Skip to main content

Sociology of Health -Module-1 2024

  

Semester-IV

Sociology of health

आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६

What is the Sociology?

समाजशास्त्र म्हणजे काय ?

-समाजाचे शास्त्र /विज्ञान, सामाजिक संबंधाचे शास्त्र /विज्ञान, आंतर्क्रियाचे  शास्त्र /विज्ञानसामाजिक संस्थांचे शास्त्र /विज्ञान, सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान, इ . व्याख्या करता येतील

What is sociology of Health?

आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ?

आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान, आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे  शास्त्र -विज्ञान, आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान, आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान, इ . व्याख्या करता येतील

What is Health?

आरोग्य म्हणजे काय ?

WHO- “शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”  आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे होय.”

 आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या :

(Meaning and Definition of Sociology of Health)

 आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होय.”

 आरोग्याचे समाजशास्त्र ही समाजशास्त्राची एक शाखा असून तिच्यात आरोग्यावर प्रभाव टाकणाऱ्या व त्याच्याशी निगडीत असणार्‍या विविध घटकांचा पद्धतशीर व सविस्तर अभ्यास केला जातो. थोडक्यातआरोग्य व समाज यांच्यातील परस्परसंबंधाचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्र होय.

हे शास्त्र आरोग्याशी निगडीत असलेले मानवी वर्तन व मानवी संबंध यांच्या अभ्यासावर विशेष भर देते.

२) पेंग्विन (Penguin) डिक्शनरी ऑफ सोशिऑलॉजी: आरोग्याचे व आजारपणाचे समाजशास्त्र ही संज्ञा औषधाचे समाजशास्त्र या संज्ञेपेक्षा अधिक पसंत केली जाते. कारण ती औषधाच्या व्यावसायिक हितासंबंधापेक्षा समाजशास्त्राच्या सैध्दांतिक हितसंबंधाचा विचार करते.(Sociology of Health and Illness: This term is often preferred to sociology of medicine, because it reflects the theoretical interests of sociology rather than the professional interests of medicine.)

 

३) विकीपिडीया विकीपिडीयावर पुढील दोन व्याख्या दिलेल्या आहेत. (१) आरोग्याचे व आजारपणाचे समाजशास्त्र किंवा आरोग्याचे व निरोगीपणाचे समाजशास्त्र (किंवा केवळ आरोग्याचे समाजशास्त्र) हे समाज व आरोग्य यांच्यातील आंतरक्रियांचे परीक्षण करते.

 (The sociology of health and illness, alternatively the sociology of health and wellness (or simply health sociology), examines the interaction between society and health.

(२) आरोग्याचे व आजारपणाची समाजशास्त्र यामध्ये समाजशास्त्रीय विकृतीशास्त्र (रोग व आजारपणाची कारणे)विशिष्ट प्रकारांच्या वैद्यकीय साधनांच्या शोधाची कारणेआणि वैद्यकीय नियमांना रुग्णाची असणारी मान्यता किंवा अमान्यता यांचा अंतर्भाव होतो. (The sociology of health and illness covers sociological pathology (causes of disease and illness), reasons for seeking particular types of medical aid, and patient compliance or non. compliance with medical regimes.)

आरोग्याच्या समाजशास्त्र चे स्वरूप:

(Nature of Sociology of Health)

1) आरोग्याचे समाजशास्त्र हे समाजशास्त्राची ज्ञान शाखा आहे.

२)विविध नावे:- अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रोबर्ट स्टारस यांनी १९५७ मध्ये औषधाचे समाजशास्त्र हि संकल्पना उपयोगात आणली.

मात्र इंग्लड , जर्मनी, नेदरलँड् इ.ठिकाणी वैद्यकीय समाजशास्त्र हीच संकल्पना उपयोगात आणली जात होती.

डेव्हिड मेकेनिक यांच्या मते वैद्यकीय समाजशास्त्र हे रोग भोवतालच्या वर्तनाचा अभ्यास करते.

व्हाइट केविन -An Introduction to the Health and illnesses (2002)

पिटर कोनरेड- Sociology of Health and illnesses : critical perspective (2008) इ. नी आरोग्याचे समाजशास्त्र हि संकल्पना उपयोगात आणली.

UN (संयुक्त राष्ट्रे) यांनी तसेच WHO यांनी आरोग्याचे समाजशास्त्र sociology of Health हि संकल्पना वापरण्यास सुरवात केली.

३) आरोग्याचे समाजशास्त्र हे  विविध ज्ञान शाखेशी (नैसर्गिक आणि मानवी) सह संबंध/इतर शास्त्रावर अवलंबून आहे.

आरोग्याच्या  समाजशास्त्राचा संबंध हा सामाजिक शास्त्रा प्रमाणेच नैसर्गिक शास्त्राशी सुद्धा येतो. बऱ्याच वेळा हे शास्त्र नैसर्गिक शास्त्रातील विकासाशी  आरोग्याचे समाजशास्त्रा तील विकासावर परिणाम होतो. जसे कि शरीरशास्त्र तील विकास हा भौतिक शास्त्र, संगणकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र इ. अवलंबून आहे; तर शरीरशास्त्र हे संपूर्ण आरोग्यावर परिणाम करते . 

४) आरोग्याचे समाजशास्त्र हे मुख्यतः रुग्णाच्या वर्तनाचे शास्त्र आहे.

समाजशास्त्रा मध्ये ‘सामाजिक वर्तना’ चा अभ्यास होतो. त्याच प्रमाणे आरोग्याचे समाजशास्त्र हे रुग्णाच्या वर्तनाचा अभ्यास करते.  रुग्णाचे वर्तन हे इतर घटकांना ही प्रभावित करीत असते त्या अर्थाने आरोग्याचे समाजशास्त्र हे मुख्यतः रुग्णाच्या वर्तनाचे शास्त्र आहे.

५) आरोग्याचे समाजशास्त्र हे  उपयोजीतशास्त्र आहे.

कोणत्याही विज्ञानाचे दोन मुख्य प्रकार पडतात, एक म्हणजे सैद्धांतिकशास्त्र तर दुसरे म्हणजे उपयोजीतशास्त्र होय. सैद्धांतिकशास्त्र हे ज्ञाना साठी ज्ञान मांडते तर उपयोजीतशास्त्र हे प्रत्यक्ष जीवनात उपयोगा साठी मांडत असते. म्हणजेच आरोग्याचे समाजशास्त्र हे मानवी जीवनात प्रत्यक्ष उपयोगी पडते.

६) आरोग्याचे समाजशास्त्र हे आधुनिक शास्त्र आहे.

काही शास्त्र हे प्राचीन, मध्ययुगीन तर काही शास्त्रे हे आधुनिक काळातील आहेत. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रोबर्ट स्टारस यांनी १९५७ मध्ये औषधाचे समाजशास्त्र हि संकल्पना उपयोगात आणली; तर पिटर कोनरेड- Sociology of Health and illnesses : critical perspective (2008) इ. नी आरोग्याचे समाजशास्त्र हि संकल्पना उपयोगात आणली.UN (संयुक्त राष्ट्रे) यांनी तसेच WHO यांनी आरोग्याचे समाजशास्त्र sociology of Health हि संकल्पना वापरण्यास सुरवात केली.

७) आरोग्याचे समाजशास्त्र हे समाजशास्त्राची ज्ञान शाखा असले तरी संकल्पना-शिद्धात च्या पातळीवर ते स्वतंत्र आहे.

कोणतेही शास्त्र हे त्यांच्या संकल्पना व सिद्धांत किती विकसित आहेत यावर अवलबून त्यावर शास्त्राचा विकास अवलबून असतो. आरोग्याचे समाजशास्त्र हे आधुनिक असूनही त्याच्या  संकल्पना-शिद्धात च्या  ते स्वतंत्र आहेत जसे कि रुग्नाची भूमिका, दवाखाना व्यवस्था इ. संकल्पना 

 

आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय  : (Subject Matter  of Sociology of Health)

1.   आरोग्याची संकल्पना:

हर्मन बिग्ज यांनी सार्वजनिक आरोग्य हि संकल्पना दंडनीय आहे अशी भूमिका घेतल्या नंतर सामुदायिक आरोग्य हि संकल्पना १९११  नंतर उपयोगात आली.

2.   आजारपणाचा अभ्यास:-

आरोग्यात बिघाड होण्याची स्थिती म्हणजे “आनारोग्य” होय.आजारी व्यक्तीला विशिष्ट वर्तन करावे लागते ते त्याचे कर्तव्य मानले जाते त्यासच टेलकॉट पार्सन यांनी “आजऱ्याची भूमिका” अशी संकल्पना वापरली आहे.  

3.   आरोग्याचे विविध पैलू घटकांचा अभ्यास: -

आरोग्य ही बाब फक्त शाररीक असत नाही तर ती WHO ने म्हटल्या प्रमाणे, मानसिक आणि सामाजिक ही असते. शरीर आणि मन या व्यक्तिगत बाबी असल्या तरी, सामाजिक घटकावर त्या अधिक अवलंबून आहेत. आजारी पडण्या साठी शरीर व्यक्ती श्रीमंत आहे कि गरीब हे महत्त्वाचे नसले तरी उपचार मात्र श्रीमंत आणि गरिबीवर अवलंबून असतात. या घटकांचा अभ्यास आरोग्याच्या समाज शास्त्रात होतो.  

4.आरोग्यावर प्रभाव टाकणारे विविध घटकांचा अभ्यास:-

मानवी आरोग्य कोणत्याही एका घटकावर अवलंबून नसते किंवा एका घटकाचा प्रभाव पूर्णांशाने नसतो; तर त्या साठी अनेक घटक महत्वाचे ठरतात. सर्व साधारणपणे असे म्हटले जाते कि, आहार, विहार आणि उपचार योग्य असतील तर आरोग्य हि चांगले राहते. या बाबीचा अभ्यास आरोग्याचे समाज शास्त्र करते.

 5.दवाखाना व्यवस्था व आरोग्याची काळजी घेणार्‍या व्यवस्था(यंत्रणा):- 

फ्रोंज बुआस यांच्या नुसार – अनेक रोग समाजच निर्माण करत असतो व त्यावर त्याच्या कडेच मार्ग हि असतो…औषधोपचार हि सामाजिक घटना मानून अभ्यास केला पाहिजे.

6.   आरोग्य सेवा सुविधा:

आरोग्याच्या सुविधा त्या समाज जीवनात किती आणि कश्या उपलब्ध आहेत यावर त्या समाजचे किंवा तेथील व्यक्तीचे आरोग्य अवलंबून असते. त्या सेवा कोणास मिळत आहेत आणि कोणास मिळत नाहीत त्याची कारणमीमांसा आणि उपाययोजना चा अभ्यास आरोग्याचे समाज शास्त्र करते.

7.   आरोग्याचे धोरण व नियोजन:

कोणत्याही राष्ट्राचे आरोग्य धोरण त्या राष्ट्रातील जनतेचे आरोग्य ठरवीत असते. विशेषतः लोकशाही राष्ट्रात आरोग्य हि बाब देशाची जबाबदारी मानली जाते. संयुक्त राष्ट्रे, WHO इ. संघटना आरोग्य विषयक धोरण बनविण्यासाठी प्रभावित करीत असतात. इ. अभ्यास आरोग्याचे समाजशास्त्रा मध्ये होतो.

 

8.   आरोग्य प्रशासन:

आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्याविषयी च्या घटकांचे, सेवा-सुविधांचे इ. चे प्रशासन  कसे काम करते हे महत्त्वाचे ठरते. आरोग्य विषयक जे विविध घटक आहेत त्या मधील समन्वय करण्यासाठी प्रशासन महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्व घटकांचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करणे गरजेचा आहे.

9.   आरोग्य संवर्धन:

आरोग्य संवर्धन करण्यासाठी अनेक उपचार पद्धती आहेत. जसे कि, आर्युवेदिक, होमिओपॅथी, आलोपॅथी, इ.  या सर्व पद्धती स्वतंत्रपणे कार्ये करीत असतात. या सर्व पद्धतीचे मुळे कसा आरोग्यावर परिणाम होतो या चा अभ्यास करणे आवश्यक आहे.

10.   आरोग्य शिक्षण:

      आरोग्य संवर्धन करण्यासाठी अनेक उपचार पद्धती आहेत. जसे कि, आर्युवेदिक, होमिओपॅथी, आलोपॅथी, इ. चे वैद्यकीय शिक्षण दिले जाते. या सर्व शिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय आहेत. त्यांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असतो. वेगवेगळ्या रोगा साठी या उपचार पद्धती महत्त्वाच्या आहेत.

11.आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना:

आरोग्य क्षेत्रात विविध शासकीय व अशासकीय संघटना [NGO] कार्यरत आहेत.  या विविध संघटनांची भूमिका व्यक्तिगत व सामाजिक दृष्टीने अतिशय महत्वाची ठरते. या मधील कोणत्या संस्था संघटना किती ठरतात हे अभ्यासणे गरजेचे आहे. जसे कि बाबा आमटे यांचे कुष्टरोगी साठी योगदान मोलाचे ठरते; तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम खेड्यातील आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

12.आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरणारे विविध रोग व आजार:

      आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरणारे विविध रोग व आजार कारणीभूत ठरतात. रोग हि दीर्घकालीन बाब असून आजार हा अल्पकालीन आहे. ऱ्हदरोग, मधुमेह, कर्करोग  इ. हे दीर्घकालीन असून संसर्ग मुळे येणारी ताप, सर्दी इ. अल्पकालीन ठरतात. काही संसर्गजन्य रोग हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असतात. जसे कि कोव्हीड- १९ इ.

13.आजार व रोग बरे करण्यासाठी केले जाणारे औषधोपचार: इ. चा अभ्यास आरोग्याच्या समाजशास्त्र मध्ये केला जातो.

14.औषधोपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स व त्यांचे इतर साहाय्यक व कर्मचारी यांच्या भूमिका:- . चा अभ्यास आरोग्याच्या समाजशास्त्र मध्ये केला जातो.

 

.दवाखाना व्यवस्था किंवा संघटनेतील व्यक्तींचे (उदा. रोगीरोग्यांचे नातेवाईकडॉक्टर्सनर्सेसऔषध विक्रेतेवैद्यकीयसामाजिक कार्याकर्ता इ.) परस्परांशी होणारे वर्तन व त्यांच्यातील परस्परसंबंध : . चा अभ्यास आरोग्याच्या समाजशास्त्र मध्ये केला जातो.

 

 थोडक्यातआरोग्याशी निगडीत असलेल्या सर्व बाबींचा वा घटकांचा अभ्यास हे शास्त्र करते. त्यामुळे त्याचा अभ्यास विषय अत्यंत व्यापक आहे

 

आरोग्याच्या समाजशास्त्राचे महत्व :

आरोग्याचे समाजशास्त्र हि ज्ञानशाखा हि समाजशास्त्राची ज्ञान शाखा असली तरी तिचे स्वतः चे वेगळे महत्व आहे. आरोग्य हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्या अर्थाने आरोग्याचे समाजशास्त्र हे आरोग्याच्या वर्तना संबधीचे विज्ञान आहे. म्हणूनच त्याची सर्व मानवी समुदायाला गरज आहे. आरोग्याचे समाजशास्त्र हे सार्वत्रिक दृष्ट्‍या महत्त्वाचे आहे त्या मधील काही बाबीचा आढावा पुढील प्रमाणे :

१)     सैद्धांतिक महत्व : आरोग्याचे समाजशास्त्र हे सामाजशास्त्राच्या मुलभूत सिद्धांतावर आधारित आहे. हे खरे असले तरी आरोग्याचे समाजशास्त्राचे  सैद्धांतिक योगदान हे महत्त्वाचे आहे.

I)नव्या संकल्पनाची निर्मिती जुन्या संकल्पनांची पुनर्रचना व कालबाह्यता ठरविणे- व  नव्या सिद्धांताची निर्मिती जुन्या सिद्धांताची पुनर्रचना व कालबाह्यता ठरविणे: आरोग्याचे समाजशास्त्र हे आरोग्य आणि त्या भोवतालचे वर्तन या विषयी च्या अनेक नव्या संकल्पनाची निर्मिती करते त्या शिवाय काही संकल्पना कालबाह्य हि ठरवते त्या च प्रमाणे आवश्यकता असेल तर त्याची पुनर्रचना करते. जसे कि सरोगेट मदर हि संकल्पना आरोग्य शास्त्राची असली तरी तिची स्वीकृती आरोग्याचे समाजशास्त्र करते. दवाखाना व्यवस्थेत  दवाखाना ही कंपनी म्हणून स्वीकृती करण्यात आली जी प्रामुख्याने  सेवा म्हणून स्वीकारण्यात आली होती. या अर्थाने सिद्धांताची पुनर्रचना करण्यात येते.

III) ज्ञान-विज्ञान निर्मिती – पुनर्रचना

ज्ञान निर्मिती हे विज्ञानाचे महत्त्वपूर्ण कार्ये आहे. नैसर्गिक किंवा सामाजिक जीवनात जर नवे तथ्य आढळत असतील तर पूर्वीच्या सिद्धांता बरोबरच ज्ञान रचनेत बदल होतो. त्याची पुनर्रचना केली जाते. जसे कि मोबाईल, संगणक यांच्या मुळे होणारे रोग हि बाब नव्या ज्ञान निर्मितीच्या कक्षेत येते.

२)व्यावहारिक महत्व

I)आरोग्य विषयक समस्यांचे निर्मुलन:

आरोग्याचे समाजशास्त्र हे आरोग्याच्या समस्ये मुळे जे समाजजीवनावर प्रभाव पडतो, व्यक्ती, कुटुंब आणि समाज या तिन्ही स्तरावर  सामाजिक स्थित्यंतरे येतात त्याचे निर्मूलन करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून समस्या निर्मुलनाचे मार्ग दिले जातात.

II)आरोग्य धोरणाची आखणी आणि अमलबजावणी:

शासकीय स्तरावर विशेषतः लोकशाही प्रक्रियेत आरोग्य ही जबाबदारी शासनाची असते; त्यामुळे त्या विषयी धोरणांनाची निर्मिती करणे व त्याच्या अमलबजावणी विषयक सूचना करणे हे महत्त्वपूर्ण कार्ये आरोग्याचे समाजशास्त्र करते. जसे कि भारतात महिला, बालक, वृद्ध, संसर्गजन्य रोग इ. विषयक धोरणे आहेत.

III) सामाजिक संशोधक -सामाजिक कार्यकर्ते – संस्था यांना उपयुक्त:

अनेक सेवाभावी संस्था व सामाजिक कार्येकर्ते  या आरोग्यास अनुसरून काम करीत असतात मार्गदर्शन करण्याचे काम हे आरोग्याचे समाजशास्त्र करते. सामाजिक संशोधक आपल्या संशोधन विषयाची निवड करणे, त्या मधील तथ्य शोधणे, मागील काळातील माहिती पाहणे इ. पातळीवर आरोग्याचे समाजशास्त्र काम करते.

IV) शासन -प्रशासन -समाज यांना उपयुक्त:

आरोग्याचे समाजशास्त्र हे जीवनाचे मुलभूत अंग असलेल्या आरोग्या च्या भोवती निर्माण झालेल्या घटनांनाचा अभ्यास करीत असल्याने शासन, प्रशासन आणि समाज जीवनातील प्रबोधन या पातळीवर आरोग्याचे समाजशास्त्र मूलभूत रित्या काम करते.

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...