हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, लक्षणे व उपचार
हृदयविकाराचा
झटका येणे – Heart attack :
हृदयविकाराचा झटका येणे अर्थात हार्ट अटॅकचे प्रमाण आज सर्वच वयोगटातील लोकांमध्ये प्रचंड वाढलेले आहे. बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, मानसिक तणाव अशा अनेक कारणांनी आज अगदी वयाच्या तिशीमध्येही हार्ट अटॅक आलेला दिसत आहे. त्यामुळे सर्वांनीच हार्ट अटॅक विषयी माहिती जाणून घेऊन त्यापासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक बनले आहे.
कोणास येऊ शकतो हार्ट अटॅक – Heart
attack risk factors :
I.
लठ्ठपणा, डायबेटीसचे रुग्ण, धमनीकाठिन्यता, हाय ब्लडप्रेशर, हाय ब्लड कोलेस्टेरॉल, मानसिक तणाव या समस्या असणाऱ्या लोकांमध्ये,
II.
हृद्यविकारासंबंधी
अनुवंशिकता असणे, कुटुंबातील आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ किंवा बहीण यापैकी कोणाला हार्ट अटॅक आलेला असल्यास आपणासही हार्ट अटॅकचा धोका असतो.
III.
सिगारेट (धुम्रपान), मद्यपान, तंबाखु, अमली पदार्थ इ. च्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये हृद्य विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.
हार्ट अटॅक का व कशामुळे येतो..?
I.
कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त
आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या
रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत
होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart
Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच
हृद्यविकाराचा झटका येतो
II.
हार्ट अटैक खालील चार स्थितींमुळे येऊ शकतो..
(1) धमनीकठिण्य किंवा अॅथोरोक्लेरोसिस (Atherosclerosis) –
धमनीकाठीन्यता हे हृद्यविकाराचे प्रमुख कारण बनत आहे. यामध्ये हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीभोवती चरबी, कोलेस्टेरॉल व तत्सम पदार्थांचा संचय होतो व त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद बनतात, त्यातील पोकळी कमी होते. त्यामुळे हृद्यास होणाऱया रक्त आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यास बाधा निर्माण होते त्यामुळे ऑक्सिजन आणि रक्ताच्या कमतरतेमुळे हृद्याचे स्नायुमधील पेशी मृत होऊ लागतात परिणामी हार्ट अटॅक येतो.
III.
उच्च रक्तदाब, मधुमेह,
लठ्ठपणा, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव, धूम्रपान-मद्यपान ह्यासारखी व्यसने यासारखी कारणे धमनीकठिण्यता (अॅथोरोक्लेरोसिस) निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात.
IV.
2) रक्ताची
गुठळी होणे –
काहीवेळा
हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये अचानक रक्ताची गुठळी तयार होते.
त्या गुठळीच्या अडथळ्यामुळे हृदयास योग्यरीत्या रक्तपुरवठा होत नाही परिणामी हार्ट
अटॅक येतो. अशा प्रकारे झटका येण्याचे प्रमाण तरुण वयामध्ये जास्त आहे.
V.
(3) काहीवेळेस
रक्तातील गुठळी रक्तप्रवाहाबरोबर हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये
जाऊनही अडथळा निर्माण करते.
VI.
(4) हृदयास
रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी अचानक आंकुचन पावल्यामुळेही हृदयाचा रक्तपुरवठा
खंडीत होऊ शकतो.
VII.
हार्ट अटॅकला सहाय्यक ठरणारी अन्य कारणे :
VIII.
कुटुंबामध्ये हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता असणे,
IX.
मधुमेह, धमनीकठिण्यता, उच्च रक्तदाब असे आजार असणे,
X.
रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असणे,
XII.
बैठी जीवनशैली,
XIII.
व्यायामाचा व शारीरिक श्रमाचा अभाव,
XIV.
धावपळीचे जीवन, मानसिक ताणतणाव,
XV.
चरबीयुक्त पदार्थ, तेलकट, खारट, सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, केक, मिठाई असा चुकीचा आहार वारंवार खाण्यामुळे,
XVI.
जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, तंतूमय पदर्थ, फळे कमी खाण्याची सवय,
XVII.
तंबाखू, सिगारेट, अल्कोहोल यासारखी व्यसने करणे, ही सर्व करणे हार्ट अटॅक येण्यासाठी जबाबदार ठरतात.
· हार्ट अटॅकची लक्षणे
– Symptoms of Heart
attack :
· अचानक छातीत वेदना सुरु होणे हे हार्ट अटॅकचे प्रमुख लक्षण आहे. छातीत होणाऱ्या त्या वेदनांना Angina
(हृद्यशूल) असे म्हणतात. हार्ट अटॅक येण्यापूर्वीची संकेत व लक्षणे खालील खालीलप्रमाणे असतात.
· छातीत दडपल्यासारखे वाटते,
· छातीत दुखायला लागते,
· छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.
· बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे,
· अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
· अशक्तपणा जाणवणे,
· उलटी किंवा मळमळ होणे,
· चक्कर येणे,
· दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
· श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.
· हार्ट अटॅक आल्यावर काय करावे
– Heart attack first aid tips :
· धावपळ व जास्त हालचाल करू नका.
· आपल्या मदतीसाठी कोणाला तरी बोलावून घ्यावे.
· अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट ही गोळी जवळ असतील तर ती गोळी घेऊन जिभेखाली ठेवावी. या गोळ्यांमुळे रक्त पातळ होते व रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होतो. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा हृद्याच्या स्नायुंना होतो.
· तातडीने 108 ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.
·
जर पेशंट बेशुद्ध असल्यास तातडीने 108
ह्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्यावी आणि रुग्णावर सीपीआर उपाय करावेत. यामध्ये पेशंटला दुसरी एखादी व्यक्ती आपल्या तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास देते व बाहेरून हृदयाला छातीवर दाब दिला जातो. रुग्णवाहिका येइपर्यंत हे उपाय करत राहावेत. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकते. प्रत्येकाने CPR उपाय कशाप्रकारे करावेत हे डॉक्टरांकडून समजून घ्यावेत.
· हार्ट
अटॅकमुळे होणारे दुष्परीणाम -Heart attack complication :
· हार्ट
अटॅकमुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच हार्ट अटॅक आल्याने
उपद्रव स्वरुपात अनेक गंभीर विकार उद्भवतात. यांमध्ये,
· हृद्याचे
अनेक विकार उद्भवणे,
· हृद्य निकामी होणे (Heart
failure),
· किडन्या निकामी होणे
यासारखे अनेक दुष्परिणाम हार्ट अटॅकमुळे होत असतात.
· हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी
खालील तपासण्या करतात :
· इलेक्ट्रोकार्डीयोग्राम ECG किंवा EKG
· स्ट्रेस टेस्ट
· 2D इकोकार्डिओग्राफी
· अँजिओग्राफी
· रक्तदाब तपासणी, कोलेस्टेरॉल चाचणी, ब्लड शुगर तपासणी या शिवाय हृदयाला झालेली इजा समजण्यासाठी आता स्ट्रेस थॅलीनम, पेट स्कॅन किंवा MRI सारख्या तपासण्याही कराव्या लागू शकतात.
·
हार्ट अटॅक आणि उपचार – Treatment of Heart attack :
·
अँजिओप्लास्टी (स्टेंट बसवून) आणि बायपास सर्जरी ह्या दोन उपचार पध्दती हार्ट अटॅकवर उपलब्ध आहेत.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ निर्माण होते किंवा रक्तवाहिन्यांचा मार्ग अरुंद बनल्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो किंवा येण्याची शक्यता असते.
·
अशा वेळी तातडीने रक्तवाहिनीतील अडथळा दूर करण्यासाठी आपले डॉक्टर निदान करून रुग्णाची स्थिती, गुंतागुंतीची शक्यता विचारात घेऊन अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेतील. अँजिओप्लास्टी करणे अजिबातच शक्य नसते किंवा धोक्याचे असते तेंव्हा तसेच अनेक ठिकाणी ब्लॉकेज असल्यास त्या रुग्णांमध्ये बायपासचा निर्णय घेतला जातो.
·
अँजिओप्लास्टी (Angioplasty) –
·
यामध्ये गुठळी झालेल्या रक्तवाहिनीत एक गाईड वायर ढकलली जाते आणि या वायरवरून एक फुगा जाऊन गुठळी असलेल्या ठिकाणी तो फुगवला जातो त्यामुळे गुठळीच्या ठिकाणी असलेले फॅटी पदार्थ चपटे होऊन रक्तवाहिनीच्या बाजूला सरकतात, रक्तवाहिनीची अरुंद झालेली पोकळी मोठी केली जाते. त्यामुळे धमनीतील अडथळा दूर होऊन हृद्याचा रक्तप्रवाह सुधारतो.
·
स्टेंट बसविणे –
·
अरुंद झालेली रक्तवाहिनी केवळ
अँजिओप्लास्टी करून बाजुला सारल्यास कालांतराने तेथे पुन्हा फॅटी पदार्थ जमा
होण्याचा धोका असतो. त्यामुळे अँजिओप्लास्टी करतानाच रक्तवाहिनीत असलेला अडथळा
काढून तेथे स्टेंट टाकावी जाते. स्टेंट म्हणजे एक प्रकारची स्प्रिंग असते. रक्तवाहिनीतील
अडथळा किती मोठा आहे, त्यावर
स्टेंटची लांबी निश्चित केली जाते.
·
यासाठी एका फुग्याद्वारे
अँजिओप्लास्टी करून रक्तवाहिनी फुगवली जाते त्यांनतर दुसऱ्या एका फुग्यावर बसवलेला
स्टेंट त्या रक्तवाहिनीत आत ढकलला जातो. हा फुगाही गुठळीच्या जागी फुगवला जातो आणि
त्यावरील स्टेंट उघडली जाते. यामुळे रक्तवाहिनीच्या बाजूला सरकवले गेलेले फॅटी
पदार्थ रक्तवाहिनीच्या आत जमा होण्यास अटकाव होतो.
·
बेअर मेटल आणि ड्रग इल्युटिंग
असे ‘स्टेंट’चे दोन प्रकार आहेत. बेअर मेटल स्टेंटमुळे रक्तपेशी त्या स्टेंटच्या
ठिकाणी जमा होऊन गुठळी बनण्याची शक्यता असते त्यामुळे आजकाल ‘ड्रग इल्युटिंग’
प्रकारचे ‘स्टेंट’ मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात. ड्रग इल्युटिंग स्टेंटमधील
औषधी घटकांमुळे रक्तपेशी या स्टेंटमध्ये जमा होत नाहीत. एकदा बसविलेला स्टेंट हा
साधारण दहा ते पंधरा वर्षे चालतो.
·
अँजिओप्लास्टीसह स्टेंट
बसवण्यासाठी रुग्णाला केवळ 3-4 दिवसच
हॉस्पिटलमध्ये राहावे लागते. आणि पुढील आठवडा विश्रांती घेऊन रुग्ण पूर्वी प्रमाणे
आपली दैनदिन कामे करू शकतो. डॉक्टरांनी दिलेली औषधे चालू ठेवावीत. त्यांच्या
सल्ल्यानुसार आहार, विहार, व्यायामाचे नियोजन ठेवावे व
नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
·
बायपास सर्जरी (Bypass surgery) –
·
अनेक ठिकाणी ब्लॉकेज असल्यास
बायपास सर्जरीचा अवलंब केला जातो. यामध्ये हृद्याच्या स्नायुंना रक्तपुरवठा
करण्यासाठी नवीन रक्तवाहिन्या जोडल्या (ग्राफ्ट केल्या) जातात. नवीन रक्तवाहिन्या
म्हणून छातीच्या आतमधील इंटर्नल मॅमरी ही रक्तवाहिनी ही जास्त प्रमाणात वापरली
जाते. याशिवाय हाता
किंवा पायातील रक्तवाहिन्यासुद्धा वापरली जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज बायपास
शस्त्रक्रिया खूप सोपी आणि सहज झाली आहे. पूर्वीइतका वेळ आणि त्रास होत नाही.
बायपास सर्जरीच्या ओपन हार्ट सर्जरी आणि बीटिंग हार्ट सर्जरी अशा दोन पद्धती आहेत.
·
नवीन रक्तवाहिनी जोडण्यासाठी
बायपासमध्ये शस्त्रक्रिया करून रुग्णाची छाती उघडी करून तिथले हाड कापले जाते व
नवीन रक्तवाहिनी जोडली जाते. किती ग्राफ्ट टाकतो आणि गुंतागुंत किती आहे यावर
शस्त्रक्रियेचा वेळ अवलंबून असतो. बायपास सर्जरी साधारण 4-6 तासामध्ये पूर्ण होते.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात दोन ते तीन दिवस ठेवले जाते.
·
त्यानंतर दहा-बारा दिवस रुग्णाला
हॉस्पिटलमध्ये राहावे लागते आणि पुढे महिनाभर रुग्णाने विश्रांती घेणे आवश्यक
असते. बायपास शस्त्रक्रियेनंतर हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे रुग्ण
जीवन व्यवस्थित जगू शकतो. दीड-दोन महिन्यानंतर आपल्या कामावर, नोकरीवर जाऊ शकतो. त्यानंतर
डॉक्टरांनी दिलेली औषधे चालू ठेवावीत. त्यांच्या सल्ल्यानुसार आहार, विहार, व्यायामाचे नियोजन ठेवावे व
नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. एकदा केलेली बायपास सर्जरी ही साधारण दहा ते
बारा वर्षे व्यवस्थित कार्य करील.
· हृदयविकाराचा
झटका येऊ नये यासाठी हे करावे उपाय :
· Heart
attack prevention
· निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास हार्ट अटॅकपासून बचाव करणे शक्य आहे. यासाठी आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी खालील हेल्दी टिप्सचे पालन करावे.
· धूम्रपान, मद्यपान करू नका.
· संतुलित व आरोग्यदायी आहार घ्या.
· आहारात हिरव्या पालेभाज्या, विविध फळे, कडधान्ये, सुखामेवा यांचा आवर्जून समावेश करा.
· चरबी व कोलेस्टेरॉल वाढवणारे पदार्थ खाणे टाळा.
· दररोज व्यायाम करा.
· सकाळी व संध्याकाळी फिरण्यास जावे.
· पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
· मधुमेह असल्यास ब्लडशुगर नियंत्रणात ठेवा.
· हाय ब्लडप्रेशर असल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
· मानसिक ताण घेऊ नका.
· अशी काळजी घेतल्यास हार्ट अटॅक येण्यापासून दूर राहता येणे शक्य आहे
· कॅन्सर म्हणजे काय व कॅन्सर कसा होतो ते जाणून घ्या..
· कॅन्सर
म्हणजे काय..?
· हृद्यविकार, मधुमेहाच्या बरोबरीने आज कॅन्सर हा सुद्धा एक गंभीर असा रोग बनला आहे.
कर्करोगात शरीरातील विशिष्ट अवयवांमधील पेशींमध्ये काही बदल घडून त्या पेशींच्या
संख्येत अनियंत्रित वाढ होते.
· या
विकृत झालेल्या पेशी स्वतःचे कार्य नीट पार पाडत नाहीत मात्र झपाट्याने वाढत जाऊन
शेजारील पेशींमध्ये रक्ताद्वारे इतरत्र पसरतात. या पेशी प्रथमतः कोणत्या अवयवांतून
वाढीस लागलेल्या आहेत यावरुन त्यांना त्या अवयवाचे नाव दिले जाते. उदा. फुप्फुसात
प्रथम वाढलेल्या पेशींना फुप्फुसाचा कॅन्सर असे म्हंटले जाते. तर याच विकृत पेशी
जेंव्हा इतरत्र हाडामध्ये पोहोचल्या तर त्यांना हाडाचा कर्करोग न म्हणता
हाडापर्यंत पोहचलेला फुप्फुसाचा कॅन्सर असे म्हणतात.
· ट्युमर्स
म्हणजे काय –
कॅन्सर हा विकृतीजन्य पेशींचा समूह असून याला कॅन्सरजन्य ट्युमर्स असेही म्हणतात. यांमध्ये विकृत पेशींची अनियंत्रीत वाढ होत असते. शरीरात निर्माण होणारे सर्व ट्युमर्स हे कॅन्सरजन्य असतीलच असे नाही.
· ट्युमर्स दोन प्रकारचे असतात. सौम्य ट्युमर्स (Benign
tumors) आणि घातक ट्युमर्स (Malignant tumors).यापैकी सौम्य ट्युमर्स हे कैन्सरजन्य नसतात. तर घातक ट्युमर्स हे कैन्सरजन्य असुन ते शरीरातील उतींवर आक्रमण करून त्या उतींना नष्ट करत असतात. तसेच त्यांमुळेच कॅन्सरजन्य पेशींची शरीरात अनियंत्रीत वाढ होत असते. पेशींची अनियंत्रीत वाढ झाल्याने ते कॅन्सरजन्य ट्युमर्स शरीरातील एका भागापासून अन्य ठिकाणी पसरत असतात.
· कॅन्सरचे
प्रकार –
प्रकाराचा विचार केल्यास जगामध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरने मरणाऱयांची
संख्या सर्वात जास्त आहे. तर भारतात आढळणाऱया कैन्सरच्या प्रकारामध्ये तोंडाच्या
कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. तोडांचा कर्करोगासाठी तंबाखु, गुटका,
धुम्रपान, पानसुपारी किंवा अन्य तंबाखुजन्य
पदार्थांचे व्यसन हेच प्रमुख कारण ठरत आहे. कॅन्सरचे प्रमाण वयाच्या 55 वर्षानंतर अधिक आढळते. स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये कॅन्सरचे प्रमाण अधिक
आहे. भारतीय स्त्रियांमध्ये सर्वायकल कँसर व स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त
आहे.
· यकृताचा कर्करोग – लिव्हर कॅन्सर
· कर्करोग वेळीच कसा ओळखावा..?
· कर्करोग किंवा कँसर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत आणि कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेमधीलच कँसर हा उपचारांद्वारे बरा होतो. अनेक व्यक्तींमध्ये जेंव्हा कँसरचे निदान केले जाते तेंव्हा बहुतांशवेळा कँसर हा दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचलेला आढळतो. आणि दुसऱ्या स्टेजमधील कँसर हा उपचाराच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कॅन्सरला वेळीच ओळखणे गरजेचे असते.
· वेळीच कॅन्सरचे
निदान करणे महत्वाचे..
कॅन्सर हा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रोगाच्या सुरवातीस रुग्णाला कोणतेही लक्षण जाणवत नाहीत. आणि कॅन्सरच्या बाबतीत सुरवातीच्या अवस्थेमधीलच कॅन्सर हा उपचारांद्वारे बरा होतो. अनेक व्यक्तींमध्ये जेंव्हा कॅन्सरचे निदान केले जाते तेंव्हा बहुतांशवेळा कैन्सर हा दुसऱया अवस्थेमध्ये पोहचलेला आढळतो. आणि दुसऱया अवस्थेतील कॅन्सर हा चिकित्सेच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कैन्सरला वेळीच ओळखणे गरजेचे असते.
· कॅन्सरची
सुरवातीची काही लक्षणे –
· कॅन्सरमध्ये
जाणवणारी सुरवातीची काही लक्षणे खाली सांगितली आहे. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीच
कँसरचे निदान करुन घ्यावे. जेणेकरुन सुरवातीच्या अवस्थेमध्येच कैन्सरचे निदान होईल
आणि कैन्सर असल्यास योग्य उपचाराने बरा होईल.
· खोकताना
रक्त येणे –
· खोकताना
रक्त येत असल्यास, थुंकीतून रक्त येत असल्यास
फुप्फुस कैन्सरची अशंका असते. अशावेळी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. कैन्सरचे
निदान करुन घ्यावे यांमध्ये फुप्फुस बायोप्सी, फुप्फुसाचा
एक्सरे, स्कैनद्वारे निदान केले जाते.
· मलाद्वारे
रक्त येणे –
· मलाद्वारे
रक्त येत असल्यास पोटाचा कर्करोग, स्वादुपिंड कैन्सर, आतड्यांचा कर्करोग आणि मलाशयाच्या कर्करोगाची अशंका येते. तेंव्हा मलातून
रक्त येत असल्यास वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे
गरजेचे असते.
·
· लघवीतून
रक्त येणे –
· लघवीतून
रक्त येत असल्यास किडनी कैन्सर, मुत्राशय कैन्सर आणि
प्रोस्टेट कैन्सरची अशंका निर्माण होते. तेंव्हा लघवीतून रक्त येत असल्यास वरील
प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.
·
· स्तनामध्ये
गाठ असणे –
· स्तनामध्ये
गाठ जाणवत असल्यास ब्रेस्ट कैन्सर (स्तनाचा कर्करोगाचे) निदान करुन घेणे अत्यंत
अवश्यक असते.
· रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव होणे –
· स्त्रीयांमध्ये रजोनिवृत्तीनंतर
जर रक्तस्त्राव येत असल्यास गर्भाशय कैन्सरचे निदान करुन घेणे गरजेचे असते.
·
· अन्न गिळताना त्रास होणे –
· अन्न गिळताना त्रास होत असल्यास तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सरची अशंका येते. तेंव्हा असे लक्षण जाणवल्यास कैन्सर नसल्याची खात्री निदानाद्वारे करुन घेणे गरजेचे असते.
·
· शरीरातील
असामान्य परिवर्तन –
· शरीरावर गाठ जाणवणे, वरचेवर चक्कर येणे, मळमळणे, भुक एकाएकी मंदावणे, अन्न गिळण्यास त्रास जाणवणे, अधिक दिवस अतिसार होत असल्यास, वजन एकाएकी कमी होणे, मल-मुत्र विसर्जन व्यवस्थित न होणे यासारखे बदल जाणवल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.
· प्रकारानुसार
कॅन्सर ची लक्षणे –
· तोंडात लाल व पांढरे चट्टे असणे, तोंडात जिभेवर गाठ किंवा जखम असणे.
· घशाचा कॅन्सर
–
· आवाजात बदल होणे, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे.
· फुफ्फुसाचा कॅन्सर –
· खोकल्यातून रक्त येणे, वजन कमी होणे, थुंकीतून रक्त पडणे.
· स्तनात गाठ असणे, काखेत गाठ असणे, निप्पलमधून पू, पाणी किंवा रक्त येणे.
· गर्भाशयाचा
कॅन्सर –
· अंगावर लाल किंवा पांढरे जाणे, पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, संबंधानंतर रक्तस्त्राव होणे, पाळी बंद झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा स्त्राव होणे.
· आतड्याचा
कॅन्सर –
· संडासवाटे रक्त जाणे, भुक कमी होणे, गुद्दव्दाराच्याजागी
गाठ असणे, अचानक वजन कमी होणे.
· किडनी व मुत्राशयाचा
कॅन्सर –
· लघवीवाटे रक्त जाणे. वरील कोणताही त्रास होत असल्यास व औषध उपचार घेऊन ही 1 ते 3 महिने त्रास बरा होत नसेल तर कॅन्सर तज्ज्ञांना भेटणे आवश्यक आहे.
· व्यसन असल्यास वेळोवेळी
कैन्सरचे निदान करुन घ्या –
· धुम्रपान, तंम्बाखु, गुटका, पानसुपारी इ. व्यसन असल्यास फुप्फुस कैन्सर, तोंडाचा कैन्सर, अन्ननलिकेचा कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो. मद्यपानाचे व्यसन असल्यास यकृत कैन्सर, पोटाचा कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो. यासाठी व्यसनाधीन व्यक्तींनी वरील प्रकारचे कैन्सर नसल्याची खात्री करुन घ्यावी. कैन्सर पासून दूर राहण्यासाठी व्यसनांपासून दूर रहावे. लक्षात ठेवा सुरवातीच्या स्टेजमधीलच कॅन्सर उपचारांद्वारे बरा होतो. दुसऱ्या स्टेजमधील कॅन्सर किंवा शरीरात इतरत्र पसरलेला कर्करोग चिकित्सेच्या दृष्टिने असाध्य असतो. यासाठी कॅन्सरला वेळीच ओळखून अटकाव करणे गरजेचे असते.
मधुमेह
– Diabetes mellitus
स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात
डायबेटीस
होतो म्हणजे शरीरात नेमके काय-काय
होते..?
) स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती कमी प्रमाणात होते किंवा शरीराच्या
पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत.
2) रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही.
3) रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढते.
4) साखरेचे शरीरात व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक
उर्जा मिळत नाही.
5) वाढलेली साखर कोणत्याही कार्याशिवाय मुत्रातून बाहेर टाकली जात असते.
6) मधुमेहाचा परिणाम आपल्या रक्तवाहिन्या, किडन्या,
हृदय, डोळे, मेंदू- मज्जासंस्था
(nervous system) यावर सतत होऊ लागतो.
मधुमेहाचे प्रकार – Types of diabetes
• मधुमेहाचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत.
(1) टाईप-1 मधुमेह
(2) टाईप-2 मधुमेह
(3) गरोदरपणातील मधुमेह (Gestational
Diabetes)
• टाईप-1 मधुमेह :
हा
मधुमेह प्रकार जास्त धोकादायक असून Type-1 मधुमेह
प्रकारचे रुग्ण कधीही डायबेटीस पासून बरे होत नाहीत. त्यांच्या शरीरात योग्य प्रमाणात
इन्सुलिनची निर्मिती होत नाही. यासाठी त्यांना नेहमी बाहेरून इन्सुलिन इंजेक्शन घेणे
गरजेचे असते.
• टाईप-2 मधुमेह :
अयोग्य
आहार, बैठी जीवनशैली यामुळे वजन जास्त प्रमाणात
वाढल्याने इन्सुलिन निर्मितीवर परिणाम झाल्याने Type-2
मधुमेह
होतो. टाईप-2 मधुमेह रुग्ण
हे योग्य आहार आणि नियमित व्यायाम या उपायांनी मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतात. तसेच
त्यांना गोळ्यांची किंवा इन्सुलिनचीही गरज भासू शकते.
• गरोदरपणातील मधुमेह :
•
प्रेग्नन्सीमध्ये अनेक स्त्रियांना रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास ह्या प्रकारचा मधुमेह होत असतो. यावर इन्सुलिन इंजेक्शनद्वारे नियंत्रण ठेवले जाते. गरोदरपणात मधुमेह झालेल्या साधारण 80%
स्त्रियांची ग्लुकोज लेव्हल बाळाच्या जन्मासोबत नॉर्मलला येते. तर काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतरही मधुमेह राहू शकतो.
• प्री-डायबेटिस
किंवा मधुमेह पूर्व अवस्था म्हणजे काय..?
• कोणत्याही
लक्षणाशिवाय डायबेटीस आपल्या शरीरात छुपलेला असतो. रक्तातील साखरेची तपासणी केल्यास
ती टाईप-2 डायबेटीस पेक्षा थोडी कमी असते. तेंव्हा
त्या अवस्थेस Prediabetes असे म्हणतात.
ही अवस्था म्हणजे धोक्याची एक घंटाच असून या अवस्थेत योग्य आहार व नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. मात्र जर प्री-डायबेटिस असूनही
त्याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा योग्य आहार व व्यायाम न केल्यास टाईप-2 प्रकारचा डायबेटीस होतो.
• मधुमेह होण्याची कारणे – Causes of Diabetes
टाईप-1 मधुमेहाची कारणे :
टाईप-1 मधुमेह हा एक autoimmune आजार आहे. टाइप-1 डायबिटीज हा प्रामुख्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेच्या विकृतीमुळे, स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशी नष्ट झाल्यानर होतो. टाईप-1 मधुमेहमध्ये आपलीच इम्यून सिस्टीम ही आपल्याच शरीरातील स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशीवर हल्ला करतात. त्यामुळे शरीरात योग्यप्रकारे इन्सुलिनची निर्मिती होत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहत नाही. पर्यायाने टाईप-1 प्रकारचा मधुमेह होतो. साधारण 10 टक्के रुग्ण हे ह्या प्रकारच्या मधुमेहाचे असतात
टाईप-2 मधुमेहाची
कारणे :
इन्सुलिनमुळे रक्तातील साखर ही शरीरातील पेशींपर्यंत जात असते. त्यामुळेच शरीराला ऊर्जा मिळत असते. मात्र टाईप-2 प्रकारच्या मधुमेहात शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखर पेशिंपर्यंत योग्यरीत्या जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते आणि पर्यायाने डायबेटिस होतो. तसेच टाईप-2 डायबेटिसमध्ये पुढील स्थितीत इन्सुलिन स्त्रावाच्या निर्मितीवर देखील परिणाम होत असतो. त्यामुळे शरीर पुरेसे इंसुलिन तयार करू शकत नाही.
टाईप-2 मधुमेहाची
सहाय्यक कारणे कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
· लठ्ठपणा हे टाइप-2 मधुमेहाचे प्रमुख कारण ठरत आहे. आज सर्वच वयाच्या व्यक्तींमध्ये जास्त वजन वाढल्यामुळे इन्सुलिन निर्मितीस बाधा पोहोचून टाईप-2 मधुमेह होण्याचे प्रमाण वाढत आहे.
· अनुवांशिकतेमुळे टाईप-2 मधुमेह होऊ शकतो. कुटुंबातील आजी, आजोबा, आई, वडील यांपैकी कुणालातरी मधुमेह असल्यास अनुवांशिकतेमुळे
मधुमेह होऊ शकतो.
· अयोग्य आहारामुळे, जास्त कॅलरीयुक्त आहार, फास्टफूड, जंकफूड, मिठाई, बेकरीचे पदार्थ, शीतपेये, तेलकट पदार्थ यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे,
· भरपेट जेवण करण्याच्या सवयीमुळे, भूक लागली नसतानाही सतत खात राहण्याच्या सवयीमुळे,
· बैठी जीवनशैली अंगीकारलेल्या व्यक्ती,
· व्यायामाचा अभाव,
· मानसिक ताणतणाव,
· ज्या स्त्रियांना गरोदरपणात मधुमेह झाला असल्यास त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना पुढील पाच ते पंधरा वर्षांत टाईप-2 मधुमेह होण्याची शक्यता असते.
· जन्मतः 3.5 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाच्या बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रियांमध्ये योग्य काळजी न घेतल्यास भविष्यात टाईप-2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.
·
मधुमेहाची लक्षणे – Symptoms of Diabetes
· मधुमेह हा आपल्या शरीरात छुप्या स्वरूपात असू शकतो त्यामुळे त्याची प्रत्येकवेळी लक्षणे दिसतीलचं असेही नाही. मधुमेहाची लक्षणे ही रक्तातील साखरेची चाचणी न करता ओळखू येण्यासारखी नाहीत. मधुमेहात खालील लक्षणे जाणवू शकतात
· वारंवार लघवीला जावे लागणे,
· वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे,
· अचानकपणे वजन घटणे,
· अधिक भूक लागणे,
· हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,
· डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे,
· मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,
· जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे,
· मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.
· डायबेटीसचे
असे करतात निदान – Test of
Diabetes :
· मधुमेहाचे निदान करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण फास्टिंग शुगर टेस्ट किंवा पीपी शुगर टेस्टद्वारे तपासले जाते.
· फास्टिंग
शुगर टेस्ट –
ही चाचणी उपाशीपोटी केली जाते.
· नॉर्मल प्रमाण – 70 ते 99 mg/dL पर्यंत.
· प्री-डायबेटीस अवस्था – 100 ते 126 mg/dL पर्यंत.
· मधुमेहाचे निदान – ब्लड शुगर 126 mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेह असल्याचे निदान होते.
· पीपी शुगर टेस्ट
(Post
Prandial test) –
जेवणानंतर ही चाचणी केली जाते.
· नॉर्मल प्रमाण – 140 mg/dL च्या आत असणे.
· प्री-डायबेटीस अवस्था – 140 ते 200
mg/dL पर्यंत.
· मधुमेहाचे निदान – ब्लड शुगर 200
mg/dL पेक्षा अधिक असल्यास मधुमेहाचे निदान होते.
·
डायबेटीसमुळे होणारे दुष्परिणाम :
·
मधुमेह असूनही रक्तातील साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास त्याचा वाईट परिणाम आपल्या हृद्य, डोळे,
किडनी, मेंदू आणि नाड्यांवर (मज्जासंस्थेवर) होतो त्यामुळे अनियंत्रित डायबेटीसमुळे हार्ट अटॅक येणे, डोळे जाऊन अकाली अंधत्व येणे, किडन्या निकामी होणे,
पक्षाघात (लकवा) किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी होऊन पाय कापून काढावा लागणे असे अनेक गंभीर दुष्परिणाम यामुळे होतात.
·
मधुमेह आणि त्यावरील उपचार – Treatment of Diabetes
·
मधुमेहावरील उपचाराचे चार प्रमुख उद्देश आहेत –
1) रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे.
2) डायबिटीजच्या दुष्परिणामापासून रुग्णाचा बचाव करणे.
3) वजन आटोक्यात ठेवणे.
4) उच्चरक्तदाब, हृद्यविकार यासारखे विकार होऊ न देणे.
·
योग्य आहार, व्यायाम आणि योग्य औषधोपचारामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. यासाठी मधुमेही रुग्णांनी त्यांचे आहार, व्यायाम आणि उपचारांचे नियोजन पुढीलप्रमाणे ठेवावे.
· मधुमेह आणि आहार नियोजन –
· डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणता आहार घ्यावा, कोणता घेऊ नये यासाठीचे डायट चार्ट बनवून घ्यावे.
· डॉक्टरांनी सुचवलेला आहार वेळच्या वेळी घ्यावा.
· वेळेवर आहार न घेतल्यास मधुमेही रुग्णांमध्ये ‘हायपोग्लायसेमिया’
होण्याची म्हणजे रक्तातील साखर एकदम कमी होण्याची शक्यता असते. यासाठी आहाराच्या वेळा पाळणे मधुमेहींसाठी अत्यंत गरजेचे असते.
· मधुमेही रुग्णांनी दर चार तासांनी थोडे-थोडे खाणे आवश्यक असते. एकावेळीचं भरपेट जेवणे टाळा.
· कमी कॅलरीजचा आहार घ्यावा. आहारात गरजेपेक्षा जास्त उष्मांक असल्यास त्यांचं रूपांतर चरबीत होते. यामुळे लठ्ठपणा होऊन इन्सुलिन निर्मितीस बाधा येते.
· हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, जास्त गोड नसणारी विविध फळे, मोड आलेली कडधान्ये, नाचणी, हातसडीचा तांदूळ यांचा आहारात समावेश करावा. यांमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ती मधुमेहामध्ये जास्त उपयुक्त ठरतात.
· मधुमेही रुग्णांनी साखरेचे गोड पदार्थ, विविध मिठाई, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट (बिस्किटे, पाव, केक इ.), तेला-तुपाचे पदार्थ, अंड्यातील पिवळा बलक, चरबीजन्य पदार्थ, कंदमुळे (बटाटा, रताळी इ.), जास्त गोड फळे (आंबा, फणस, चिक्कू, केळी इ.) आणि खारट पदार्थ खाऊ नयेत.
· मधुमेह आणि व्यायाम –
· डॉक्टरांनी सांगितलेला व्यायाम (Excercise
workout tips) नियमितपणे करावा.
· नियमित व्यायाम आणि योगासने करावीत.
· व्यायामामध्ये चालणे, पळणे (जॉगिंग), सायकलिंग यासारखे व्यायाम करू शकता.
· दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा.
· व्यायाम करताना शरीराला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी.
· व्यायामामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
· रात्री पुरेशी झोप घ्यावी. दुपारी झोपणे टाळावे.
· सततची बैठी जीवनशैली टाळावी. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे.
· मानसिक ताणतणावापासून दूर राहावे यासाठी प्राणायाम, ध्यान-धारणा करू शकता.
·
धूम्रपान, सिगारेट, तंबाखू, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावे मधुमेह आणि औषध उपचार –
·
मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांकडूनचं उपचार करून घ्या.
·
स्वतःच्या स्वतः ऐकीव माहितीवर किंवा जाहिरात पाहून घरगुती उपाय करत बसू नका.
·
मधुमेहावरील उपचारासाठी आपले डॉक्टर रुग्णाची प्रकृती, मधुमेहाचा प्रकार, रक्तातील साखरेचे प्रमाण विचारात घेऊन मधुमेहावरील गोळ्या किंवा इन्शुलिनचे इंजेक्शन देतील.
·
डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळच्या वेळी घ्यावीत.
·
नियमित ब्लड शुगरची तपासणी करुन घ्यावी.
·
डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यामध्ये रक्तदाब, हृदयाचे आरोग्य, डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
Comments
Post a Comment