Skip to main content

Remedies on Youth Issues [OE ] Sociology of Youth

 तरुणांच्या समस्यांवर उपाय

Remedies on Youth Issues

२.१ प्रास्ताविक 

                  आजच्या तरुणपिढी विषयी विचार व त्यांना देण्यात येत असलेले महत्त्व वेगळ्या प्रकारचे आहे. समाजाचा अभ्यास  करताना वर्गानुसार, जातीनुसार वर्ग करून विश्लेषण केले जाते.  वयामानानुसार समाजाचे गट करुन युवक हा वेगळा सामाजिक गट निर्माण करण्याची प्रवृत्ती नवीन आहे. त्याचप्रमाणे तरुण व्यक्तीना आपण युवक म्हणुन कोणीतरी वेगळे आहोत, वेगळी सामाजिक जबाबदारी आपल्यावर आहे व समाज परिवर्तनाच्या कामात आपल्याला विशेष स्थान आहे, ही जाणीव होत आहे.

                       अशा तरुणांच्या प्रश्नांसंदर्भामध्ये शासनाने त्यांच्या विकासाच्या बाबतीत  कोणकोणत्या योजना  आणलेल्या आहेत  याचा अभ्यास  आपण या घटकांमध्ये करणार आहोत.  त्याचबरोबर तरुणांच्या समस्यांच्या संदर्भामध्ये असलेल्या  प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना  या देखील पाहणार आहोत.  याशिवाय  या घटकांमध्ये  तरुणांच्या प्रश्नासंदर्भात  कुटुंबाची  भूमिका कशा पद्धतीची आहे  याचाही विचार करणार आहोत.

२.२.१ तरुणांच्या समस्यांवर सरकारी योजना  ( Government initiatives)

                     आजच्या जगाला विकसित करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहिले जाते. भारतातील १०-२४ वर्षे वयोगटातील तरुण भारतातील मौल्यवान संसाधनांपैकी एक आहेत. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या आहे. ज्यात जगातील एकूण युवा लोकसंख्येच्या सुमारे एक पंचमांश आहेत. श्रमिक बाजारपेठेत योग्य रीतीने आत्मसात केल्यास भारतीय तरुण ते आर्थिक विकासात योगदान देऊ शकतात.

                           आजच्या युवा वर्गाला बेकारी, व्यसनाधीनता, दारिद्रय, बेरोजगारी, यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जर समाजाचा विकास करायचा असेल तर या युवा पिढीचा योग्य पद्धतीने सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून युवकांच्या विकासासाठी कल्याणासाठी अनेक योजना, धोरणे, कार्यक्रम राबवले जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत, या सर्व माध्यमातून युवकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, तरुणांच्या  समस्या सोडविण्यासाठी  पुढील प्रमाणे उपाययोजना शासनाने केल्या आहेत.

1.राष्ट्रीय शिक्षण धोरण: १९८६ आणि युवक विकास:

                        भारतातील युवकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक धोरणांची महत्वपूर्ण भूमिका ठरलेली आहे . भारतातील युवकांचा विकास साधण्यासाठी १९८६ च्या  नवीन शैक्षणिक धोरणाची निर्मिती करून युवकांच्या विकासासंदर्भात पुढील मुद्यांचा महत्त्वपूर्णरित्या विचार करण्यात आला.  पारंपारिक शिक्षणाचा आराखडा बदलणे,युवकांना शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी आवश्यक त्या सोयी, सुविधा व सवलती प्राप्त करून देणे,युवकांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व कोणीही बेकार राहू नये यासाठी प्रयत्न करणे,स्त्रीयांना शिक्षणाबाबत विशेष सोयी मागासवर्गीय व दुर्बल गटातील युवकांसाठी विशेष सोयी, सवलती प्राप्त करून देणे इ.

2. राष्ट्रीय युवा धोरण २०१४ आणि युवकांचा विकास:

       केंद्र सरकारने स्वामी विवेकानंदांच्या १५०  व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून राष्ट्रीय युवा धोरण २०१४ जाहीर केले.

       युवकांच्या कौशल्यांचा विकास करून भारताच्या शाश्वत आर्थिक विकासासाठी श्रमिक शक्ती यंत्रणा तयार करणे, हे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट होते.

       विशेषत: शिक्षण, रोजगार व कौशल्य विकास, उद्योजकता या क्षेत्रांवर अधिक भर देणे अपेक्षित  होते. राष्ट्रीय कार्यात    युवकांचा सहभाग वाढवणे  हा एक या धोरणाचा उद्देश होता.  त्याचबरोबर  राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन शिक्षण, क्रीडा, आरोग्य  इत्यादी क्षेत्रात ही  युवकांचा सहभाग वाढवणे अपेक्षित होते.

३. राष्ट्रीय सेवा योजना (NSS)  :-

         महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव व समाजसेवेची आवड निर्माण व्हावी म्हणून भारत सरकारच्या केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या सहकार्याने ही योजना राबविली आहे .शिक्षण मंत्रालयाने १९६९-७० मध्ये सुरू केलेली एक योजना आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे, हे आहे. महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण  व समाज प्रबोधन करणे इ. कार्यक्रमांचा या योजनेत समावेश आहे.

४. राष्ट्रीय छात्रसेना (NCC) :-

           राष्ट्रीय छात्रसेनेची स्थापना १९४८ साली झाली.देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. महाविद्यालयीन व माध्यमिक विद्यार्थ्यांना या  योजने अंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले धडसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे.

५. विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या :-

                                 केंद्र सरकार व राज्य सरकार च्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे देशातील विविध राज्यातील सर्व स्तरातील  विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या योजना  सुरु करण्यात आलेल्या आहेत. पैशाअभावी विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो व त्यामुळे विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतो. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून  देशातील  विविध राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विविध शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वतःला उपयुक्त अशा शिष्यवृत्ती च्या सहाय्याने शिक्षण पूर्ण करू शकतील जेणेकरून कोणी विद्यार्थी पैशाअभावी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही हे पाहिले जाते.

                             विद्यार्थ्यांसाठी  उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या उदा. भारत सरकार शिष्यवृत्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, इयत्ता १० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी 'गुणवत्ता शिष्यवृत्ती' तसेच विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांना 'गुणवत्ता शिष्यवृत्ती', क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंत युवांना शिष्यवृत्ती 'उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती', 'परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती' इत्यादी विविध शिष्यवृत्त्यांच्या माध्यमातून युवकांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

६. विद्यावेतन व निर्वाहभत्ता :-

                    मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन /उच्च  व शालेय  शिक्षण घेता यावे आणि विद्यार्थ्याचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी  . केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विशेषतः अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांनसाठी ही योजना अस्तित्वात आली आहे.या योजनेतून विद्यावेतन व निर्वाहभत्ता दिला जातो.

७. शैक्षणिक कर्ज योजना :-

                     शैक्षणिक कर्ज म्हणजे देशात व परदेशात तांत्रिक, शैक्षणिक किंवा इतर अभ्यासक्रम  पूर्ण करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना बँकद्वारे  दिलेली आर्थिक मदत होय. अनेक भारतीय बँका सर्वसमावेशक शैक्षणिक कर्जांद्वारे युवकांच्या शैक्षणिक आकांक्षांना समर्थन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

८. नॅशनल युथ कॉर्प्स (NYV)

                         तरुणांच्या क्षमतेचा विकास  करण्यासाठी आणि त्यांच्या  क्षमता राष्ट्र उभारणीकडे वळवण्यासाठी  राष्ट्रीय युवा कॉर्प्सही नवीन योजना  सरकारने २०१०-११ या आर्थिक वर्षात सुरू केली आहे. नॅशनल सर्व्हिस व्हॉलंटियर (NSV) आणि राष्ट्रीय सद्भावना योजना (RSY) या विद्यमान दोन स्वयंसेवक योजनांचे एकत्रीकरण करून, “National Youth Corps” (NYC) नावाची नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

 

९. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र :-

                             केद्र व राज्य शासनांकडून युवकांना केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्यलोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या  स्पर्धा परीक्षांत यश प्राप्त होण्यासाठी विविध मार्गदर्शन केंद्रातून मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते उदा. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था

१० . सेवायोजन कार्यालये  :-   

                                भारतात ही कार्यालये शासनामार्फत युवकांना रोजगार प्राप्त व्हावा  यासाठी १९२१  पासून स्थापन होऊ लागली. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या सनदेप्रमाणे मोफत सार्वजनिक रोजगार सेवा पुरविण्याची योजना त्या वर्षी आखण्यात आली पण ती १९३८ मध्ये प्रत्यक्षात आली. शासकीय, निमशासकीय नोकरीत युवकांना  उपलब्ध पदाची, नोकरीची माहिती देणे, सेवेत सामावून घेणेसाठी आवश्यक ती मदत करणे इत्यादीसाठी सेवायोजन कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे.

११ ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराची शिक्षण योजना (ट्रायसेम) :-

                                                     ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करण्यासाठी ट्रायसेम ही स्वतंत्र राष्ट्रीय योजना म्हणून १५ ऑगस्ट १९७९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत कुक्कुट पालन, मत्स्यबीज, मधुमक्षिका पालन, अगरबत्ती, साबण, चॉकलेट, खडू, मेणबत्ती इ. वस्तु उत्पादनाबरोबर सुतारकाम, लोहारकाम, हस्तकलासंबंधी व्यवसाय इत्यादी व्यवसायाचे शिक्षण देण्यात येते. वय वर्षे १८ ते ३५ वयोगटातील युवकांना या योजनेचा लाभ घेता येतो. ज्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळते.

१२ स्टार्ट अप इंडिया :-

                      भारत सरकारचा स्टार्ट अप इंडिया योजना  हा एक नवीन उपक्रम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी२०१६ रोजी ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत केंद्र सरकारने तरुण उद्योजकांना व्यवसाय करण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत होत आहे. या सर्व योजनांमुळे स्टार्ट अप इंडिया योजना स्टार्ट अप इंडिया योजना नावाच्या योजनेअंतर्गत सुरू केल्या जात आहेत.

                याशिवाय तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी  इतर काही  योजना शासनाच्या होत्या  त्या पुढीलप्रमाणे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय ,ग्रामीण स्वयंरोजगार योजना ,युवकांसाठी राष्ट्रीय आयोग , राष्ट्रीय युवा दल (NYC) ,शासकीय वसतिगृहे.

१३. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना२०२४ :-

                                                                  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना२०२४ या योजेअंतर्गत केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेतून देशात राहणाऱ्या लाखो तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. देशातील लाखो तरुणांना घरी बसून ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये सर्व तरुणांसाठी ‘स्किल इंडिया डिजिटलचे प्रॅक्टिकल’ अभ्यासक्रमही घेण्यात येतो. 

 

      एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) केंद्र सरकारने स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून कोणती योजना जाहीर केली?

२) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणारी योजना कोणती?

३) ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणती योजना अस्तित्वात आली? 

४)  भारतात१६ जानेवारी२०१६ रोजी ही योजना सुरू केली आहे?

 ५) प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना२०२४ हा या योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे?

 

 

 

 

 

 

 

 २.२.२  तरुणांच्या समस्यांवर  प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाय

 (Preventive and curative measures)

1)         तरुणांच्या समस्यांवर  प्रतिबंधात्मक उपाय

तरुणांच्या समस्यांच्या संदर्भामध्ये  विचार करीत असताना पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक  उपाय स्पष्ट करता येतील

1.  तरुणांचे समुपदेशन 

                                तरुण  ही आपल्या संपत्ती आहे. कारण ते सामाजिक जबाबदाऱ्या पेलतात आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात. परंतु काही वेळा अशा व्यक्ती आपला अभ्यास पूर्ण करण्यात किंवा नोकरीच्या शोधात मागे पडतात.  समुपदेशनमुळे तरुणांना त्यांचे निर्धारित ध्येय साध्य करण्यासाठी मदत होते. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये  तरुणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते परिणामी ते डिप्रेशनमध्ये जातात. आजकाल तरुण पिढी फार मोठ्या प्रमाणात नैराश्यात असल्याचे आपण पाहत आहोत. परिणामी अनेक तरुण व्यसनाधीन होतात, आत्महत्या करीत आहेत अशा अनेक समस्यांना सामोरे जात आहेत त्यासाठी  त्यांच्या समुपदेशनाची गरज आहे.

2.तरुण पिढीला सुसंस्काराची गरज

                        संस्कार' म्हणजे काय ? लहान मुलांवर उत्तम संस्कार होण्यासाठी काय काय करता येईल? कुंभार जसे मातीच्या गोळ्याला आपल्या हातातील कौशल्याने सुंदर आकार देतो व मग त्यापासुन कधी मातीचा घडा बनतो व तो घडा पाणी शितल बनवतो आणि तहानलेल्याची  तहान भागवतो तर कधी पणती बनून प्रकाश देते.तसेच तरुण पिढीला शक्य तेवढे चांगले कौटुंबिक वातावरण व उत्तम संस्कार मिळाल्यास तो चांगला व्यक्ती नक्कीच होईल.

 

3.पालकांनी तरुण पिढीकडून अवास्तव अपेक्षा न बाळगणे:-

                                   प्रत्येक पालकाच्या आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात. त्यांनी खूप शिकून नाव कमवावे असे त्यांना वाटत असते. त्यासाठी ते खूप परिश्रम घेतात व मुलांना, सोयी सुविधा उपलब्ध करून देत असतात. मुले अभ्यासात कमी पडू नये म्हणून क्लास ही मुलांना लावतात. इतर हुशार मुलांशी बरोबरी किंवा अनुकरण करतात. पण कधीकधी ह्या अपेक्षा अवास्तव ठरू शकतात. पालक आपले विचार मुलांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतात पण मुलांना काय वाटते, ह्याचा विचार बऱ्याचदा केला जात नाही.अशा वेळी स्पर्धात्मक युगात निभाव लागण्यासाठी मुलांनी सतत अभ्यास करावा, अशा विचाराने ताण देतात. पर्यायाने मुलांना खेळाचा आनंद, मोकळेपणाने घेता येत नाही.पालकांनी आपल्या मुलाची क्षमता वेळीच ओळखली पाहिजे.मुलांवर सुसंस्कार करणे, पालकांचे कर्तव्यच आहे पण त्याचा अतिरेक केल्यास बालपण हरवले जाईल आणि अपेक्षित परिणाम मिळणार नाही.मुलांनी मोठे झाल्यावर  खूप पैसा मिळवावा ही अपेक्षा न बाळगता , पालकांनी तरुणांच्या क्षमता पाहून  त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा न करता  योग्य अपेक्षा करणं गरजेचे आहे.

4.सोशल मीडियाच्या वापरा संदर्भात योग्य मार्गदर्शन:-

                            आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मीडिया ही अपरिहार्य बाब आहे. या सोशल मीडियाच्या वापरा संदर्भात युवकांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे . त्याचा वापर कसा करावा, याचे ज्ञान आणि भान युवकांना होणे गरजेचे आहे.सोशल मीडियावर धर्माबद्दल विद्वेष पसरविणारे संदेश टाकणे, महिलांना अश्लील शिवीगाळ करणे,  प्रकार सर्रास घडत आहेत. या प्रकारांसंदर्भात  युवकांनी योग्य दक्षता घेतली पाहिजे. त्याच बरोबर स्मार्टफोनचे  स्क्रीन टाइमिंग कमी करून  सोशल मीडियाचा वापर  तरुणांनी व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून  करून घेणे गरजेचे आहे. यासंदर्भामध्ये सातत्याने समाजीकरणाच्या साधनातून    त्यांना मार्गदर्शन झाले पाहिजे.

 

 5.ताणतणावा पासून मुक्ती:- 

                         

                                     आजची पिढी प्रत्येक गोष्टीबद्दल अक्षरशः प्रचंड तणावाखाली आहे. तरुणांसाठी आजचे वातावरण तितकेसे चांगले नाही. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्यापैकी काहींना तणावाची सवय लागते आणि मग ते किरकोळ गोष्टींवर ताण घेऊ लागतात. त्यासाठी तरुणांची ताणतणाव पासून मुक्ती  करणे गरजेचे आहे.

 ब) उपचारात्मक उपाय:-

      तरुणांच्या समस्यांसंदर्भामध्ये  पुढील प्रमाणे उपचारात्मक उपाय  स्पष्ट करता येतील

१. स्वावलंबी होऊन स्वतःचा व्यवसाय चालू करणे:-

                                                                            अलीकडच्या स्पर्धेच्या काळामध्ये  भरपूर शिक्षण घेऊन  युवकांना नोकरी प्राप्त करणे अवघड झालेले आहे.  त्यासाठी  तरुणांनी  नोकरीच्या मागे न लागता  आपले छोटे मोठे व्यवसाय  उभे करून  आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होणे  गरजेचे आहे.त्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये विकसित होणे गरजेचे आहे. जर तरुणांच्या घरातपिढ़ीजात व्यवसाय असेल तर त्यातील कसब, हातोटी, माणसं जोडण्याची कला हे गुण आत्मसात करून तो व्यवसाय खूप छान पद्धतीने तो करू शकतो.

     २ तरुण पिढिला धेयवादी व आदर्शवादी बनविणे:-

                                                                 एका प्रसिद्ध वाक्यामध्ये सांगायचे म्हटले तर  We don't need  followers, we need  Ideals. पण तरीसुद्धा मान्यता पावलेले आदर्श व्यक्तिमत्व नेहमीच आपल्याला उपयुक्त ठरेल. भारतीय युवकाच्या दृष्टिने स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी व अगदिच अलिकडल्या काळातील म्हटले तर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इ. चा उल्लेख होईल. यानांच आदर्श का म्हणावे यामागील काही महत्वाची कारणे विशद करणे मला महत्वाचे वाटते. त्यांचे नुसते ज्ञानच प्रचंड आहे ,एवढेच नाही तर  त्यांची नैतिकता व सखोल विचार करण्याची प्रवृत्ती.युकांच्यासाठी आदर्श आहे. गौतम बुद्धानी  केलेल्या उपदेशा नुसार  , " मी सांगतो आहे  म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, धर्मग्रंथात आहे म्हणुन आंधळेपणाने स्विकार करु नका तर सर्व विचार तुमच्या बुद्धिवर तपासून पहा आणि योग्य अयोग्य काय ते ठरवा " , या उपदेशाचे तंतोतंत  पालन युवकांनी केले पाहिजे .  साधे जीवन जगत, उच्च विचारसरणी जोपासली, त्यांची काम करण्याची पद्धत, सचोटी, जगाकडे व जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन, काहीतरी बनून दाखविण्याची मनीषा व आपण जगाला काहीतरी देणे लागतो ही भावना हे त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या अनेक पैलुं  युवकांना आदर्श बनवण्यासाठी  महत्त्वाचे आहेत.

    .युवकांना प्रशिक्षण:-

                           युवकांना प्रशिक्षण या अभियानानुसार सरकार असंघटित क्षेत्रातील                                 युवकांना प्रशिक्षण देईल. युवकांमध्ये रोजगारासंदर्भात योग्य ते कौशल्य निर्माण होण्यासाठी ही सरकारच्या  माधमातून प्रयत्न करता येतील. त्यासाठी प्रत्येक राज्यात स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात येईल. कौशल्य विकासाबाबत भारत इतर देशांच्या मानाने बराच मागे आहे. एका सर्वेक्षणानुसार देशातील केवळ ३.५ टक्के युवक कौशल्य विकासाबाबत अग्रेसर असल्याचे दिसून आले. इतर देशांचा विचार करायचा तर तेथे ही टक्केवारी बरीच अधिक आढळते. उदाहरण द्यायचे तर चीनमध्ये ४५ टक्के युवक कौशल्य विकासात अग्रेसर आहेत. हीच टक्केवारी अमेरिकेत ५६, जर्मनीत ७४, जपानमध्ये ८० तर दक्षिण कोरियामध्ये ९६ टक्के इतकी आहे.याच पद्धतीने भारतीय युवकांनचे कौशल्य विकास करून बेरोजगारी कमी केली पाहिजे.

 

 

 .युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे:-

                                                                  देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने रोजगाराच्या संधीतील वाढही महत्त्वाची ठरते. अन्यथा बेरोजगारीचा प्रश्‍न ऐरणीवर येतो आणि हळूहळू गंभीर रूप धारण करतो.त्या दृष्टीने विचार केला तर भारत हा तरुणांचा देश आहे. या देशात तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या तरुणांसाठी रोजगाराच्या उचित संधी उपलब्ध करणे गरजेचे ठरणार आहे. आजचे युग खाजगीकरणाचे आहे. त्यामुळे  खाजसगीकरणाला मोठ्या प्रमाणावर वाव दिला जात आहे. परंतु यातूनही खासगी क्षेत्रात रोजगाराच्या व्यापक संधी निर्माण व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.

५.युवकांचा जगाकडे व जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनविणे :-

                       आजच्या काळात  बेरोजगारी सारखी मोठी समस्या युवापिढी समोर आहे. त्यामुळे युवा पिढीचे मानसिक दृष्ट्या खच्चीकरण झाली आहे. यासाठी युवापिढीचा जगाकडे व जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनविणे गरजेचे आहे. त्यामुळे काहीतरी बनून दाखवण्याची क्षमता निर्माण  होईल.

 ६. तंत्रशिक्षण, कौशल्याभिमुख, उपजिवीकाभिमुख शिक्षण:-

                                                             इथून पुढच्या काळात तंत्रशिक्षण, कौशल्याभिमुख, उपजिवीकाभिमुख शिक्षणाचा फायदा होणार आहे, आणि तेच देशाचे भवितव्य आहे. तंत्रशिक्षण, कौशल्याभिमुख, उपजिवीकाभिमुख शिक्षण घेतलेले असेल तरच पुढील काळात समृद्धीने आणि सन्मानाने जगता येईल. त्यामुळे युवक बेरोजगार न बनता  रोजगाराभिमुख  शिक्षणातून  त्याला स्वयंपूर्ण बनता येईल  आणि  अनेक समस्यांवरती मात करता येईल.

७ व्यसनाधीनते पासून दूर करणे:-

                                                    मादक पदार्थाचा गैरवापर ड्रग्स आणि अल्कोहोलचा प्रयोग बहुतेकदा पौगंडावस्थेमध्ये सुरू होतो. पदार्थांच्या दुरुपयोगामुळे व्यसनाधीनता यामुळे दीर्घकालीन शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. प्रतिबंधक रणनीतींमध्ये मादक पदार्थांच्या गैरवापराच्या जोखमींबद्दल सर्वसमावेशक शिक्षण, मजबूत सामना कौशल्ये निर्माण करणे आणि एक सहाय्यक वातावरण तयार करणे गरजेचे वाटते. तरुणांना मित्रांच्या दबावाला  बळी न पडता व्यसनाधीनते पासून दूर केले पाहिजे.

 

            एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) तरुण व्यसनाधीन होतात, आत्महत्या करीत आहेत अशा अनेक समस्यांना सामोरे जात आहेत त्यासाठी  त्यांच्या समुपदेशनाची गरज आहे?

२) तरुण पिढिला धेयवादी व आदर्शवादी बनविणे या साठी कशाची गरज आहे ?

३) सोशल मीडियाच्या वापरा बाबत  तरुणांना कोणता सल्ला आहे? 

४) युवकांचा जगाकडे व जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन कोणता  बनविला पाहिजे 

५) तरुण पिढिला मादक  पदार्थांच्या दुरुपयोगामुळे  व्यसनाधीनता यामुळे  कोणत्या समस्या  होऊ शकतात ?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

..२.३  तरुणांच्या समस्यांवर कुटुंबाची भूमिका   (Role of family)

             मानवी मुल हे जन्मता हाडामांसाचा गोळा असतो असे समाजशास्त्रज्ञ म्हणतात.अशा हाडामांसाच्या गोळ्याचे  सामाजिकरण प्रक्रियेच्या माध्यमातून मानवी मुलांमध्ये रूपांतरण केली जाते.  हे करत असताना  मानवी मुलाचा  विकास अनेक टप्प्यातून होत असतो  यामध्ये पौगांड अवस्था  किंवा युवावस्था  ही अत्यंत महत्त्वाच्या अवस्था म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते  या अवस्थेमध्ये  मुलाचे सामाजीकरण करत असताना. किशोर अवस्थेतील  अथवा तरुण अवस्थेतील  मुलांमध्ये  अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले असतात  हे प्रश्न सोडवण्याची  कुटुंबाची महत्त्वाची भूमिका असते  या भूमिका कुटुंब कशा पद्धतीने पार पाडते  ते पुढील प्रमाणे पाहता येईल.

१. तरुणांच्या नातेसंबंधातील प्रश्ना संदर्भाततील पालकांची भूमिका :-

                      तरुणां सोबत पालकांचे नाते आणि काळजी घेण्याची भूमिका महत्त्वाची असते,  तरुणांच्या  बदलत्या गरजांशी जुळवून घेण्यासाठी नातेसंबंध लवचिक असणे आवश्यक आहे. यावेळी, अधिक अधिकृत दृष्टीकोनातून, अधिक सहयोगी दृष्टिकोनातून हळूहळू बदल करणे आवश्यक आहे. पालकांना (कधीकधी कठीण) वास्तवाचा सामना करावा लागतो की त्यांचे मूल आता मूल राहिलेले नाही, स्वतंत्र होत आहे आणि आता त्यांच्या नियंत्रणात नाही. तरुण पाल्य त्यांचे ऐकणार नाही किंवा ते जे सुचवू शकतील त्याच्या उलट वागतात हे त्यांना समजल्यामुळे त्यांना दुःख वाटू शकते. पालकांनी तरुणांच्या संदर्भा मध्ये काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल.काही चुकांच्या बाबतीत  ‘जाऊ द्या” ही भूमिका स्वीकारली पाहिजे. तरुण पिढीवर आपला अधिकार आहे ही भूमिका बदलून तरुण पिढीशी

सामंजस्याचे तत्व स्वीकारले पाहिजे. तरुणपिढीच्या विकासाच्या संदर्भामध्ये आपल्या अवास्तव अपेक्षांची ओझे न लागता समन्वयाची भूमिका ठेवणे अत्यंत गरजेचे आहे

 

 

 २. तरुणांच्या मानसिक समस्यांतील भूमिका   ;-

                                                                तरुणांना कौटुंबिक वातावरणातच प्रेम, सहानुभूती, जिव्हाळा या मानसिक सुरक्षितता लाभतात.शारीरिक-मानसिक सुरक्षितते बरोबरच                                                       तरुणांचा मानसिक विकासही कुटुंबामुळे साध्य होऊ शकतो. कोणतीही इतर सामाजिक संस्था                                                                तरुणांना प्रेम आणि वात्सल्य इ.भावना  देऊ शकणार नाही की जे तरुणांना कौटुंबिक वातावरणातच  मिळत असते. भावी जीवनात स्वीकारावयाच्या जबाबदाऱ्यांचे प्रशिक्षण  तरुणांच्या  कुटुंबातच प्राप्त होतात.   तरुणांच्या  मनोरचना, आवडी-निवडी, सवयी, दृष्टिकोण इ. गोष्टींना कुटुंबजीवनातच विशिष्ट आकार व दिशा प्राप्त होतात  तरुणांना व्यक्तिमत्त्व विकासामध्ये तर कुटुंबाचा फार मोठा वाटा असतो.

 

३.सामाजिक भूमिकांसंदर्भात कुटुंबाची भूमिका :-  

                                       कुटुंब आणि त्यांचे सदस्य यांनी प्रभावी संप्रेषण, नातेसंबंध कौशल्ये  कसें जपावेत, सामाजिक भूमिका व विविध सामाजिक वर्तनासाठी आदर्श  वर्तन  कसे असावे. त्याचबरोबर सामाजिक जीवनातील संघर्ष, मतभेद यासंदर्भात वाटाघाटी कशा कराव्यात, याबाबतीत योग्य भूमिका कशी निभवावी यासाठी कुटुंब तरुणपिढीसाठी मार्गदर्शन करीत असते.सामाजिक वर्तनात  वर्तनासंदर्भात योग्य काय आहे ? अथवा नाही याबाबतीत कुटुंब योग्य मार्गदर्शन देते. सतत सकारात्मक भूमिका ठेवून सामाजिक संबंध कसे जोपासावे या याबाबतीत मार्गदर्शन करणारे  महत्वाची सामाजिक संस्था आहे. या सर्व मार्गदर्शनाचा तरुणपिढीला फायदा होतो.

 

४.आर्थिक प्रश्नातील कुटुंबाची भूमिका :- 

                                          कुटुंबातील सदस्यांना  आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे  हे कुटुंबाचे महत्त्वाचे कार्य आहे.  त्यासाठी  युवकांना  शिक्षण घेत असताना  आर्थिकदृष्ट्या  मदत करणं  अत्यंत गरजेचे असते. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईपर्यंत  तरुणांना  मदत करणे,  तरुणांना कुटुंबाचा एक सदस्य म्हणून  आर्थिक मदत करणे  कुटुंबाच्या दृष्टिकोनातून  महत्त्वाची भूमिका ठरते  की ज्यामुळे  भविष्यामध्ये  तरुण  आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन  तो स्वतःच्या पायावरती उभा राहू शकतो.  या अर्थोत्पादनामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभते.

५.सुरक्षित-आधाराचीसाठी भूमीका :-

                                               किशोरवयीन मुले शारीरिक, भावनिक आणि संज्ञानात्मकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आणि तरीही ते वाढत आहेत. तरुणांना अजूनही घरच्या वातावरणात स्थिरता आणि जगाचा शोध घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी सुरक्षित भावनिक आधार आवश्यक असतो. या कठीण काळात तरुणांना आश्वासन, समर्थन आणि बिनशर्त सुरक्षित-आधारा  दिला जातो.

           कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये आदर, विचार आणि परस्परसंवादाच्या अपेक्षांचा एक तरुण व्यक्तीला फायदा होतो. कौटुंबिक वातावरणातील विचार, भावना आणि वर्तन नातेसंबंधांचे निरीक्षण आणि अनुभव घेण्यापासून त्यांना अजूनही फायदा होतो.

६.सोशल मीडियाच्या अतीवापरा संदर्भाततील कुटुंबाची भूमिका  :- 

             अलीकडच्या काळातील  युवा पिढी स्मार्टफोनचा वापर  फार मोठ्या प्रमाणात  करत आहे.  पण हा वापर करत असताना  मनोरंजन  हाच दृष्टिकोन जास्तीत जास्त  बळावत चाललेला आपल्याला दिसून येतो.  त्यासाठी  कुटुंबातील सदस्यांकडून  अनेक वेळा  यासंदर्भामध्ये  युवा पिढींना  सूचना केली जाते.  पण तरीसुद्धा  याकडे दुर्लक्ष करून  मनोरंजन हाच उद्देश  डोळ्यासमोर ठेवून  युवा पिढी फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा  वापर करीत आहे.  त्यासाठी  कुटुंबाकडून  व कुटुंबातील सदस्यांकडून  योग्य पद्धतीने  त्यांना मार्गदर्शन  समुपदेशन केले पाहिजे. सोशल मीडियाचा विळखा सोडवण्याचा प्रयत्न  कुटुंबाकडून केला जात आहे.

 

       एका वाक्यात उत्तरे लिहा.

१)  पालकांनी युवा पिढी काही चुकांच्या कोणती  भूमिका स्वीकारली पाहिजे?

२) तरुण पिढिला प्रेम आणि वात्सल्य इ.भावना  प्रामुख्याने  कोणत्या सामाजिक संस्थे कडून ? 

३) पालकांनी युवकांना शिक्षण घेत असताना  कोणती  मदत करणं  अत्यंत गरजेचे असते ? 

४) युवकांचा सुरक्षित-आधाराचीसाठी  कोणती  कुटुंबा  संस्था भूमीका कोणती  पार पडते

५) तरुण पिढिलाच्या  सोशल मीडियाच्या अतीवापरा संदर्भात  कुटुंबाची काय  भूमिका पाहिजे           ?

 २.४   स्वाध्याय

अ)  खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर द्या

१) तरुणांच्या प्रश्नांसंदर्भात  सरकारी योजनांचा  आढावा घ्या .

२) तरुणांच्या समस्यांसंदर्भात  उपचारात्मक उपाय सांगा .

३) तरुणांच्या समस्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय सांगा.

४) तरुणांच्या समस्या आणि कुटुंबाची भूमिका स्पष्ट करा .

   ब )   टिपा द्या 

१) सरकारच्या रोजगार विषयक योजना

२) मुलांच्या करिअर संदर्भात पालकांची भूमिका

३) तरुण आणि सोशल मीडिया

  २.५   सारांश

            या दुसऱ्या घटकांमध्ये आपण  युवकांच्या    समस्यांवरती उपाय योजना करणाऱ्या सरकारी योजना कोणत्या प्रकारच्या आहेत?  हे समजून घेतले आहे  त्याचबरोबर  तरुणांच्या समस्या संदर्भामध्ये  प्रतिबंधात्मक  आणि उपचारात्मक उपाय योजना  यांचा देखील आढावा घेतला आहे  यामध्ये प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपाय सांगत असताना  तरुणांना समुपदेशनाची गरज  सुसंस्काराची गरज,  पालकांनी  अवास्तव अपेक्षा न बाळगणे,  यासारख्या  प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरती चर्चा केलेली आहे. उपचारात्मक उपाय योजना मध्ये स्वावलंबी होऊन स्वतःचा व्यवसाय चालू करणे, युवकांना  रोजगार विषयक प्रशिक्षण, तंत्रशिक्षण, कौशल्याभिमुख, उपजिवीकाभिमुख शिक्षण,  इत्यादी उपायोजनांवरती चर्चा केलेली आहे. तरुणांच्या समस्येमधील  कुटुंबाची भूमिका स्पष्ट करत असताना तरुणांच्या नातेसंबंधातील प्रश्ना संदर्भातील पालकांची भूमिका,तरुणांच्या मानसिक समस्या, सामाजिक भूमिकांसंदर्भात कुटुंबाची भूमिका  यांसारख्या अनेक  तरुणांच्या समस्येतील  कुटुंबांच्या कुटुंबाच्या भूमिकेचा  भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

.   स्वयं  अधयनाची  उत्तरे

१ ) स्वयं  अधयनाची  उत्तरे

१) केंद्र सरकारने स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधूनराष्ट्रीय युवा       धोरण २०१४ जाहीर केले.

२) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी  राष्ट्रीय सेवा योजना  अस्तित्वात  आली आहे. 

.३) ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणारी ट्रायसेम ही योजना अस्तित्वात आली.

४) १६ जानेवारी२०१६ रोजी स्टार्ट अप इंडिया  सुरू ही योजना केली आहे  

) केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेतून देशात राहणाऱ्या लाखो तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.

 

२ ) स्वयं  अधयनाची  उत्तरे 

 १) तरुण व्यसनाधीन होतात, आत्महत्या करीत आहेत अशा अनेक समस्यांना सामोरे जात आहेत त्यासाठी  त्यांच्या समुपदेशनाची गरज आहे .    

२)  तरुण पिढिला धेयवादी व आदर्शवादी बनविणे या साठी  मान्यता पावलेली आदर्श व्यक्तिमत्व नेहमीच त्यांना  उपयुक्त ठरतील. 

.३) तरुणांनी सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा. 

४) युवकांचा जगाकडे व जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनविणे .   

) तरुण पिढिला पदार्थांच्या दुरुपयोगामुळे व्यसनाधीनता यामुळे दीर्घकालीन शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्या देखील होऊ शकतात .

३) स्वयं  अधयनाची  उत्तरे

१) पालकांनी युवा पिढी  काही चुकांच्या बाबतीत  जाऊ द्याही भूमिका स्वीकारली पाहिजे .

२)  युवकांना  शिक्षण घेत असताना  आर्थिकदृष्ट्या  मदत करणं  अत्यंत गरजेचे असते. 

.३) तरुण पिढिला प्रेम आणि वात्सल्य इ.भावना  प्रामुख्याने  कुटुंब या  सामाजिक संस्थे कडून मिळवतात . 

४) युवकांचा सुरक्षित-आधाराचीसाठी भूमीका कुटुंब  पारपडते .   

) तरुण पिढिलाच्या  सोशल मीडियाच्या अतीवापरा संदर्भात  कुटुंबाची समुपदेशनाची  भूमिका  पाहिजे.

.२.७  अधिक अभ्याससाठी संदर्भ ग्रंथ

1)       Allan France, Julia Coffey, Steven Roberts, Catherine Wait (2020).

“Youth Sociology).Red Glob Press

2)       Michael Brake (2014)“The Sociology of Youth Culture and Subculture”. Routledge Publications

3)       Rakesh Pandey (2006). “Sociology ofYouth”. Sterling Publications

 

 

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...