धर्माच्या अभ्यासाचे दृष्टीकोन :Perspectives of Study of Religion
एमिल
दुर्खीम : (१८५८-१९१७ )
-ज्यू कुटुंबात जन्म, वडील ज्यू धर्म
गुरू , कैथोलिक शिक्षेके च्या प्रभावातून ख्रिश्चन कैथोलिक धर्माचा प्रभाव
विल्यम रोबर्टसन स्मिथ च्या lectures
on Religious of the Semites चा प्रभाव
-प्रकार्यात्मक दृस्तीकोनाचा समर्थक –
“ समान श्रद्धा बाळगणाऱ्या व समान विधीत सहभागी होणाऱ्या मध्ये सामजिक ऐक्य भाव
निर्माण होतो.”
-ग्रंथ:- The elementary forms of religious life(1912)
-ऑष्ट्रीया
तील “अरुंटा” जमातीचा अभ्यास
-धर्माचा अर्थ
/व्याख्या:
Émile Durkheim defined religion as
a “unified system of beliefs and practices relative to sacred things”
(1915).
दुर्खीम - “पवित्र गोष्टींशी संबंधित श्रद्धा-विश्वास आणि
वर्तनाच्या
संबंधित एकवटलेली (व्यवस्था) प्रणाली”.
धर्माचे स्वरूप
:-
१)पवित्र-
अपवित्र वस्तू
२) सापेक्ष
संकल्पना
३)
श्रद्धा-विधी ची व्यवस्था
४)सर्वात्मवाद
(एडवर्ड टायलर ) व निसर्ग वाद (मैक्स मुलर ) चे खंडन
५)देवक वाद – अरुंटा जमातीच्या अभ्यासातून या संकल्पनेचा जन्म
Totem-
देवक
/कुलचिन्हं /प्रतिक विषयी च्या श्रद्धा आणि रीती- रिवाजातून धर्म निर्माण -हे
धर्माचे प्रारंभिक रूप आहे.
६)धर्म एक सामाजिक घटना /तथ्य असून त्याचा उदय समाजात होतो. त्याच्या
निर्माणास सामाजिक घटना जबाबदार असतात .
७) ईश्वर म्हणजे समाज; जे ईश्वराचे गुण आहेत तेच समाजाचे गुण आहेत. आणि स्वर्ग म्हणजे आदर्श समजाचे रूप होय.
-रॉबर्ट लेवी च्या मते -अमेरिका , आफ्रिका, आशिया खंडात देवक वाद आढळत
नाही …
-मैलीनोस्की याने धर्मा संबंधी व्यक्तीकरण आणि समूह मनाची संकल्पना
नाकारल्या आहेत
मैक्स वेबर (१८६४-१९२०)
जर्मन समाजशास्त्रज्ञ, ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथाचा अनुयायी
घटनाशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास (अनुभवता येणाऱ्या / निरीक्षणक्षम
असणाऱ्या घटनातील परस्पर संबंधाचा निरपेक्ष पद्धतीने अभ्यास )
ग्रंथ :-
The
Protestant Ethics and Spirit of Capitalism (1905)
The
Religion of China (1916)
The
Religion of India (1916-17)
Ancient
Judaism (1917-19)
Sociology
of Religion (1922)
धर्म विवेचन :-
-कार्ल मार्क्स यांच्या अर्थव्यवस्था मूलभूत मानायच्या मताचे खंडन
-अर्थ व्यवस्था आणि धर्म व्यवस्था यांचा परस्पर सबंध आहे. जशी अर्थ
व्यवस्था धर्मावर प्रभाव टाकते तसा धर्म ही अर्थ व्यवस्थेवर प्रभाव टाकतो
- धर्माचा अर्थ व्यवस्थेवरील
प्रभाव स्पष्ट करण्यासाठी त्याने ख्रिश्चन प्रोटेस्टंट
पंथाच्या विशेषतः Calvinism च्या निती शास्त्राचे विवेचन केले आहे. ही तत्त्वे भांडवलशाही
साठी कशी उपयुक्त ठरले याची मांडणी त्यांनी केली.
-प्रोटेस्टंट पंथाचे निती तत्त्वे:-
I.
वेळ हीच संपत्ती,
II.
कर्ज देणे म्हणजे पैसा कमवणे,
III.
धनातून धनाची निर्मिती,
IV.
पैसा वाचविणे म्हणजे पैसा कमवणे,
V.
काम हीच पूजा,
VI.
प्रामाणिकता हेच धोरण,
VII.
धन कमविणे आणि बचत करणे बुद्धिवंतांचे लक्षण
-क्न्फ्युशीयस धर्म हा इहवादी /भौतिक वादी होता. पारलौकिक जगाला त्यात
स्थान नव्हते. ज्या प्रमाणे ख्रिश्चन धर्मात सुधारणा न झाल्याने भांडवलशाही ची
व्यवस्था चिन मध्ये नाही.
-भारत-
धर्मनिरपेक्ष क्रिया आणि भांडवलशाही ला शक्तिशाली बनवणारी तत्वे
भारतीय समाजव्यवस्थेत/ नीती शास्त्रात नाहीत म्हणून भांडवलशाही चा विकास नाही.
हिंदू धर्म – रूढी प्रिय, जाती बंधिस्त व्यवसाय, ऐहिक जीवना
पेक्षा मोक्ष महत्त्वाचा, कर्म-पुनर्जन्म विचार, तंत्र-मंत्र -जादू-जप-तप ई. मुळे
भांडवलशाही नाही
बौद्ध धर्म :- तत्त्वज्ञान ऐहिक परंतु पुढील काळात प्रभाव
कमी आणि हिंदूचे अनुकरण म्हणून भांडवलशाही नाही.
मूल्यमापन :-
सोरोकीन यांनी जपान चे उदाहरण देऊन वेबेरचा
विचार नाकारला
-सैम्युअल यांनी ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथ नसलेल्या देशात भांडवलशाही चे उदाहरण देऊन वेबेरचा विचार
नाकारला.
मिल्टन सिंगर यांनी भारतातील जाती आणि संयुक्त कुटुंब भांडवलशाही
अडथला ठरले नाही हे सांगितले
-योगेद्र्सिंग यांनी वेवर चा शिद्धांत नसून आदर्श प्रारूप आहे असे
म्हटले
जोतीबा फुले – (1827-1890)
हिंदू धर्मातील माली(वर्ण- शुद्र ) जातीत जन्म
थोमस पेन च्या Rights of Man चा प्रभाव
ग्रंथ- तृतीय रत्न(१८५५)
ब्राम्हणांचे कसब (१८६९)
गुलामगिरी(१८७३)
शेतकऱ्याचा आसूड (१८८३)
इशारा (१८८५)
सार्वजनिक सत्य धर्म (१८८९)
धर्म विवेचन :-
१) सार्वजनिक सत्यशोधक धर्म ची स्थापना
(२४ सप्टेंबर १८७३)
२) जाती आणि वर्ण व्यवस्थेस साठी ब्राम्हणी धर्म आणि त्यांचे ग्रंथ
कारणीभूत असल्याचे प्रतिपादन
३)निर्मिक संकल्पना – निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कश्या
साठी , मानवचे धर्म नसावे अनेक निर्मिक तो एक
४)मध्यस्थ / पुरोहित यांना विरोध – पूजा-पाठ सोवळे ओवळे ई.
पोटभरण्याची साधने आहेत
५)कर्मकांड विरोध
६) ब्राम्हणी ग्रंथ प्रामाण्य विरोध
७)अंधश्रद्धा विरोध
८)सर्वधर्मसमभाव ( विश्व कुटुब ची संकल्पना )
९)नीतिमान धर्माची संकल्पना
१०)सत्यशोधकी आचर संहिता- मानवतेची आचर संहिता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: १८९१-१९५६)
-बुद्ध-कबीर
-जोतीराव फुले यांना गुरु मानले, ज्यांनी धर्म या विषयी मानवतेची मांडणी केली आहे.
-बालपणी केळुसकर गुरुजी कडून बुद्ध चरित्र भेट
-कुटुंबातील कबीर पंथाच्या विचाराचा प्रभाव
ग्रंथ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे,
१० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे.
भारतीय संविधान चे शिल्पकार (१९५०)
भारतातील जाती शोध निबंध (१९१६)
जाती व्यवस्थे चे निर्मुलन (१९३६)
अस्पृश्य मुळचे कोण ?(१९४८)
शुद्र पूर्वी चे कोण? (१९४६)
क्रांती- प्रतिक्रांती (मृत्यू नंतर )
बुद्ध आणि त्यांचा धम्म (१९५६ -१९५७)
धर्म विवेचन :
1)वर्ण आणि जाती व्यवस्थेचे मूळ वेदिक ग्रंथा मध्ये
२)जाती व्यवस्था टिकविण्या साठी हिंदू/ब्राम्हणी धर्मात सती-केशवपण, पुनर्विवाह बंदी – बालविवाह
आदी प्रथा (अतिरिक्त पुरुष आणि अतिरिक्त स्त्री ची समस्या )
३) जाती व्यवस्था निर्मुलना साठी ज्या धर्म ग्रंथात जातीची भावना
अंतर्भूत आहे ती नष्ट केली पाहिजे.
४)बौद्ध धर्म -आदर्श समाज रचना
५) भारतीय इतिहास ब्राम्हणी आणि बौद्ध धर्माच्या संघर्षाचा इतिहास आहे
६)आदर्श समाज रचणे साठी समता-स्वातंत्र्य-बंधुता या मुल्यांची गरज
७)धर्म ही समाजाची गरज आणि व्यक्तिगत बाब
८)राजकीय दृष्टीने धर्म निरपेक्षतेला महत्व
९) धम्म आणि धर्म यात फरक ( धम्म हा नैतिकतेवरती आधारलेला असतो )
१०) वेदिक/हिंदू धर्माने
स्त्रियांचे अधिकार काढून घेतले
११) पुरोहीतशाही नष्ट झाली पाहिजे
१२) मंदिरांचे राष्ट्रीयीकरण
Comments
Post a Comment