Skip to main content

STD BA-I Notes For semester -II 2021

 STD Notes For BA-I Semester-II

(Modules one to three are included )

 

अचानक येणारे संकट म्हणजे आपत्ती होय.

आपत्ती ही नैसर्गिक आणि मानवनिर्मित अश्या दोन प्रकारची असते. बदलत्या काळात काही आपत्ती या मिश्र स्वरूपाच्या आहेत.

नैसर्गिक आपत्ती या निसर्गाचा अपरिहार्य भाग आहेत तर मानवनिर्मित आपत्ती मुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

व्यवस्थापन करतांना मानवनिर्मित आपत्ती टाळणे आणि नैसर्गिक आपत्ती मुळे होणारे नुकसान कमींत कमी करणे अपेक्षित असते.

आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसैर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती मुळे होणारे नुकसान कमीत कमी करण्या साठी केल्या जाणाऱ्या विविध स्तरातील उपाययोजना होत.

आपत्ती चे तीन पातळीवर व्यवस्थापन करता येते.

१) प्रतिबंधात्मक (आपत्ती येण्या पूर्वी )

२) उपचरात्मक (आपत्तीच्या दरम्यान )

३)उपाययोजनात्मक (आपत्ती येऊन गेल्या नंतर )

 

जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात.

भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लहरी" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे

 

 

 

 

भूकवचाखाली असणाऱ्या द्रवरूपी पदार्थामुळे जमिनीस जे हादरे  बसतात त्याला भूकंप म्हणतात

पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणविण्या इतक्या बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतातमराठी विश्व कोष

 

पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ उत्पन्न
होऊन तेथील खडकांना एकाएकी धक्का बसला म्हणजे
धक्क्याच्या स्थानापासून कंपने निर्माण होऊन ती सभोवार
पसरतात
, त्यालाच भूकंप म्हटले जाते.

 

नैसर्गिक रीत्या भूकंप होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत.

 

१)नैसर्गिक

२) मानवनिर्मित

पृथ्वीवर ज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत, आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण आहे.

मानवनिर्मित कारणामध्ये-   अणुचाचणी – धरणे -रेल्वे -मोटर वाहन  ई. चा समावेश होतो.

भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "सेस्मोग्राफ" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.

नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणामुळे नद्यांच्या पात्रातील पाणी नदी लगतच्या प्रदेशात पसरते त्यामुळे जीवित-वित्त आदी हानी होते.

गंगा यमुना आणि ब्रम्हपुत्र नद्यांना वर्षातून दोनदा पूर येतो पैकी एक पूर हिमालयातील बर्फ वितळून पूर येतो.

अतिवृष्टी हे महापुराचे प्रमुख कारण आहे.

पूर नियंत्रण रेषेतील बांधकाम आणि वाढता प्लास्टिक चा गैरवापर मुळे शहरातील पुराची गंभीरता वाढली आहे.

इतर आपत्तीच्या तुलनेत वाहतुकीच्या अपघातामुळे सर्वात जास्त (३८.५%)मृत्यू होतो. रेल्वे अपघातामुळे होणारे होणारे प्रमाण ही लक्षणीय आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या प्रदेशात गर्दीची समस्या आहे .

संसर्गजन्य रोगाचा फैलाव हा गर्दीचा परिणाम आहे

यात्रा-धार्मिक- राजकीय -सांस्कृतिक -सामाजिक समारंभ हे भारतातील गर्दीचे प्रमुख कारणे आहेत .

कौटुंबिक आणि औद्योगिक कारणे ही आग आपत्तीची प्रमुख कारणे आहेत.

मोठी आग शमवण्यासाठी अग्निशामक दलाचा वापर केला जातो.

 

संदेशवहनाची पारंपारिक साधने :

मानवी जीवना तील संदेश (स्वर ) उत्क्रांतीचा इतिहास किमान दोन लाख वर्षा पूर्वीचा आहे.

चिन्ह/ संज्ञा (३००००वर्षा पूर्वी )  -संकेत –

टपाल –(भारतात ही सेवा १८३७ ला सुरु )

तारयंत्र :१८३६ मोर्स याने शोध लावला)

दूरध्वनी ((१८७६ -अलेक्झांडर ग्रेह्मबेल याने शोध लावला)

आकाशवाणी  (रेडीओ लहरीवर आधारित संदेशवहन १८९५)

भ्रमणध्वनी : (१९४६ -अमेरिकेतील सेंट लुईस येथे शोध )

रडार: १८८८ हेनरीच हर्टस याने  कल्पना मांडली. रेडीओ  लहरी द्वारे एखाद्या गोष्टीचे स्थान आणि गती सांगितली जाते.

दूरचित्रवाणी १९४५ जॉन बेअर्ड ने शोध लावला

टेलेक्स :

फैक्स:

संगणक :

Computer चे मराठी भाषांतर म्हणजे गणना करणे होय

संगणकाच्या चार पिढ्या :

०१) १९४६ ते १९५९ -इकरट आणि मोचली -आकार मोठा – माणसा पेक्षा ३०० पट अधिक वेगाने आकडेमोड

०२) दुसरी पिढी :१९५९ ते १९६५ -संगणकाची गती १० पटीने वाढली. फोत्रोन ही संगणकाची भाषा तयार झाली.

०३) तिसरी पिढी : (१९६५- ते १९७५)

संगणकाचा आकार छोटा सेकंदात लाखो सूचना घेऊ लागला .अनेक उपकरणे नवीन – कोबोल आणि अल गो ल ही भाषा विकसीत

०४) चौथी पिढी १९७५ ते आज तागायत :

अतिशय गतिमान -आकार प्रचंड छोटा – माहितीचा स्फोट होईल एवढ्या माहिती चा साठवणूक आणि   प्रचार -शिक्षण -आरोग्य -संदेश वाहन आणि दळणवळण -शाषण आणि प्रशाषण- संसोधन-सुरक्षा इ ठिकाणी वापर

माहिती तंत्रज्ञान म्हणजे संगणक व संदेशवहन तंत्राच्या आधारावर विकसित केलेलं तंत्रज्ञान कि जे निर्मिती ,नियोजन ,साठा-संपर्क आणि माहितच प्रसार याला मदत करते.

LAN-local area network

MAN- metro polytan network

WAN-wide area network

WWW-world wide web

URL- Uniform Resources locator

विदेश संचार निगम लिमिटेड या कंपनीची सर्व प्रथम भारतातील सेवा १४ ऑगस्ट १९९५ ला सुरु झाली .

वर्तमान जग/युग  हे डिजिटल जग/युग म्हणून ओळखले जाते

मोबाईल द्वारे हिचा सार्वत्रिक प्रचार होत आहे.

व्हायरस हा संगणक आणि इंटरनेट च्या यंत्रणेला हानी पोहचवू शकतो.

ई-इल   सोसीअल मेडिया या आजच्या जगाच्या दैनदिन बाबी बनल्या आहेत.

भारताचा इतिहास हा वैज्ञानिक दृस्ठीने वैभवशाली होता. प्राचीन काळी भारताने अवकाश संशोधनात प्रगती केली होती

वराहमिहिर -आर्यभट -ब्रम्ह्गुप्त-ई चे महत्वाचे योगदान

०४ आक्टोबर१९५७ रोजी रशियाने स्पुतीनिक-०१ हा उपग्रह अवकाशात पाठवून उपग्रह युगाचा प्रारंभ केला

अवकाशात जाणाऱ्या मानवाला अंतराळ वीर म्हणतात

३१ जानेवारी १९५८ ला अमेरिकेने एक्सप्लोरर-०१ अवकाश यान पाठवविले

जगातील पहिला अंतराळ वीर युरी गागरीन हा होय (१९६३)

व्हालेटीना तेरेस्कोवा ही पहिला महिला  अंतराळ वीर आहे

अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावर पाहिले पाउल टाकले (१९६९)

१९ एप्रिल १९७५ ला प्रथमच आर्यभट हा उपग्रह भारताने अवकाशात पाठवविला

अवकाशात कोणतेही उपकरण -उपग्रह -मानवी-यांत्रिक यान ई. ना अवकाशात पाठविन्याचे काम उपगृह करते

इंधन प्रणालीच्या आधारावर अग्निबाण चे तीन प्रकार पडतात

१)घन इंधनी अग्निबाण

२)द्रव इंधनी अग्निबाण

३)मिश्र इंधनी अग्निबाण

क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे विकसित तंत्रज्ञान असून भारत या मध्ये स्वयंपूर्ण आहे.

अग्निबाण हे दुधारी तंत्रज्ञान आहे

अब्दुल कलाम यांना मिसाईल मैन म्हणतात

कृत्रिम उपग्रहात विद्युत सौरघट पुरविते

रेडीओ लहरी द्वारे संदेश पोहचविण्याचे काम होते

कृत्रिम उपग्रहाचे कामा नुसार प्रकार

वैज्ञानिक संशोधन

हवामान

सुरक्षा /लष्करी

संदेशवहन

दूरसंवेदन

मार्गदर्शक

भ्रमण कक्षे नुसार प्रकार :

कमी उंचीचा

भूस्थिर

सूर्य स्थिर

मोलोनिया

 

भारता चे अग्निबाण तंत्रज्ञान

SLV- ASLV-PSLV-GSLV

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ची स्थापना १९६९ ला झाली

१९७२ ला अवकाश विभाग स्वतंत्र झाला

विक्रम साराभाई केंद -थिरुअनंतपूरम

अवकाश उपाययोजना केद्र -गुजरात अहमदाबाद

उपग्रह केद्र- बंगलोर

सतीशधवन केंद्र -श्रीहरी कोटा आंध्र प्रदेश

INSAT ही भारताची उपगृह मालिका आहे

IRS ही दूरसंवेदन उपग्रह प्रणाली आहे.

 

  

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...