Skip to main content

Introduction to Sociology of Health [2023]

 Semester-IV

Sociology of health

आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६

What is the Sociology?

समाजशास्त्र म्हणजे काय ?

-समाजाचे शास्त्र -विज्ञान, सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान, -आंतर्क्रियाचे  शास्त्र -विज्ञान, – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान, – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान,

What is sociology of Health?

आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ?

आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान, आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे  शास्त्र -विज्ञान, आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान, आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान,

What is Health?

आरोग्य म्हणजे काय ?

WHO- “शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”  आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे होय.

 आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या :

(Meaning and Definition of Sociology of Health)

 आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होय.”

 आरोग्याचे समाजशास्त्र ही समाजशास्त्राची एक शाखा असून तिच्यात आरोग्यावर प्रभाव टाकणाऱ्या व त्याच्याशी निगडीत असणार्‍या विविध घटकांचा पद्धतशीर व सविस्तर अभ्यास केला जातो. थोडक्यात, आरोग्य व समाज यांच्यातील परस्परसंबंधाचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्र होय.

हे शास्त्र आरोग्याशी निगडीत असलेले मानवी वर्तन व मानवी संबंध यांच्या अभ्यासावर विशेष भर देते.

२) पेंग्विन (Penguin) डिक्शनरी ऑफ सोशिऑलॉजी: आरोग्याचे व आजारपणाचे समाजशास्त्र ही संज्ञा औषधाचे समाजशास्त्र या संज्ञेपेक्षा अधिक पसंत केली जाते. कारण ती औषधाच्या व्यावसायिक हितासंबंधापेक्षा समाजशास्त्राच्या सैध्दांतिक हितसंबंधाचा विचार करते.(Sociology of Health and Illness: This term is often preferred to sociology of medicine, because it reflects the theoretical interests of sociology rather than the professional interests of medicine.)

 

३) विकीपिडीया विकीपिडीयावर पुढील दोन व्याख्या दिलेल्या आहेत. (१) आरोग्याचे व आजारपणाचे समाजशास्त्र किंवा आरोग्याचे व निरोगीपणाचे समाजशास्त्र (किंवा केवळ आरोग्याचे समाजशास्त्र) हे समाज व आरोग्य यांच्यातील आंतरक्रियांचे परीक्षण करते.

 (The sociology of health and illness, alternatively the sociology of health and wellness (or simply health sociology), examines the interaction between society and health.

(२) आरोग्याचे व आजारपणाची समाजशास्त्र यामध्ये समाजशास्त्रीय विकृतीशास्त्र (रोग व आजारपणाची कारणे), विशिष्ट प्रकारांच्या वैद्यकीय साधनांच्या शोधाची कारणे, आणि वैद्यकीय नियमांना रुग्णाची असणारी मान्यता किंवा अमान्यता यांचा अंतर्भाव होतो. (The sociology of health and illness covers sociological pathology (causes of disease and illness), reasons for seeking particular types of medical aid, and patient compliance or non. compliance with medical regimes.)

आरोग्याच्या समाजशास्त्र चे स्वरूप:

(Nature of Sociology of Health)

1) आरोग्याचे समाजशास्त्र हे समाजशास्त्राची ज्ञान शाखा आहे.

२)विविध नावे:- अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रोबर्ट स्टारस यांनी १९५७ मध्ये औषधाचे समाजशास्त्र हि संकल्पना उपयोगात आणली.

मात्र इंग्लड , जर्मनी, नेदरलँड् इ.ठिकाणी वैद्यकीय समाजशास्त्र हीच संकल्पना उपयोगात आणली जात होती.

डेव्हिड मेकेनिक यांच्या मते वैद्यकीय समाजशास्त्र हे रोग भोवतालच्या वर्तनाचा अभ्यास करते.

व्हाइट केविन -An Introduction to the Health and illnesses (2002)

पिटर कोनरेड- Sociology of Health and illnesses : critical perspective (2008) इ. नी आरोग्याचे समाजशास्त्र हि संकल्पना उपयोगात आणली.

UN (संयुक्त राष्ट्रे ) यांनी तसेच WHO यांनी आरोग्याचे समाजशास्त्र sociology of Health हि संकल्पना वापरण्यास सुरवात केली.

३) आरोग्याचे समाजशास्त्र हे  विविध ज्ञान शाखेशी (नैसर्गिक आणि मानवी) सह संबंध/इतर शास्त्रावर अवलंबून आहे.

४) आरोग्याचे समाजशास्त्र हे मुख्यतः रुग्णाच्या वर्तनाचे शास्त्र आहे

५) आरोग्याचे समाजशास्त्र हे  उपयोजीतशास्त्र आहे.

६) आरोग्याचे समाजशास्त्र हे आधुनिक शास्त्र आहे.

७) आरोग्याचे समाजशास्त्र हे समाजशास्त्राची ज्ञान शाखा असले तरी संकल्पना-शिद्धात च्या पातळीवर ते स्वतंत्र आहे.

 आरोग्याच्या समाजशास्त्राचा अभ्यास विषय  : (Subject Matter  of Sociology of Health)

 

1.   आरोग्याची संकल्पना: हर्मन बिग्ज यांनी सार्वजनिक आरोग्य हि संकल्पना दंडनीय आहे अशी भूमिका घेतल्या नंतर सामुदायिक आरोग्य हि  संकल्पना १९११  नंतर उपयोगात आली.

2.   आजारपणाचा अभ्यास :- आरोग्यात बिघाड होण्याची स्थिती म्हणजे “आनारोग्य” होय.

--आजारी व्यक्तीला विशिष्ट वर्तन करावे लागते ते त्याचे कर्तव्य मानले जाते त्यासच टेलकॉट पार्सन यांनी “आजऱ्याची भूमिका” अशी संकल्पना वापरली आहे.  

3.   आरोग्याचे विविध पैलू व आरोग्यावर प्रभाव टाकणारे विविध घटक,

4.   दवाखाना व्यवस्था व आरोग्याची काळजी घेणार्‍या व्यवस्था(यंत्रणा)- फ्रोंज बुआस यांच्या नुसार – अनेक रोग समाजच निर्माण करत असतो व त्यावर त्याच्या कडेच मार्ग हि असतो…औषधोपचार हि सामाजिक घटना मानून अभ्यास केला पाहिजे.

5.   आरोग्य सेवा सुविधा

6.   आरोग्याचे धोरण व नियोजन

7.   आरोग्य प्रशासन

8.   आरोग्य संवर्धन

9.   आरोग्य शिक्षण

10.आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना

11.आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरणारे विविध रोग व आजार, आजार व रोग बरे करण्यासाठी केले जाणारे औषधोपचार,

10.                  हे औषधोपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स व त्यांचे इतर साहाय्यक व कर्मचारी यांच्या भूमिका-

11.                  या संघटनेतील व्यक्तींचे (उदा. रोगी, रोग्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स, नर्सेस, औषध विक्रेते, वैद्यकीय, सामाजिक कार्याकर्ता इ.) परस्परांशी होणारे वर्तन व त्यांच्यातील परस्परसंबंध

 थोडक्यात, आरोग्याशी निगडीत असलेल्या सर्व बाबींचा वा घटकांचा अभ्यास हे शास्त्र करते. त्यामुळे त्याचा अभ्यास विषय अत्यंत व्यापक आहे

 

आरोग्याच्या समाजशास्त्राचे महत्व :

१) सैद्धांतिक महत्व

I) नव्या संकल्पनाची निर्मिती जुन्या संकल्पनांची पुनर्रचना व कालबाह्यता ठरविणे

II) नव्या सिद्धांताची निर्मिती जुन्या सिद्धांताची पुनर्रचना व कालबाह्यता ठरविणे

III) ज्ञान-विज्ञान निर्मिती - पुनर्रचना

२)व्यावहारिक महत्व

I)आरोग्य विषयक समस्यांचे निर्मुलन

II)आरोग्य धोरणाची आखणी आणि अमलबजावणी

III) सामाजिक संशोधक -सामाजिक कार्यकर्ते – संस्था यांना उपयुक्त

IV) शासन -प्रशासन -समाज यांना उपयुक्त

 

या कडे लक्ष द्या :

०१)या शास्त्रज्ञाने सार्वजनिक आरोग्य हे दंडनिय आहे अशी घोषणा केली.

अ) टॉलकॉट पार्सन्स ब) हर्मन बिम्स क) रॉबर्ट मर्टन ड) पार्क

२) आजाऱ्याची भूमिका ही संकल्पना यांनी मांडली.

 अ) रॉबर्ट मर्टन ब) पार्क व पार्क क) सझाझ ड) टॉलकॉट पार्सन्स

३)… ..ही शाखा रोगाभोवतालच्या मानवी वर्तनाच्या अभ्यासावर

विशेष भर देते.

अ) औषधाचे समाजशास्त्र ब) वैद्यकीय समाजशास्त्र क) आरोग्याचे

समाजशास्त्र ड) आरोग्यशास्त्र

 

४) समाजशास्त्रीयदृष्ट्या आजारी पडणे हे... वर्तन आहे.

अ) अनुचलनात्मक ब) अनुकूल क) विपथगामी ड) नैसर्गिक

५) औषधातील समाजशास्त्र व औषधाचे समाजशास्त्र हे वर्गीकरण... यांनी केले.

अ) रॉबर्ट मर्टन ब) रोबर्टट स्ट्रास क) सझाझ ड) पार्सन्स

६) आरोग्य व समाज यांच्यातील परस्परसंबंधाच्या अभ्यासासाठी सध्या……...हे अधिक व्यापक नाव वापरले जात आहे.

अ) औषधाचे समाजशास्त्र व) औषधातील समाजशास्त्र क) वैद्यकीय

समाजशास्त्र ड) आरोग्याचे व आजारपणाचे समाजशास्त्र

७) आरोग्याचे समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नसून ते... शास्त्रही आहे.

अ) वैचारिक ब) काल्पनिक क) विश्वसनिय ड) उपयोजित

८) आधुनिक राज्य हे... राज्य मानले जाते.

अ) पोलीस ब) अकल्याणकारी क) कल्याणकारी ड) सैनिकी

०९)जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची मूलभूत व्याख्या साली

(ब) १९५१ (अ) १९४८ (क) १९६१ ड )१९७१

१०)“आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्टिकोणातून अवस्था होय, तसेच रोग व दुबळेपणा यांचा अभाव होय" यांनी केली. ही

(अ) टी. एम्. डाक ब) पार्सन्स (क) थॉमस मॅकॉन (ड) जागतिक आरोग्य संघटन

११)आरोग्य हि वर्तमानातील ……………..गरज आहे ..

अ)कृत्रिम ब)चैनीची क)दुय्यम ड) मूलभूत

१२)कोणत्याही देशाची प्रगती हि त्या देशाच्या लोकांच्या निकोप ………वर अवलबून असते.

अ)विकृती ब) चैन क) विपथगमन ड)आरोग्य

१३) आरोग्याचे स्वरूप.... असते.

(अ) नैसर्गिक (क) वैज्ञानिक(ब) स्थल व कालसापेक्ष (ड) धार्मिक

१४ ) डॉ. सुधा काळदाते यांनी आरोग्याचे ..... घटक सांगितले आहेत.

(अ) चार(नैसर्गिक/शाररीक- मानसिक -जीवशास्त्रीय -सामजिक)

(ब) तीन     (क) पाच      ड)दहा

१५) सर्वसामान्यपणे निरोगी व्यक्तीचा रक्तदाब असला पाहिजे.

(अ) १२०/७० (ब) १२०/६० (क) १००/१२० (ड)८०/१२०

१६) यांच्या मते, अति उच्च रक्तदाब, कर्करोग, क्षयरोग यांचा संबंध हा सामाजिक आर्थिक परिस्थितीशी आहे.

(अ) मॅक-आयव्हर व पेज (क) गिलिन आणि गिलिन

(ब) टी. एम्. डाक (ड) ग्रॅहम आणि रिडर

 

१७) समाजातील जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या समाज ची असते.

(अ) शासनाची (ब) कुटुंबाची (क) व्यक्तींची ड) संस्कृती

१८). आरोग्य रक्षणासाठी ……हा घटकसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो.

(अ) समाजीकरण (ब) आंतरक्रिया क)समाज ड) संस्कृती

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...