Skip to main content

Indian Rural Community -module-no.-02

 Indian Rural Community

Module-02

भारतीय ग्रामीण समुदाय

ग्रामीण समुदायाचा अर्थ :

१) त्रि.ना. अत्रे (गावगाडा ):-“खेडणे म्हणजे जमीन कसणे, खेडूत म्हणजे जमीन कसणारा खेडूताची जी वस्ती खेडे म्हणजे गावडे होय.ज्या भरण्याची वस्ती शेतकर्‍याची असते.”

२) पुराण ग्रंथ : “जिच्या सभोवती किर्दसार -वहतीला योग्य जमीन आहे व जिच्या भोवती मात्तबर शेतकरी व पुष्कळसे मजूर आहेत,अश्या वस्तीला गाव म्हणतात.”

३) राधाकमल मुखर्जी :”खेडे म्हणजे असा मानवी समूह कि, ज्याच्या ठिकाणी सापेक्ष अशी सांस्कृतिक व सामाजिक साम्ये आढळतात, ज्यांचे स्वरूप अनौपचारिक व प्राथमिक समूहा सारखे असते. तेथे लोकसंख्येची घनता कमी असून शेती हा प्रमुख व्यवसाय असतो.”

४) हेरॉल्ड पिक :- “ ग्रामीण समुदायात अश्या परस्परसंबंधीत किंवा असबंधित व्यक्तीच्या समुहाचा अंतर्भाव होतो, जो एका मोठ्या कुटुंबा पेक्षा मोठा आहे, त्या व्यक्तीची घरे अगदी जवळजवळ किवा अनियमित वसलेली आहेत. या समुदायाच्या कृषी योग्य जमिनीवर शेती केली जाते व सभोवतालच्या पडीक जमिनीवर गुरे चारली जातात. शेजारच्या सिमेपर्यंत पसरलेल्या कृषी योग्य व पडीक जमिनीवर त्या समुदायाच्या मालकी हक्काची भावना असते.”

 

भारतातील खेड्याचा अभ्यास :

ग्रामीण समाजशास्त्राच्या अभ्यासाचे समाजशास्त्रा पूर्वीचा अभ्यास आणि समाजशास्त्रा नंतरचा विशेषतः ग्रामीण समाज शास्त्राच्या उद्या नंतरचा अभ्यास असे वर्गीकरण / विभागणी करावी लागेल विशेषतः भारताच्या संदर्भात ती अधिक सुलभ होते.

अ) समाजशास्त्रा पूर्वीचा- विशेषतः ग्रामीण समाजशास्त्राच्या उद्या पूर्वीचा  भारतातील अभ्यास :-

वेदिक आणि जैन -बौद्ध धर्माचे  ग्रंथ

“इंडिका” या ग्रीक राजदूत मेगैस्थेणीस च्या अभ्यासात भारतीय खेड्याचा स्वतंत्र गणराज्य असा उल्लेख

१६८९- ईस्ट इंडिया कंपनी द्वारे भारतीय खेड्याचा अभ्यास

मद्रास- मैसूर- बंगाल- बिहार ई मध्ये १८८० च्या दरम्यान फ्रान्सिस बुकानन यांच्या द्वारे खेड्याचा अहवाल

 

१८८३ ला जोतीबा फुले यांचा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ प्रकाशित

१८८८ ला ड्युक ऑफ केनोट भेटीत जोतीबा यांची  शेतकरी प्रतिनिधी म्हणून भेट

गावगाडा….ग्रंथ त्रि .ना.आत्रे १९१५

१९३५ बंगाल च्या शांतीनिकेतन जवळच्या खेड्याचा भट्टाचार्य ई. द्वारे अभ्यास

१९४० -गोखले संस्था पुणे – खेड्याचे  सर्वेक्षण

१९४३ -बंगाल दुष्काळ चा खेडे च्या जीवना वरील अभ्यास

१९४९ केशवराव जेधे यांची “शेतकरी कामगार पक्षाची” स्थापना

“जय जवान-जय किसान” ही घोषणा (१९६५)पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी केली

ब)१९५० नंतर समाजशास्त्रीय  अभ्यास / भारतातील ग्रामीण समाजशास्त्राच्या नंतरचा अभ्यास :-

१) एम. एन. श्रीनिवास :- (१९१६-१९९९)

@म्हैसूर राज्य (आजचे कर्नाटक) मुख्य रस्त्यावर “रामपुरा” या खेड्याचा अभ्यास क्षेत्रकार्य पद्धतीने (वास्तव्याला राहून) अभ्यास केला.

@१९४८ मध्ये १० महिने (ओक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने) १९५२ मध्ये ०२ महिने (एम.एस.विद्यापीठ बडोदाच्या मदतीने) असे एकूण १२ महिने अभ्यास केला.

@संरचनात्मक- कार्यात्मक दृष्टीने अभ्यास

@अभ्यासाचे सर्व कागदपत्रे जळाल्या नंतर फोर्ड संस्थेच्या अनुदानातून व पार्थ सारथी यांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञांच्या मदतीने जळीत कागदपत्रातील मजकूर पुन्हा मिळवला.

@१९७६ ला वरील अभ्यास “ A remembered Village” ग्रंथ प्रकाशित.

@रामपुरा चा अभ्यास

संरचना- एकूण ०४ जाती- पारंपारिक व्यवसाय -पशुपालन -कृषिप्रधान व्यवस्था

बलुता पद्धती- आलुतेदार व्यवस्था अस्तित्वात होती.

वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात होती

शेती मध्ये मालक -नोकर व्यवस्था होती, नोकर मुख्यतः अस्पृश्य किंवा खालच्या जातीचे होते. शेती साठी करार पद्धत होती . शेतकरी -कुळ पद्धत ही अस्तित्वात होती.

जाती आधारित श्रेणी रचना होती .लिंगायत ब्राम्हणाच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न करीत.

अस्पृश्यता अनेक क्षेत्रात पाळली जात होती.

ब्राम्हणी वर्चस्व होते. अनेक जातीच्या जात पंचायती होत्या. ग्राम पंचायत अधिक प्रभावी होती.

@ एम. एन. श्रीनिवास यांनी यांनी विकसित केलेल्या समाजशास्त्रीय संकल्पना :

प्रभू जाती -

संस्कृतीकरण- वरिष्ठ जातीच्या  संस्कृतीचे कनिष्ठ जाती कडून केले जाणारे अनुकरण यालाच ब्राम्हणीकरण  असेही संबोधले कारण मुख्यतः ब्राम्हण जातीचे कनिष्ठ जाती कडून अनुकरण केले जाते.

प्रा. मुजुमदार यांनी फक्त ब्राम्हण यांचे च इतर जाती कडून अनुकरण केले जाते यावर टीका केली. त्यास वि-संस्कृतीकरण असे संबोधले.

पाश्चातीकरण- पश्चिमी कडील देशाच्या संस्कृतीचे  पूर्वे कडील विशेषतः भारता सारख्या देशाकडून अनुकरण जाते.

आधुनिकीकरण :आधुनिक मूल्याचा स्वीकार जसे कि, स्वातंत्र्य- समता- बंधुता- न्याय ई…

२)डॉ. एस.सी.दुबे:- (१९२२ -१९९६)

@श्यामचरण दुबे यांनी आंध्रप्रदेश मधील (आजच्या तेलगांना)  हैदराबाद पासून २५ मैल अंतरावरील शामिरपेठ या खेड्याचा अभ्यास केला.

@ यावर आधारित त्यांनी १९५५ मध्ये Indian Village” ग्रंथ प्रकाशित केला.

@संबंधित अभ्यासाकरिता त्यांना उस्मानिया विद्यापीठातील सामाजिक सेवा विस्तार प्रकल्पाचे आर्थिक सहाय्य लाभले

 @या करिता त्यांनी एक अशी विशिष्ट पद्धत न वापरता ऐतिहासिक-भौगोलिक- समाजशास्त्रीय दृस्तीकोनाचा पर्याप्त वापर केला.

@रोबर्ट रेडफिल्ड यांनी १९३० ला मेक्सिको मधील जो खेड्याचा अभ्यास केला त्याच प्रमाणे दुबे यांनी केल्याचा विचार अनेक विचारवंत मांडतात.

@मौरीस ओप्लर म्हणतात कि, जगातील उत्तम खेड्याचा अभ्यास पैकी हा एक अभ्यास आहे.हा अभ्यास मौल्यवान आणि आव्हानात्मक असून आजच्या भारतीय खेड्याच्या संसोधना साठी मार्गदर्शक आहे.

@तेलंगानातील खेड्यातील जातीची श्रेणी (१९५५) हा ग्रंथ ही प्रकाशित केला आहे.

@ शमीरपेठ च्या अभ्यासाच्या आधारावर त्यांनी प्रतिपादन केले कि “जातीच्या श्रेणी चे मुख्य तत्व हे कर्मकांड विषयक शुद्धतेची आणि अशुद्धतेची कल्पना ही आहे.

@शमीरपेठ खेड्यातील जातीची श्रेणी ही परंपरा आणि पुराणकथा यांच्या द्वारे निश्चित झाली आहे.

@ प्रभावशाली जाती आणि ग्रामीण नेतृत्व हा शोध निबंध प्रकाशित केला मध्ये त्यांनी श्रीनिवास यांच्या प्रभू जाती या संकल्पनेचे टीकात्मक परीक्षण मांडून ही संकल्पना नाकारून ग्रामीण नेतृत्व प्रभू जातीच्या नव्हे तर व्यक्तीच्या हाती केंदित झालेली असते.

@ समुदाय विकास कार्यक्रम चा अभ्यास करून त्यांनी “The changing villages: Human Factors in community developments (1958) हा ग्रंथ प्रकाशित केला. हा अभ्यास प.उत्तर प्रदेशातील दोन खेड्यातील क्षेत्र कार्य पद्धतीवर आधारलेला होता. त्या सोबतच त्यांनी “Community Development: A Critical Review” हा ग्रंथ प्रकाशित केला.

@ समुदाय विकास कार्यक्रम आणि पंचायतराज व्यवस्थे मुळे ग्रामीण भागात सत्येची अनेक केंद्र स्थापन  झाली;शिवाय राजकीय संघर्ष निर्माण होऊन एकजिनसीपणाला धोका निर्माण झाला.

@सत्ता संघर्षामुळे समुदाय विकास कार्यक्रमचा लाभ जनतेला मिळाला नाही    

 

०३) आंद्रे बेताई:

@एम. एन. श्रीनिवास यांचे शिष्य- त्यांच्या प्रमाणेच खेड्याचे क्षेत्र कार्य पद्धतीनुसार अभ्यास /संशोधन

@तामिळनाडू मधील तंजावर जिल्ह्यातील श्रीपूर या खेड्याचा अभ्यास केला

@ Caste, Class and Power हा १९६६ मध्ये ग्रंथ प्रकाशित

@ त्यांनी आपल्या या अभ्यासात ब्राम्हण-ब्राम्हणेतर यांच्या मधील संबंधाचा अभ्यास केला.

@ सहभागी निरीक्षण (ब्राम्हण कुटुंबात एक वर्षे वास्तव्य ) तंत्राचा वापर करून राजकीय व्यवहार आणि राजकीय वर्तन यांचा अभ्यास केला.

प्रस्तुत अभ्यास हा अधिक गुणात्मक होता त्यांच्या मते कोणत्याही समाजाचे वास्तव हे तेथे वास्तव्य केल्या शिवाय कळू शकत नाही.

त्यांनी आपले गृहीतके /अभ्युपगम तपासण्यासाठी नियंत्रित निरीक्षण उपयुक्त आहे असे म्हटले.

जाती आणि वर्ग यांच्या परस्पर विरोधी विचारातून परिवर्तन गतिमान होते.

 

 

 

@Inequality Among Man हा ग्रंथ १९७७मध्ये प्रकाशित

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दुबे यांचे Indian Village, मुजुमदार यांचे Rural Profile – श्रीनिवास यांचे -India’s Villages- ए आर देसाई यांचे Rural Sociology in India  ई. 

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Social Audit- Case study- Module -01

  Module -०१ शासकीय योजनांचे लेखा परीक्षण -काही व्यष्टी अध्ययन प्रश्न -०१ मनरेगा : कधी सुरू झाले ? (When did it start?) वैधानिक सुरुवात (२००५): ७ सप्टेंबर २००५ रोजी जेव्हा ' राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ' (NREGA) संमत झाला , तेव्हाच त्याच्या कलम १७ ( Section 17) मध्ये सामाजिक लेखापरीक्षणाची तरतूद करण्यात आली होती. अंमलबजावणी (२००६): प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यापासून या प्रक्रियेची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. अनिवार्यता (२०११): ३० जून २०११ रोजी केंद्र सरकारने 'Audit of Schemes Rules, 2011' अधिसूचित केले , ज्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीचे वर्षातून किमान दोनदा (दर ६ महिन्यांनी) सामाजिक लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले. २. का सुरू झाले ? (Why was it started?) मनरेगामध्ये सामाजिक लेखापरीक्षण सुरू करण्यामागे खालील प्रमुख कारणे होती: अ) भ्रष्टाचारावर नियंत्रण ( Curbing Corruption) सरकारी योजनांमध्ये अनेकदा ...

भारतातील समकालीन सामाजिक समस्या Minor-II

  भारतातील समकालीन सामाजिक समस्या Module -०१ समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ' सामाजिक समस्या ' (Social Issues) म्हणजे केवळ व्यक्तिगत अडचणी नसून , त्या समाजाच्या रचनेशी आणि मूल्यांशी जोडलेल्या असतात. समाजशास्त्रज्ञांच्या मते , जेव्हा एखादी परिस्थिती समाजातील मोठ्या समूहाच्या मूल्यांना बाधा पोहोचवते आणि त्यावर सामूहिक कृतीद्वारे उपाययोजना करणे शक्य असते , तेव्हा तिला सामाजिक समस्या म्हटले जाते. खाली सामाजिक समस्यांच्या काही महत्त्वाच्या समाजशास्त्रीय व्याख्या दिल्या आहेत: प्रमुख समाजशास्त्रीय व्याख्या ( Sociological Definitions) १. पॉल लँडिस ( Paul B. Landis): " सामाजिक समस्या म्हणजे अशी परिस्थिती जी लोकांच्या कल्याणास धोका निर्माण करते आणि ज्यावर सामूहिक प्रयत्नांनी नियंत्रण मिळवता येते." २. रिचर्ड फुलर आणि रिचर्ड मायर्स ( Fuller and Myers): " सामाजिक समस्या म्हणजे अशी वर्तणूक किंवा परिस्थिती जिच्याकडे समाजातील लक्षणीय संख्येने लोक त्यांच्या सामाजिक मूल्यांचे उल्लंघन म्हणून पाहतात." ३. लॉरेन्स फ्रँक ( Lawrence K. Frank): " सामाजिक समस्या म्हणजे समाजातील अशा...

Sociology of Health -Module-1 2024

   Semester-IV Sociology of health आरोग्याचे समाजशास्त्र -पेपर -०६ What is the Sociology? समाजशास्त्र म्हणजे काय ? -समाजाचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक संबंधाचे शास्त्र / विज्ञान , आंतर्क्रियाचे  शास्त्र / विज्ञान ,  सामाजिक संस्थांचे शास्त्र / विज्ञान , सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र -विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is sociology of Health? आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे काय ? आरोग्य विषयक सामाजिक संबंधाचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक -आंतर्क्रियाचे   शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक संस्थांचे शास्त्र -विज्ञान , आरोग्य विषयक – सामाजिक प्रक्रियांचे शास्त्र विज्ञान , इ . व्याख्या करता येतील What is Health? आरोग्य म्हणजे काय ? “ WHO- “ शारीरिक -मानसिक आणि सामाजिक दृष्टीने समतोलाची अवस्था”    आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे   होय.”   आरोग्याच्या समाजशास्त्राचा अर्थ व व्याख्या : ( Meaning and Definition of Sociology of Health)   “ आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे आरोग्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून के...