खत हा शब्द, fertilis असा लॅटिन या भाषेतून तयार झालेला आहे.
व्याख्या - वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक
असणारी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणारे
मिश्रण
म्हणजे खत होय . संदर्भ- https://www.wikipedia.org
वनस्पतींना आवश्यक असणारी
अन्नद्रव्ये
अ) मुख्य अन्न्द्रव्ये (अधिक
प्रमाणात लागणारी) कर्ब, प्राणवायू आणि हायड्रोजन ही हवा आणि पाण्यातून मिळतात व नत्र, स्फुरद आणि पालाश ही जमिनीतून मिळतात.
ब) दुय्यम अन्नद्रव्ये (मध्यम
प्रमाणात लागणारी) चुना, मॅग्नेशियम आणि गंधक जमिनीतून मिळतात.
क) सूक्ष्म
अन्न्द्रव्ये (कमी प्रमाणात लागणारी) जस्त, लोह, मँगनीज, तांबे, मॉलीब्डेनेम, बोरॉन, क्लोरीन आणि सोडीयम जमिनीतून मिळतात.
खतांचे प्रकार : (अ) सेंद्रिय खते व (ब) रासायनिक खते
अ)
सेंद्रिय खते :
वनस्पती, प्राणी आणि
जीवजंतू यांच्या अवशेषापासून मिळणाऱ्या खतास सेंद्रिय खत असते म्हणतात. या
खतांमध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण रासायनिक खतापेक्षा कमी असते, म्हणून यांची मात्रा फारच अधिक वापरावी लागते. ही खते
पिकांना सावकाश लागू पडतात आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनुकूल परिणाम होऊन
जमिनीचा पोत सुधारतो तसेच जलधारणा शक्ती वाढते. त्याचप्रमाणे जमिनीच्या जैविक
गुणधर्मात सुधारणा होते.
सेंद्रीय खतांचे प्रकार :
१) भरखते : शेणखत, कंपोस्ट, लेंडीखत
२) जोरखते : सर्व प्रकारच्या
पेंडी, मासळी खत, शिंग आणि खुरांचे खत इत्यादी.
हिरवळीची खते : यात मुख्यत: झाडांचा पाला, फांद्या आणि वनस्पतीचे अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात.
बोरु, धैंचा, उडीद, मूग, चवळी, गवार इत्यादी द्विदल पिके शेतात वाढवून फुलोऱ्याच्या
वेळी नांगरुन जमिनीत गाडली जातात. याशिवाय गिरीपुष्प, सुबाभूळ इत्यादीच्या कोवळ्या फांद्या, पाने जमिनीत गाडून कुजविली जातात. करंज, गाजर फुली सारख्या या हिरवळीच्या खतामुळे जमिनीस
सेंद्रीय पदार्थ पुरविले जातात. जमिनीची जलधारणाशक्ती वाढते. शिवाय पीकपोषक
अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
गिरीपुष्प – उत्तम हिरवळीचे खत : गिरीपुष्प हे हिरवळीच्या खताचे अतिशय उपयुक्त पिक
असून या पिकाची लागवड शेतीच्या बांधावर कलमाद्वारे करावी, किंवा बिया टाकून करावी. गिरीपुष्पाच्या कोवळ्या
फांद्या व पाला पावसाळ्यामध्येय शेतात टाकल्यास कुजून त्यापासून मुख्यत: नत्र व
सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो. गिरीपुष्पातून मिळणाऱ्या मुख्य अन्नद्रव्याचे
प्रमाण खालीलप्रमाणे आहे.
नत्र (N) ०.६ ते ०.७%, स्फुरद (P२O५) ०.१ ते ०.२%, पालाश (K२O) ०.५ ते ०.६%
तक्ता क्र. १ : निरनिराळ्या
सेंद्रिय खतातील (साधारणपणे) अन्नद्रव्याचे प्रमाण
|
अ.क्र. |
सेंद्रिय खताचे नांव |
नत्र % |
स्फुरद % |
पालाश % |
|
१. |
शेणखत |
०.८४ |
०.६१ |
१.५६ |
|
२. |
लेंडीखत |
०.५ |
०.५–०.८ |
१.०० |
|
३. |
कोंबडीचे खत |
०.५ |
२.५ |
१.०० |
|
४. |
डुकराचे खत |
०.५५ |
०.५० |
०.४० |
|
५. |
कंपोस्ट खत (सर्वसाधारण) |
|||
|
ग्रामीण |
०.४-०.८ |
०.३–०.६ |
०.७–१.०० |
|
|
शहरी |
१.२-२.० |
१.०० |
१.०० |
|
|
६. |
गांडूळ खत |
०.५-१.०६ |
०.३-२.३० |
०.१५–०.५० |
|
७. |
पेंडी खत, भुईमुगाची पेंड |
७.१६ |
१.२२ |
०.९४ |
|
८. |
करडईची पेंड |
५.०१ |
१.६३ |
०.६३ |
|
९. |
एरंडीची पेंड |
४.५५ |
१.७२ |
०.७० |
|
१०. |
सरकीची पेंड (प्रक्रिया केलेली) |
७.०० |
३.०० |
२.०० |
|
११. |
करंज पेंड |
४.०० |
१.०० |
१.०० |
|
१२. |
निम पेंड |
५.०० |
१.०० |
१.५० |
|
१३. |
मोहाची पेंड |
२.५० |
०.८० |
१.८० |
|
१४. |
रक्तांचे खत |
११-२४ |
०.८६ |
०.५४ |
|
१५. |
मासळीचे खत |
५.१५ (४ ते १०) |
५.२० (३ ते ४) |
१.६३ -- |
|
१६. |
हाडाचे खत |
३.८८ |
२१.५६ |
-- |
|
१७. |
ॲनिमल मील |
८.५० |
७.८० |
-- |
|
१८. |
खुराचे व शिंगाचे खत |
१०-१५ |
१–० |
-- |
|
१९. |
उसाची मळी |
०.२५ |
०.४–०.५ |
-- |
|
२०. |
हिरवळीची खते (सरासरी) |
०.५-०.७ |
०.१–०.२ |
०.८–१०.६ |
कंपोस्ट खते व ते तयार
करण्याच्या विविध पध्दती
विविध प्रकारच्या
सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट खताला अनन्यसाधारण असे स्थान आहे. कारण कंपोस्ट खत
म्हणजे जिवाणूंच्या साह्याने शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या टाकाऊ स्वरुपाचा काडीकचरा, पानगळ, जनावरांची उष्टावळ व मलमूत्र यापासून कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय.
वनस्पतीजन्य व
प्राणिजन्य स्वरुपाच्या टाकाऊ पदार्थापासून निर्माण केलेले कंपोस्ट खत जमिनीची
सुपिकता व उत्पादनक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचे साधन आहे. अशा
प्रकारे सेंद्रिय खते वापरले असता त्यातील अन्नद्रव्ये पिकांना सतत व हळुवारपणे
उपलब्ध होतातच पण त्याशिवाय जमिनीत ह्युमस सारख्या प्रभावी घटकांचे प्रमाण वाढून
त्यातून वनस्पतीच्या वाढीस उपयुक्त अशी इतर अन्नद्रव्ये निर्माण होण्यास मदत होते.
जमिनीचा पोत सुधारुन जलधारणा शक्तीत वाढ, हवा व पाणी यांचे योग्य संतुलन, तापमानाचे नियमन इत्यादी बाबींमुळे जमिनीच्या कायिक, रासायनिक व जैविक गुणधर्मावर अनुकुल परिणाम होऊन तिची
एकंदर दुरगामी उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.
कंपोस्ट खताची निर्मिती : कंपोस्ट खत तयार करण्याच्या विविध पद्धती प्रचलित
असून त्यात तौलनिकदृष्ट्या अनेक गुणदोष अंतर्भूत आहेत.
(१) इंदौर पद्धत किंवा ढीग पध्दत
: यामध्ये शेतीतील
काडीकचरा, मलमुत्र, इतर सेंद्रिय पदार्थ एकत्र करुन एक आड एक थरात पसरुन
साधारणत: सहा फूट रुंद आणि सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून
जमिनीवर ५ ते ६ फुट उंचीपर्यंत रचला जातो. अधूनमधून पाणी शिंपडून ओलावा टिकविला
जातो. एक महिन्याच्या अंतराने मजुराच्या उपलब्धतेनुसार ढीग तीन ते चार वेळा वरखाली करुन कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात.
कुजण्याची क्रिया उघड्यावर ऑक्सीजनयुक्त वातावरणात होत असल्याने लवकर होते परंतु
यामध्ये ओलावा लवकर उडून जातो व काही प्रमाणात अन्नद्रव्ये वायु रुपात वाया जातात.
ढिगावर प्लास्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्यास मदत होते. तसेच
अन्नद्रव्याचा ऱ्हास पण थांबवता येतो. अशा प्रकारे तयार केलेल्या कंपोस्ट खतामध्ये
सुमारे ०.८ ते १.५ टक्के नत्र, ०.५ ते १.० टक्के स्फुरद, ०.८ ते १.८ टक्के पालाश आणि इतर दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध असतात.
(२) बंगलोर पद्धत किंवा खड्डा पध्दत : यामध्ये ६ फुट रुंद, ३ फुट खोल व सोयीनुसार लांबी असलेला खड्डा तयार केला
जातो. खड्डयाचा तळ व बाजू चांगल्याप्रकारे ठोकून घेतल्या जातात. त्यानंतर प्रथम ६
इंच जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून ओला केला
जातो. अशा क्रमाने खड्डा पूर्ण भरुन जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फुट उंचीपर्यंत
भरुन माती व शेणकाल्याचे मिश्रण करुन लिंपून घेतला जातो. खड्डयात ओलावा
टिकविण्यासाठी अधूनमधून पाणी शिंपडले जाते.
कुजण्याची क्रिया
सुरुवातीस ऑक्सिजनयुक्त वातावरणात व नंतर ऑक्सिजन विरहित वातावरणात होत असल्याने
कुजण्याचा वेग मंदावतो त्यामुळे खत तयार होण्यास लागणारा कालावधी वाढतो, अर्थात ढीग पद्धतीच्या तुलनेत अन्नद्रव्याचे वाया
जाण्याचे प्रमाण कमी असते.
कुजण्याचा वेग
चांगला राखण्यासाठी व कंपोस्ट खताची गुणवत्ता वाढविण्यासाठी खालील बाबी महत्वाच्या
आहेत.
१. सेंद्रिय
पदार्थामधील दगड, विटांचे तुकडे, कचरा, खिळे, प्लॅस्टिकचे तुकडे इत्यादी पदार्थ वेचून बाजूला
टाकावे.
२. सेंद्रिय
पदार्थांचे शक्यतो लहान लहान तुकडे (१५ ते २० सें.मी.) करुन थर द्यावा, त्यावर शेणकाल्याचे मिश्रण टाकावे.
३. शेणखतामध्ये
प्रति टन उपल्बध सेंद्रिय पदार्थास अर्धा किलो या प्रमाणात कंपोस्ट तयार करणारे
जिवाणू खत मिसळावे.
४. जनावरांचे
मूत्र किंवा अर्धा किलो युरिया किंवा अमोनियम सल्फेट व दोन किलो सुपर फॉस्फेट
पाण्यात एकजीव मिश्रण करुन प्रत्येक थरात शिंपडावे.
५. या बरोबर जुने
कुजलेले शेणखत चांगले वाळवून थरात विरजन म्हणून टाकल्यास कंपोस्ट खत कुजण्यास मदत
होते.
६. खड्डयात सतत
ओलावा राहील याची दक्षता घ्यावी.
७. अशाप्रकारे
खड्डा भरुन खड्डयातील थर एक महिन्याच्या अंतराने शक्य असल्यास खालीवर करुन एकत्रित
केल्यास ४ ते ५ महिन्यात उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार होते.
(३) नॅडेप पध्दत : या पध्दतीत जमिनीवर पक्क्या विटांच्या साह्याने १०
फुट लांब, ६ फुट रुंद व ३
फुट उंच अशा आकाराच्या टाकीचे बांधकाम केले जाते. विटाच्या दोन थरानंतर तिसऱ्या
थरात खिडक्या सोडल्या जातात. नंतर या टाक्यामध्ये सुमारे दीड टन काडीकचरा, १०० कि.ग्रँ. शेण व दीड टन चांगली चाळलेली जमिनीच्या
वरच्या थरातील जिवाणुयुक्त माती भरली जाते.
कंपोस्टची टाकी भरतानां प्रथम टाक्याचा तळ चांगला
ठोकून शेणाचा सडा टाकून घ्यावा व त्यानंतर ६ इंच जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय
पदार्थाचा थर द्यावा व त्यावर सुमारे १०० लिटर पाण्यात ४ ते ५ किलो ग्रॅम शेण
मिसळून शिंपडले जाते.
यानंतर साधारणत:
अर्धा इंच जाडीचा चाळलेला मातीचा थर देऊन परत पाणी शिंपडून ओला केला जातो.
याचप्रमाणे पूर्ण टाकी भरली जाते व अधूनमधून पाणी टाकून टाकीत योग्य तो ओलावा (५०
ते ६० टक्के) राखला जातो.
अशाप्रकारे
टाकीमध्ये कुजण्याची प्रक्रिया सर्वच थरात ऑक्सिजनयुक्त वातावरणात जलद व सारख्याच
प्रमाणात होते. त्याशिवाय कंपोस्ट तयार होत असतांना ओलावा तितक्या प्रमाणात उडत
नाही आणि अन्नद्रव्याचा ऱ्हास पण होत नाही व ३ ते ४ महिन्यात उत्कृष्ट कुजलेले
चांगले कंपोस्ट तयार होते.
कंपोस्ट खत तयार करतानां
घ्यावयाची काळजी
1. तयार केलेले कंपोस्ट खत चांगल्या प्रतीचे होण्यासाठी वापरण्यात येणारा
काडीकचरा जनावरांच्या गोठ्यात ठेवला तर त्यात शेण व मूत्र मिसळले जावून खताची प्रत
चांगली होते पण त्याशिवाय ते जलद कुजण्यास मदत होते.
2. तूर, तीळ, कापसाच्या पराट्या, ज्वारीची धसकटे खड्डयात भरायची असतील तर ते
भरण्यापूर्वी शक्य तितके लहान लहान तुकडे केले तर लवकर कुजतात.
3. कार्बन व नत्राचे प्रमाण अधिक असणारे सेंद्रिय पदार्थ (लवकर कुजणारे ) उदा.
गव्हाचे काड, भाताचे तणीस, भुईमुगाची टरपले इत्यादी पासून जर कंपोस्ट तयार
करावयाचे असेल तर प्रत्येक थरात जनावरांच्या गोठ्यातील साठलेला मुत्राचा हलका
शिडकावा करावा किंवा हे शक्य नसेल तर युरिया किंवा अमोनिया सल्फेटचे १.५ ते २.५
टक्के तीव्रतेचे द्रावण शिंपडावे जेणेकरुन त्यातील नत्राचे प्रमाण वाढून खत लवकर
तयार होईल.
4. कंपोस्ट लवकर कुजण्या करिता त्यात सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी.
(४) सुपर कंपोस्ट खत : रासायनिक खताच्या तुलनेत कंपोस्ट खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे
ती वापरण्यास शेतकरी सहसा धजत नाहीत म्हणून त्यातील अन्नद्रव्यांचे प्रमाण
वाढविण्याचे दृष्टिकोनातून विशेषत: स्फुरदाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रत्येक थरात
१० ते १५ किलो सुपरफॉस्फेटचा थर देणे फायदेशीर आहे. यापासून तयार झालेल्या कंपोस्ट
खतालाच सुपर कंपोस्ट खत असे म्हणतात. यामुळे कुजण्याची क्रिया तर लवकर होतेच पण
त्याचबरोबर स्फुरद तसेच नत्राचे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. कंपोस्ट खताचा
दर्जा सुधारतो.
(५) ऊसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्रज्ञान : मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणावर आहे.
ऊस नेल्यानंतर शेतात भरपूर पाचट उपलब्ध होते आणि शेतकरी ते पाचट जाळून टाकतात. पाचट जाळल्यामुळे
जमिनीच्या वरच्या थरातील उपयुक्त जिवाणूचा नाश होतो. तसेच पाचटामधील अन्नद्रव्यांचा देखील नाश होतो व
ऊसाच्या मुळाला उष्णतेची झळ बसल्यामुळे त्याच्या फुटव्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे पाचट
कुजून सेंद्रिय खत तयार करण्याचे तंत्र विद्यापीठाने विकसित केले आहे.
खोडवा ऊसामध्ये
शेतातील पाचट खोडव्यातील सरीमध्ये समप्रमाणात पसरावे व त्यानंतर एकरी एक बॅग
युरिया, एक बॅग सुपर फॉस्फेट, १० टन ऊसाची मळी व शेवटी चार किलो पाचट कुजविणारे जिवाणू पसरावे. त्यानंतर
खोडव्याच्या बगला फोडून माती पाचटावर पसरावी. काही पाचटे उघडी राहिल्यास पाणी देतांना उघडे पडलेले
पाचट दाबून टाकावे. त्यानंतर पिकास नेहमीच्या पद्धतीने पाणी व खते द्यावी. ३-४ महिन्यात
संपूर्ण पाचट कुजून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत मिळते.
|
|||
|
|||
(ब) : रासायनिक खते :
यामध्ये
अन्नद्रव्याचे प्रमाण अधिक असून ते पिकांना लवकर उपलब्ध होते. ज्या रासायनिक
खतामध्ये ठराविक प्रमाणात एकापेक्षा अधिक अन्नद्रव्ये संयुक्त अवस्थेत आणली जातात त्यांना
संयुक्त खते म्हणतात. रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमाचा वापर न करता एक वा अधिक
अन्न्द्रव्ये मिसळून तयार केलेल्या खतांना मिश्रखते म्हणतात.
रासायनिक खताचे प्रकार :
१. नत्रयुक्त खते : युरिया, अमोनियम सल्फेट
२. स्फुरदयुक्त खते : सुपर फॉस्फेट, डायकॅल्शियम फॉस्फेट
३. पालाशयुक्त खते : म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश
४. दुय्यम खते : चुना, गंधक, मॅग्नेशियम
५. सूक्ष्म अन्नद्रव्ये : जस्त सल्फेट, मोरचूद, हिराकस, मँगनीज सल्फेट,
बोरॅक्स, अमोनियम मॉलिब्डेट
तक्ता क्र. ३ : रासायकनिक
खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण (शेकडा)
|
अ.क्र. |
खताचे नांव |
नत्र |
स्फुरद |
पालाश |
गंधक |
|
अ) |
नत्रयुक्त खते |
||||
|
१. अमोनियम सल्फेट |
२०.६० |
-- |
-- |
२४.०० |
|
|
२. अमोनियम क्लोराईड |
२५.०० |
-- |
-- |
-- |
|
|
३. अमोनियम सल्फेट नाईट्रेट |
२५.०० |
-- |
-- |
-- |
|
|
४. कॅल्शियम अमोनियम नाईट्रेट |
२५.०० |
-- |
-- |
-- |
|
|
५. युरिया |
४६.०० |
-- |
-- |
-- |
|
|
ब) |
स्फुरदयुक्त खते |
||||
|
१. सिंगल सुपर फॉस्फेट |
-- |
१६.०० |
-- |
१२.०० |
|
|
२. ट्रिपल सुपर फॉस्फेट |
-- |
४८.०० |
-- |
१-१.५ |
|
|
क) |
पालाशयुक्त खते |
||||
|
१. म्युरेट ऑफ पोटॅश |
-- |
-- |
६०.०० |
-- |
|
|
२. सल्फेट ऑफ पोटॅश |
-- |
-- |
४८.०० |
-- |
|
|
ड) |
संयुक्त खते |
||||
|
१. डाय अमोनियम फॉस्फेट |
१८ |
४६ |
-- |
-- |
|
|
२. नायट्रो फॉस्फेट (सुफला) |
२० |
२० |
-- |
-- |
|
|
३. नायट्रो फॉस्फेट (उज्वला) |
१५ |
१५ |
१५ |
-- |
उपरोक्त तक्त्यामध्ये दिलेल्या
अन्नांशाच्या प्रमाणाच्या आधारे नत्र, स्फुरद अथवा पालाशयुक्त खताच्या द्यावयाच्या मात्रा काढता येतात (तक्ता क्र.
४).
तक्ता क्र. ४ : खताच्या मात्रा
काढणे
|
अन्नद्रव्यांचे नांव |
हव्या असलेल्या खताद्वारे पुरवठ्याची मात्रा |
गुणकांक |
|
नत्र |
युरिया |
२.१७ |
|
नत्र |
अमोनियम सल्फेट |
५.०० |
|
नत्र |
अमोनियम क्लोराईड |
४.०० |
|
नत्र |
अमोनियम सल्फेट नायट्रेट |
३.८४ |
|
स्फुरद |
सिंगल सुपर फॉस्फेट |
६.२५ |
|
पालाश |
म्युरेट ऑफ पोटॅश |
१.६७ |
उदा. समजा आपणास १०० किलो नत्र
पिकाला द्यावयाचा आहे. युरिया आणि अमोनियम सल्फेटच्या स्वरुपात म्हणजे १०० x २.१७ गुणकांक = २१७ कि.ग्रॅ.
युरिया किंवा १०० x ५ = ५०० कि.ग्रॅ. अमोनियम सल्फेट.
तक्ता क्र. ५ : सूक्ष्म
अन्नद्रव्य पुरविणारी खते आणि त्यांचे प्रमाण
|
खताचे नांव |
अन्न्द्रव्याचे प्रमाण (%) |
इतर अन्न्द्रव्यांचे प्रमाण (%) |
|
जस्त सल्फेट |
२२.५ (जस्त) |
१५ |
|
फेरस सल्फेट |
१९.० (लोह) |
१९ |
|
मँगनीज सल्फेट |
३०.५ (मँगनीज) |
१७ |
|
तांबे सल्फेट |
२४.० (तांबे) |
१३ |
|
अमोनियम मॉलिब्डेट |
५२.० (मोलाब्द) |
-- |
|
बोरॅक्स (सोडियम टेट्राबोरॅट) |
१०.५ (बोरॉन) |
-- |
|
जिप्सम |
-- |
२० |
शिफारशी
1. जमिनीत उपलब्ध जस्त कमी असल्यास १७.७५ कि.ग्रॅ. जस्त सल्फेट प्रति हेक्टरी
ज्वारी – गहू अथवा साळ – हरभरा या पीक चक्रामध्ये जमिनीतून द्यावे.
2. जमिनीत जलद्राव्य बोरॉनचे प्रमाण कमी असल्यास ५ कि.ग्रॅ. प्रति हेक्टर बोरॅक्स
कापसाच्या पिकास जमिनीतून द्यावे.
3. चुनखडीयुक्त जमिनीत मसुरी रॉक फॉस्फेट आणि जीवाणूखत याचा वार साळ, भुईमूग या पीक चक्रामध्ये जमिनीतून करावा.
4. भुईमूग पिकास हेक्टरी ५० किलोग्रॅम स्फुरदाची मात्रा बोरॉनयुक्त सुपर फॉस्फेट
किंवा ५ किलो बोरॅक्स अधिक सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे जमिनीतून दिल्यास उत्पादनात
लक्षणीय वाढ होते.
5. सूर्यफुल या पिकास हेक्टरी ७५ कि.ग्रॅ. स्फुरदाची मात्रा बोरान युक्त सुपर
फॉस्फेट किंवा ७.५ कि.ग्रॅ. बोरॅक्स अधिक ७५ कि.ग्रॅ. स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर
फॉस्फेटद्वारे (उत्पादनात वाढ होण्यासाठी) जमिनीतून द्यावी.
6. सर्वसाधारणपणे द्विदल पिके विशेषत: सोयबीन हे पीक सरी आणि वरंबा पद्धतीने
घेतल्यास आणि स्फुरदाची जास्त मात्रा १२० कि.ग्रॅ. स्फुरद प्रति हेक्टरी तसेच
शिफारशीप्रमाणे नत्राची मात्रा दिल्यास रबी ज्वारीमध्ये नत्र आणि स्फुरदाची
कार्यक्षम वापर होऊन ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि उत्पादनात भरीव वाढ होते.
एकात्मिक पीक पोषण पध्दती
रासायनिक
खताबरोबर सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते आणि सेंद्रिय द्रव्ये यांचा योग्य प्रमाणात पूरक खते म्हणून वापर
करण्याच्या पद्धतीस एकात्मिक पीक पोषण पद्धती असे म्हणतात.
या पद्धतीत रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांचा समतोल साधला जातो. तसेच पिकांच्या फेरपालटीत द्विदल
पिकांचा समावेश करुन जमिनीची सुपिकता टिकविली जाते. या पद्धतीत पिकांच्या भरघोस
उत्पादनाबरोबरच अन्नधान्य आणि जमिनीचा दर्जा सुधारला जातो. महागड्या रासायनिक
खतांची बचत करुन जमिनीची उत्पादकता वर्षानुवर्षे सुधारली जाते. या पद्धतीमध्ये
सर्वसाधारणपणे अन्नद्रव्याच्या एकूण गरजेपैकी अर्धी मात्रा रासायनिक खतामधून दिली
जाते आणि उरलेली अर्धी मात्रा सेंद्रिय खतांमधून भागविली जाते. दर तीन वर्षातून
एकदा हिरवळीच्या खतांची पिके घेऊन जमिनीत गाडण्याची शिफारस केली आहे. पिकांचे सर्व
अवशेष जसे ऊसाचे पाचट, ज्वारीची धसकटे, गहू व साळीचे बुडखे, सुर्यफुलाचे खोड आणि भुसा डाळवर्गीय पिकांचे सर्व अवशेष, इत्यादी जमिनीत गाडून सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण
वाढविले जाते. या बरोबरच जिवाणू खते व गांडूळ खतांचा वापर करणे गरजेचे असते.
रासायनिक खतांची निवड करतांना
खालील बाबींचा आवश्य विचार करावा.
1. दीर्घकालीन पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा (नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५)
(अमोनियम फॉस्फेट २८:२८:०)
2. स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी.
उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट
3. डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट
4. स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू
(पि.एस.बी.) खतांचा वापर करावा.
5. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा वापर करावा.
(निमकोटेड युरिया, सल्फर कोटेड युरिया).
6. हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या
वापराव्यात.
7. साखर कारखान्यातील ऊसाची मळी, जिवाणू खत (बायो अर्थ कंपोस्ट) चा वापर करावा.
रासायनिक खते कशी द्यावीत
1. साधरणत: स्फुरदयुक्त आणि पालाशयुक्त खते एकाच हफ्त्यात पेरणीच्या वेळी आणि
बियाण्यापासून ५ सें.मी. खोल द्यावीत.
2. नत्रयुक्त खताची पूर्ण मात्रा एकाच हफ्त्यात न देता पिकाच अवस्था लक्षात घेऊन
२ अथवा ३ हफ्त्यात द्यावेत.
3. चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर
दिल्यास बराच नत्र उडून जातो. म्हणून ही खते जमिनीत मिसळून द्यावीत.
4. नत्र वाहून जाऊ नये म्हणून पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे. खते शक्यतो
पेरणीच्या वेळी द्यावीत व मातीने झाकावीत.
5. पिकाच्या कालावधीप्रमाणे खताच्या मात्रा विभागून देणे फायदेशीर ठरते. -
संदर्भ
- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी - महाराष्ट्र
===================================================================
कृषी यांत्रिकीकरण म्हणजे काय?
शेती क्षेत्रात पारंपारिक मार्ग बदलून मानव व
प्राणी यांचे
श्रम
कमी
करून यंत्रांचा
वापर करून
केलेली शेती म्हणजे यांत्रिकीकरण शेती . संदर्भ- https://www.wikipedia.org
व्याख्या - शेतीतील कामे वेळेवर, कमी कष्टात व बियाणे, खते, रसायने इ. निविष्ठांचा योग्य व कार्यक्षम वापर करण्याच्या उद्देशाने अवजारे व
यंत्राचा वापर म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण होय. संदर्भ- https://www.wikipedia.org
प्रस्तावना - शेतीच्या विविध कामांचे
यांत्रिकीकरण हा तसा वादाचा मुद्दा राहिलेला आहे. सुरुवातीला यांत्रिकीकरणामुळे
शेतीतील मजुरांची गरज कमी होईल. त्यांच्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढून त्यांचे
विस्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शेती कामातील मजुरांचे कष्ट
वाचण्यासाठीही यांत्रिकीकरण महत्त्वाचे ठरत आहे. भारत पर्यायाने महाराष्ट्रातील
कृषी यांत्रिकीकरणाची वाटचालीमध्ये सुधारित औजारांचा वापर आणि अधिक कृषिशक्तीचा
पुरवठा या दुहेरी नितीवर भर दिला जातो. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ,
पशुबल आणि यांत्रिक शक्ती यांचे व्यावहारिक मिश्रण याला प्राधान्य
दिले जाते. या उलट पाश्चात्त्य देशांमध्ये कृषी यांत्रिकीकरणाचा मूळ हेतू हा
शेतीतून मनुष्यबळ कमी करून औद्योगिक क्षेत्रात गुंतविणे हा होता. योग्य दिशेने
सुरू असलेल्या यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे कृषी उत्पादन वाढीबरोबरच उत्पादन
खर्च कमी करणे, पिकांचे नुकसान कमी होणे या
गोष्टी शक्य झाल्या. तसेच कृषी यांत्रिकीकरणामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता
पंजाब, हरियाना अशा राज्याच्या उदाहरणावरून व्यर्थ ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
उलट यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांची मिळकत आणि ग्रामीण रोजगारात वाढ दिसून आली. शेतीचे
यांत्रिकीकरण हे केवळ ट्रॅक्टरच्या वापराची जोडले जाते. मात्र या संज्ञेची
व्याप्ती त्यापेक्षाही मोठी आहे. शेतीतील विविध कामांच्या उपलब्धतेसाठी मनुष्यचलित,
पशुधनचलित आणि ट्रॅक्टरचलित अवजारांसोबतच स्वयंचलित अशा अनेक श्रेणी
उपलब्ध होत आहेत. कृषी यांत्रिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अशा सर्व यांत्रिकी
साधनांचा विकास, वापर आणि व्यवस्थापन यांचा समावेश होतो. त्यामध्ये वापरकर्त्याच्या
गरजेवर आधारित यंत्राची निर्मितीला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.
यांत्रिकीकरणाचे फायदे
१) कृषी औजारामुळे शेतीतील कामे
वेळेवर व योग्यरीत्या पार पडतात व मनुष्यबळ कमी लागते. परिणामी उत्पादनात १५ ते
४०% एवढी वाढ होऊन खर्चात बचत होते. निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते.
२) यांत्रिकीकरणांमुळे उत्पादन खर्चात ३० ते ४० टक्के बचत होते. तर वेळच्या वेळी कामे झाल्यामुळे
उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते.
३) जमीन, पाणी, बियाणे व खते, रसायने, मनुष्यबळ यांचा
कार्यक्षम वापर होतो. उदा. सुधारित पेरणी यंत्राने पेरणी केल्यास बियाणाचे प्रमाण
योग्य ठेवतानाच दोन रोपांतील अंतर योग्य राहते. त्याचा फायदा वाढीमध्ये होतो.
५) कष्ट कमी होतात. उदा.
ट्रॅक्टरचलित नांगरामुळे नांगरणीतील कष्ट कमी झाले आहेत.. पारंपरिक नांगरणीमध्ये
बैलापाठोपाठ
शेतकऱ्याला एक हेक्टरसाठी ३० सेंमी नांगरामागे ६६ किमी एवढे चालावे लागते.
६) प्रत्यक्ष शेती व कष्टाच्या
कामातून सवलत मिळत असल्यामुळे चालक, कृषी औजारांची दुरुस्ती व चालवणे यात कुशल कामगारांना रोजगाराची उपलब्धता
वाढते.
इतके
फायदे असतानाही भारतीय शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे प्रमाण कमी असण्याची काही कारणे
१)
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अधिक प्रमाण. योग्य आकाराच्या यंत्राचा अभाव.
२)
शेतकऱ्याची कमी क्रयशक्ती.
३)
तांत्रिक माहितीचा अभाव.
४) निगा व
दुरुस्तीच्या सोयीचा अभाव.
गेल्या
काही पंचवार्षिक योजनांपासून शासकीय स्तर, कृषी
विभाग, कृषी विद्यापीठ, स्वयंसेवी
संस्था यांच्या प्रयत्नांमुळे आजमितीस मशागतीमध्ये ४५%, पेरणीमध्ये
३५%, मळणी ५५% तर पीक संरक्षणात ३५% इतके यांत्रिकीकरण झाले आहे.
शेतीतील
विविध कामासाठी सुधारित कृषी यंत्रे व औजारे उपलब्ध आहेत
१)
मशागतीसाठी औजारे - ट्रॅक्टर चलित नांगर, कल्टिव्हेटर,
पलटी नांगर, तव्याचा
नांगर, सब सॉयलर, रिजर,
पॉवर हॅरो, डिस्क हॅरो
, रोटाव्हेटर, पोस्ट होल
डिगर इ
२)
पेरणीसाठी व लागवडीसाठी - बी व खत पेरणीयंत्र, टोकण
यंत्र, बी बी एफ यंत्र,न्युमॅटिक
पेरणी यंत्र, रोपे पुनर्लागवड यंत्र इ.
३)
आंतरमशागतीसाठी औजारे- खुरपी, चाकाचे
कोळपे, खत कोळपे, खत पसरणी
यंत्र, पॉवर विडर इ.
४) कापणी व
मळणीसाठी औजारे - विळे, रिपर,
मळणी यंत्र, कम्बाईन
हार्वेस्टर, मिनी हार्वेस्टर इ.
५) पीक
संरक्षणासाठी औजारे - फवारणी यंत्रे, धुरळणी
यंत्र, ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्रे, हाय
ग्राउंड क्लिअरन्स फवारणी यंत्रे इ.
६) पीक
अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी औजारे -मल्चर, श्रेडर,
हे रेक, बेलर इ.
भारतात
कृषी यांत्रिकीकरणाचा स्तर वाढविण्याचा असेल तर सुधारित कृषी औजारे व यंत्रे
यांच्या वापराशिवाय पर्याय नाही
तक्ता १ महाराष्ट्रातील
शेतकरी प्रकार - जमीन धारणा - टक्केवारी

शेती काम निहाय यांत्रिकीकरण
टक्केवारी
|
मशागत - ६८% |
पेरणी -२६% |
मळणी - ९०% |
|
काढणी - १५ २०% |
फवारणी - ९२% |
इतर कामे -३०% |
कृषी यांत्रिकीकरण
व रोजगार
रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध
होण्याची शक्यता -भारतामध्ये प्रतिवर्षी शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये वृद्धी होत
असून त्यामुळे लोकांना अतिरिक्त रोजगार उपलब्ध होत आहे.
१)
भाडेपट्टीवर औजारे / ट्रॅक्टर देणे.
२ )औजारे बँक स्थापन करणे व चालवणे.
३)
विक्री, देखभाल व दुरुस्ती ट्रॅक्टर पंप/मशिनरी. ४) ट्रॅक्टर/औजारांची निर्मिती.
५) डिझेल पंपसेट. ६) मळणीयंत्र.
संदर्भ
- अखिल
भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प,
डॉ.
अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
यांत्रिकीकरण योजना
(ट्रॅक्टर व इतर औजारे)
कृषी उन्नती योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान 2023-24
योजनेची
माहिती - ही योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
या योजने मध्ये समाविष्ट विविध प्रकारचे औजारे व देय अनुदान. अनुदान -
|
औजारे |
देय अनुदान. |
देय अनुदान. |
|
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा
यांना (50 टक्के) अनुदान |
इतर व मोठे लाभार्थी
यांना 40 टक्के |
|
|
ट्रॅक्टर (08-70 पीटीओ
एचपी) |
125000/- |
100000/- |
|
पॉवर टिलर - 8 बीएच
पी पेक्षा कमी |
65000/ |
50000/- |
|
8 बीएचपी
व त्यापेक्षा जास्त |
85000 |
70000/- |
|
स्वयंचलित अवजारे |
||
|
रिपर कम बाइन्डर (3
व्हील) |
175000/- |
140000/- |
|
रिपर कम बाइन्डर (4
व्हील) |
250000/- |
200000/- |
|
रीपर |
75000/- |
60000/- |
|
पॉवर वीडर (2 बीएचपी
पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड
) |
25000/- |
20000/- |
|
पॉवर वीडर (2 बीएचपी
ते 5 एचपी
इंजीन ऑपरेटेड ) |
35000/- |
30000/- |
|
पॉवर वीडर (5 बीएचपी
पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) |
63000/- |
50000/- |
|
ट्रॅक्टर (३५ बीएच पी पेक्षा जास्त) चलीत
औजारे |
||
|
रोटाव्हेटर 5 फुट |
42000/- |
34000/- |
|
रोटाव्हेटर 6 फुट |
44800/- |
35800/- |
|
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) |
100000/- |
80000/- |
|
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)
|
250000/- |
200000/- |
|
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) |
20000/- |
16000/- |
|
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र) |
35000/- |
30000/- |
|
कल्टीव्हेटर |
50000/- |
40000/- |
|
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम |
70000/- |
56000/- |
|
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम |
89500/- |
71600/- |
|
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम |
40000/- |
32000/- |
|
नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम |
50000/- |
40000/- |
|
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट) |
125000/- |
100000/- |
|
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर |
75000/- |
60000/- |
|
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर |
100000/- |
80000/- |
या योजने मध्ये समाविष्ट इतर प्रकारचे औजारे व देय अनुदान. अनुदान -
|
औजारे |
देय अनुदान. |
देय अनुदान. |
|
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा
यांना (50 टक्के) अनुदान |
इतर व मोठे लाभार्थी
यांना 40 टक्के |
|
|
चाफ
कटर - (operated by engine/electric motor
below 3 hp and power Tiller, and tractor of below 20 hp)- 50 टक्के, |
20000/- |
16000/- |
|
Manually operated
chaff cutter (above 3 feet)- 50 टक्के, |
6300/- |
5000/- |
|
Manually operated
chaff cutter (above 3 feet)- 50 टक्के, |
5000/- |
4000/- |
|
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी
अनुदान |
||
|
मिनी दाल मिल- 60 टक्के, |
150000/- |
125000/- |
|
मिनी राईस मिल- 60 टक्के, |
240000/- |
200000/- |
|
पैकिंग मशीन- 60 टक्के |
300000/- |
240000/- |
|
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर- 60 टक्के, |
60000/- |
50000/- |
|
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक
ग्रेव्हीटी सेपरेटर- 50 टक्के, |
100000/- |
80000/- |
अवजारे बँक साठी अनुदान
आहे का? --- होय.
कृषी अवजारे बँक स्थापन
करण्यासाठी 40 टक्के
कमाल 24 लाख
रु.अनुदान आहे. यामध्ये 10 लाख
पासून 60 लाख पर्यंत
औजारे खरेदी करता येतील. यासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र यांना हे
अनुदान दिले जाते. रु. 25 लाखावरील खरेदीसाठी बँक कर्ज घेणे
बंधनकारक आहे. अनुदान क्रेडिट लिंकड बैक एन्डेड़ स्वरुपात बँकेच्या कर्ज खात्यावर
जमा केले जाईल. कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 4 वर्षापेक्षा कमी नसावा. अनुदानावर
मिळणारी औजारे पुढील किमान 6 वर्षे
हस्तांतर/पुनर्वीक्री/गहाण ठेवता येणार नाहीत.
कृषी औजार बँके ची सेवा
पुरवण्याची क्षमता किमान 10 हेक्टर
प्रती दिवस आणि किमान 300 हेक्टर
प्रती हंगाम असणे बंधनकारक आहे.
सर्व बाबींसाठी आवश्यक
कागदपत्रे कोणती लागतात-
१)
7/12 व
8 अ,२) बँक
पास बुक, ३) आधार कार्ड, ४) यंत्राचे कोटेशन, ५) परिक्षण अहवाल,
२)
जातीचा दाखला.
अर्ज कुठे करावा
ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या वेबसाइट वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने
या वेबसाईटवर अर्ज भरणे आवश्यक आहे.
शेतकरी स्वतःच्या मोबाईल/लैपटॉपवर
त्याचप्रमाणे सीएससी सेंटर/ ग्रामपंचायत मधील संग्राम केंद्र येथे ही हा अर्ज भरु
शकतात. या संकेत स्थळावर "शेतकरी योजना" हा पर्याय निवडायचा आहे. शेतकरी
यांना "वैयक्तीक लाभार्थी" तसेच "शेतकरी गट/एफपीओ/सहकारी
संस्था" म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रथम युजर नेम आणि
पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे. आणि त्यानंतर लॉगइन करुन आपल्याला
आवश्यक असणारे घटक यासाठी अर्ज करायचा आहे. अर्जासाठी रु.20 व जीएसटी रु.3.60 असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे आहे. शेतकरी
यांना अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा त्यांना काही सुचना करावयाच्या असतील
तर महाडीबिटी पोर्टल वरील "तक्रार/सुचना" या बटन वर क्लिक करुन आपली
सुचना नोंदवू शकतात.
लाभार्थी निवड कशी केली
जाते?
संगणकीय
प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जाते. निवड झालेल्या
शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येईल. ज्या लाभार्थी यांची निवड झाली
नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी
लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज
ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा. त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
शेतकरी यांच्या अर्जाची व
कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व
सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर
पाठवला जातो. शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन
मध्ये उपलब्ध होइल. पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन
पाहू शकतील.
त्याच प्रमाणे अर्जाच्या विविध
टप्प्यांवर लाभार्थी शेतकरी यांना एसएमएस येईल.
लाभार्थी निवडीसाठी काही
प्राधान्य आहे का?
होय.
30 टक्के
निधी हा महिला खाते दारांसाठी तर 3 टक्के
निधी दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित आहे. परंतु पुरेशा प्रमाणात अर्ज आले नाही तर
सदर निधी इतर खातेदार शेतकरी यांचे साठी वापरला जातो.
पुर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी औजारे खरेदी कोठून करावीत ?
पुर्वसंमती मिळाल्या नंतर
लाभार्थी यांनी खुल्या बाजारतील आपल्या पसंतीच्या अधिकृत विक्रेते यांचे कडून
यंत्र/औजारे विहित मुदतीत खरेदी करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत खरेदी केले नाही तर
पुर्वसंमती रद्द होवू शकते. लाभार्थीं यांनी खरेदी करावयाची औजारे केंद्रीय तपासणी
संस्था किंवा केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून तपासणी केलेली असणे
बंधनकारक असुन त्यांनाच अनुदान देय आहे. या साठी लाभार्थी यांनी विक्रेते
यांचेकडून सदर यंत्र/औजाराबाबत सक्षम संस्थेने दिलेल्या परिक्षण प्रमाणपत्राचा
पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. औजारे खरेदी करताना त्यावर परिक्षण अहवाल व मॉडेल
क्रमांक एम्बॉस केलेला आहे का याची खात्री करुन यंत्र/औजार खरेदी करावे. तसेच ट्रॅक्टर , पॉवर टीलर, रिपर, रिपर कम बाइन्डर, पैडि ट्रान्सप्लांटर, थ्रेशर, पॉवर वीडर या औजारांचे बाबतीत ही
औजारे खरेदी करताना काळजी घेणे महत्वाचे आहे. ही औजारे केंद्र शासनाच्या यादीतील
नमुद मॉडेल/मेकचीच असली पाहिजेत. त्यांनाच अनुदान देय आहे. मात्र या केंद्र
शासनाच्या यादीतील औजारे खरेदी केली तर त्याबाबतचा परिक्षण अहवाल/प्रमाणपत्र सादर
करण्याची आवश्यकता नाही.
केंद्र शासन मान्यता प्राप्त
ट्रॅक्टर/पॉवर टीलर यादी-
औजारे तपासणी साठी केंद्रीय
तपासणी संस्था कोणत्या आहेत?
1.
केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था(CMFTTI) बुधनी
2.उत्तर
क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था (NRFMTTI), हिस्सार
3.
दक्षिण क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी संस्था
(SRFMTTI), गार्लैंडिन
4.
उत्तर पुर्व क्षेत्रीय केंद्रीय कृषी मशिनरी प्रशिक्षण व तपासणी
संस्था (NRFMTTI), बीश्वनाथ
चारीअली, आसाम.
यंत्र/ औजारे खरेदी
केल्यानंतर शेतकरी यांनी काय कार्यवाही करणे आवश्यक आहे?
यंत्र/औजारे खरेदी करताना
स्वत:च्या बँक खात्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने/धनादेश/धनाकर्षाद्वारे विक्रेत्यास
रक्कम देणे बंधनकारक आहे. खरेदी केल्यानंतर शेतकरी यांनी देयकाची प्रत (जीएसटी
क्रमांका सह) महाडीबिटी पोर्टल वर अपलोड करावी. त्यानंतर शेतास प्रत्यक्ष भेट देऊन
कृषी अधिकारी मोका तपासणी करतील व देय अनुदानाची शिफारस करण्यात येईल. देय अनुदान
लाभार्थीचे थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
संदर्भ - मार्गदर्शक सुचना
सन २०२३-२४
महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उपअभियान
========================================================================= सादरीकरण विद्यार्थी - श्री.संदिप संपत देसाई – BA
भाग -१ संपर्क नंबर- 9422741661


Comments
Post a Comment