Skip to main content

Observation Module-02( Methods of Social Research-II)

  

निरीक्षण (Observation)

 

निरीक्षण हे सामाजिक संशोधनातील एक अतिशय महत्वाचे असे तंत्र आहे. भौतिक किंवा नैसर्गिक शास्त्रात निरीक्षणाचा अवलंब केला जातो. इतकेच नव्हे तर शास्त्राची सुरूवातच हो निरीक्षणापासून झाली आहे.

गुड आणि हॅट (Good and Hatt) यांनी म्हटले की, 'शास्त्राचा प्रारंभ हा निरीक्षणापासून झाला आहे. आणि त्याच्या सत्यापणास अंतिम रूप देण्यासाठी निरीक्षणाकडे वापस यावे लागते.' (Scicnce begins with observation and must ultimately return to observation for its final validation-Goode and Hatt.) समाजशास्त्राचे जनक ऑगस्त कॉम्ट (August Komte) स्पष्ट केले होते की, "जर समाजशास्त्राला शास्त्रीय आधारावरील एक शास्त्र बनायचे असेल तर निरीक्षण तंत्राद्वारा त्याच्या विषय वस्तूचे अध्ययन व्हायला पाहिजे."

निरीक्षणाचा अर्थ (Meaning of Observation)

निरीक्षण हा शब्द इंग्रजी भाषेतील 'Observation' या शब्दाचा पर्यायी शब्द आहे. त्याचा अर्थ हा पाहणे, अवलोकन करणे किंवा निरीक्षण करणे हा आहे.

() पॉलिन यंग (Pauline Young) : “निरीक्षण हे डोळ्याद्वारा विचारपूर्वक केलेले अध्ययन आहे ज्याचा उपयोग सामूहिक व्यवहार आणि जटिल सामाजिक संस्थांच्या बरोबरच संपूर्णतेचे निर्माण करणाऱ्या वेग-वेगळ्या एककाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याच्या एका पद्धतीच्या रूपात केला जाऊ शकतो. "("Observation A deliberate study through the eye may be used as one of the methods for scrutinizing collective behaviour and complex social institutions as well as the separate units composing a totality." - Paulive Young. )

(२) सी. ए. मोसर (C. A. Maser) : "दृढ अर्थाने कान आणि वाणीच्या अपेक्षेत डोळ्यांचा उपयोग निरीक्षणात केला जातो."("In the strict sense, observation implies the use of the eye rather than of the ears and the voice." C. A. Moser )

(३) आक्सफोर्ड कन्साईज शब्दकोष (Oxford Concise Dictionary) घटनातील पारस्पारिक संबंध किंवा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी घटनांचे केलेले यथार्थ अवलोकन म्हणजे निरीक्षण होय." ("Accurate watching, nothing of phenomena as they occur in nature with regent to cause and effect or mutual relations. Oxford Concise Dictionary)

निरीक्षण तंत्राची वैशिष्ट्ये  (Characteristics of Observation Technique)

(१) मानवी इंद्रियांचा पूर्ण उपयोग (Full Use of Human Senses) निरीक्षण तंत्रामध्ये मानवी इंद्रियाचा पूर्णपणे उपयोग केला जातो. जरी निरीक्षणात कान, वाणी आणि डोळ्याचा उपयोग केला जात असला तरी डोळ्याच्या उपयोगावर विशेष भर दिला जातो.

(२) उद्देशपूर्ण आणि सूक्ष्म अध्ययन (Deliberate and Minute Study) : निरीक्षण तंत्रात निरीक्षण हे नेहमीच आणि सूक्ष्म असते. या अर्थाने हे निरीक्षण सामान्य निरीक्षणापेक्षा वेगळे आहे. प्रत्येक व्यक्ती नेहमीच काही ना काही बघत असतात. परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यास निरीक्षण म्हटले जात नाही.

(३) प्रत्यक्ष अध्ययन (Direct Study) निरीक्षण तंत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे आहे. की, यामध्ये प्रत्यक्ष अध्ययन केले जाते. संशोधनकर्ता स्वतः संशोधन क्षेत्रात जातो. आणि प्रत्यक्ष तथ्यांचे संकलन करावे म्हणून ही पद्धत अधिक विश्वसनीय आहे.

(४) पारस्पारिक आणि कार्यकारण संबंधाचा शोध लावणे (To Know About Mutual and Causc Effect Relationship): पारस्पारिक आणि कार्यकारण संबंधाचा शोध घेणे हे देखील निरीक्षणाचे एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. संशोधनकर्ता आपल्या अध्ययन विषयाच्या संदर्भात निरीक्षण करून घटनेच्या कार्यकारण संबंधाचा शोध घेतो.

 (५) सामूहिक व्यवहाराचे अध्ययन (Study of the Collective Behaviour) निरीक्षणात सामूहिक व्यवहाराचे अध्ययन केले जाते. वैयक्तिक व्यवहाराचे अध्ययन निरीक्षण तंत्रात केले जाते. त्याचप्रमाणे सामूहिक अध्ययन करण्याचे हे एक चांगले तंत्र आहे.

०६) व्यावहारिक आणि अनुभवाधिष्ठित अध्ययन (Empirical Study) : निरीक्षण हे कोणत्याही प्रकारच्या कल्पनावर आधारित नसते. निरीक्षणात अनुभवाधिष्ठित अध्ययन केले जाते.

 

निरीक्षणाचे प्रकार (Types of Observation)

 

विविध विचारवंतानी निरीक्षणाचे पुढील प्रकारे वर्गीकरण केले आहे.

(अ) गुड आणि हॅट यांचे वर्गीकरण : गुड आणि हॅट यांनी निरीक्षणास दोन मोठ्या भागात विभाजित केले आहे.

(१) सामान्य निरीक्षण पद्धती: यामध्ये अनियंत्रित सहभागी आणि असहभागी निरीक्षणाचा अंतर्भाव होतो.

(२) व्यवस्थित निरीक्षण पद्धती : यामध्ये नियंत्रित निरीक्षणाचे दोन्ही प्रकार निरीक्षणकर्त्यावर नियंत्रण आणि अध्ययन घटनेच्या नियंत्रणाचा समावेश करण्यात आला आहे.

(ब) पी. व्ही. बंगच्या मते

(१) अनियंत्रित निरीक्षण सहभागी आणि असहभागी (२) नियंत्रित निरीक्षण

 

(क) सेल्टिज, जहोडा, डवॉइश व कुक यांच्या मते

(१) संरचित निरीक्षण                         (२) असंरचित निरीक्षण

(ड) लुंडबर्ग, मोजर व कालटन, इत्यादीच्या मते

(१) सहभागी निरीक्षण                        (२) असहभागी निरीक्षण

वेगवेगळ्या विचारवंतानी निरीक्षणाचे विविध प्रकार सांगितले आहे. या सर्व प्रकारांचा वचार करून निरीक्षणाचे पुढील प्रकार पाडण्यात आले आहे.

(१) अनियंत्रित निरीक्षण(UncontrolledObservation)

(२)नियंत्रित निरीक्षण(Controlled Observation)

(३) सहभागी निरीक्षण (Participant Observation) (

४) असहभागी निरीक्षण (Non Participant (Observation)

(५) अर्थ सहभागी निरीक्षण (Quasi-Participant Observation)

(६) सामूहिक निरीक्षण (Mass (Observatin)

 

निरीक्षणाचे प्रकार    (Types of Observation)

(१) अनियंत्रित निरीक्षण (Un-Controlled Observation) ज्यांचे निरीक्षण करायचे आहे, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे निरीक्षण नसते. ज्या परिस्थितीमध्ये क्रिया घडतात. त्याच परिस्थितीमध्ये त्या क्रियांचे निरीक्षण केले जाते. निरीक्षणकर्त्यावर आणि ज्याचे निरीक्षण करायचे आहे त्या परिस्थितीवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवले जात नाही. निरीक्षणकर्ता मुक्तपणे त्या घटनांचे निरीक्षण करतो. म्हणून या निरीक्षणास अनियंत्रित निरीक्षण असे म्हणतात.

 पॉलिन यंग (Pauline Young) यांच्या मते, "अनियंत्रित निरीक्षणात वास्तविक जीवनाच्या परिस्थितीची सूक्ष्म परीक्षा केली जाते. ज्यामध्ये यथार्थतेच्या तंत्राचा उपयोग किंवा निरीक्षण केल्या गेलेल्या घटनाच्या शुद्धतेची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला जात नाही."

गुड आणि हॅट (Good and Hatt), "मानवा जवळ सामाजिक संबंधाबाबत जे काही ज्ञान आहे. त्यापैकी बहुतांश भाग हा अनियंत्रित निरीक्षणाद्वारा प्राप्त झाला आहे. मग ते सहभागी किंवा असहभागी निरीक्षण असो." ("Most of the Knowledge which, People have about social relation is derived from uncontrolled observation whether participant on non-participant" - Goode and Hatt

 

अनियंत्रित निरीक्षणाचे गुण व उपयोगिता

(Merits and Importance of Un-Controlled Observation)

(१) व्यक्ती व घटनाचे सामाजिक रूप आणि स्वाभाविक रूप बघण्यास मदत होते.

(२) सर्वेक्षण कर्त्याला निरीक्षणासाठी विशिष्ट सामुग्रीची आवश्यकता नसते.

(३) अनियंत्रित निरीक्षण वस्तुनिष्ठ असते.

(४) व्यक्तीच्या व्यवहारावर कोणतेच नियंत्रण नसते.

5) सामाजिक संबंधाचे ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टीने अनियंत्रित निरीक्षण ही एक अतिशय महत्वाची पद्धतीत आहे.

 

अनियंत्रित निरीक्षणाचे मुख्य दोष (Main Defects of Un-Controlled Observation)

(१) अनियंत्रित निरीक्षणात निरीक्षण कर्त्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. त्यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे तो कोणतीही चूक करू शकतो. तसेच तो पक्षपात देखील करू शकतो.

(२) या निरीक्षण पद्धतीत निरीक्षण कर्त्यावर निरीक्षण नसते. त्यामुळे कोणत्या विशेष व्यक्तींचे निरीक्षण करताना त्याच्यात भावनात्मकता निर्माण होऊ शकते. (३) या निरीक्षणात अनावश्यक तथ्यांचे देखील संकलन केले जाते.

(४) व्यक्तिगत पक्षपात होण्याची शक्यता अधिक असते.

(५) या निरीक्षणात सत्यापनाचा अभाव असतो.

 

(अ) सहभागी निरीक्षण (Controlled Observation)

 

अनियंत्रित निरीक्षणाचे तीन प्रकार आहेत. सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण आणि अर्ध-सहभागी निरीक्षण हे अनियंत्रित निरीक्षणाचेच प्रकार होत

सहभागी निरीक्षण हा निरीक्षण तंत्राचा एक अतिशय महत्वाचा प्रकार आहे. सहभागी निरीक्षण (Participant Observation) या शब्दाचा उल्लेख सर्वात प्रथम लिडमन (Lindman) यांनी १९२४ मध्ये प्रकाशित केलेल्या 'Social Discovery' या पुस्तकात केला.

गुड आणि हॅट यांनी म्हटले की, "जेव्हा संशोधनकर्ता आपल्याला या समूहाच्या सदस्याच्या रूपात स्वीकृत करण्यास योग्य समजतो. तेव्हा निरीक्षण पद्धतीचा उपयोग केला जातो."

जॉन मैज त्यांच्या मते, "जेव्हा निरीक्षणकर्त्याचे मन समूहाच्या इतर व्यक्तीच्या मनाशी जुळते. तेव्हा तो बाहेरून आलेला व्यक्ती अपरिचित राहत नाही. म्हणून त्यात सहभागी निरीक्षणकर्ता म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो."

अनेक मानवशास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनात सहभागी निरीक्षण पद्धतीचा उपयोग केला आहे. जॉन हॉवर्ड (John Howard) यांनी तर कैद्यायांचे अध्ययन करण्यासाठी तो अनेक वर्ष कैद्यासोबत जेलमध्ये राहिला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. मलिनोवस्की (Malinowski) यानी पश्चिम प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या अॅग्रोनॉट (Agronauts) जमातीचे अध्ययन केले. त्याचप्रमाणे मागारेट मिड (Margaret Mead), रेमंड फर्थ (Raymond Firth) ले प्ले (Le-Play) यांनी देखील आप-आपल्या संशोधनात सहभागी निरीक्षण पद्धतीचा उपयोग केला.

 

 

सहभागी निरीक्षणाचे गुण (Merits of Participant Observation)

 

() प्रत्यक्ष अध्ययन (Direct Study) सहभागी निरीक्षण तंत्राचा एक महत्त्वाचा गुण आहे.

(२) सखोल आणि सूक्ष्म अध्ययन (Most Intensive and Minute Study) : सहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्त्याला अध्ययन विषयाचे अतिशय सखोल आणि सूक्ष्म अध्ययन करण्याची संधी प्राप्त होते.

(३) वास्तविक व्यवहाराचे अध्ययन (Study of Actual Behaviour) सहभागी निरीक्षणामध्ये वास्तविक व्यवहाराचे अध्ययन करण्याची संधी प्राप्त होते. त्या समूहातील लोक मनमोकळेपणाने माहिती देतात. तसेच निरीक्षणकर्ता वास्तविक व्यवहाराचे अध्ययन सहजपणे करू शकतो.

(४) संकलित माहितीची पडताळणी (Examination of Collected Information Possible) सहभागी निरीक्षणात संकलित केलेली माहिती ही अधिक शुद्ध आणि विश्वसनीय असते.

(५) अतिशय सोपे अध्ययन (Easy Study) सहभागी निरीक्षण ही अध्ययनाची एक साधी आणि सोपी अशी पद्धत आहे. त्या समूहाच्या दैनंदिन जीवनाशी सहभागी झाल्यामुळे निरीक्षणकर्त्याला तथ्याचे संकलन सहजपणे करता येते.

सहभागी निरीक्षणाचे दोष आणि मर्यादा (Demerits and Limitations of Participant Observation)

(१) दीर्घ कालावधी (Long Period) सहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता हा प्रत्यक्ष त्या समूहात जाऊन काही काळ वास्तव्य करतो. त्यांच्या जीवनाशी एकरूप होऊन नंतर तथ्यांचे संकलन केले जाते. त्यामुळे या पद्धतीत बराच कालावधी लागतो.

(२) पूर्ण सहभाग अशक्य (Full Participation Not Possible) : सहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता प्रत्यक्ष सहभागी होत असला तरी तो त्या समूहाशी पूर्णपणे एकरूप होऊ शकत नाही निरीक्षणकर्ता हा काही काळ त्या समूहात राहतो. आपण या समूहाचा एक घटक नाही. आपणास या समूहाचे अध्ययन करायचे आहे. आपण याच्यापेक्षा वेगळे आहोत अशी जाणीव संशोधनकर्त्यामध्ये निर्माण होते.

(३) अपरिचितपणाचा लाभ शक्य नाही (Advantage of Stranger Not Possible) समूहाच्या जीवनाशी एकरूप झाल्यामुळे अधिक सखोल आणि सूक्ष्म अध्ययन करणे शक्य होते. परंतु त्यामुळे निरीक्षणकर्त्याला अपरिचितपणाचा लाभ मिळत नाही.

() समूहाच्या व्यवहारात परिवर्तन (Change in Group Behaviour) : निरीक्षणकर्ता समूहाच्या व्यवहारात सहभागी होतो. म्हणून समूहाच्या व्यवहारात परिवर्तन होते. समूहाबाहेरील सदस्य समूहामध्ये येऊन राहतो. तेव्हा त्या लोकांना त्या परक्या व्यक्तीविषयी शंका असते. त्यामुळे ते लोक स्वाभाविकपणे वर्तन करीत नाही.

(५) वस्तुनिष्ठता शक्य नसते (Objectivity Not Possible) निरीक्षणकर्ता त्या समूहातील लोकांच्या भाव भावनाशी एकरूप होतो. निरीक्षणकर्ता आणि समूहातील सदस्य यांच्यात भावनात्मक संबंध प्रस्थापित होतात. त्यामुळे निरीक्षणकत्यनि केलेले निरीक्षण हे वस्तुनिष्ठ राहणे अशक्य असते. भावनात्मकतेमुळे वस्तुनिष्ठ निरीक्षण करणे संशोधनकर्त्याला शक्य नसते.

() अधिक खर्चाची पद्धत (Most Expensive Method) सहभागी निरीक्षण पद्धतीत निरीक्षणकर्ता प्रत्यक्ष अध्ययन क्षेत्रात जाऊन तेथे वास्तव्य करतो तसेच वास्तव्याचा कालावधी देखील बराच मोठा असतो

(ब) असहभागी निरीक्षण (Non Participant Observation)

असहभागी निरीक्षण हा देखील अनियंत्रित निरीक्षणाचाच एक प्रकार आहे. असहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता त्या समूहात जाऊन वास्तव्य करीत नाही. येथे तटस्थ वृत्तीने त्या अध्ययन समूहाचे निरीक्षण केले जाते त्याच्यात सहभागी न होता बाहेरूनच निरीक्षण करून त्या अध्ययन विषयाचे सखोल अध्ययन करण्याच्या प्रयत्न केला जातो.

वैशिष्ट्ये (Characteristics)

(१) निरीक्षणकर्ता किंवा संशोधक हा असहभागी निरीक्षणामध्ये समूहात सहभागी होत नाही. तो तटस्थ वृत्तीने निरीक्षण करतो.

(२) यामध्ये संशोधक केवळ ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून संध्य संकलन करतो.

(३) या निरीक्षणात संशोधक अध्ययन समूहाच्या व्यवहारामध्ये भाग घेत नाही. किंवा त्यांच्याशी समन्वय साधल्या जात नाही.

(४) या निरीक्षणपद्धतीत केवळ समूहाच्या बाह्यांगाचे निरीक्षण केले जाते.

(५) कोणतीही महत्वपूर्ण घटना निरीक्षणातून सुटू नये म्हणून निरीक्षण हे सावध आणि सतर्क राहून केले जाते.

(६) असहभागी निरीक्षणाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वस्तुनिष्ठता हे होय. यामध्ये तटस्थ वृत्ती ठेवून निरीक्षण केले जाते. त्यामुळे हे निरीक्षण अधिक वस्तुनिष्ठ होते.

असहभागी निरीक्षणाचे फायदे वा गुण (Merits of Non-Participant Observations)

 (१) वस्तुनिष्ठता (Objectivity) : असहभागी निरीक्षणात वस्तुनिष्ठता किंवा यथार्थता अधिक असण्याची शक्यता आहे. कारण अशा प्रकारच्या निरीक्षणामध्ये निरीक्षणकर्ता आपल्या अध्ययन समूहाशी एकरूप होत नाही. पक्षपात होण्याची शक्यता नसते, म्हणून ही पद्धत अधिक वस्तुनिष्ठ आहे.

(२) विश्वसनीयता (Reliability) असहभागी निरीक्षणात वस्तुनिष्ठता राखणे शक्य असल्यामुळे निरीक्षणकर्ता विश्वसनीय तथ्यांचे संकलन करतो. निरीक्षणकर्ता जशी घटना बघतो, त्यानुसार तो तथ्य गोळा करतो. म्हणून या पद्धतीत विश्वसनीय तथ्यांचे संकलन केले जाते.

(३) लोकांचे सहकार्य (Co-Operation of People) : असहभागी निरीक्षण पद्धतीमध्ये निरीक्षणकर्त्यास अधिक आदर आणि सहकार्य देखील मिळते. जेव्हा निरीक्षणकर्ता आपली ओळख त्या समूहातील लोकांना करून देतो. तेव्हा ते लोक त्याचा आदर करतात. इतकेच नव्हे तर तथ्य संकलनाच्या दृष्टीने पाहिजे ते सहकार्य देखील करतात.

(४) वेळ, श्रम आणि पैशाची बचत (Saving of Time, Labour and Money) : सहभागी निरीक्षण पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीत वेळ, श्रम आणि पैशांची बरीच बचत होते. त्यामुळे वेळ, श्रम व पैसा या दृष्टीने देखील ही परवडणारी पद्धत आहे.

 

असहभागी निरीक्षणाचे दोष किंवा मर्यादा

(Demerits and Limitations of Non Participant Observation)

 

(१) असहभागी निरीक्षण पद्धतीत काही माहिती मिळते. परंतु पूर्ण ज्ञान मात्र प्राप्त होत नाही. या पद्धतीमुळे सखोल आणि सूक्ष्म अध्ययन करणे शक्य होत नाही.

(२) यामध्ये निरीक्षणकर्ता आपल्या दृष्टिकोनातून निरीक्षण करतो. आणि त्या अनुषंगाने तथ्यांचे संकलन करतो. तो प्रत्येक घटनेचा आपल्या दृष्टीने अर्थ काढतो. परंतु प्रत्यक्ष त्या घटनेबाबत समूहाचा कोणता दृष्टिकोण आहे हे कळत नाही.

(३) अध्ययन समूहाशी सहभागी न होता निरीक्षणकर्ता तटस्थ राहून निरीक्षण करतो, म्हणून निरीक्षणकर्त्याविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. तसेच निरीक्षणकार्याविषयी त्यांना आपलेपणा वाटत नाही, म्हणून लोक निरीक्षणकर्त्याला योग्य ते सहकार्य करीत नाहीत.

(४) असहभागी निरीक्षणामध्ये पूर्णतः असहभागी असणे शक्य नसते. ज्याप्रमाणे सहभागी निरीक्षणात पूर्णतः सहभागी होणे शक्य नसते, त्याचप्रमाणे असहभागी निरीक्षणात पूर्णतः असहभागी राहणे शक्य नसते.

(५) समूहातील लोकांच्या मनामध्ये निरीक्षण कयाविषयी संशय व शंका निर्माण झाल्यामुळे वे आपल्या व्यवहारात स्वाभाविकता ठेवू शकत नाही, निरीक्षणकर्त्याविषयी परकेपणाची भावना असते. म्हणून आपले अनेक सामाजिक व्यवहार आणि इतर गोपनीय व्यवहार त्यास कळू नये असे लोकांना वाटते. म्हणून निरीक्षणकर्ता असताना त्यांच्या व्यवहारात कृत्रिमता निर्माण होते,

 

(क) अर्ध सहभागी निरीक्षण (Quasi Participant Obseration)

सहभागी निरीक्षण आणि असहभागी निरीक्षण या दोन्ही पद्धतीची काही खास अशी वैशिष्ट्ये आहेत. तर काही त्रुटी देखील आहेत. म्हणून सहभागी आणि असहभागी निरीक्षण या दोन्ही निरीक्षण पद्धतीमधील दोष टाळण्यासाठी ….

गुड आणि हॅट (Good and Hatt) यांनी या दोन्ही पद्धतीच्या मधला एक मार्ग सांगितला. त्यालाच अर्ध  सहभागी निरीक्षण असे म्हणतात. यामध्ये सहभागी आणि असहभागी या दोन्ही पद्धतीमधील गुणांचा समन्वय करण्यात आला आहे. या अर्ध-सहभागी निरीक्षण पद्धतीत निरीक्षणकर्ता त्या समूहाच्या सर्वसामान्य क्रिया आणि व्यवहारांमध्ये सहभागी होतो. तरी देखील त्या समूहाच्या भावनात्मक प्रभावापासून निरीक्षणकर्ता स्वतःला अलिप्त ठेवतो. आणि तटस्थ वृत्तीने तो त्या समूहाचे निरीक्षण करतो.

 प्रा. विलियम व्हाइट (Prof. William White) यांनी अर्ध-सहभागी निरीक्षण पद्धतीचे समर्थन करताना स्पष्टपणे नमूद केले की, "आपला समाज हा जटिल आहे. त्यामुळे समाजाबाबत एकि‍करणाचा दृष्टीकोन हा व्यावहारिक नाही. एका वर्गाशी निरीक्षणकर्ता एकरूप झाला की, त्याचे इतर वर्गा सोबतचे संबंध हे संपुष्टात येतात. त्यामुळे अर्ध तटस्थ वृत्ती ठेवणे हेच अधिक चांगले असते. सामाजिक उत्सवात सहभाग घेणे, त्यांच्या सोबत खाणे पिणे इत्यादी व्यवहारात देखील सहभागी होणे. परंतु त्याच्या सोबत काही प्रमाणात सहभाग घेत असतानाच आपला उद्देश हा संशोधन करणे हा आहे. ही गोष्ट त्याने न विसरता त्या समूहाचे निरीक्षण करायचे. त्यामुळे निरीक्षण कर्त्याला सहभागी आणि असहभागी या दोन्ही निरीक्षण पद्धतीचा फायदा मिळू शकतो.

अर्ध-सहभागी निरीक्षणाचे गुण (Merits of Quasi Observation)

(१) अर्ध- सहभागी निरीक्षणामध्ये निरीक्षणकर्ता त्या समूहाशी पूर्णपणे एकरूप होत नाही. पूर्णपणे सहभागी न झाल्यामुळे निरीक्षणाची व्यावहारिकता नष्ट होत नाही.

(२) या निरीक्षण पद्धतीत सहभागी आणि असहभागी निरीक्षण या दोन्ही निरीक्षण पद्धतीच्या गुणांचा समावेश होतो. कारण सहभागी आणि असहभागी निरीक्षण पद्धतीच्या दोषापासून ही पद्धतमुक्त आहे.

(३) या निरीक्षण पद्धतीमध्ये वेळ, श्रम आणि पैशाची बचत होते.

(४) या निरीक्षण पद्धतीमध्ये उपयुक्त परिणाम प्राप्त होतात.

(५) या निरीक्षण पद्धतीत निरीक्षणकर्त्याला आपली तटस्थ वृत्ती टिकवून ठेवणे सहज शक्य होते.

दोष (Demerits)

(१) अर्थ सहभागी निरीक्षण पद्धतीमध्ये वास्तविक आणि सखोल अध्ययन करणे शक्य नसते. कारण निरीक्षणकार्ता समूहाशी एकरूप होत नाही...

(२) या निरीक्षण पद्धतीत केवळ बाह्यांगाचे निरीक्षण केले जाते.

(३) या निरीक्षण पद्धतीत काही प्रमाणात निरीक्षणकर्ता सहभागी होतो. त्यामुळे निरीक्षणकर्ता तटस्थ वृत्तीने निरीक्षण करू शकत नाही.

 

सहभागी आणि असहभागी निरीक्षणातील फरक

(Distinction Between Participant and Non-Participant)

(१) सहभागी निरीक्षणात संशोधनकर्ता किंवा निरीक्षणकर्ता हा स्वतः त्या अध्ययन समूहामध्ये जाऊन वास्तव्य करतो. याउलट असहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता हा त्या समूहामध्ये जाऊन राहत नाही. तर तो समूहात जाऊन तटस्थपणे निरीक्षण करतो.

 

(२) सहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता केवळ जाऊन तेथे राहत नाही तर तो त्या समूहाचा एक घटक बनून त्याच्या सर्व व्यवहारात सहभागी होतो. परंतु असहभांगी निरीक्षणात निरीक्षणकर्ता एक बाहेरील व्यक्ती म्हणून राहतो. पण तो त्याच्या व्यवहारात स्वतः सहभागी होत नाही.

(३) सहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता त्या समूहाशी एकरूप होऊन त्यांच्या आंतरिक जीवनाचे सखोल आणि सूक्ष्म अध्ययन करतो. याउलट असहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता त्या समूहाच्या जीवनातील केवळ बाह्य गोष्टींचेच निरीक्षण करतो.

(४) सहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता त्या समूहाच्या आंतरिक आणि गोपनीय गोष्टीबाबत माहिती प्राप्त करू शकतो. परंतु असहभागी निरीक्षणात मात्र एक परका व्यक्ती म्हणून निरीक्षणकर्त्याला त्याच्या सर्व आंतरिक आणि गोपनीय गोष्टींची माहिती प्राप्त होऊ शकत नाही.

(५) सहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता हा स्वतः विविध सामाजिक परिस्थितीमध्ये वारंवार भाग घेत असतो. त्यामुळे त्याने संकलित केलेली माहिती खरी आहे किंवा नाही याची त्याला पडताळणी करून घेता येते. परंतु असहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता हा अधून मधून त्या समूहात जातो. त्यामुळे संकलित केलेल्या माहितीची सत्यता त्याला पडताळून बघता येत नाही.

(६) सहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता हा त्या समूहाच्या जीवनाशी मिसळून जातो. आपण त्याचे अध्ययन करीत आहोत याची जाणीव त्या समूहाला निरीक्षणकर्ता होऊ देत नाही. त्यामुळे त्याला घटनांचे सरळ व स्वाभाविक स्वरूपात निरीक्षण करणे शक्य होते. तर असहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्ता हा त्या समूहाला अपरिचित असतो. अपरिचित असल्यामुळे त्यांच्याशी त्या समूहातील लोक मोकळेपणाने वागत नाही. निरीक्षणकर्त्यांशी व्यवहार करताना लोकांच्या व्यवहारात औपचारिकता निर्माण होते.

(७) सहभागी निरीक्षणात निरीक्षणकर्त्याचा अधिक वेळ, श्रम आणि पैसा खर्च होतो. याउलट असहभागी निरीक्षण पद्धतीत अधिक वेळ, श्रम आणि पैसा खर्च होत नाही. कारण निरीक्षणकर्ता त्या समूहात जाऊन राहत नाही तर अधून-मधून तो तेथे जात असतो.

(२) नियंत्रित निरीक्षण (Controlled Observation)

नियंत्रित निरीक्षण हे अनियंत्रित निरीक्षणाचे विकसित रूप होय. अनियंत्रित निरीक्षणातील दोष दूर करून अधिकाधिक प्रमाणात विश्वसनीय तथ्ये  संकलित करण्याच्या दृष्टीने नियंत्रित निरीक्षण पद्धतीचा विकास झाला आहे. नियंत्रित निरीक्षणात विविध साधनांचा उपयोग करून निरीक्षणास नियंत्रित केले जाते.. नियंत्रित निरीक्षणात सर्वप्रथम निरीक्षणाची एक संपूर्ण योजना तयार केली जाते. त्यानंतर विविध साधनाचा उपयोग करून निरीक्षणकर्ता निरीक्षण कार्य करतो. निरीक्षणकर्त्याला आपल्या इच्छेनुसार अध्ययन प्रक्रियेत आणि साधनामध्ये बदल करण्याचे स्वातंत्र्य नसते. तो आपल्या इच्छेनुसार कसेही निरीक्षण करू शकत नाही. म्हणूनच निरीक्षणाच्या या प्रकाराला नियंत्रित निरीक्षण असे म्हणतात.

 श्रीमती पॉलिन यंग (Smt. Pauline Young) यांनी नियंत्रित निरीक्षणाची व्याख्या करताना स्पष्टपणे प्रतिपादन केले की, "नियंत्रित निरीक्षण हे साधारणतः अशा निश्चित आणि पूर्व निर्धारीत योजनेच्या अनुसार संपन्न होते की, ज्या अंतर्गत पर्याप्त प्रमाणात प्रायोगिक कार्य पद्धतीचा समावेश केला जातो." (Controlled Observation is carried on according to definite prearranged plans which may include considerable experimental procedure. - Pauline Young.

 

नियंत्रित निरीक्षणाच्या प्रक्रियेत पुढील गोष्टींचा समावेश केला जातो.

(१) निरीक्षण केल्या जाणाऱ्या घटनेची किंवा क्षेत्राची स्पष्ट व्याख्या करणे.

(२) निरीक्षणासाठी आवश्यक आणि योग्य सामुग्रीची निवड करणे.

(३) निरीक्षणासाठी स्थान, वेळ, व्यक्ती इत्यादी एककांचे प्रमाणीकरण (Standarization) करणे

(४) आवश्यक माहिती लिहिणे,  

(५) निरीक्षणांच्या आवश्यकतेनुसार यंत्राचा उपयोग करणे.

नियंत्रित निरीक्षणातील नियंत्रणाचे प्रकार (Types of Controlled Observation) नियंत्रित निरीक्षणाचे किंवा नियंत्रित निरीक्षणातील नियंत्रणाचे दोन प्रकार आहेत.

 

(१) निरीक्षणकत्यांवर नियंत्रण (Control Over the Observer) नियंत्रित निरीक्षणातच निरीक्षणकर्त्यावर नियंत्रण ठेवले जाते, ज्या वस्तू, घटना किंवा परिस्थितीचे निरीक्षण करायचे आहे. त्याचे वस्तुनिष्ठ आणि योग्य पद्धतीने निरीक्षण करण्यात यावे. त्याकरिता निरीक्षणत्यनि व्यक्तिगत प्रभावापासून अलिप्त राहावे. तसेच त्याने कोणत्याही प्रकारचा पक्षपात करता कामा नये. म्हणून निरीक्षणकर्ता स्वतःच काही नियंत्रणाचा स्वीकार करतो. हे नियंत्रण अनेक साधने किंवा यंत्राचा उपयोग करून उदा. निरीक्षणापूर्वीच निरीक्षणाची विस्तृत योजना तयार करणे, अनुसूची व प्रश्नावलीचा उपयोग विस्तृत नोट्स, नकाशाचा उपयोग करणे, दैनंदिनी, फोटो, टेपरेकॉर्डर, फिल्म इत्यादी.

गुड आणि हॅट (Goode and Hatt) यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. की, "सामाजिक संशोधनकर्त्याला संशोधन विषयावर नियंत्रण ठेवणे अतिशय कठीण आहे. म्हणून कमीत कमी त्याने स्वतः वर तरी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे."

() सामाजिक घटनांवर नियंत्रण (Control Over Social Phenomena)  यामध्ये ज्या सामाजिक घटनांचे नियंत्रण करायचे असते त्या घटना नियंत्रित केल्या जातात. यालाच आपण 'सामाजिक प्रयोग' (Social Experiment) असे म्हणतो. भौतिकशास्त्रात भौतिक वस्तूंना प्रयोगशाळेत आणून नियंत्रित परिस्थितीत त्या वस्तूवर प्रयोग केले जातात. त्याच प्रमाणे सामाजिक घटनांना सामाजिक परिस्थितीच्या अंतर्गत नियंत्रित करून आणि अध्ययन कार्य संचालित करण्याचा प्रयत्न केला जातो; परंतु हे सोपे कार्य नाही. त्याकरिता सामाजिक शास्त्रज्ञाला विचारपूर्वक आणि कौशल्यपूर्वक कार्य करावे लागते. यालाच नियंत्रित निरीक्षण असे म्हणतात. नियंत्रित नियंत्रणाचे स्वरूप हे संरचित असते. म्हणून या निरीक्षणास संरचित निरीक्षण (Structured Observation) असे म्हणतात.

स्वयंनियंत्रणाची साधने (Means of Self Controlled) नियंत्रित निरीक्षणात निरीक्षणकर्ता स्वतःवर नियंत्रण ठेवण्याकरिता पुढील साधनाचा उपयोग करतो.

(१) विस्तृत निरीक्षण योजना (Detailed Observation Plan) : निरीक्षण कार्यास आरंभ करण्यापूर्वी निरीक्षणकर्ता किंवा संशोधक आपल्या निरीक्षणाची एक विस्तृत योजना तयार करतो. संशोधन विषयाच्या अनुषंगाने उपयुक्त अशी कोणती तथ्ये संकलित करायची आणि तो तथ्ये कशा प्रकारे संकलित करायची यासंबंधीचा निर्णय निरीक्षणापूर्वीच घेतला जातो अशा प्रकारच्या विस्तृत निरीक्षण योजनेमुळे आपले संशोधनकार्य व्यवस्थित आणि एका निश्चित दिशेने करण्यास संशोधनकर्त्यास मदत होते.

() अनुसूची (Schedule) नियंत्रित निरीक्षणात निरीक्षण अनुसूचीचा उपयोग केला जातो, नयंत्रित निरीक्षणाचे अनुसूची एक अतिशय महत्वाचे साधन आहे. निरीक्षणकर्ता अनुसूतील प्रश्नाच्या दृष्टीने निरीक्षण करून त्याबाबतची तथ्ये संकलित करीत असतो

() समाजमितीचे माप (Sociometric Measure) सामाजिक घटना या गुणात्मक असतात. गुणात्मक सामाजिक घटनांचे संख्यात्मक विवेचन करणे शक्य व्हावे म्हणून नियंत्रित निरीक्षणात समाजमितीच्या मापाचा उपयोग केला जातो. सामाजिक घटनांचे गुणात्मक मापन करताना पक्षपात होण्याची शक्यता असते. म्हणून गुणात्मक सामाजिक घटनांचे संख्यात्मक रूपात परिवर्तन करणे आवश्यक आहे. म्हणून नियंत्रित निरीक्षणात समाजमितीच्या मापाचा अवलंब करून निरीक्षणात अधिक वस्तुनिष्ठता आणली जाते.

() दैनंदिनी (Diary) निरीक्षणकत्यनि निरीक्षण केलेल्या आणि अनुभवलेल्या घटनांच्या नोंदी दैनंदिनीमध्ये केल्या जतात. दैनंदिनीमुळे निरीक्षणकर्त्यावर एक प्रकारे नियंत्रण ठेवले जाते. कार्ड दैनदिनी (Card Diary) हा देखील दैनंदिनीचा एक प्रकार आहे. रोज जे काही निरीक्षण केले जाते ते एका कार्डवर लिहून ठेवले जाते. नंतर हे सर्व कार्डस् पंच करून व्यवस्थित ठेवले जाते.

(५) यांत्रिक साधने (Mechanical Devices): नियंत्रित निरीक्षणात फोटोग्राफ, टेपरेकॉर्डवर फिल्म इत्यादीचा उपयोग केला जातो. निरीक्षणकर्ता निरीक्षण करीत असताना या सर्व साधनांचा वापर करतो. त्यामुळे निरीक्षणात वस्तुनिष्ठता येते. या साधनांद्वारे निरीक्षणकर्ता आणि निरीक्षण केली जाणारी पद्धती या दोहोंवर नियंत्रण ठेवले जाते.

नियंत्रित निरीक्षणाचे गुण (Merits of Controlled Observation)

(१) नियंत्रित निरीक्षणात निरीक्षणाचा उद्देश स्पष्ट करून त्यानुसार निरीक्षण योजना तयार केली जाते. त्यामुळे पुढे अडचणी निर्माण होत नाही.

(२) निरीक्षण करण्यापूर्वीच निरीक्षण योजना तयार केली जाते. त्यामुळे निरीक्षण क्रमबद्ध आणि व्यवस्थित होते. तसेच व्यवस्थित तथ्यांचे संकलन करणे शक्य होते.

(३) नियंत्रित निरीक्षण हे अधिक विश्वसनीय असते. या निरीक्षणाद्वारे संकलित केलेली तध्ये सुद्धा विश्वसनीय असतात. ती तथ्ये समप्रमाणित असतात.

(४) नियंत्रित निरीक्षणात वेळ, श्रम आणि पैशाची बचत होते.

नियंत्रित निरीक्षणाचे दोष (Demerits of Controlled Observation)

१) व्यक्तीच्या व्यवहाराचे व्यवस्थित रूपात अध्ययन कठीण आहे. कारण मानवी हा गतीशील आहे. म्हणून निरीक्षणाची सर्व तयारी करून देखील निरीक्षणकर्ता योग्यच तथ्याचे व्यवहार संकलन करीलच असे नाही.

(२) या पद्धतीत निरीक्षणापूर्वीच निरीक्षण योजना तयार केली जाते. त्यात बदल करण्याचे स्वातंत्र्य निरीक्षण कर्त्याला नसते. त्यामुळे वेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास अडचणी निर्माण होतात.

(३) नियंत्रित निरीक्षणात निरीक्षणकर्ता समाजजीवनाच्या केवळ बाह्य घटनांचेच निरीक्षण करू शकतो.

(४) नियंत्रित निरीक्षणामध्ये फक्त काही विशिष्ट घटना किंवा व्यवहाराचे निरीक्षण करणे शक्य आहे. सर्वच प्रकारच्या व्यवहाराचे निरीक्षण या पद्धतीद्वारे केले जाऊ शकत नाही.

नियंत्रित व अनियंत्रित निरीक्षणातील फरक

(Distinction Between Controlled and Un-Controlled Observation)

(१) नियंत्रित निरीक्षणात ज्याचे अध्ययन करायचे आहे, त्या घटना आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जाते. याउलट अनियंत्रित निरीक्षणात अध्ययन करण्यात येणाऱ्या घटना आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात नाही.

(२) नियंत्रित निरीक्षण हे स्वाभाविक नसते. त्यात कृत्रिमता आढळून येते. परंतु अनियंत्रित निरीक्षणात निरीक्षणकर्ता आणि परिस्थिती ही स्वाभाविक परिस्थितीत असते.

(३) नियंत्रित निरीक्षणात निरीक्षणकयांवर देखील नियंत्रण ठेवले जाते. तो काही निश्चित तंत्राचा आणि पद्धतीचा उपयोग करून निरीक्षण करतो. परंतु अनियंत्रित निरीक्षणात मात्र संशोधन कर्त्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. तो समूहात जाऊन स्वतंत्रपणे निरीक्षण करतो.

(४) नियंत्रित निरीक्षणात निरीक्षण अनुसूची, क्षेत्रीय नोंदी, नकाशे, कॅमेरा, टेपरेकॉर्डर इत्यादी तंत्र व साधनांचा उपयोग करतो. परंतु अनियंत्रित निरीक्षणात मात्र या तंत्र व साधनांचा उपयोग केला जात नाही.

 (५) नियंत्रित निरीक्षणात निरीक्षण योजना ही निरीक्षणापूर्वीच तयार केली जाते. आणि त्यानुसारच निरीक्षण कार्य केले जाते. याउलट अनियंत्रित निरीक्षणात मात्र निरीक्षणाची अशी कोणती योजना तयार करण्याची आवश्यकता नसते.

(६) नियंत्रित निरीक्षणात विविध तंत्रे आणि साधनांचा अवलंब केला जातो. त्यामुळे यामध्ये घटनांचे सखोल आणि सूक्ष्म अध्ययन केले जात नाही. तसेच समूहाच्या जीवनासंबंधित गोपनीय तथ्याचा शोध घेणे शक्य नसते, परंतु अनियंत्रित निरीक्षणात विशेषता सहभागी. निरीक्षणामध्ये घटनांचे सखोल व सूक्ष्म अध्ययन केले जाते.

(७) नियंत्रित निरीक्षणात निरीक्षणकर्त्यावर नियंत्रण ठेवले जाते. त्यामुळे निरीक्षणकर्त्यांचे व्यक्तिगत विचार, आदर्श, मूल्ये इत्यादींचा परिणाम निरीक्षणावर पडत नाही. परंतु अनियंत्रित निरीक्षणात निरीक्षणकर्त्यावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे निरीक्षणकर्त्यांचे व्यक्तिगत विचार, आदर्श, मूल्ये इत्यादींचा परिणाम

(३) सामूहिक निरीक्षण (Mass Observation)

सामूहिक निरीक्षणात नियंत्रित व अनियंत्रित निरीक्षण या दोन्ही पद्धतीचे मिश्रण आढळून येते. एकाच सामाजिक समस्येचे किंवा सामाजिक घटनाचे निरीक्षण अनेक संशोधनकर्ते किंवा निरीक्षणकर्त्याद्वारा केले जाते. हे सर्व संशोधनकर्ते सामाजिक घटनेच्या वेगवेगळ्या पैलूचे विशेषज्ञ असतात. अशा निरीक्षणास सामूहिक निरीक्षण असे म्हणतात

P.V. यंग (Hsin Pao Yang) यांच्या मते, "सामूहिक निरीक्षण हे नियंत्रित आणि अनियंत्रित निरीक्षणाचे संमिश्रण आहे. यामध्ये अनेक व्यक्ती मिळून माहितीचे संकलन करतात. आणि नंतर एका केंद्रीय व्यक्तीद्वारे त्या सर्व माहितीचे संकलन आणि त्यापासून निष्कर्ष काढले जाते." (Mass observation is a combination of controlled an uncontrolled observation. Mass Observation depends on the observing and recording of information by a number of people and the pooling and treatment of their contribution by a central person. - Hsin Pao Young.)

 

सामूहिक निरीक्षणात एका किंवा काही विशिष्ट निरीक्षणकर्त्यावर निरीक्षणाचा भार पडत नाही. अनेक विशेषज्ञ संशोधनकर्ते निरीक्षणाचे कार्य करतात. अशा प्रकारचे निरीक्षण कार्य एका व्यक्तीला परवडणारे नसते. कारण या कार्याकरिता अधिक पैशाची आवश्यकता असते. म्हणून या निरीक्षणपद्धतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात नाही. सर्वप्रथम १९४४ मध्ये जमैका येथील स्थानीय परिस्थितीचे अध्ययन करण्यासाठी सामूहिक निरीक्षणाचा उपयोग करण्यात आला होता.

सामूहिक निरीक्षणाचे गुण (Merits of Mass Observation)

(१) या प्रकारच्या निरीक्षणात पक्षपात होण्यास वाव नसतो.

(२) निरीक्षणातून वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष तथ्ये प्राप्त होतात.

(३) सामूहिक निरीक्षणातून काढलेले निष्कर्ष हे अधिक विश्वसनीय आणि समप्रमाणित असतात.

दोष: (Demerits )

(१) निरीक्षणकर्त्यांची अधिक संख्या असल्यामुळे या पद्धतीत अधिक पैसा खर्च होतो.

(२) प्रत्येक निरीक्षणकर्ता वेग-वेगळ्या साधनांचा उपयोग करतात त्यामुळे खर्च वाढतो.

 

(३) निरीक्षणकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे अधिक वेळ लागतो. कारण प्रथम अनेक निरीक्षणकत्यांनी गोळा केलेली माहिती एकत्रित केली जाते. नंतर ती माहिती संबंधित केंद्राकडे पाठविली जाते. तेथे त्या माहितीच्या संबंधात विचार विनिमय विचार करून निष्कर्ष काढले. जातात.

निरीक्षण तंत्राचे गुण किंवा महत्व

(Merits and Importance of Observation Technique)

((१) सोपे आणि प्राथमिक तंत्र (Easy Preliminary Technique) : तथ्य संकलनाची निरीक्षण ही अतिशय सोपी अशी पद्धत आहे. या पद्धतीचा अवलंब करताना कोणत्याही विशेष ज्ञानाची आवश्यकता नसते.

(२) यथार्थता व विश्वसनीयता (Accuracy and Reliability) निरीक्षणातून काढलेले निष्कर्ष हे यथार्थ आणि विश्वसनीय असतात. स्वतः संशोधनकर्ता किंवा निरीक्षणकर्ता तथ्य संकलन करतो तथ्य संकलन करताना काही प्रश्न निर्माण झालेत तर त्या प्रश्नांचे समाधान करण्याची संधी त्याला असते. तथ्यांची यथार्थता व विश्वसनीयता तपासून घेता येते..

(३) गृहितकृत्याच्या निर्मितीमध्ये सहाय्यक (Helpful in the Formulation of Hypothesis) निरीक्षणकर्ता अनेक घटनांचे तसेच एकाच घटनेच्या विविध पैलूंचे निरीक्षण करीत असतो. त्यामुळे निरीक्षणकर्त्याचा अनुभव समृद्ध होतो.

(४) लोकप्रिय तंत्र (पद्धती) (Most Popular Technique): निरीक्षण पद्धती ही विशेष लोकप्रिय आहे. कारण ही सोपी व प्राथमिक पद्धती आहे.

(५) सत्यापनाची सोय (Facility of Verification) : निरीक्षण पद्धतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत संकलित केलेल्या तथ्याच्या सत्यतेची पडताळणी करण्याची संधी असते. निरीक्षणकर्ता एकाच सामाजिक घटनेचे वारंवार निरीक्षण करून त्या घटनेची सत्यता पडताळून बघू शकतो..

 

(६) घटनांचे सखोल व विस्तृत निरीक्षण (Intensive and Detail Observa tion of Phenomenon) : निरीक्षण पद्धतीत सामाजिक घटनांचे सखोल व विस्तृत निरीक्षण करणे शक्य असते. कारण संशोधनकर्ता स्वतः त्या समूहात जाऊन निरीक्षण करीत असतो. त्यामुळे लहान लहान गोष्टी देखील निरीक्षणातून सुटू शकत नाही.

निरीक्षण तंत्राचे दोष किंवा मर्यादा

(Demerits or Limitations of Observation Technique)

(१) निरीक्षणकर्त्यांचा पूर्वग्रह (Prejudice of Observer) : निरीक्षणामध्ये निरीक्षणकर्ता हा आपल्या दृष्टिकोनातून निरीक्षण करून तथ्य संकलन करीत असते. नियंत्रित निरीक्षणाचा अपवाद सोडल्यास निरीक्षणकर्त्यावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे निरीक्षणकर्त्यांचा पूर्वग्रह, आदर्श, मूल्ये, दृष्टिकोण, आवड इत्यादी गोष्टींचा निरीक्षणावर परिणाम होतो.

(२) प्रत्येक व्यवहाराचे निरीक्षण अशक्य (Observation of Each Behaviour is not Possible) : सर्वच सामाजिक घटनाचे निरीक्षण केले जाते, असे म्हटले जाते. परंतु ही गोष्ट बरोबर नाही सर्वच घटनांचे निरीक्षण केले जाऊ शकत नाही. फक्त सामाजिक व्यवहाराच्या बाह्य अंगाचे निरीक्षण केले जाते. परंतु आंतरिक अंगाचे निरीक्षण केले जात नाही. व्यक्तीच्या भावना, विचार जाणून घ्यायचे असेल तर अशावेळी निरीक्षण पद्धत उपयुक्त ठरत नाही.

(३) व्यवहारामध्ये कृत्रिमता (Artificiality in Behaviours) : जेव्हा इतर व्यक्ती आपल्यामध्ये असते किंवा कुणी आपल्या व्यवहारांचे निरीक्षण करीत असेल. तेव्हा त्यांच्या मूळ वर्तनात परिवर्तन होते. त्यामुळे निरीक्षणकार्य सामाजिक व्यवहाराचे योग्य निरीक्षण करू शकत नाही.

(४) कालावधीची मर्यादा नसते (No Time Limitation) : निरीक्षणकर्ता एका निश्चित कालावधीत निरीक्षण पूर्ण करण्याचे ठरवितो परंतु निरीक्षण करताना त्याला वेगळे अनुभव येतात. कारण त्याने निरीक्षणासाठी जो कालावधी ठरविलेला असतो. त्यापेक्षा जास्त कालावधी निरीक्षणासाठी लागत असतो. काही घटनाची लवकर पुनरावृत्ती होत नसते. त्या घटनेचे निरीक्षण करण्यासाठी संशोधनकर्त्याला ती घटना कधी घडेल याची वाट बघावी लागते. म्हणून निरीक्षणासाठी किती कालावधी लागेल याची निश्चिती नसते.

(५) खर्चिक पद्धत (Expensive Method) : निरीक्षणाकरिता बराच खर्च येतो. या पद्धतीत संशोधनकर्ता प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन तथ्य संकलन करतो. त्यामुळे त्याच्या जाणे येणे, राहणे, खाणे पिणे आणि इतर कामासाठी बराच खर्च येतो. तसेच निरीक्षणासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे निरीक्षणावर संशोधनकर्त्याचा बराच खर्च होतो म्हणून ही खर्चिक पद्धत आहे

निरीक्षण तंत्राच्या विश्वसनीयतेमधील अडथळे

(Obstacles in Reliability in Observation Techniques)

(१) ज्ञानेंद्रियाच्या मर्यादा (Limitations of Senses) : निरीक्षण करण्याचे मुख्य ज्ञानेंद्रीय म्हणजे डोळे होय. परंतु अनेक प्रयोगातून हे स्पष्ट करण्यात आले की, आपल्या ज्ञानेंद्रियाची शक्ती  अचूक नसते.

जॉन मेज (John Madge) यांनी म्हटले की, "आपली ज्ञानेंद्रिये हे पर्याप्त प्रमाणात पक्षपात आणि अनिश्चित स्वरूपात कार्य करतात." 

ब्लॉकबर्न (Blackburn) यांनी लिहिले की, “मानसशास्त्रीय प्रयोगद्वारा हे सिद्ध झाले आहे की, कोणतीही व्यक्ती कोणत्या विशिष्ट परिस्थितीत काय बघतो, हे बऱ्याच प्रमाणात त्याच्या मन आणि शरीराची अवस्था, आराम, अडचणी पासून मुक्त, उत्साह आणि आत्मविश्वासाच्या मात्रा या गोष्टीवर अवलंबून असते."

(२) कृत्रिम व्यवहार (Artificial Behaviour): जेव्हा घटना स्वाभाविकरित्या घडते तेव्हाच निरीक्षणकर्ता त्या घटनेचे निरीक्षण करून योग्य निष्कर्ष काढू शकेल. परंतु सामाजिक घटना या नेहमीच स्वाभाविकरित्या घडतीलच असे नाही. जेव्हा त्या समूहातील लोकांना कुणी तरी बाहेरील व्यक्ती आपले निरीक्षण करीत असल्याची चाहूल लागते. त्याबरोबर त्यांच्या व्यवहारात कृत्रिमता निर्माण होते. त्यामुळे निरीक्षणकर्ता जे काही बघतो, ते त्या घटनेचे स्वाभाविक रूप नसते. अशावेळी त्या कृत्रिम व्यवहाराच्या निरीक्षणावरून काढलेले निष्कर्ष हे विश्वसनीय राहू शकत नाही.

(३) निर्वचनाचा प्रभाव (Effect of Interpretation) : निरीक्षणकर्ता सामाजिक घटना किंवा व्यवहारांचे निरीक्षण करतो. आणि त्या घटना वा व्यवहाराचा आपल्या पूर्वज्ञान किंवा पूर्वधारणेच्या आधारे अर्थ लावत असतो. त्यामुळे त्या घटना किंवा व्यवहाराचे वास्तविक अर्थाकडे दुर्लक्ष होते. अशाप्रकारे प्रत्यक्ष घटना आणि त्याबाबत आपण काढलेला अर्थ यात फरक असतो. म्हणून निरीक्षणाच्या विश्वसनीयतेमध्ये अडथळा निर्माण होतो.

 

(४) घटनेची अपर्याप्तता (Inadequacy of Phenomenon) : घटनाची अपर्याप्तता ही देखील निरीक्षणाच्या विश्वसनीयतेला प्रभावित करीत असते. अनेकदा घटनेच्या काही मोजक्या तथ्यामुळे त्या घटनेचे पर्याप्त विश्लेषण केले जात नाही. घटनेची काही वैशिष्ट्ये ही त्या घटनेचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्या काही वैशिष्ट्यांच्या आधारावर संपूर्ण घटनेचा अर्थ काढणे चुकीचे असते. घटनेचे सर्व पैलू लक्षात न घेता काही पैलूंच्या आधारावर काढलेला अर्थ हा त्या घटनेच्या संदर्भात चुकीचा असतो.

(५) निरीक्षणकर्त्यांचा व्यक्तिगत पक्षपात (Personal Bais of the Observer): निरीक्षणकर्ता हा एक व्यक्ती असतो. त्याचा एक व्यक्तिगत दृष्टिकोण असण्याची शक्यता असते. निरीक्षणकर्त्यांचा वैयक्तिक दृष्टिकोण, विचार, श्रद्धा, विश्वास, भावना इत्यादींचा परिणाम निरीक्षणावर होत असतो. निरीक्षणकर्त्याच्या या व्यक्तिगत पक्षपातामुळे तो घटनेचे वास्तविक स्वरूप लक्षात घेत नाही.

 

(६) अव्यवस्थित निरीक्षण (Unsystematic Observation) : निरीक्षण कार्य हे व्यवस्थित नसेल तर त्यामुळे देखील निरीक्षणाची विश्वसनीयता ही शंकास्पद राहण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा निरीक्षण योजना तयार केलेली असताना सुद्धा इतर काही परिस्थितीमुळे व्यवस्थित आणि क्रमबद्ध निरीक्षण करणे निरीक्षणकर्तयाला शक्य नसते. काही व्यावहारिक अडचणीमुळे निरीक्षण अव्यवस्थित होते. म्हणून अव्यवस्थित निरीक्षण देखील निरीक्षणाची विश्वसनीयता प्रभावित करीत असते.

 

Comments

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...