कॅन्सर म्हणजे काय व कॅन्सर कसा होतो ते जाणून घ्या..
कॅन्सर म्हणजे काय..?
हृद्यविकार, मधुमेहाच्या बरोबरीने आज कॅन्सर हा सुद्धा एक
गंभीर असा रोग बनला आहे. कर्करोगात शरीरातील विशिष्ट अवयवांमधील पेशींमध्ये काही
बदल घडून त्या पेशींच्या संख्येत अनियंत्रित वाढ होते.
या विकृत झालेल्या पेशी स्वतःचे कार्य नीट पार पाडत नाहीत मात्र
झपाट्याने वाढत जाऊन शेजारील पेशींमध्ये रक्ताद्वारे इतरत्र पसरतात. या पेशी
प्रथमतः कोणत्या अवयवांतून वाढीस लागलेल्या आहेत यावरुन त्यांना त्या अवयवाचे नाव
दिले जाते. उदा. फुप्फुसात प्रथम वाढलेल्या पेशींना फुप्फुसाचा कॅन्सर असे म्हंटले
जाते. तर याच विकृत पेशी जेंव्हा इतरत्र हाडामध्ये पोहोचल्या तर त्यांना हाडाचा
कर्करोग न म्हणता हाडापर्यंत पोहचलेला फुप्फुसाचा कॅन्सर असे म्हणतात.
ट्युमर्स म्हणजे काय –
कॅन्सर हा विकृतीजन्य पेशींचा समूह असून याला कॅन्सरजन्य ट्युमर्स असेही म्हणतात. यांमध्ये विकृत पेशींची अनियंत्रीत वाढ होत असते. शरीरात निर्माण होणारे सर्व ट्युमर्स हे कॅन्सरजन्य असतीलच असे नाही.
ट्युमर्स दोन प्रकारचे असतात. सौम्य ट्युमर्स (Benign tumors)
आणि घातक ट्युमर्स (Malignant
tumors).यापैकी सौम्य ट्युमर्स हे कैन्सरजन्य नसतात. तर घातक ट्युमर्स हे कैन्सरजन्य असुन ते शरीरातील उतींवर आक्रमण करून त्या उतींना नष्ट करत असतात. तसेच त्यांमुळेच कॅन्सरजन्य पेशींची शरीरात अनियंत्रीत वाढ होत असते. पेशींची अनियंत्रीत वाढ झाल्याने ते कॅन्सरजन्य ट्युमर्स शरीरातील एका भागापासून अन्य ठिकाणी पसरत असतात.
कॅन्सरचे प्रकार –
प्रकाराचा विचार केल्यास जगामध्ये
फुफ्फुसाच्या कॅन्सरने मरणाऱयांची संख्या सर्वात जास्त आहे. तर भारतात आढळणाऱया
कैन्सरच्या प्रकारामध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. तोडांचा
कर्करोगासाठी तंबाखु, गुटका, धुम्रपान,
पानसुपारी किंवा अन्य तंबाखुजन्य
पदार्थांचे व्यसन हेच प्रमुख कारण ठरत आहे. कॅन्सरचे प्रमाण वयाच्या 55 वर्षानंतर
अधिक आढळते. स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. भारतीय
स्त्रियांमध्ये सर्वायकल कँसर व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.
यकृताचा कर्करोग – लिव्हर कॅन्सर
कर्करोग वेळीच कसा ओळखावा..?
कर्करोग किंवा कँसर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत आणि कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेमधीलच कँसर हा उपचारांद्वारे बरा होतो. अनेक व्यक्तींमध्ये जेंव्हा कँसरचे निदान केले जाते तेंव्हा बहुतांशवेळा कँसर हा दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचलेला आढळतो. आणि दुसऱ्या स्टेजमधील कँसर हा उपचाराच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कॅन्सरला वेळीच ओळखणे गरजेचे असते.
वेळीच कॅन्सरचे निदान करणे महत्वाचे..
कॅन्सर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत. आणि कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेमधीलच कॅन्सर हा उपचारांद्वारे बरा होतो. अनेक व्यक्तींमध्ये जेंव्हा कॅन्सरचे निदान केले जाते तेंव्हा बहुतांशवेळा कैन्सर हा दुसऱया अवस्थेमध्ये पोहचलेला आढळतो. आणि दुसऱया अवस्थेतील कॅन्सर हा चिकित्सेच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कैन्सरला वेळीच ओळखणे गरजेचे असते.
कॅन्सरची सुरवातीची काही लक्षणे –
कॅन्सरमध्ये जाणवणारी सुरवातीची काही लक्षणे खाली सांगितली आहे. अशी लक्षणे
जाणवल्यास त्वरीच कँसरचे निदान करुन घ्यावे. जेणेकरुन सुरवातीच्या अवस्थेमध्येच कैन्सरचे
निदान होईल आणि कैन्सर असल्यास योग्य उपचाराने बरा होईल.
खोकताना रक्त येणे –
खोकताना रक्त येत असल्यास, थुंकीतून रक्त येत असल्यास फुप्फुस कैन्सरची अशंका
असते. अशावेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. कैन्सरचे निदान करुन घ्यावे यांमध्ये
फुप्फुस बायोप्सी, फुप्फुसाचा एक्सरे, स्कैनद्वारे निदान केले जाते.
मलाद्वारे रक्त येणे –
मलाद्वारे रक्त येत असल्यास पोटाचा कर्करोग, स्वादुपिंड
कैन्सर, आतड्यांचा कर्करोग आणि मलाशयाच्या कर्करोगाची अशंका येते. तेंव्हा मलातून
रक्त येत असल्यास वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे
असते.
लघवीतून रक्त येणे –
लघवीतून रक्त येत असल्यास किडनी कैन्सर, मुत्राशय
कैन्सर आणि प्रोस्टेट कैन्सरची अशंका निर्माण होते. तेंव्हा लघवीतून रक्त येत असल्यास
वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.
स्तनामध्ये गाठ असणे –
स्तनामध्ये गाठ जाणवत असल्यास ब्रेस्ट कैन्सर (स्तनाचा कर्करोगाचे) निदान
करुन घेणे अत्यंत अवश्यक असते.
रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे –
स्त्रीयांमध्ये रजोनिवृत्तीनंतर जर रक्तस्त्राव येत असल्यास गर्भाशय कैन्सरचे निदान करुन घेणे गरजेचे असते.
अन्न गिळताना त्रास होणे –
अन्न गिळताना त्रास होत असल्यास तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सरची अशंका येते. तेंव्हा असे लक्षण जाणवल्यास कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.
शरीरातील असामान्य परिवर्तन –
शरीरावर गाठ जाणवणे, वरचेवर चक्कर येणे, मळमळणे, भुक एकाएकी मंदावणे, अन्न गिळण्यास त्रास जाणवणे, अधिक दिवस अतिसार होत असल्यास, वजन एकाएकी कमी होणे, मल-मुत्र विसर्जन व्यवस्थित न होणे यासारखे बदल जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
प्रकारानुसार कॅन्सर ची लक्षणे –
तोंडात लाल व पांढरे चट्टे असणे, तोंडात जिभेवर गाठ किंवा जखम असणे.
घशाचा कॅन्सर –
आवाजात बदल होणे, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे.
खोकल्यातून रक्त येणे, वजन कमी होणे, थुंकीतून रक्त पडणे.
स्तनात गाठ असणे, काखेत गाठ असणे, निप्पलमधून पू, पाणी किंवा रक्त येणे.
गर्भाशयाचा कॅन्सर –
अंगावर लाल किंवा पांढरे जाणे, पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, संबंधानंतर रक्तस्त्राव होणे, पाळी बंद झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा स्त्राव होणे.
आतड्याचा कॅन्सर –
संडासवाटे रक्त जाणे, भुक कमी होणे, गुद्दव्दाराच्याजागी गाठ असणे, अचानक वजन कमी होणे.
किडनी व मुत्राशयाचा कॅन्सर –
लघवीवाटे रक्त जाणे. वरील कोणताही त्रास होत असल्यास व औषध उपचार घेऊन ही 1 ते 3 महिने त्रास बरा होत नसेल तर कॅन्सर तज्ज्ञांना भेटणे आवश्यक आहे.
व्यसन असल्यास वेळोवेळी कैन्सरचे निदान करुन घ्या –
धुम्रपान,
तंम्बाखु, गुटका, पानसुपारी इ. व्यसन असल्यास फुप्फुस कैन्सर, तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो. मद्यपानाचे व्यसन असल्यास यकृत कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी व्यसनाधीन व्यक्तींनी वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री करुन घ्यावी. कैन्सर पासून दूर राहण्यासाठी व्यसनांपासून दूर रहावे. लक्षात ठेवा सुरवातीच्या स्टेजमधीलच कॅन्सर उपचारांद्वारे बरा होतो. दुसऱ्या स्टेजमधील कॅन्सर किंवा शरीरात इतरत्र पसरलेला कर्करोग चिकित्सेच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कॅन्सरला वेळीच ओळखून अटकाव करणे गरजेचे असते.
Comments
Post a Comment