऐक्याची भावना

       प्रतीकांचा वापर

       परिस्थिती- विषय- समूह इ. आधारावर स्वरूप

       अनिश्चित काल मर्यादा

 

 

 

 

 

 

 

सामाजिक चळवळीचे/ आंदोलनाचे घटक :

elements of social movements

01)Aim and Objectives ध्येय आणि उद्दिष्टे

02)Philosophy/Ideology तत्वज्ञान /विचारधारा

03)Structure   संरचना

04)Strategies   रणनीती

05)Collective Action सामूहिक कृती

06)Policy धोरण

07)Programs कार्यक्रम

08)Leadership नेतृत्व

09)Motivator प्रचारक

10)Members  सदस्य/कार्यकर्ते

11)Follower अनुयायी

 

 

 

 

 

 

Importance of Social Movements

सामाजिक चळवळीचे/आंदोलनाचे  महत्व

1.  Resolve the Problems of Society (सामाजिक समस्या सोडविणे)

2.  Changes in Institutional Mechanism (संस्थात्मक कार्यप्रणालीत बदल )

3.  To Occupy of Power(सत्ता काबीज करणे )

4.  Provide -Establishment of the New Leaderships( नवीन नेतृत्व देणे किंवा त्यास प्रस्थापित करणे )

5.  To express the Aspirations and Priorities of the Society(समाजाच्या आकांक्षा आणि प्राधान्य मांडणे )

6.  Provide a Social voice to those are voiceless (ज्यांचा आवाज नाही त्यांना आवाज देणे/अन्यायाच्या विरोधात आवाज )

7.  Important roles in shaping of the Society ( समाजाला आकार देणे)

8.  Social reform ( सामाजिक सुधारणा)

9.  Social awareness in the society (सामाजिक जन जागृती)

10.       Social control सामाजिक नियंत्रण  

11.   Change Social Change in Society (सामाजिक परिवर्तन /बदल )

a.  Changes in Political area (राजकीय परिवर्तन /बदल)

b.  Change in Religious life (धार्मिक जीवनात परिवर्तन/ बदल )

c.  Change in educational life ( शैक्षणिक जीवनात परिवर्तन/ बदल )

d.  Change in Government ( शासनात परिवर्तन /बदल)

e.  Change in Institutional arenas. (सामाजिक संस्था मध्ये परिवर्तन/बदल )

f.   Change in Health (आरोग्य क्षेत्रात परिवर्तन /बदल

g.  Change in Corporate (सहकार क्षेत्रात परिवर्तन /बदल)

 

 

 

Peasant movements शेतकरी (कुणबी)चळवळ /आंदोलन

इंग्रजीतील Peasants आणि Farmers या दोन्ही संकल्पना मराठीत समान अर्थानेच वापरल्या जातात ते म्हणजे “शेतकरी” होय.

यामध्ये मात्र काही मुलभूत फरक आहे. Peasants ही संकल्पना मराठी मध्ये कुणबी/कुळ  या अर्थाने  वापरता येईल. ज्या मध्ये शेती कसणारा परंतु जमिनीची मालकी नसणारा (शेतमजूर),  अल्पभूधारक शेतकरी किंवा पारंपारिक  अर्थाने शेती करणारा या अर्थाने वापरली जाते.

तर  Farmers साठी जमिनीची मालकी असणे आवश्यक आहे. काही  संदर्भात जमीनदार किंवा मोठ्या शेतकऱ्यासाठी  Farmers ही संकल्पना वापरली जाते

१९५३ ला रोबर्ट रेडफील्ड यांनी ही संकल्पना औद्योगिक व्यवस्थेपुर्वी च्या शेतकरी व्यवस्थेसाठी वापरली आहे,

संयुक्त राष्ट्रे (UN) यांच्या मानवी हक्क समितीने २०१८ ला “Rights of Peasants and Other People Working in Rural Areas या नावाने ठराव पास केला.

भारत सरकारने संयुक्त राष्ट्रे (UN) यांच्या वरील ठरावाच्या बाजूंने भूमिका घेतली होती…..

 

 

 

भारतीय शेतकर्‍यांच्या समस्या

६९% जनतेचे  शेतीवर अवलंबन आणि खेड्याचे रहिवासी

जय जवान- जय किसान १९६५ लाल बहादूर शास्त्री यांची घोषणा

अ) शेती विषयक समस्या: 

१)शेतीचा आकार लहान

२)पारंपारिक विभाजनाची समस्या

३)निसर्गावर आधारीत/कोरडवाहू  शेती

४) शेतीची उत्पादकता

५) जलसिंचनाची समस्या

६) जमीन धारणा पद्धती

७) पायाभूत सुविधांचा अभाव

ब) शेतकरी विषयक समस्या

१) शिक्षणाचा अभाव /निरक्षरता

२) दारिद्र्य

३)कुटुंबाचा आकार मोठा

४) कर्जबाजारीपणा

५) व्यसनाधीनता

६)शेतकरी आत्महत्या

७) जागृतीचा अभाव

८)सामाजिक प्रतिष्ठा चा अभाव

९) आधुनिक अवजारे यांचा अभाव

१०)सरकारी धोरणांची अनास्था

११) धोरणातील विसंगती

 

शेतकरी आंदोलन /चळवळ आणि त्यांचे नेतृत्व

अ)ब्रिटीश काळ

१८५७ नंतर च्या ब्रिटीशकाळातील  आंदोलनाचे मुख्य कारणे:

१)वाढता जमीन सारा

२)आर्थिक मंदी

३)दुष्काळ 

१८८३ ला जोतीबा फुले यांचा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ प्रकाशित

१८८८ ला ड्युक ऑफ केनोट भेटीत जोतीबा यांची  शेतकरी प्रतिनिधी म्हणून भेट ……आंदोलनाचा परिणाम

गावगाडा….ग्रंथ त्रि .ना.आत्रे १९१५

१९४९ केशवराव जेधे यांचीशेतकरी कामगार पक्षाची” स्थापना

“जय जवान-जय किसान” ही घोषणा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी केली

 

शेतकरी आंदोलन /चळवळ विषयक समाजशास्त्राची भूमिका/ मते-

एन.जी .रंगा :शेतकरी असंतोष म्हणजे ---शेतकरी संघर्ष

(struggle of the peasantry)

ए.आर. देसाई: शेतकरी संघर्ष (peasant struggle)

कैथलीन गॉग:  शेतकरी उठाव  (peasant upraising)

हमझा अलावी : शेतकरी क्रांती (-peasant revolution )

मार्क्सवादी संशोधक : वर्ग संघर्ष (class struggle)

वर्ग युद्ध (class war)

धनागरे द.ना.  :- शेतकरी चळवळ (peasant movement)

दोषी आणि जैन : शेतकरी असंतोषाची पाळेमुळे ही कृषक समाजाच्या सामाजिक संरचनेत, तिच्या इतिहासात आणि शेतीच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत रुतलेली दिसून येतात.

स्वातंत्र्य पूर्व काळातील आंदोलने /चळवळी

संथाल विद्रोह -१८५५-१८५६ जमीनदारी आणि इंग्रजाच्या कर विरोधी

नील आंदोलन : १८५९ बिहार /बंगाल ---नील या पिका संबंधी इंग्रजांनी

केलेल्या सक्तीला शेतकऱ्याचा विरोध

पाबना आंदोलन: १८७३ बंगाल ‘कृषक संघाची’ स्थापना 

दक्खन आंदोलन – (१८४०- १८७४) महाराष्ट्र -मुख्यतः अहमदनगर पुणे जिल्हा सावकारी विरोधी

रोमोशी शेतकरी आंदोलन –  महाराष्ट्र -वासुदेव बळवंत फडके – १८७९-१९२२

पंजाब शेतकरी विद्रोह – १९०७

एका आंदोलन: उत्तर प्रदेश १९१८-१९१९ किसान सभा सावकारी विरोध -करास विरोध

ताना भगत – १९१४ बिहार -

 बारडोली सत्यागृह: गुजरात १९२२ -१९२८ नेतृत्व- गांधी-वल्लभभाई पटेल – जमीन महसूलीत ३०% वाढ

चंपारण्य सत्यागृह : बिहार १९१७ गांधी

खेडा सत्यागृह :  गुजरात १९१८ गांधी

मोपला आंदोलन –(१९२० – १९३६ )केरल (मलबार) गांधी

अखिल भारतीय किसान सभा -१९२३ ला बिहार किसान सभा ची निर्मिती सहजानंद किसान सरस्वती  नेतृत्व -चे १९२८ ला आन्ध्रप्रांतीय रयत सभा -ओरिसा मध्ये उत्कल प्रांतीय किसान सभा तर बंगाल मध्ये कृषक प्रजा पार्टी (१९२९) या सर्वांनी मिळून १९३५ ला अखिल भारतीय किसान सभा ची स्थापना

बेन्गु किसान आंदोलन -१९२९ राजस्थान

 

स्वातंत्र्या नंतरची शेतकरी आंदोलने/चळवळी  :

बहुतेक आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी – समाजवादी आंदोलन ने केले तरी परंतु शेतकरी आंदोलन कोणत्याही एका -दुसऱ्या विचारधारेशी जोडलेले दिसत नाही. त्यांच्या साठी शेती हा मुद्दा महत्वाचा आहे .

तेलंगाना किसान आंदोलन (१९४६-१९५१)

तेभाग आंदोलन (१९४६-४९)

कगोंदू सत्यागृह : १९५१

‘नक्षलबारी’ आंदोलन (बंगाल) -१९६७

भारतीय किसान यूनियन -महेंद्र सिह टीकेत (उत्तर प्रदेश )यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन : १९८६-विजे संबंधी , मेरठ आंदोलन -१९८८ , जंतर- मंतर -२००८

कर्नाटक मधील आंदोलन (१९८१ ते १९८९)

महाराष्ट्रातील आंदोलन : (शेतकरी संघटना – नेतृत्व एस.एम. जोशी) १९८० नाशिक कांदा उत्पादक शेतकरी –.

शेतकरी लोंग मार्च -२०१८ नाशिक ते मुंबई पायी मोर्चा अजित नवले

स्वाभिमानी शेतकरी संघटना -राजू शेट्टी -२००४

रयत शेतकरी संघटना – सदाभाऊ खोत

२०२०-२०२१ मध्ये दिल्ली परिसर आणि संपूर्ण भारतात ( विशेषतः उत्तर भारत ) केंद्रीय शेतकरी बिल -धोरण विरोधी आंदोलन मार्च २०२० पासून ते आज पर्यंत चालू … संयुक्त किसान मोर्चा

 

शेतकरी चळवळीचा परिणाम :

1)  क्रियाशील दबाव गट निर्माण

2)  पिकांना हमी भाव (कापूस,ऊस,तंबाखू,दुध ई.)

3)  जमीनदारी पद्धत कमजोर

4)  सावकरशाही पद्धत कमजोर

5)  वेठबिगारी ई. प्रथा संपुष्टात

6)  कृषी रचनेत परिवर्तन

7)  शेतकरी नेतृत्व निर्मिती

8)  राजकीय, सामाजिक, संविधानिक अधिकाराची जाणीव

9)  शेती विषयक कायदे निर्मिती

10)    आर्थिक -सामाजिक प्रगती

11)    वीज, पाणी, कर्ज ई. पुरवठा

12)    शेतकरी शोषणाची तीव्रता कमी

13)    राष्ट्रीय आंदोलन

14)    कायदेशीर अधिकार प्राप्त (सात बारा -कुळ कायदा ई.)

15)    अन्न धान्य पुर्तेते कडे वाटचाल

16)    शेती- शेतकरी अस्मिताची निर्मिती

 

Dalit Movements

दलित चळवळी /आंदोलन

 

पारंपारिक अर्थाने ज्यांना ‘अस्प्रश्य’ म्हटले जाते किंवा

संविधानिक भाषेत “अनुसुचित जाती (SC) असे संबोधले जाते मुख्यरूपाने त्यांच्या साठी “दलित” ही संकल्पना उपयोगात आणली जाते.

काही विचारवंताने ‘दलित’ ही संकल्पना जाती अनुशंगाने नसून….कोणत्याही दबलेल्या/ शोषित / कमजोर /मागास घटका साठी वापरली जाते….जसे कि..स्त्रिया, अपंग,गरीब ई…

दलित चळवळीस काही समांतर नावानेही ओळखले जाते जसे फुले -शाहु- आंबेडकर चळवळ, मागासवर्गीयांची चळवळ, वंचित चळवळ, बहुजन चळवळ, मूलनिवासी चळवळ ई. असे असले तरी सर्व चळवळीत काही मुलभूत अंतर आहेत ….

 

 

Dalit Problems in India

भारतातील दलितांच्या समस्या

१)अस्प्रश्यतेची समस्या, जातीभेद ,वर्णभेद ,

२)  विषमता, शोषण ,गुलामगिरी, सामाजिक अंतर

३) सामाजिक प्रतिष्ठा चा अभाव

४)पारंपारिक व्यवस्थेमध्ये शिक्षण संपत्ती आणि शस्त्र धारण करण्याचा करण्याचा अधिकार नाकारला

५)धार्मिक अधिकार नाही ( मंदिर प्रवेश नाही, पूजेचा अधिकार नाही)

६) गावाच्या बाहेर वसाहती

७)आर्थिक समस्या (दारिद्य )

८) हिंसाचार- अत्याचार विशेषतः महिलावर अधिक (दुहेरी ) अत्याचार

९)आरोग्याची समस्या ( गरीबांचे रोग- TB, संसर्गजन्य ई.रोग)

१०) शिक्षणाची समस्या

११) बेरोजगारी -बेकारी

१२)अस्मितेची समस्या

13)

 

 

Major Dalit Movements

भारतातील प्रमुख दलित चळवळी /आंदोलने

*    दलित चळवळीच्या केंद स्थानी फुले-शाहु -आंबेडकर

*   डॉ. यांच्या विचारात बुद्ध-महावीर-चार्वाक-कबीर- तुकारम -शिवाजी महाराज -फुले -आंबेडकर यांच्या विचारांचा सहभाग ,त्यांमुळे दलित चळवळी चे तीन गटात वर्गीकरण करता येतील

*   डॉ. आंबेडकर पूर्व -डॉ. आंबेडकर – डॉ. आंबेडकर नंतर ची चळवळ

*   अ) डॉ. आंबेडकर पूर्व दलित चळवळ

१)       सहानुभूती : ( ज्यांना अपृश्यता- जाती व्यवस्था चा वाइट अनुभव नाही) आगरकर , गोखले ,रानडे ,कर्वे ई.

२)       अनुभूतीची चळवळ : ( ज्यांना अपृश्यता- जाती व्यवस्था चा वाइट अनुभव आहे )

-जोतीबा फुले –तत्कालीन अस्प्रश्यासाठी  पाण्याचा हौद खुला केला, केशवपन विरुद्ध लढा, शिक्षण,सत्यशोधक समाज निर्माण ..

- वी रा शिंदे- आधुनिक काळात बहुजन संकल्पना वर काम, अस्पृश्य निवारण,डिप्रेस्ड क्लास मिशन (१९०६)  ई.

-१८१८ – भीमा कोरेगाव लढा

राजर्षि शाहु महाराज:- अस्पृश्य साठी शाळा , वसतिगृह, जमीन, व्यवसाय ई. विशेषत: आरक्षण ( नोकरी आणि शिक्षण)

-किसान फागुजी बनसोडे – सोमवंशी वर्तमान पत्र, शिक्षण, अस्पृश्यता निवारण , आर्य -अनार्य लढा वर आंदोलनाचा विचार

ब))डॉ. आंबेडकर कालखंड

१) सहानुभूती :-

-म.गांधी – हरिजन, दलित संकल्पना मांडल्या , हरिजन सेवक संघ द्वारे कार्ये ….सहभोजन आणि स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग …..

२) अनुभूती चे आंदोलन:

डॉ.बाबासाहेब आंबेडकर- सायमन कमिशन, गोलमेज परिषद द्वारे अधिकार प्राप्त …..(स्वतंत्र मतदार संघ)

महाड च्या चवदार तळ्याचा सत्यागृह ….

मनुस्मृती चे दहन…

काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन

संविधानिक तरतुदी

वर्तमान पत्र – मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता,प्रबुद्ध भारत ई.

SC फेडरेशन, स्वतंत्र मजदूर संघ ई. राजकीय पक्ष

पिपल एज्युकेशन सोसायटी ची स्थापना ….

आंबेडकर यांचे समकालीन : - पेरियार रामसामी (दक्षिण भारत) , बाबू जगजीवन राम ( उत्तर भारत )सयाजीराव गायकवाड ,शाहु महाराज , भाई माधवराव बागुल , गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील ई..

*   ३) डॉ. आंबेडकर नंतर ची चळवळ :

·      राजकीय -RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दादासाहेब गायकवाड(गायरान जमीन आंदोलन ), रुपवते …रामदास आठवले ( सध्या केंद्रीय मंत्री)

·      बहुजन महासंघ/ भारतीय रिपब्लिकन पार्टी – प्रकाश आंबेडकर

·      बहुजन समाज पार्टी (BSP) – कांशीराम , मायावती उत्तर प्रदेश मध्ये ४ वेळा सत्ता

·      इतर नेतृत्व : रामविलास पासवान ई.

सामाजिक आंदोलन :-

दलित पैथर- रामदास आठवले , अरुण कांबळे, राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज वी पवार ई.

( भूमिहीन शेतकरी प्रश्न, जाती आधरित अन्याय विरुद्ध आंदोलन,साहित्य निर्मिती , सांस्कृतिक लढा , तरुणांचा लढा ई. )

बामसेफ: BAMCEF- All India Backward (SC/ST/OBC) and Minorities Employees  Federation

06 डिसेंबर (आंबेडकर महापरीनिर्वाण दिन ) १९७८ ला स्थापना

डी.के खापर्डे आणि कांशीराम द्वारे स्थापना

कर्मचारी यांची संघटना परंतु समजाच्या जागृतीचे काम

बहुजन – मूलनिवासी – ८५ विरुद्ध १५ ई आंदोलनात्मक संकल्पनाची निर्मिती

Pay Back to Society हे उद्दिष्टे

राष्ट्रीय आधार- केडर -मास (जनता) पद्धती द्वारे कार्ये

विविध नियतकालिके –  बहुजन संघटक ,बहुजन नायक  Mulnivasi Organizer ,बहुजन संघर्ष, मूलनिवासी टाईम्स ई.

धार्मिक आंदोलन : भारतीय बौद्ध महासभा , त्रिरत्न बौद्ध महासंघ  ई. 

 

 

 

 

 

 

 

 

 

दलित आंदोलनाचे गुण आणि मर्यादा :

गुण :

1.  नेतृत्व निर्मिती

2.  राष्ट्रीय- राज्य ई. पातळीवरील संघटन

3.  सामाजिक- राजकीय जागृती

4.  महिलांचा सहभाग

5.  कायदेशीर तरतुदी

6.  शैक्षणिक प्रगती

7.  नोकरीतील संधी

8.  राहणीमान उंचावले

9.  महत्वाचे पद प्राप्त

10.       राजकीय सहभाग

11.       राजकीय जागृती

 

 

 

मर्यादा :

१)   फुटी ची समस्या/मतभेद 

२)   साधनहीनता

३)   समन्वयाचा अभाव

४)   सक्षम नेतृत्वाचा अभाव

५)   जातीच्या मर्यादा

६)   अस्वीकृतीची समस्या

७)   सर्व समावेशकता अभाव / ठराविक प्रश्नांना महत्व

८)    

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...