Rural
Sociology -ग्रामीण समाजशास्त्र
Module-01
Introduction
to Rural Sociology
६९%
जनतेचे शेतीवर अवलंबन आणि खेड्याचे
रहिवासी
खेडणे म्हणजे जमीन कसणे खेडूत म्हणजे जमीन कसणारा
खेडूताची वस्ती म्हणजे गावडे किंवा खेडे होय ज्या मध्ये भरण्याची वस्ती ही शेतकर्यांची
असते ….(गावगाडा )
A)“ग्रामीण समाजशास्त्राचा अर्थ”
स्टूअर्ट चैपिअन :- “ग्रामीण जीवनाचे समाज शास्त्र
म्हणजे, ग्रामीण लोकसंख्येचा, ग्रामीण संघटनाचा व ग्रामीण समाजात
प्रभावी असणार्या सामाजिक
प्रक्रियेचा अभ्यास होय.”
टी. एल. स्मिथ :- “ग्रामीण सामाजिक संबंधाचा वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या अभ्यासात निष्पन्न
झालेल्या आवश्यक घटना व
मुलभूत तत्वे एकत्रित करण्याचे कार्ये ग्रामीण समाज शास्त्र करते.”
ए.आर. देसाई :- “ग्रामीण समाजशास्त्र हे ग्रामीण समाजाचे विज्ञान होय. सर्वसामान्यपणे
ग्रामीण समाज रचनेचे
व विकासाचे नियम
विवक्षित ग्रामीण समाजाचे नियंत्रण
करणाऱ्या विशिष्ट कायद्याचा शोध घेण्यास आपणास साह्यभूत होतील.”
लैंडक्वीस्ट व कार्व्हर:- “ग्रामवासीयांच्या सामाजिक प्रश्नांशी निगडीत असणाऱ्या सर्व विषयांचा अभ्यास ग्रामीण
समाजशास्त्रात केला जातो.”
डी. सैडरसन:- “ग्रामीण समाजशास्त्र हे ग्रामीण पर्यावरणातील जीवनाचे समाजशास्त्र आहे.”
B)-01“ग्रामीण समाजशास्त्राचा उदय आणि विकास”
१८३८-३९
फ्रान्स मध्ये ऑगस्त कौम्त यांच्या द्वारे उदय
सुरवातीला शहरी
समाजाचा अभ्यास करण्यात आलेला दिसतो.
१८९०-१९२०
ग्रामीण समाजशास्त्रा विकासाचा काळ-
अमेरिकेत
औद्योगिक मंदीचा काळ
शहरी जीवना
बरोबर च ग्रामीण जीवन उध्वस्त
मूलभूत
गरजांची अडचण
अमेरिकेचे
अध्यक्ष थीओडोर रूझवेल्ट यांनी ग्रामीण जीवनाचा अभ्यास करण्यासाठी समिती (country life commission) गठीत केली. या समितीच्या सुचनेनुसार ग्रामीण जीवना चा सर्वेक्षण करण्यात आले.
डीन बेली हे त्याचे अध्यक्ष होते. ५००० प्रश्नाची ही
प्रश्नावली एक लाख लोकाकडून
भरून घेण्यात आली. ए.आर . देसाई म्हणतात कि, या समितीचा अहवाल म्हणजे ग्रामीण समाजशास्त्राचा चार्टर
च होय.
1919 मध्ये अमेरिकेत शेती खात्या तर्फे शेती मंडळाची स्थापना ---प्रायोगिक केंद्राची
स्थापना
समाजशास्त्र संसोधन मंडळाची स्थापना
१९३६-ग्रामीण
समाजशास्त्र हे त्रैमासिक
१९३७ -ग्रामीण समाजशास्त्रीय संस्था ची स्थापना
विविध ग्रंथ
लेखन :- (१९०६-१९१२)
वारेन विल्सन ,
सिम्स आणि विल्यम यांनी ‘ ऐन
अमेरिकन व्हिलेज हा ग्रंथ लिहिला
वारेन विल्सन-ग्रामीण धर्म शासन
गल्विन -शेतकरी समुदायाचे सामाजिक
शरीरशास्त्र
जॉन गिळ गिलेट
-ग्रामीण समाजशास्त्र
B-02समाजशास्त्रज्ञाचा जागतिक अभ्यास :-
कैलिफोर्निया
-डॉ.डग्लस एनस्मिगर
हॉवर्ड विरसनी-
ग्रीक ग्रामीण प्रोढ शिक्षण
टी एल स्मिथ
-ब्राझील
कार्ल टायलर
-आर्जेन्टिना
किमान ८०० प्राध्यापक आणि संशोधक यांचे योगदान
जागतिक संस्था
:- UN संयुक्त राष्ट्रे , ILO आंतरराष्ट्रीय कामगार
संघटना
FAO अन्न व शेती संघटना, IFAD आंतरराष्ट्रीय कृषी विकास
निधी
WHO जागतिक आरोग्य संघटना ई.
संयुक्त
राष्ट्रे (UN) यांच्या मानवी हक्क समितीने २०१८ ला “Rights of Peasants and Other People Working in
Rural Areas” या नावाने ठराव पास केला.
B-03भारतातील ग्रामीण समाजशास्त्राचा उदय आणि विकास:
वेद आणि जैन -बौद्ध धर्माचे ग्रंथ
“इंडिका” या ग्रीक राजदूत
मेगैस्थेणीस च्या अभ्यासात भारतीय खेड्याचा स्वतंत्र गणराज्य असा उल्लेख
१६८९-
ईस्ट इंडिया कंपनी द्वारे भारतीय खेड्याचा अभ्यास
मद्रास- मैसूर- बंगाल- बिहार ई मध्ये १८८० च्या दरम्यान फ्रान्सिस बुकानन यांच्या
द्वारे खेड्याचा अहवाल
१८८३ ला जोतीबा फुले यांचा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ
प्रकाशित
१८८८ ला ड्युक ऑफ केनोट भेटीत जोतीबा यांची शेतकरी प्रतिनिधी म्हणून भेट
गावगाडा….ग्रंथ त्रि .ना.आत्रे १९१५
१९३५ बंगाल च्या शांतीनिकेतन जवळच्या खेड्याचा भट्टाचार्य
ई. द्वारे अभ्यास
१९४० -गोखले
संस्था पुणे – खेड्याचे सर्वेक्षण
१९४३ -बंगाल
दुष्काळ चा खेडे च्या जीवना वरील अभ्यास
१९४९ केशवराव जेधे यांची “शेतकरी कामगार पक्षाची” स्थापना
“जय जवान-जय किसान” ही घोषणा (१९६५)पंतप्रधान लाल बहादूर
शास्त्री यांनी केली
१९५० नंतर समाजशास्त्रीय अभ्यास :
दुबे यांचे Indian Village, मुजुमदार यांचे Rural
Profile – श्रीनिवास यांचे -India’s Villages- ए आर देसाई यांचे Rural Sociology in India ई.
C)ग्रामीण समाजशास्त्राची
व्याप्ती :
१)ग्रामीण
समाजशास्त्र हे एक विज्ञान आहे
२) ग्रामीण
समाजशास्त्र ही समाजशास्त्राची ज्ञान शाखा
आहे
३) ग्रामीण
समाजशास्त्र हे एक अनुभावाधीष्टीत विज्ञान आहे
४) ग्रामीण समाजशास्त्र
हे एक वस्तुनिष्ठ (तथ्यात्मक)विज्ञान आहे
५) ग्रामीण
समाजशास्त्र हे एक उपयोजित विज्ञान आहे
०६) ग्रामीण
समाजशास्त्र हे एक ग्रामीण जीवना बरोबरच समग्र मानवी जीवनाचे ही विज्ञान आहे
०७)ग्रामीण
समाजशास्त्र हे शहर/नागर भेद आणि सातत्य चे विवेचन करते
०८)ग्रामीण
समाजशास्त्र ची वैज्ञानिक पद्धत ग्रामीण जीवनाच्या नियमा बरोबरच पुनर्रचनेच्या
(पुनर्बांधणी) च्या नियमाचे हे विवेचन करते.
०९) ग्रामीण
समाजशास्त्र हे एक पूर्वकथनक्षम विज्ञान
आहे
D) ग्रामीण समाजशास्त्राचा
अभ्यास विषय:
१)ग्रामीण सामाजिक आंतरक्रिया-संबंधाचा अभ्यास
२) ग्रामीण समाजव्यवस्था -संरचनेचा अभ्यास
०३) ग्रामीण सामाजिक संस्थाचा अभ्यास
०४)ग्रामीण- नागरी भेद आणि सातत्य चा अभ्यास
०५)ग्रामीण पर्यावरणाचा अभ्यास
०६)ग्रामीण सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास
०७) ग्रामीण सामाजिक संघटनांचा अभ्यास
०८)ग्रामीण आर्थिक जीवनाचा अभ्यास- साधी अर्थव्यवस्था
(शेती -आलुतेदारी -बलुतेदारी)
०९)ग्रामीण धर्माचा अभ्यास
१०) ग्रामीण परंपरा -रूढी -लोकनीती- कायदे ई. चा अभ्यास
११)ग्रामीण सण-उत्सवाचा अभ्यास
१२)ग्रामीण समस्यांचा अभ्यास
१३) प्रतिकूल
स्थितीत टिकण्याच्या क्षमतेचा अभ्यास
१४)ग्रामीण पुनर्रचना चा अभ्यास
१५) ग्रामीण परिवर्तनाचा अभ्यास
E) ग्रामीण समाजशास्त्राचे महत्व:-
१) ऐतिहासिक महत्व
२) सर्वांगीण उपयुक्तता
३)बहुसंख्यकाचे शास्त्र
४)मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग
५)ग्रामीण समाजशास्त्राच्या संकल्पना- पद्धती-
नियम-सिद्धांत चा अभ्यास
०६)शासकीय- अशासकीय धोरण निर्मिती साठी उपयुक्त
०७) प्रशासनिक उपयुक्तता
०८) सामाजिक पुनर्रचना आणि सामाजिक पुनर्बांधणी साठी
उपयुक्त
०९) सामाजिक परिवर्तनाला समजून घेण्या साठी
१०) सामाजिक कार्ये आणि सामाजिक कार्यकर्ते यांना उपयुक्त
Comments
Post a Comment